Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 7

काय करू मी तिच्या सौरभला भेटतोच त्याला आणि त्याला सांगतो की हिला स्पष्ट नकार दे, ओरड तिच्यावर तेव्हा श्रेयाला समजेल तो नाही म्हणतोय ते,



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 7

©️®️शिल्पा सुतार
........

श्रेया शांत पणे झोपली होती, सचिन लोळून तिच्या चेहऱ्याकडे बघत होता, अगदी निरागस आहे ही, हे असा त्रास होतो मला हिच्याकडे बघताना, नेहाच काय करू या?, मोहनने केली असेल चौकशी,

लग्नाच्या आदल्या रात्री नेहाला फोन केला होता तेव्हा किती चिडून बोलली होती ती माझ्याशी, भांडली होती, मी तिला सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाही, मी बोलतो आहे घरच्यांशी, करतो आहे काही तरी, तिने ऐकलं नाही तेव्हा आणि आम्ही दोघे बोलत होतो तेव्हा ही कोणीतरी मुलाचा बोलण्याचा आवाज आला होता एकदा दोनदा, तेव्हा तिने फोन म्युट केला, नक्की काय आहे?

काल ही असच झाल होत, ही नेहा कोणा सोबत आहे तिकडे? त्यानंतर तिने एकदाही मला फोन केला नाही, फक्त तुझी लग्नाची बातमी इंटरनेटवर बघितली.. अभिनंदन एवढाच मेसेज आला होता तिचा , किती समजून सांगाव तिला, चार-पाच वर्षापासून हेच सुरू आहे,

आता त्याचं मन हळूहळू नेहा आणि श्रेयाची कम्पॅरिझन करत होतं, नेहा जरी हुशार आणि त्याच्या आवडीची होती तरी ती खूप डेंजर होती, काहीतरी लपवत होती, साधी अल्लड श्रेया त्याला जास्त आवडत होती, तिच्या मनात काही नसत, जे बोलायच ते डायरेक्ट बोलते ते, भांडते पण लपवा छपवी नाही श्रेया कडे,

जर हिला सौरभ मिळाला नाही तर? नाहीच मिळणार, ज्यावरून ती सांगते आहे तो मुलगा हिच्याशी एकदाही बोलला नाही, त्या मुलाला नाही आवडत श्रेया, त्याला आनंद झाला होता, मी श्रेया सोबत राहील, माझी बायको आहे ही, अरेंज मॅरेज मध्ये अस वाटत असेल ना आधी अनोळखी नंतर खूप जवळचे होतात दोघ, मग नेहाचं काय होईल? एकदा जाऊन नेहाला भेटावं लागेल,

सचिन थोड बाहेर आला, त्याने त्याच्या असिस्टंट मोहनला फोन केला,.. "काय झालं मोहन? नेहाची चौकशी करायला सांगितली होती ना",

"सर तुम्ही एकदा स्वतः जाऊन बघून या तिकडे",.. मोहन

"काय झाला आहे स्पष्ट सांग? ",.. सचिन

"सर नेहा मॅडमने एक वर्षापूर्वीच एका मुलाशी लग्न केलं आहे",.. मोहन

सचिन एकदम शांत झाला, एवढा मोठा धोका दिला मला नेहाने, त्या आधी किती वेळ मी तिच्याशी नीट बोलत होतो, तरी काही सांगितल नाही तिने मला, मागे मी तिला लग्नासाठी आग्रह करत होतो तेव्हा ती आलीच नाही वापस, आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी माझं लग्न ठरलं तिने बरोबर हा पॉईंट उचलला की तू लग्न करतो आहेस, उगीच भांडत होती ती माझ्याशी,

" का केलं असेल नेहाने असं? कोण आहे तो मुलगा?, काही माहिती मिळाली का अजून मोहन ? ",.. सचिन

" मॅडमच्या ऑफिस मधलाच मुलगा आहे, इंडियन आहे, सोबतच राहतात ते दोघ जेव्हापासून मॅडम तिकडे गेल्या, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो",.. मोहन

फोन झाल्यावर सचिनच्या फोनवर तिकडचे त्या दोघांचे फोटो मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सगळं दिसत होतं, तो खूपच रागात होता, मला इकडे गिल्टी वाटत आहे की मी श्रेयाशी लग्न केल, श्रेया सोबत बोलतो आहे, पण ही नेहा तर मला इथून गेल्यापासून धोका देते आहे, तिने जर मला स्पष्ट सांगितलं असतं लग्न केल तर मी काय केलं असतं? मला नेहाच्या वागण्यात फरक जाणवत होता, उगीचच चिडत होती ती मला टाळत होती.

जाऊ दे आता काय करूया? , श्रेया लगेच म्हणेल की नेहाने तुला नाही म्हटलं म्हणून माझ्या मागे येतो आहेस, पण असं नाही मला श्रेया खरंच आवडलेली आहे,

जाऊ दे आपण गप्प बसूया नेहाचं नाव यापुढे काढायचं नाही, बघू आता ही श्रेया काय करते? सौरभशी बोलते की नाही? तो नकार देईल मग मी श्रेयाला प्रपोज करेन, तो पर्यंत गडबड करायची नाही, तो टेन्शनमध्ये होता.

विचार करून तो झोपायला आला, श्रेया खरच काॅटवर लोळत होती, त्याने तिला तिकडे सरकवल, जवळ जावून कपाळावर किस केल, तो झोपला,

सकाळी जाग आली, श्रेया जागेवर नव्हती मागे गार्डनमध्ये ती बसलेली होती

सचिन जाऊन तिच्याजवळ बसला,

" किती थंडी आहे बाहेर हे घे तुझं जॅकेट",.. सचिन बघत होता श्रेया खूप खुश होती, खूप फ्रेश दिसत होती ती,

"किती छान वाटतं आहे ना सचिन इथे, केव्हाच त्या झाडावर एक पक्षी येतो आहे, मस्त काहीतरी फळ खातो आहे, तो त्याच्यात जगात रममान आहे" ,.. श्रेया

"तू एवढी हळू का बोलते आहेस? ",.. सचिन

" आवाज करू नको तो पक्षी घाबरेल" ,.. श्रेया गप्प बसुन निसर्गाचा आनंद घेत होती

"एवढा छान विचार पण करते श्रेया, चांगली वाटते अशी शांत ",.. सचिन

चहा नाश्ता आला, श्रेया आत आली, मग आज खुश श्रेया

" मला आवडत आहे इथे",.. श्रेया त्याच्या जवळ बसली

" मग घ्यायचं का आपण दोघांनी इथे घर ",.. सचिन

त्याने असं म्हटल्यानंतर श्रेया त्याच्याकडे बघत होती

"काय झालं? आमच्या जरी प्रोजेक्ट मध्ये लॉस झाला असला तरी बंगला घेवू शकतो मी तुझ्या साठी आता एका तासात",.. सचिन

" ते नाही रे तू माझ्यासोबत राहणार आहे का फ्युचर मध्ये? तू घे बंगला तुझ्यासाठी आणि नेहा साठी, मला बोलव कधीतरी तिथे पाहूणी म्हणून",.. श्रेया

तिने असं म्हटल्यानंतर सचिन समोर बघत होता, नेहाच नाव काढल्यावर तो दुःखी होता, का केल नेहाने अस? आधी स्वतः लग्न केल आणि आता माझ्यावर आरोप करून चिडते आहे ती की मी लग्न केल, मी बोलणार आहे तिला,

" काय झालं सचिन तू काय विचार करतो आहेस ",.. श्रेया

"काही नाही श्रेया",.. सचिन

कशाला सांगितलं हिला नेहाचं काय माहिती, मी नेहमी माझा आणि श्रेयाचा विचार करतो, आणि ही तिचं नाव खोडून तिथे नेहाच नाव टाकते,

चहा झाला

" तयार हो श्रेया आपण फिरायला जाणार आहोत ",. सचिन

"कुठे जायचं आहे? ",.. श्रेया

"इथेच बरेच पॉईंट्स आहेत ते बघू संध्याकाळपर्यंत वापस येऊ तुला आवडतो ना निसर्ग",.. सचिन

श्रेया तयार होत होती, तिने जीन्स घातली होती त्याच्यावर टॉप आणि जॅकेट शूज घालून खूपच छान दिसत होती ती अगदीच रेखीव बांधा, सुंदर केस मोकळे सोडले होते

सचिनही तयार होऊन आला,.." छान दिसते आहेस श्रेया",

श्रेया थोडी लाजली होती

" तुझं जॅकेट घे सचिन खूप थंडी आहे, नाही लागलं तर गाडीत ठेवता येईल",.. श्रेया

"तुझा हा ड्रेस मस्त आहे ",.. सचिन

हो सचिन चल आता,... पुरे माझ कौतुक

दोघ निघाले, खूपच छान वातावरण होत, सुंदर वळणाचा रस्ता होता, दोघी बाजूला झाडी होती, पुढे गेल्यानंतर एका बाजूला खोल दरी लागली, वेगळाच गारवा होता, एक एक पॉईंट बघत होते ते, डोंगर दर्यातून फिरतांना श्रेयाला एका जागी दगड पाया खाली आला, ती पडणार होती, सचिनने पटकन धरल, काळजी घे श्रेया, आता तिला चालतांना सचिनची गरज लागत होती, पाय थोडा दुखत होता, ती त्याचा हात धरून फिरत होती, सचिन श्रेयाचे फोटो काढत होता,

"सचिन तो कॅमेरा ठेव आणि जरा निसर्गाचा आस्वाद घे, नको काढु फोटो प्लीज ",.. श्रेया

"ठीक आहे तू म्हणते ना बघ ठेवला कॅमेरा ",.. सचिन

एका पॉईंट्सला खूप माकडं होते, अचानक एक मोठं माकड श्रेयाकडे आलं, श्रेयाने घाबरून सचिनला मिठी मारली,

"श्रेया काय करते आहेस तू सरक ",.. सचिन

" नाही सचिन मी सरकणार नाही, ते माकड जवळ येत आहे, सॉरी ",... श्रेया

"श्रेया अगं घाबरू नको काही करत नाही ते, आधी मला सोड बरं",.. सचिन

श्रेयाने सचिनला सोडलं, हात लाव त्याला,

नाही... श्रेयाने चणे फुटाणे दिले, माकड निघून गेलं,

" बघितलं एवढं इझी होतं, त्यात घाबरण्यासारखं काय होतं? ",.. सचिन

"तुझ्या मागे आल असत माकड मग समजलं असतं",.. श्रेया

"सुंदर मुलींच्या जवळ येतात ते",.. सचिन

काहीही... श्रेया हसत होती

"आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की",...

"माहिती आहे तुला हात लावायचा नाही, अरे पण मी घाबरली होती, काही करू शकतो आपण अश्या वेळी",.. श्रेया

"ठीक आहे मी पण घाबरलो की तुला मिठी मारेन",.. सचिन

नाही..

" अस कस? तुला वेगळे रूल्स मला वेगळे, तुझ्यावर एक पॉईंट आहे म्हणजे जो चुकी करेल त्याच्यावर पॉईंट असेल, जर माझी चुकी झाली तर माझ्यावर एक पॉईंट आणि मग त्या एका पॉईंटची मी तुला शिक्षा देईल",.. सचिन

ठीक आहे

दुपारी तिथल्या लोकल हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं, खूप छान होतो जेवण, नंतर सूर्यास्ताच्या वेळी बोटिंग केलं, अथांग असा तलाव होता खूपच छान वाटत होतं, दोघ शांत बसुन आनंद घेत होते, संध्याकाळी दोघं दमून घरी आले,

" आता रूमवरच जेवण मागवूया ",.. सचिनने जेवण मागवलं

साक्षी ताईचा फोन आला होता, ती बराच वेळ बोलत होती,.. "मी उद्या सकाळी निघते आहे गावाला जायला सचिन",

"ठीक आहे ताई पण लवकर यायच परत घरी",.. सचिन

"हो श्रेयाकडे फोन दे" ,.. साक्षी

हॅलो ताई

" चांगलं वाटतं आहे का ग तिकडे श्रेया",.. साक्षी

"हो खूप छान वाटतं आहे इकडे",.. श्रेया

"आम्ही निघतो उद्या, लवकर ये घरी" ,.. साक्षी हसत होती

" हो ताई, फोन करा नंतर मला ",.. श्रेयाने फोन ठेवला.

"काय छान वाटत होतं तुला? फोनवर काय सांगत होतीस श्रेया ",... सचिन

" अरे साक्षी ताई विचारत होत्या की कसं वाटतं आहे तिकडे म्हणून सांगितलं खूप छान वाटतं आहे",... श्रेया

" असं सांगायचं नाही ",.. सचिन

"मग काय सांगायचं?",.. श्रेया

"अशावेळी काहीच बोलायचं नाही",.. सचिन

"का पण?",.. श्रेया

" तुला थोडं सुद्धा लाजता वगैरे येत नाही का श्रेया ? ",.. सचिन

"पण लाजण्यासारखं काय झालं आहे? ",.. श्रेया

" त्यांना तसं वाटायला पाहिजे की इकडे लाजण्यासारखं काहीतरी झालं आहे",.. सचिन

" अच्छा असं आहे का",.. श्रेया

" कधी समजणार तुला श्रेया ",.. सचिन

आता?

" आता काही नाही चल जेवण आलं आहे जेवून घे",..सचिन

"तुला बहिण भाऊ कोणी नाही ना तू एकुलती एक आहे ना",.. श्रेया

हो

" मग तुला करमत का असं घरात? ",.. सचिन

" हो न करमायला काय झालं",.. श्रेया

"मला तर साक्षीताई शिवाय करमत नाही",.. सचिन

"हो आहे तर साक्षी ताई चांगल्या, दिसायलाही किती छान आहेत ना त्या",.. श्रेया

" हो खूपच सुंदर आहे ताई तुझ्यासारखी, तू पण गोड आहेस",. सचिन

श्रेया सचिनकडे बघत होती... " ठीक आहे इट्स ओके माहिती आहे आपण असं दुसऱ्याला बोलू शकतो थँक्यू",..

श्रेया जेवत होती

" अरे मला नाही द्यायचं का जेवायला? ",.. सचिन

" इथे पण तुला मीच वाढुन द्यायचं आहे का? ",.. श्रेया

"ठीक आहे घेतो मी माझ्या हाताने",.. सचिन

श्रेया उठली तिने सचिनला जेवण वाढवून दिल, सचिन खुश होता, तो जेवत होता, जरा वेळाने श्रेयाने तिच्या आईला फोन लावला ती बराच वेळ बोलत होती, चालतांना ती थोडी लंगडत होती,

"पाय दुखतोय का?",.. सचिन

हो थोडा..

"बघु.. खाली नीट बघून चालता येत नाही का? ",.. सचिन

" डोंगरातून फिरायची सवय आहे का मला? मुरगळला थोडा पाय काय करणार",.. श्रेया

सचिन श्रेयाचा पाय बघत होता,.. "कुठे दुखतोय माझ्या कडे स्प्रे आहे थांब",

"आग आग होईल का जास्त? ",.. श्रेया

दोन मिनीट..

"नको सचिन थांब नको मारू स्प्रे ",.. श्रेया

"अरे काय अस? लहान आहे का तू? जरा गप्प बस",.. सचिन

सचिनने तिच्या पायावर स्प्रे मारला, आता आराम कर उद्या बर वाटेल

श्रेया मोबाईल वर गेम खेळत होती सचिन तिच्या बाजूला येऊन बसला,.." श्रेया तुला आपल्या लग्नाचे फोटो बघायचे आहेत का? माझ्याकडे थोडे पाठवले आहेत फोटोग्राफरने",

" हो दाखव",.. श्रेया

" मी लॅपटॉप घेऊन येतो",.. सचिन लॅपटॉप घेऊन आला, खूप छान फोटो होते सगळ्यांचे, श्रेया तर खूपच सुंदर दिसत होती फोटोंमध्ये, जेव्हा त्या दोघांचे फोटो येत होते तेव्हा ते दोघं एकमेकाला अगदीच अनुरूप होते असं वाटत होतं

" आपण दोघं सोबत छान दिसतो नाही",.. सचिन

" हो ना मला पण आता तसंच वाटत आहे",.. आता श्रेयाला सचिनशी बोलताना काहीही वाटत नव्हतं, तुझ्यासोबत बोलताना मला असं वाटतं की आपली खूप वर्ष झाले ओळख आहे.

" हो मी पण कम्फर्टेबल आहे तुझ्यासोबत",.. सचिन

" उद्या काय कार्यक्रम आहे?",..श्रेया

" इथे जवळच एक मंदिर आहे, तिथे जाऊ, दुपारी रूममध्येच राहू आरामात, परवा घरी निघून चालेल ना",... सचिन

श्रेयाला आता सचिन बरोबर चांगलं वाटत होतं, पण मी एकटी असताना चांगला वागतो हा, सगळे असले की मला काम सांगतो मुद्दामून नवरा असल्यासारखं करतो, विचार करत ती झोपली,

सचिन जरा वेळ बाहेर येऊन बसला, त्याने नेहाला मुद्दाम मेसेज केला,.." काय करते आहे? ",

तिचा रिप्लाय आला",.." काही नाही आता ऑफिसला जाईन मी".

" मी तिकडे येतो आहे",.. मुद्दामच सचिनने सांगितलं

तशी नेहा दचकली,.." कधी येतो आहेस तू सचिन? ",.

" अजून काही ठरलं नाही, पण येईल मी तुला भेटायला, तू येशील का माझ्यासोबत इंडियात वापस",. सचिन

"मला कसं शक्य आहे, माझा इथे बॉन्ड साइन केला आहे पाच वर्षाचा, तू मला येण्याआधी एकदा सांग",.. नेहा

"ठीक आहे",.. काय करावं नेहाचं? काही समजत नाही? जाऊन स्वतः बघू तिकडे की जाऊ द्यावं, जावू दे, नेहा शी बोलायला नको आपण या पुढे.

श्रेयाला सांगायचं का सगळं? नको ती घाबरून जाईल, तिला असं वाटेल की आता नेहा नाही याच्या आयुष्यात हा मला सोडणार नाही, ती उगाच घरातुन पळायचा प्रयत्न करेन, शांत आणि कम्फर्टेबल आहे ती तर राहू दे तिला,

काय करू मी तिच्या सौरभला भेटतोच त्याला आणि त्याला सांगतो की हिला स्पष्ट नकार दे, ओरड तिच्यावर तेव्हा श्रेयाला समजेल तो नाही म्हणतोय ते, काय करेल मग श्रेया? असं वाटतं आहे की माझ्यासोबत राहील ती, का तिच्या आईकडे निघून जाईल? माहिती नाही

पण मला असं वाटतं आहे श्रेयालाही माझ्यासोबत आवडतं, मी जरा शांततेत घेईन, श्रेयाला जपेल, छान आहे ही, आता आम्हाला एकमेकांसोबत रहायच आहे, तिला तिच्या आवडीचा मुलगा नकार देतो, नेहाने लग्न केल, जावू दे,

तो आत आला, श्रेया झोपलेली होती, तिचा पाय दुखतोय, उद्या आराम करू, तो तिच्या जवळ बसला, तिचा हात हातात घेतला, श्रेया आरामात झोपली होती, हिचा विश्वास आहे माझ्या वर, माझ्या सोबत नीट रहाते ही, तो बराच वेळ तिच्याकडे बघत होता ,