Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 10

मला नाही वाटत असं काही असेल, तुला कसं समजलं हे तुला फक्त हेच हवं आहे की मी कुठे जायला नको आणि घरातच बसायला पाहिजे




रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 10



©️®️शिल्पा सुतार

........


कॉलेज संपलं श्रेया घरी आली, आई आजी तिची वाट बघत होत्या, त्या खूप तिला जेवणाचा आग्रह करत होत्या म्हणून त्यांच्यासोबत तिने थोडं खाल्लं, ती रूममध्ये येऊन बसली, काहीच करावसं वाटत नव्हतं, तिने लोळून घेतलं, सौरभचा विचार ती करत होती, मी लग्न करायची घाई केली का सचिनशी? आता नेमक सौरभ बोलतो आहे माझ्याशी, मला तेच हव होत ना, काय करू मी समजत नाही.


सचिनला काही सांगणार नाही मी सौरभशी बोलते आहे ते, त्याला त्याची नेहा मिळाली की मी निघून जाईल इथून, सचिनशी ही जास्त बोलायला नको आता,


सौरभने सचिनला फोन केला या नंबर वरून खूप कॉल आले कोण आहे?


"मी सचिन श्रेयाचा नवरा बोलतो आहे थोड काम होत, मदत करणार का थोडी? ",.. सचिन


बोला..


" श्रेया तुझ्याशी बोलायला आली तर तू बोलू नको तिच्याशी",.. सचिन


"मी असं का करेन? म्हणजे श्रेया माझी मैत्रीण आहे, मी बोलेल तिच्याशी, तुम्ही मला हे सांगू शकत नाही",.. सौरभ


"तुला समजत आहे का सौरभ मी काय म्हणतो आहे",.. सचिन


"समजत आहे तुम्ही मला श्रेया पासून दूर रहायला सांगता आहात, ते मला जमणार नाही एकाच कॉलेजमध्ये आहोत आम्ही",.. सौरभ


"तुला माहिती आहे ना तिचं लग्न झालं आहे, आणि श्रेयाने मला आधी सांगितल तू तिला नकार दिला होता, मग आता काय प्रॉब्लेम आहे?, अचानक कस काय बोलतोस तू तिच्याशी? ",.. सचिन


" हो तिच्या घरच्यांनी जबरदस्ती तिचं लग्न तुमच्याशी करून दिला आहे, मी बघेन मला काय करायच ते, तुम्ही प्लीज मला इकडे परत फोन करू नका आपला काहीही संबंध नाही",.. सौरभ


" अरे याला काय अर्थ आहे? माझ्या बायकोच्या संदर्भात मी कोणाशीही बोलू शकतो",.. सचिन


सौरभने फोन ठेवून दिला, विचित्रच मुलगा दिसतोय हा, कालपर्यंत तर तो श्रेयाला नाही म्हणत होता ना मग आज कसं काय तिच्या बाजूने बोलतो आहे? नक्की काय आहे हे प्रकरण? श्रेयाला सावध करायला पाहिजे, काय करू मी आता?.. सचिनला टेन्शन आलं होतं, श्रेया साठी मी आहे, अशा कोणत्याही फालतू मुलाच्या हाती तिला जाऊ देणार नाही.


आता श्रेयाला मी सोडणार नाही , समजल मला सौरभ चांगला नाही, तीन दिवसाच्या ऐवजी दोन दिवसात काम झाल होत सचिनच, तो दिल्ली हून घरी जायला निघाला मी सांगणार नाही श्रेयाला येतो आहे असं, घरच्यांनाही सरप्राईज देतो,


घरच्यांच जेवण झाल होत, सविता ताई श्रेया सोबत बसल्या होत्या जरा वेळ,


"मी जाते आत उद्याची तयारी करते" ,.. श्रेया आत आली, आज तिला खूप छान वाटत होतं, पण सासरच्या लोकांशी बोलताना मनात वाईट वाटत होत, हे सचिनच्या घरचे किती चांगले आहेत, त्यांना काय माहिती माझं आणि सचिनचं काय ठरलं आहे, मी सौरभशी बोलते हे चुकी करत आहे का? पण तसंच ठरल आहे ना आमचं की सचिन नेहाशी आणि मी सौरभशी लग्न करणार आहे, जाऊदे जास्त विचार नको करायला,

तिने सचिनला मेसेज केला,.. कुठे आहेस सचिन? झाल का जेवण? ,


सचिनची फ्लाइट लॅण्ड झाली होती, त्याने सांगितल नाही .. "नाही झाल जेवण अजून, आता जेवेन",


"का उशीर झाला? " ,... श्रेया


"जेवतो, तुला काळजी वाटते का माझी?",.. सचिन


"विचारु शकत नाही का मी सचिन? , काय करतोस तू? जेवला का? ,जनरल प्रश्न आहेत हे,",.. श्रेया


" ठीक आहे, मी झोपणार आहे आता",... सचिन


श्रेयाने फोन ठेवला, आत जावून कपडे बदलले, आई कडून आणलेली कंफर्टेबल नायटी घातली तिने, आता कोणी येणार नव्हत तिच्या खोलीत, ती आरामात होती,


सचिन घरी आला, सविता ताई खुश होत्या,.. "जा आत जावून फ्रेश होवुन ये, मग जेव",


"तुमच झाल का जेवण? ",.. सचिन


"हो झाल, माहिती नव्हत तू येणार आहेस ते नाही तर थांबली असती मी ",.. सविता ताई


श्रेया बसुन नोट्स लिहित होती, एकदम रूमच्या दाराचा आवाज आला, कोण आल रूम मध्ये? ती बघत होती, सचिन आत आला, स्लीवलेस शॉर्ट नाइटी मध्ये श्रेया खूप छान दिसत होती, सचिन तिच्याकडे बघत होता, तिने पटकन ब्लॅंकेट अंगावर घेतलं,.." तू आज येणार नव्हता ना सचिन? मग कसा काय आला तु?",..


" माझं काम झालं मग आलो, माझं घर आहे हे केव्हाही येईल मी",.. सचिन


"सांगायला हवं होतं ना येतांना",.. श्रेया


"काय प्रॉब्लेम आहे श्रेया?",.. सचिन


"काही नाही कपाटातून माझी पॅन्ट आणि टी-शर्ट दे",.. श्रेया


"का काय झालं?",.. सचिन


" सांगितलं ना माझे कपडे दे ",.. श्रेया


सचिन अजूनच श्रेयाकडे बघत होता,.." काय झालं तुझ्या कपड्यांना? ",


" सचिन आधी ते दार बंद कर आपल्या रूमचं आणि माझे कपडे दे",.. श्रेया


" तू अजिबातच कपडे घातले नाही का श्रेया? ",.. सचिन हसत होता


" तसं नाही सचिन मी नायटी घातली आहे ",.. श्रेया


सचिन आत गेला, कपाटातून त्याने श्रेयाचे कपडे तिला दिले, खूप हसत होता तो,.." मी घरी नसताना असं राहते का तू? कोणी आलं म्हणजे? ",


" आता इतक्या रात्री कोण कशाला येईल? मी आत्ताच कपडे बदलले, तु जा ना आत मध्ये आवरायला म्हणजे मी हे कपडे घालते",.. श्रेया


सचिन आत मध्ये चालला गेला, श्रेयाने कपडे बदलले, सचिन आवरून आला,


"तुझं जेवण झालं आहे का सचिन? ",.. श्रेया


"नाही तिकडे कोण देईल जेवायला",.. सचिन


"चल मग तुला जेवायला देते",.. दोघं बाहेर आले, सविताताई वाट बघत होत्या, श्रेयाने सचिनला जेवायला वाढलं, तो दिल्लीला काय झालं ते सांगत होता, तिघेजण छान बोलत होते,


"जा आता आराम करा उद्या सकाळी कॉलेज आहे ना श्रेया",.. सविता ताई


style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



कॉलेजचे नाव काढल्यानंतर सचिनला सौरभ आठवला, आज किती उलटून बोलत होता तो मला, नक्की तो श्रेयाला कॉलेजमध्ये भेटला आहे, विचारू का तिला?


श्रेयालाही सौरभच टेन्शन आलं होतं, नेमका आता लग्नानंतर तो बोलायला लागला, सचिनला सांगू का? मला नाही आवडत अस लपून छपून बोलण, दोघ रूम मध्ये आले, श्रेया तिची बुक्स नीट ठेवत होती,


"काय केलं मग आज कॉलेजमध्ये श्रेया? ",..सचिन बघत होता की तिला सौरभ भेटला की नाही,


" काही नाही लेक्चर होते मी नोट्स कम्प्लीट केल्या",.. श्रेयाने सांगितलं नाही सौरभ भेटल्याचं, खरंतर तिची हिम्मत झाली नाही सचिनला सांगायची की सौरभ माझ्याशी बोलतो आहे ,


मी का घाबरते आहे सचिनला?, मला सौरभ सोबत राहायचं आहे, पण सचिनला सांगितलं तर काय होईल? त्याने आई-बाबांना सांगितलं तर? सगळे मला रागवतील, आधीच आई म्हटली होती की त्या मुलाशी बोलू नको, काय करू मी? सचिनला नेहा मिळाली की निघून जाईल मी, आता माझ्याशी सौरभ बोलतो आहे तर काय हरकत आहे, बरोबर करते आहे मी, आता नको सांगायला सचिनला, तो थकला आहे, नंतर सांगेल.


सचिन विचार करत होता, नाही भेटला वाटतं हिला सौरभ, उद्याच सांगतो मी मोहनला की सौरभवर लक्ष ठेवायला, कोणीतरी माणूस नेमा त्याच्यावर, काय करतो तो कोणाला भेटतो सगळं समजेल,


सकाळी श्रेया कॉलेजला निघाली, ती पूर्ण रस्ता भर सचिनचाच विचार करत होती, खूपच बोर आहे लग्न झालेल आहे तर, मी असं सचिन शी खोटं बोलू शकत नाही, मला नाही आवडत हे, पण मला आधीपासून सौरभ सोबत राहायचं होतं, आता सौरभ माझ्याशी बोलतो आहे तर मी का नाही बोलणार,


पण माझ्या मैत्रिणींना सुद्धा आवडत नाही मी सौरभशी बोलते तर काय करू? कॉलेजच्या गेटमध्ये गाडी शिरत होती, तेवढ्यात तिला समोर सौरभ दिसला तो भेटायला आला, श्रेया सोबत बोलत तो कॉलेजमध्ये गेला, बरीच माहिती विचारात होता तो श्रेयाला,.. "चल आपण चहा घ्यायला जायचं का कॅन्टीनमध्ये? ",


"नको सौरभ मला क्लासेस आहेत",.. ती क्लासमध्ये येऊन बसली, आज सौरभ भेटला तर एवढा आनंद झाला नाही, उलट भीतीच वाटत होती कोणी बघेल का?


माही राधिका आल्या, तिने मैत्रिणींना सौरभ भेटला ते सांगितल नाही,


सचिन ऑफिसमध्ये पोहोचला, सुरुवातीच्या एक दोन मीटिंग झाल्या हा जो लॉस झाला आहे ते भरून काढण्यासाठी काय काय करायचंय बऱ्याच आयडिया होत्या त्यांच्याकडे, थोडेच दिवस लागतील आता, आधी इन्फॉर्मेशन बाहेर जात होती ती बंद झाल्यामुळे बराच फरक पडला होता.


मोहन आत मध्ये आला,.. "मोहन सौरभच्या मागे एक माणूस लावायला सांगितला होता काय झालं आहे",


"एक माणूस आहे त्याच्या मागे आणि त्या माणसाचा आता फोन आला होता, सौरभ सकाळी श्रेया मॅडमला भेटला, ते दोघे बोलत क्लासमध्ये गेले, नंतर सौरभ कॅन्टीनमध्ये गेला, तिथून तो फोनवर बराच वेळ बोलत होता",.. मोहन


" कोणाशी बोलत होता तो ",.. सचिन


" ते माहिती नाही ",.. मोहन


" मनीष तर नाही ना? त्याला काही काम सांगितलं श्रेयाच्या मागे जायचं",.. सचिन


" माहिती नाही त्याचा नंबर स्ट्रेस करायला सांगतो",.. मोहन निघून गेला


सचिन रागात होता, काय गरज आहे श्रेयाला अस त्या सौरभशी बोलायची, मला किती खोटं बोलली ती म्हणे की सौरभ भेटला नाही, आज तर छान बोलत मध्ये गेले ते, असं वाटतं आहे ना आता कॉलेजमध्ये जावा आणि श्रेयाला घरी घेऊन यावं आणि विचारावं कि ती असं का करते आहे? तो मुलगा फसवतो आहे सगळ्यांना.


दुपारी लंच ब्रेक मध्ये समोरून सौरभ जात होता, श्रेया त्याच्याशी बोलायला गेली नाही, नकोच लांबच बरं, कॉलेज सुटल्यावर तिच्या गाडी जवळ सौरभ उभा होता, तो बराच वेळ श्रेयशी बोलत होता, श्रेया घरी यायला निघाली,.. "मी आजच बोलते सचिन सोबत, त्याला सांगून देते की मला सौरभ भेटतो आहे रोज, आम्ही दोघे बोलतो आहोत, उगाच सचिनला बाहेरून समजलं तर तो चिडेल, हे असं लग्न झालं की फरक पडतो, आधी सौरभ माझ्यासोबत बोलतो आहे म्हणजे मोठी गोष्ट होती, आता त्याच गोष्टीचा खूपच टेन्शन येत आहे, काय करू समजत नाही,


संध्याकाळी सचिन घरी आला, श्रेया बाहेर काम करत होती, तो विशेष बोलला नाही तिच्याशी, श्रेयाला फरक जाणवला, काय झालं आहे आज?, याला काही समजल तर नसेल ना,


श्रेया आत मध्ये ये सचिनने बोलवत होता, बापरे हा का बोलवतो आहे मला, ती आत गेली


सचिन रेडी होत होता,.. "चल आपल्याला माझ्या मित्राकडे वाढदिवसाला जायचं आहे" ,


"आत्ता",..


"हो मग पार्टी संध्याकाळची असते ना",.. सचिन


"मी आली नाही तर चालणार नाही का",.. श्रेया


"नाही तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि आपल्याला जावं लागेल",.. सचिन विचार करत होता इथे घरी श्रेयाशी बोलण्यात काही अर्थ नाही, थोड बाहेर घेवून जावू हिला तिकडे नीट बोलू,


श्रेया बाहेर आली ती सविता ताईंना सांगत होती पार्टीला जायचं, श्रेयाने आत मध्ये येऊन खूप छान वन पीस घातला, केस मोकळे सोडले होते, खूप छान दिसत होती ती, सचिन तिच्याकडे बघत होता, तिने आरशातुन बघितलं होतं सचिन तिच्याकडे बघताना,


दोघं निघाले छान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आले, दोघ आत मध्ये गेले , सचिन ने रूम बुक केली होती, दोघ आत आले श्रेया आश्चर्याने बघत होती कुठे आहे इथे बर्थडे पार्टी? हा खोटं बोलला माझ्याशी नक्की त्याला काहीतरी समजलं आहे काही खरं नाही आज माझं,.. "इथे कुठे आलो आहे आपण सचिन?",


"मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे श्रेया",.. दोघं आत येऊन बसले,


"चहा कॉफी काही घेणार का?",.. सचिन


नाही... श्रेया बोलली,.. "काय झालं सचिन आपण इथे अस का आलो?",


"श्रेया तुला मला काही सांगायचं आहे का?, की मी बोलू आधी ",.. सचिन


"हो सचिन मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे",.. श्रेया


" बोल श्रेया",.. सचिन


"सचिन आज मला कॉलेजमध्ये सौरभ भेटला होता तो माझ्याशी आज व्यवस्थित बोलला",.. बहुतेक हेच कारण असेल आम्ही इथे आलो


सचिन तिच्याकडे बघत होता,.. "हो समजल ते मला, काय चाललं आहे हे? तू का बोलायला गेली होती त्याच्याशी? ",


"अरे माझा मित्र आहे तो आपलं असंच ठरलं ना मला सौरभ भेटला आणि तुला नेहा भेटली की आपण सोबत नाही राहणार मग आता काय प्रॉब्लेम आहे ",.. श्रेया


" तुला वाटत आहे का की सौरभ तुझ्या सोबत राहील, काय बोलला तो तुझ्याशी? ",.. सचिन


" काही नाही तो माझ्याशी व्यवस्थित बोलला आणि त्याला माझ्याशी मैत्री करायची आहे ",.. श्रेया बघत होती सचिन काय म्हणतोय ते, चिडला तर नाही ना हा, एक तर घरी बोलत असतो आम्ही तर कंट्रोल मधे असता हा, इथे हॉटेल मधे सांगता येत नाही,


" मला असं वाटत आहे तू सौरभ शी बोलायला नाही पाहिजे",.. सचिन


" का पण सचिन काय झालं? ",.. श्रेया


" जो मुलगा इतके दिवस तुझ्याशी बोलत नव्हता आता अचानक बोलतो आहे म्हणजे काहीतरी असेलच ना",...सचिन


" आधी आमची विशेष ओळख नव्हती, आता त्याला वाटलं असेल माझ्याशी बोलावं त्यात काय सचिन ?",..श्रेया


"मला वाटतं आहे तो मुलगा चांगला नाही",..सचिन


" तसं काही नाही मी सौरभ शी बोलू नये असं तुला नेहमी वाटतं, पण मी तुझ्या आणि नेहाच्या मध्ये इंटर फेयर करत नाही, तू मात्र नेहमी माझ्या आणि सौरभच्या मध्ये मध्ये करतो",.. श्रेया


" हो करतो मी काय प्रॉब्लेम आहे? माझी बायको आहेस तू आणि तू चांगलं वाईट काय करते आहे ते बघण माझं काम आहे ",.. सचिन


" म्हणजे तू तुझच ठरवलं की सौरभ चांगला नाही",.. श्रेया




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">


" हो तसंच आहे",.. सचिन


" मी तुझा ऐकणार नाही सचिन",.. श्रेया


" ऐकाव लागेल मी म्हणतो ते सौरभ पासून लांब थांबायच त्याच्याशी अजिबात बोललेल मला चालणार नाही, तो मुलगा आपल्याला सगळ्यांना फसवतो आहे मी स्वतः बोललो त्याच्याशी",.. सचिन


काय?


" की श्रेयाशी बोलू नको ",.. सचिन


" मग काय म्हटला तो ",.. श्रेया


" तो बोलला मी श्रेयाशी बोलेल",.. सचिन


" बरोबर बोलतो आहे सौरभ, आम्ही दोघे बोलणार",.. श्रेया


" श्रेया तुला चांगलं सांगून समजत नाही का तू नुकसान करून घेणार आहेस ",.. सचिन


"तुम्ही लोकांनी पहिल्यापासून माझा वापर केला तुला नुकसान म्हणजे तुझ्या बिझनेस मधलं वाटत असेल माझे बाबा पण असेच करतात पण मला काय वाटतं आहे याचा तुम्ही कोणीच विचार करत नाही आता सौरभ माझ्याशी बोलतो आहे तर काय प्रॉब्लेम आहे",.. श्रेया


" माझ्या प्रोजेक्ट मधला प्रतिस्पर्धी मनीष याने सौरभला तुझ्याशी बोलायला सांगितलं आहे नाहीतर सौरभला तुझ्यात इंटरेस्ट नाही",.. सचिन


" का करेल पण तो असं? ",.. श्रेया


" म्हणजे आपले लग्न मोडेल आणि तुझे पप्पा मला हेल्प करणार नाही ",.. सचिन


" मला नाही वाटत असं काही असेल, तुला कसं समजलं हे तुला फक्त हेच हवं आहे की मी कुठे जायला नको आणि घरातच बसायला पाहिजे, मी तुला लग्ना आधीच सांगितलं होतं सौरभ बद्दल तेव्हा तू मला बोलला की तू सौरभ बद्दल सोबत राहा आता काय प्रॉब्लेम आहे ",.. श्रेया


" जर तो खरच चांगला असता तर मला प्रॉब्लेम नव्हतं पण तू फसणार आहेस तो तुझ्याशी लग्न करणार नाही ",.. सचिन


" मी माझं माझं बघून घेइन",.. श्रेया


" अजिबात नाही, सारखं काय तू अस बोलते आहेस लग्न झाल्यावर पासून, मी इथे तुझी एवढी काळजी करतो आणि तू माझ्याशी फटकून वागते तुला तुझं चांगलं वाईट कळत नाही का? अजिबात मध्ये बोलू नको, नसेल चांगलं वागायचं तर जायचं नाही कॉलेजला परीक्षेच्या वेळी जा ऐकायला आलं ना",.. खूप मोठ्याने सचिन बोलत होता श्रेया दचकली, ती रडायला लागली, सचिन तिच्या जवळ आला, श्रेया बाजूला सरकून बसली, सॉरी श्रेया प्लीज रडू नको, मला समजून घे काय सांगतोय मी ते, प्रोजेक्ट बिझनेस सगळ सोड एक मित्र म्हणून एक हितचिंतक म्हणून मी तुला ही गोष्ट सांगतो आहे,


तरी श्रेया रडतच होती, तिला स्पष्ट समजलं होतं की आता इथून सुटका नाही, याला आवडत नाही मी सौरभ सोबत बोललेलं, मला आता सचिन सोबतच राहायचं आहे, सौरभ खरच वाईट आहे का?

 


🎭 Series Post

View all