रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 9

सौरभ गेला , श्रेयाला सुचत नव्हत काही काय करू , माही राधिका खूप ओरडत होत्या तीला, कशाला बोललीस तू त्या सौरभशी बावळट,रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 9

©️®️शिल्पा सुतार
........

सचिन ऑफिस मध्ये पोहोचला, त्याने मोहनला आत मध्ये बोलावलं, तो नेहा बद्दल चौकशी करत होता, खूप धक्कादायक माहिती त्याला मिळत होती, ठीक आहे आता हिच्याकडे बघण्यात काही अर्थ नाही, त्याला एकदम सौरभची आठवण झाली त्याने श्रेयाच्या कॉलेजमधल्या सौरभच नाव सगळं माहिती सांगितली, या मुलाची माहिती काढा आणि त्याला मला कॉन्टॅक्ट करायला सांगा, तो नसेल कॉन्टॅक्ट करत तर मला सांगा त्याचा फोन नंबर घेऊन, मी फोन करेन.

"ठीक आहे सर",.. मोहन

प्रोजेक्ट मध्ये लॉस कसा झाला यासाठी आज ऑफिसमध्ये खूप मोठी मीटिंग होती, केदार साहेब, सचिन तिथले दोन मॅनेजर, मोहन एका मोठ्या टेबल भोवती बसलेले होते, समोर प्रेझेंटेशन सुरू होतं, ही टीम जे बोलत होते ती माहिती कॉन्फिडन्शियल होती, यात जे ठरत होत ते बाहेर कोणालाच माहिती नव्हतं, बरेच पॉईंट्स निघत होते की का प्रोजेक्टमध्ये लॉस झाला, असिस्टंट मोहन सगळे पॉईंट लिहून घेत होता, त्यांच्या ऑफिस मधला एक मॅनेजर जाधव मुद्दामून हे काम करत होता, कसा लॉस होईल हे बघत होता, त्यांनी सही केलेले बरेच चलन मधे प्रॉब्लेम होता, खरं तर सचिनला ही मीटिंग आधीच घ्यायची होती पण लग्नामुळे जमल नाही,

"काय आहे यांचा प्रॉब्लेम जरा चौकशी करा",.. केदार साहेब सांगत होते

"आपल्या समोरची पार्टी ज्यांना हा प्रोजेक्ट हवा होता त्यांच्या बाजूने आहेत हे जाधव, पैसे घेतात ते या कामाचे, त्यांनीच मुद्दामून आपल्या प्रोजेक्टमध्ये लॉस कसा येईल या साठी हे काम केलेल आहे",..मॅनेजर

" कसं करायचं आता? यांच्या हातातुन सगळ काम काढून घ्या, त्यांना कळू देऊ नका, आपल्या ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांना ताबडतोब बोलून घ्या आणि जाधव यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवा, पोलिसांना त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घ्यायला सांगा, पेपर वर सही करून घ्या की महत्त्वाची माहिती मी इकडे तिकडे शेअर केली, त्यामुळे कंपनीला जेवढा लॉस झाला तेवढा मी बरेल भरेल, नाही तर मला अटक करा ",.. केदार साहेब

चला प्रॉब्लेम कशामुळे झाला हे समजलं होतं, जरा वेळाने पोलीस आले आणि जाधव यांना अटक झाली, केदार साहेब केबिनमध्ये बसलेले होते, सचिन समोर बसलेला होता, मोहन उभा होता, या जाधव यांनी जो प्रोजेक्टमध्ये गोंधळ घातला आहे तो आता कधी नीट होईल ?

" होईल बाबा मी बघतो काय करायचं ते",.. सचिन

केदार सर मॅनेजर ला दिल्लीच काम सांगत होते

"बाबा मी करतो ना नेहमी हे काम, मी जातो तिकडे",.. सचिन

"तुझ आता लग्न झाल एक आठवडा झाला नाही तू नको जावू",.. केदार साहेब

"मी जातो बाबा दिल्लीला महत्वाच आहे हे प्रोजेक्ट आपल्या साठी, एक दोन दिवसात होईल काम",.. सचिन

ठीक आहे

हा प्रोजेक्ट ज्यांना हवा होता ते मनीष इंजीनियरिंग वाले त्यांच्याकडेही मोठी मीटिंग सुरू होती, जाधव यांनी दिलेले पॉईंट्स ते बघत होते, सचिनच्या कंपनीत प्रोजेक्टमध्ये असाच लॉस झाला तर हा प्रोजेक्ट त्यांच्याकडून मोठी कंपनी काढून घेईल आणि आपल्याला देईल म्हणून त्यांच्याकडे खूप आनंद झाला होता,.. "नेमकं ते त्यांना वेळेवर अभिजीत साहेबांनी मदत केली",.. मनीष चिडला होता

"हो ना त्या बदल्यात त्या सचिनने त्यांच्या मुलीशी लग्न केलं",.. बाकीचे लोक माहिती देत होते,

" या दोघांची माहिती काढा, कोण आहेत ते यापुढे अजून त्या प्रोजेक्टमध्ये काय करता येईल ते बघू, आपले काम होत ते, असे काढून घेतात का आपल्या हातातून काम, सोडायच नाही त्यांना",.. मनीष

मनीष एका शी फोन वर बोलत होता,.." सचिन श्रेया या दोघांची माहिती हवी मला, लगेच ",

" हो देतो एका तासात ",..

आज श्रेया लवकर घरी आली, घरी येता येताच तिने आईला फोन केला होता, सासुबाई सोप्यावर बसून समोर टीव्ही बघत होत्या,... जेवून घे श्रेया,

श्रेया त्यांना कॉलेजला झालेल्या गमतीजमती सांगत होते

जरा वेळाने सचिन लवकर घरी आला, मला लगेच दिल्लीला जायचं आहे, तीन-चार दिवसासाठी,.. "श्रेया माझी बॅग भरायला मदत कर",

श्रेया सचिन सोबत आत मध्ये गेली,.. "खरंच चाललं आहे तू दिल्लीला?",

" हो प्रोजेक्ट साठी महत्वाच काम आहे, नेहमीच जातो मी",.. सचिन

"मी काय करू मग इथे सचिन?, तू नाही तर बोर होईल ",.. श्रेया

सचिन श्रेयाकडे बघत होता,.. "काय करू म्हणजे काय? घरचे सगळे आहे तिथे, सारखं आई कडे जायचं नाही",.

" प्लीज उद्याच्या दिवस जाते ना कॉलेज झाल्यावर ",.. श्रेया

"जरा वेळ थांबायचं अर्धा तास आणि घरी यायचं",.. सचिन

"असं काय करतो सचिन",.. श्रेया

"तुला नाही आवडत का इथे",.. सचिन

"तसं काही नाही तुझे आई-वडील, आजी आजोबा खूप चांगले आहेत, माझी खूप काळजी घेतात, काही बोलत नाही ते, ठीक आहे मी एक तासासाठी जाऊन येईन",.. श्रेया

"तू एवढे कपडे का घेतोय तीन दिवसासाठी",.. श्रेया

"अगं त्याच्यात माझे कोट आहे कोट घालावे लागतात ",.. सचिन

" तुझा फोटो पाठव कोट घालून मी तुला बघितलं नाही कधी कोट मधे, काय काम कराव लागेल तुला तिकडे ",..श्रेया

"आल्यावर सांगू का मी उशीर होतो आता" ,... सचिन

" ठीक आहे तू नाही तर मला करमणार नाही ",.. श्रेया

"काळजी करू नकोस, आरामशीर रहा",.. सचिन

चल मी निघतो , चल बाहेर, सचिन आवरून बाहेर आला, आजी आजोबा आई डायनिंग टेबलवर बसलेले होते, सगळे चहा घेत होते,

" आत्ताच लग्न झालं आणि लगेच कसं काय रे तू ऑफिस कामासाठी निघतो, श्रेयाला घेऊन जा सोबत",.. आजी

"नाही तिचं कॉलेज आहे, मी येणार आहे तीन चार दिवसात मी कळवतो",.. सचिन उठला, त्याने आजी आजोबांना मिठी मारली, आईला येऊन भेटला, बाजूला बसलेल्या श्रेयाला त्याने हलकी मिठी मारली, कपाळावर किस केला,

" चला येतो मी नीट रहा ",.. आई श्रेयाकडे लक्ष दे ग.

सचिन निघून गेला, श्रेयाचे हात खूप थरथर कापत होते चक्क मला जवळ घेतलं होतं सचिनने, सगळ्यांसमोर काही करता येत बोलता येत नाही, नंतर बघणार आहे मी याच्याकडे,

सचिन कार मध्ये त्याचा त्याचा खुश होता, श्रेयाच्या जवळ छान वाटत, ती काय रीअॅक्ट करेल काही समजत नाही, तिला राहायचं आहे की नाही माझ्यासोबत?, आज कॉलेजला गेली होती तर तो मुलगा भेटला होता का श्रेयाला? म्हणू का मी की तू नको जाऊ त्याच्याकडे माझ्यासोबत रहा, आल्यावर बोलू तिच्याशी,

सचिन दिल्लीला गेल्यामुळे श्रेयाला अजिबातच करमत नव्हतं, सारखं त्याने मारलेली मिठी आठवत होती, कपाळावर किस केलं होत त्याने, ती उठून आरशासमोर गेली, आरशात ती तिचं कपाळ बघत होती, तिला तिचा हसू आलं, रात्री जेवणाची वेळ झाली तरी श्रेया अभ्यासच करत होती, आजी रूममध्ये येऊन बसल्या, बहुतेक त्यांना आईंनी पाठवलं असेल,.. ती एकटी आहे तर लक्ष द्या,

आजी खूप गप्पा मारत होत्या,.. "पोहोचला का ग सचिन दिल्लीत?",

" नाही अजून मेसेज आलेला नाही त्यांचा ",.. श्रेया

चला जेवायला, सगळे जेवायला गेले, आई बाबा आजी आजोबा खूपच श्रेयाची काळजी घेत होते, अगदीच लहान मुलगी घरात असल्यासारखं करत होते, तिला काय नको हवं काय नको ते बघत होते,

सचिनचा फोन आला, मी व्यवस्थित पोहोचलो आहे, आता खाली जाऊन जेवून घेतो आणि झोपतो, श्रेया मी तुला करतो नंतर फोन,

श्रेया रूम मध्ये आली, तिला झोप येत नव्हती सचिन रूम मध्ये असतो तर बरं वाटत, जरा भांडकुदळ आहे तो पण चांगला आहे,

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये गेली, सचिनचा फोन आला होता तिला त्यांच्याशी बोलतांना धड धड होत होती,

"काय झालं माझ्याशी बोलत नाही का श्रेया",.. सचिन

"नाही सचिन अस काही नाही",.. श्रेया

" मी पाठवलेले फोटो बघितले नाही तू अजून",.. सचिन

"एक मिनिट बघते",.. श्रेया

सचिनने त्याचे कोट घातलेले फोटो श्रेयाला पाठवले होते, श्रेयाने फोटो बघितले कमालीचा हँडसम दिसत होता तो,..." जबरदस्त आहेत फोटो तुझे सचिन, छान दिसतो तुला फॉर्मल ड्रेस",

" खरंच हा टाय सूट होत आहे ना ",.. सचिन

" हो चांगला दिसतो आहे तुझ्या पर्सनॅलिटी कडे बघून कुठला टाय घातला आहे त्याच्याकडे लक्ष जात नाही",.. श्रेया

"हो का",.सचिन खुश होता

"मला आता क्लासेस आहेत , मी जाते ",.. श्रेया

" ठीक आहे बाय",.. सचिन

" कोणाशी बोलते आहे ग श्रेया एवढं हसून",.. माही

" सचिन शी आणि हसून काय",.. श्रेया

" चेहरा बघ जरा तुझा आरशात किती आनंद आहे तुझ्या चेहऱ्यावर ",.. राधिका

मला का आनंद झाला, थोडे दिवसच राहणार आहे मी सचिन सोबत, सचिन किती चांगला आहे पण, सगळं चांगलं आहे त्याच्या घरचे खूप चांगले आहेत ते सचिन पेक्षा माझी जास्त काळजी घेतात, त्याला नेहा आवडते ती तिकडंन आली की सचिन तिच्यासोबत लग्न करणार आहे, जावु दे ते दोघ आहेत कपल, श्रेया आत वर्गात येवून बसली

मी आई-बाबांकडे वापस जाईल, जर सौरभ हो बोलला तर त्याच्यासोबत राहील, मला नाही वाटत तो मला आता हो म्हणेल, मी एकटी राहीन, सचिनच्या घरचे सोडतील का मला? जर सचिनलाच माझ्यासोबत राहायचं नसेल तर घरच्यांचा काय प्रॉब्लेम असेल ना?

मनीष ऑफिस मध्ये बसला होता त्याच्या समोर सचिन श्रेया चा रीपोर्ट होता, दोघांचं वेगवेगळ्या ठिकाणी अफेअर आहे आणि तरी या दोघांचं लग्न झालं म्हणजे नक्कीच अभिजीत सरांनी सचिन सोबत डिल केलेली असेल, नेहा परदेशात राहते तिच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे आणि तिच्याशी नको बोलायला, हा सौरभ सोपा आहे त्याच्याशीच बोलूया, त्याला फोन लावा

सौरभला फोन लागला, मनीष बराच वेळ त्याच्याशी बोलत होता,... "तु जर मला मदत केली तर या बदल्यात मी तुला भरपूर पैसे दिल, काय हवय तुला? कॉलेज इलेक्शनला उभं राहायचं आहे ना, मी तुला सपोर्ट करेल स्पॉन्सरशिप देईल",..

"पण मला नाही करायचं आहे श्रेयाशी लग्न",.. सौरभ

"नको करू ना तू लग्न, तुला फक्त तिच्यासोबत थोडे दिवस फिरायचा आहे, काहीही करून हे सचिन श्रेयाच लग्न मोडायला पाहिजे म्हणजे तिचे वडील अभिजीत सर या सचिनला मदत करणार नाही, त्या श्रेयाला तुझ्या सोबत राहायचं आहे म्हणून तुझी मदत मागतो आहे मी,

"विचार करून सांगतो मी",..

"जास्त वेळ नाही माझ्याकडे जर तुला नसेल करायच हे काम तर लगेच सांग म्हणजे मी दुसऱ्याकडून मदत घेतो",.. मनीष

सौरभ विचार करत होता जर ह्या लोकांनी मला इलेक्शनला मदत केली तर किती चांगलं होईल त्या बदल्यात काय करायचं आहे फक्त थोडे दिवस श्रेयशी बोलायचं आहे नाहीतर मला तिच्यात इंटरेस्ट नाही, पैसे घेवू मदत घेवू या लोकांची आणि बाजूला होवु ,.." काही प्रॉब्लेम नाही मी करतो हे काम",

कॉलेज झाल्यावर श्रेया आई कडे गेली जरा वेळ बसली तोपर्यंत सासूबाईंचे दोन-तीन फोन आले होते, त्यांना करमत नव्हतं, श्रेया घरी गेली त्या तयार होत्या,

"कुठे जायचं आहे आई?",.. श्रेया

"शॉपिंगला जायचं आहे चल आटोप लवकर, तू दमली आहेस का? ",.. सविता ताई

" नाही येते मी",.. श्रेया आवरून आली, त्यांच्या मैत्रिणीचं खूप मोठं बुटीक होतं त्यात त्या दोघीजणी गेल्या,

"श्रेया तुला कॉलेजला जायला ड्रेस टॉप काय लागतील ते घे ",.. सविता ताई

श्रेयाने एक दोन ड्रेस घेतले, एक दोन ड्रेस ने काय होणार आहे, जरा भरपूर घे ना ड्रेस, त्यांनी श्रेयासाठी भरपूर कुर्ते शोधले, टॉप शोधले, नाईट वेअर घेतले, खूपच शॉपिंग झाली, त्यांनी स्वतः साठी दोन-तीन ड्रेस घेतले, जरा वेळा नंतर त्या दोघी घरी आल्या आज खूपच छान वाटत होतं

घरी बाबा आलेले होते, श्रेया गेल्या गेल्या त्यांना काय काय घेतलं ते जोर जोरात सांगत होती, तिचा आवाज ऐकून आजी आजोबा सुद्धा बाहेर येऊन बसले, ती आजींना तिचे ड्रेस दाखवत होती,.. "आज मला खूप ड्रेस घेतले सुंदर आहेत हे ड्रेस चांगले दिसतील ना आजी मला",

" हो बेटा खूप छान दिसतील",.. आजी

आईंनी आजीसाठी पण जे जे आणलं होतं ते त्यांना दिलं

"सचिनचा फोन आला होता का?",.. आजी

"हो सकाळी आला होता फोन, हे बघा आजी फोटो",.. आजी श्रेयाच्या फोन मधून सचिनचे फोटो बघत होत्या,.." खूपच छान दिसतो आहे ना सचिन ",

" हो मी पण तेच म्हटलं त्यांना",.. श्रेया

आजी हसत होत्या, जेवण झाल रात्री सचिनचा फोन आला, श्रेया तिच्या रूम मधे होती,.. "सचिन आज मी आईंन सोबत शॉपिंगला गेली होती ",

" काय काय घेतल",.. सचिन

"खूप ड्रेस घेतले आई चांगल्या आहेत ",.. श्रेया

" शॉपिंगला नेल तर चांगल्या का आई ",.. सचिन

" तस नाही खरच चांगले आहेत तुझ्या घरचे",. श्रेया

"आणि मी?",.. सचिन

"बर झालं आठवल, सचिन तू मला जवळ का घेतल होत काल दिल्लीला जातांना, मी काय सांगितल होत",... श्रेया

" माहिती आहे डोन्ट टच मी ",.. सचिन

मग?

"ते असच होत एज ए फ्रेंड ",.. सचिन

"ठीक आहे पण लक्ष्यात ठेव या पुढे ",.. श्रेया

हो, चल गुड नाइट...

सचिन सकाळी आवरत होता, त्याच्या पर्सनल असिस्टंट मोहनचा फोन आला,

"सर तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे सौरभचा नंबर मिळाला आहे, तुम्हाला फोन करायचा असेल तर करून द्या",.. त्याने नंबर पाठवून दिला

अजून मिटींगला वेळ होता तेवढ्या वेळात बोलता येईल म्हणून सचिनने फोन लावला, सौरभने फोन उचलला नाही

दोन-तीनदा सचिनने प्रयत्न केला, रिंग वाजत होती पण तिकडं कोणी फोन उचलत नव्हतं, बहुतेक क्लासेस सुरू असतील, नंतर करून बघु सौरभला फोन

श्रेया कॉलेजला गेली, क्लासेस झाले लंच ब्रेक सुरू होता, तिला सौरभ कॅन्टीन मध्ये जातांना दिसला नाही, चलते का माझ्यासोबत माही कॅन्टीनमध्ये सौरभ आहे त्याच्याशी थोडं बोलायचं आहे,

"आता काही गरज आहे तुला श्रेया असं करायची तू गप्प बस जरा श्रेया, मी अजिबात येणार नाही ",.. माही

श्रेया लाही आहे खरं तर आवडत नव्हत, पण एकदा तिला सौरभशी बोलायचं होतं, जावु दे नंतर बोलू, ती तिच्या मैत्रिणी सोबत बसलेली होती, सौरभ समोरून आला

श्रेया सौरभला बोलायचं आहे तुझ्याशी..

सौरभ समोर आला,.. हाय श्रेया

श्रेया आश्चर्य चकित होवुन सौरभ कडे बघत होती, कस काय आज बोलतो हा माझ्याशी?

"आपण ओळखतो एकमेकांना श्रेया" ,.. सौरभ

श्रेया काही म्हटली नाही, माही राधिका आश्चर्याने बघत होत्या,

आपण ओळख करून घेवू श्रेया, मस्त सोबत राहू,... फ्रेंड्स.. सौरभने हात पुढे केला, श्रेया गप्प होती, नको अस करायला, सचिनला समजल तर,

प्लीज श्रेया आय रियली लाइक यु.... फ्रेंड्स...

श्रेयाने हात मिळवला, श्रेयाला काही सुचत नव्हत, आधी कधीच न बोलणारा सौरभ असा अचानक बोलतो आहे, ती खुश होती,

" चल चहा घेवू आपण श्रेया, नंतर आम्हाला आता लेक्चर आहे" ,.. सौरभ

"नाही सौरभ भेटू नंतर" ,.. श्रेया

सौरभ गेला , श्रेयाला सुचत नव्हत काही काय करू , माही राधिका खूप ओरडत होत्या तीला, कशाला बोललीस तू त्या सौरभशी बावळट, झाल श्रेया मनासारखं तुझ्या, एकदम मूर्ख मुलगी आहेस तू, बोलू नको त्या सौरभ सोबत, तुझ किती चांगल्या मुलाबरोबर लग्न झालं आहे, तुझं तुला तुझ्या घरी नीट नाही राहता येत का,

श्रेया जाऊन वर्गात बसली तिला काही सुचत नव्हत, बाकीच्या मुली डबा खात होत्या, तिचा डबा तसाच पडलेला होता, चल श्रेया जेवून घे

"नाही मला नाही जेवायचं",.. श्रेया तशीच बसून होती,


🎭 Series Post

View all