Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 6

आता श्रेया शांत होती, ती विचार करत होती खरच मी का पळत होती, हा छान आहे सचिन हिरो सारखा, जाऊ दे पण तो माझा नाही तो नेहाचा आहे



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 6

©️®️शिल्पा सुतार
........

सचिनने श्रेयाला ब्लँकेट दिल,.. "जागा पुरत नाही इथे, चल तिकडे झोप",

"नाही मी इकडे ठीक आहे" ,.. तिने तोंड फिरवून झोपून घेतल.

"ठीक आहे पण सकाळी लवकर उठ इथे सगळे साडेआठला नाष्टा करतात, त्याच्या आधी आंघोळ करून बाहेर टेबलवर आईच्या मदतीला जा",.. श्रेया अजूनही रागाने सचिन कडे बघत होती

"तुला माहिती आहे ना सचिन मी इथे थोडे दिवस राहणार आहे ते",.. श्रेया

"हो माहिती आहे पण जेवढे दिवस आहे तेवढे दिवस नीट राहा",.. सचिन

"पण अशी मी व्यवस्थित राहिली तर मला जाऊ देतील का हे लोक",.. श्रेया

"ते मला माहिती नाही ऑफिसचं काम होईपर्यंत तरी तुला नीट वागावच लागेल",.. सचिन

"मला उद्या कॉलेजला जायचं होतं",.. श्रेया

"आपण फिरून आलो की जा कॉलेजला ",.. सचिन

" कधी जाणार आहोत आपण फिरायला",.. श्रेया

" उद्या दुपारी निघू ",.. सचिन

" कधी परत येऊ",.. श्रेया

" रविवारी परत येऊ तू सोमवारपासून जा कॉलेजला",.. सचिन

श्रेयाने माहिला मेसेज केला की मी सोमवारपासून येते

" काय झालं? ",.. माही

" काही नाही मी सचिन सोबत उद्या फिरायला जाणार आहे",.. श्रेया

माही हसत होती.. "तू तर खूप म्हटली होती की सचिन सोबत कुठेही जाणार नाही मी ",..

" अगं त्याच्या घरच्यांनी बुकिंग करून दिल मग आता नाही म्हणता येणार नाही",.. श्रेया

"असंच होतं ग बाई काही दिवसांनी त्याच्या प्रेमात पडशील तू ",.. माही

" काहीही बोलू नकोस माही, तुझ्या शी बोलण्यात काही अर्थ नाही",.. श्रेया

श्रेया सकाळी मोबाईल मध्ये बेल लावून साडेसातला उठली, आंघोळ करून आली, अजूनही सचिन झोपलेला होता, चांगला आहे हा झोपला आहे आणि मला मात्र लवकर उठायला सांगितलं, या सोफ्यावर नीट झोपही येत नाही, तिने तिच्या ब्लँकेटची घडी केली आणि ब्लॅंकेट उशी व्यवस्थित कपाटात ठेवलं, उगीच परत कोणी हे ब्लॅंकेट इथे बघितलं तर सगळ्या घरात चर्चा होईल,

जरा वेळाने सचिन उठला तो बाथरूम मध्ये गेला, श्रेया बाहेर येऊन बसली, अजून कोणी आलेलं नव्हतं, ती पेपर वाचत होती, सविता ताई आल्या ती त्यांच्या मदतीला डायनिंग टेबल जवळ गेली

" कशाला उठली तू एवढ्या लवकर आराम करायचा",.. सविता ताई

"मला झोप येत नव्हती",.. श्रेया

"नवीन घर आहे त्याच्यामुळे होतं असं सचिन कुठे आहे",..सविता ताई

"ते अंघोळीला गेले आहेत",.. तिने चहा नाश्त्याची तयारी केली, मावशीच बनवत होत्या सगळे प्रकार फक्त वाढून द्यायचं होतं, सगळे टेबलवर आले, श्रेयाचं कौतुक करत होते सगळे, सचिन तयार होऊन आला वाईट शर्ट ब्लॅक पॅट मध्ये वेगळाच दिसत होता,

" कुठे चालला आहे सचिन? तुम्हाला जायच आहे ना आज फिरायला ",.. साक्षी विचारत होती

" थोड्यावेळ ऑफिसला जाऊन येतो ताई, एक दोन तासात येतो, महत्वाच काम आहे ",.. सचिन

नाश्ता झाला सचिन आणि त्याचे बाबा निघत होते, श्रेया आजी जवळ बसलेली होती

" श्रेया आत मध्ये ये",.. श्रेया उठून गेली

" मी ऑफिसला जाऊन येतो , तुझी बॅग भरून घे दोन-तीन दिवसाचे कपडे घे ",.. सचिन

ठीक आहे

" कुठे जाऊ नको एकटी",.. सचिन

"मी कशाला जाईल कुठे ",.. श्रेया

सचिन ऑफिसला गेला, श्रेया परत चहा घ्यायला बाहेर आली, आई आजी साक्षी खुश होत्या, चांगलं चाललं आहे दोघांचं

"तुझी बॅग भरून घे श्रेया जरा वेळाने",.. साक्षी

"हो ताई काय काय घेऊ",.. श्रेया

तिच्या निरागस प्रश्नांनी आई आजी हसत होत्या

" कम्फर्टेबल वाटतील असे ड्रेस घे की दोन-तीन दिवसाचे",.. साक्षी हसत होती

"काय झालं आहे? तुम्ही सगळे का हसता आहात? ",.. श्रेया

" अगं आम्हाला विचारण्यापेक्षा सचिनला विचार की बॅग मध्ये काय काय घेऊ ",.. साक्षी

" ठीक आहे हे आले की विचारेन",.. श्रेया

दुपारी सचिन वापस आला,.." अजून बँग भरली नाही का तू श्रेया?,

"आई आजी म्हटल्या की तुला विचारूनच बॅग बर म्हणून भरली नाही, काय घेऊ? ",.. श्रेया

"तुला कम्फर्टेबल वाटतील असे दोन तीन ड्रेस आणि घरचे कपडे घे तुला थंडी वाजत असेल तर एखादा जॅकेटही सोबत असू दे ",.. दोघांची बॅग भरून झाली जेवण झालं ड्रायव्हर सोबत येणार होता

"चला आम्ही निघतो",.. सचिन

" आम्ही पण निघते आहे उद्या सकाळी घरी जायला",.. साक्षी विवेक सांगत होते

" थांबा ना थोडे दिवस ताई जिजाजी",.. सचिन

" नाही आता खूप काम पेंडिंग आहेत आम्ही निघतो एन्जॉय करा दोघांनी ",.. साक्षी

सचिन पुढे चालत होता, त्याची बॅग मागे राहिली, सविता ताई, आजी होत्या समोर काय करू? ,

" अहो.. अहो" ,.. सचिनने मागे बघितल,

" सचिन श्रेया हाक मारते आहे",.. आजी सविता ताई सांगत होत्या,

"तुमची बॅग घ्या",.. श्रेया

सचिन आश्चर्याने बघत होता, मला चक्क अहो बोलते आहे ही

तीन-चार तासाची जर्नी होती श्रेया कारच्या मागच्या सीटवर एकदम कोपऱ्यात बसलेली होती, एकतर कार सुरू झाली की तिला नेहमी झोप येते परत त्या सचिनच्या अंगावर झोपले तर पूर्ण वेळ भांडत राहील तो माझ्याशी.

सचिन बघत होता,... "एवढी लांब का बसली आहेस तू श्रेया?",

" मी इथेच ठीक आहे सचिन, एक तर प्रवासात मला खूप झोप येते आणि तुझ्या जवळ झोपली तर तू खूप चिडतोस",.. श्रेया

सचिन हसत होता,.. "नाही चिडणार ये इकडे तिकडून ऊन लागत आहे" ,

श्रेया थोडी बाजूला सरकून बसली

"तू मला चक्क आज अहो म्हणत होतीस का?",.. सचिन

"हो मग काय म्हणणार आई आजी समोर होत्या ",.. श्रेया

" अस आहे का ",.. सचिन

" हो माझ्या आईने सांगितल की सगळ्यां समोर अहो बोलायच",.. श्रेया

"छान तू ऐकल आणि",.. सचिन

" म्हणजे काय, ऐकावच लागत मला सगळ्यांच, मी चांगली मुलगी आहे ",.. श्रेया

"हो का मग माझ्याशी का भांडते तु सारखी? ",.. सचिन काहीतरी लॅपटॉप वर काम करत होता

" आता चांगली बोलते ना मी, काय करतो आहेस तू?",.. श्रेया

"ई-मेल चेक करतो आहे",.. सचिन

" ऑफिस मधल काम आहे का हे ? ",.. श्रेया

" हो.. खूप काम असतं",.. सचिन

श्रेया बघत होती, काहीही समजल नाही तिला,.. "हे तर कॉलेजमध्ये शिकवत नाही, मग कस काय समजतं पुढे जाऊन की काय काम करायचं आहे",

" एक मिनिट श्रेया जरा महत्त्वाचं काम आहे मला कॉन्सन्ट्रेट करू दे",.. सचिन त्याचं काम करत होता, बऱ्याच इ मेलला रिप्लाय द्यायचं होतं

श्रेया बोर झाली, ती बाहेर बघत होती,

" श्रेया सॉरी थोडा वेळ थांब, एकदा हिल स्टेशनवर गेलं की ऑनलाईन राहता येणार नाही, पप्पांनी तसा दम दिला आहे पूर्ण वेळ दे तू श्रेयासाठी, दोन-तीन दिवस ऑनलाइन दिसला तर बघ ",.. सचिन

श्रेया सचिन कडे बघत होती, फारच छान वाटत होता तो ऑफिसचा काम करताना, डॅशिंग,.. आज सकाळी पण ऑफिसला जाताना चांगला दिसत होता,

सचिनचं थोडसं काम झालं,.." बोल काय म्हणत होतीस तू तिकडे पोचलो की मला ऑफिसचं काम करता येणार नाही",

" कर मग तू काम",.. श्रेया

" नाही इथे रेंज नाही",.. सचिन

" तुझ्या ऑफिस मध्ये मुली आहेत का?",.. श्रेया

" हो आहेत खूप मुली आहेत",.. सचिन

" मग तू त्यांच्यासोबत काम करतो का? ",.. श्रेया

" हो काय झालं ",.. सचिन

" तू एवढी तयारी करून ऑफिसला जातो त्या मुलींना काम सुचतं का?.. म्हणजे काही नाही ",.. काय बोलते मी हे? श्रेया गप्प बसली,

सचिन हसत होता,.. "मी हँडसम दिसतो असं म्हणायचं आहे का तुला? ",

" आज सकाळी तू चांगला दिसत होता, आत्ताही इ मेल बघतांना हुशार वाटत होता ",..श्रेया

" हुशार आहे मी, एक मिनिट श्रेया अजिबात मला असं बोलायचं नाही",.. सचिन

" अरे आपण कॉम्प्लिमेंट तर कोणालाही देऊ शकतो ना, ओळखीच्या लोकांना, घरातल्यांना,मित्रांना",.. श्रेया

" चांगलं आहे माझी वाक्य मलाच ऐकव, आज तू कसं काय माझ्याशी एवढं नीट वाटते आहेस? भांडत नाहीस तू? ",... सचिन

" गाडीत जर काही बोललं नाही तर मला झोप येते म्हणून मी तुझ्याशी बोलते आहे, उगाच झोप लागली तर परत तू चिडणार",.. श्रेया

" मग तू तुझं तुझ झोपायचं माझ्या अंगावर नाही",.. सचिन

" पण मला समजत नाही तस, त्यादिवशी माहितीच नाही की मी तुझ्याजवळ आली आहे, तूच घेतलं असणार मला तुझ्याजवळ ",.. श्रेया

"मला काही काम नाहीत का? ",.. सचिन हसत होता. गोड वाटल त्या दिवशी हिच्या जवळ.

" सुंदर आहे ना हा रस्ता",.. श्रेया

" हो खूप छान आहे, आता घाट सुरू होईल ",.. सचिन

" हे हिल स्टेशन जवळच आहे, तू गेला आहेस तिकडे आधी?",.. श्रेया

" बऱ्याच वेळा, या वेळी ऑफिसचं कामही भरपूर होतं म्हणून सांगितलं की तिथलेच बुकिंग करा, जवळ बर",.. सचिन

"तू सांगितलं हे बुकिंग करायला?",.. श्रेया

" नाही.. साक्षी ताई विचारत होती, तिने दोन तीन ऑप्शन दिले त्यातले मी हे निवडल ",.. सचिन

दोघं रिसॉर्टवर पोहोचले, खूपच सुंदर रिसॉर्ट होता, एकदम निसर्गाच्या सान्निध्यात, मोठी रूम त्यांनी बुक केलेली होती, दोघं आत मध्ये गेले

मिस्टर अँड मिसेस देशमुख का?

हो

श्रेया सचिनकडे बघत होती,.. "तू माझं नाव मिसेस देशमुख असं का लिहिलं? मला अजिबात आवडल नाही , माझं नाव श्रेया माने आहे ते मला आवडतं",

" जरा शांत राहणार का आपण रूममध्ये गेल्यावर भांडू",.. सचिन

दोघांचे आयडेंटिटी प्रूफ मागितले, दोघांनी दाखवले दोघं आत मध्ये आले, मोठी छान रूम होती मागच्या बाजूला गार्डन होतं, प्रायव्हेट स्विमिंग पूल होत, श्रेया फिरून सगळी रूम बघत होती,

सचिनने घरी मेसेज केला की आम्ही पोहोचलो, श्रेयाच्या घरी ही मेसेज केला

वेलकम ड्रिंक आलं, श्रेया येऊन सचिनच्या समोरच्या खुर्चीवर बसली, सामान ठेवून तो माणूस गेला, सचिनने उठून दरवाजा लावून घेतला,

"छान आहे रूम पण मी झोपणार कुठे",.. श्रेया

" काय झालं आत नाहीये का काही सोफा वगैरे",.. सचिन

नाहीये

"हा हनिमून सूट आहे म्हणून काही नसेल",.. सचिन

"किती लवकर अंधार होतो ना इथे हिल स्टेशनवर",.. श्रेया

"असंच जायचं फिरायला की घरातच थांबूया",.. सचिन

फिरून येऊ..

थोडं दोघं फिरायला गेले, येतानाच जेवून आले, आल्यानंतर सचिन टीव्ही बघत होता, श्रेया मोबाईलवर काहीतरी करत होती,

" बोर होत आहे इथे, किती सामसूम आहे, टीव्हीवरही काही नाही, काय बघतो आहेस तू सचिन",.. श्रेया

" असंच बातम्या वगैरे ",.. सचिन

"किती दिवस थांबणार आहोत आपण इथे?",.. श्रेया

"दोन दिवस थांबू नंतर जाऊ घरी, उद्या इथे फिरू मस्त म्हणजे तेवढाच वेळ जाईल",.. सचिन

खालून एक मॅनेजर आला होता, तो उद्यासाठी सगळं काय काय बघायचं त्याची माहिती देत होता, तो सारखा श्रेयाकडे बघत होता, श्रेयाच लक्ष नव्हत,

" श्रेया आत जा आणि तुम्ही पण जरा बाहेर थांबा",..सचिन

मॅनेजर बाहेर गेला

श्रेया सचिनकडे बघत होती.. काय झालं?

"काही लक्ष असतं का कुठे काय चाललं आहे ते",.. सचिन

"काय झालं पण सचिन?",.. श्रेया

"काही नाही तू आत थांब" ,.. सचिन बाहेर आला त्याच्याकडून माहितीचे कागद घेतला, तुम्ही जरा तुमची वर्तवणूक सुधारा मिस्टर मॅनेजर, नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेल, सचिन रागाने आत मध्ये आला

" काय झालं आहे या सचिनला काय माहिती? काय केलं मी, उगीच चीड चीड करतो",... श्रेया कॉटवर लोळून मैत्रिणींना मेसेज करत होती, सचिन आल्याने ती उठून बसली,

"श्रेया तुला चांगले वाईट लोक समजतात का जरा लक्ष देत जा आजुबाजूला काय सुरु आहे ते",.. सचिन

काय झालं?

"तो माणूस कसा बघत होता तुझ्या कडे",.. सचिन

" आता मी काय करू कोणी बघत माझ्याकडे तर",.. श्रेया

"हिम्मत कशी होते लोकांची पण, सारखं फोन वापरु नको श्रेया",.. सचिन

" याला काय अर्थ आहे सचिन? तू मला पूर्णच कंट्रोल करतो आहे ",.. श्रेया

" तसं नाही श्रेया आपण फिरायला आलो आहोत ना तू सारखी ऑनलाईन दिसली तर घरचे मित्र मैत्रिणी काय काय म्हणतील त्यांना असं वाटायला पाहिजे की आपल्या दोघांना करमलं आहे आणि आपण एकमेकांसोबत आहोत",.. सचिन

" ठीक आहे",.. श्रेयाने फोन बाजूला ठेवला, डेटा बंद केला

" तू तुझ्याबद्दल सांग थोडं सचिन, तू फॉरेनला गेला होता का? ",.. श्रेया

हो..

का बरं?

" ऑफिसच्या कामासाठी ",.. सचिन

" मग तिथे तुला तुझी मैत्रीण भेटली का? ",.. श्रेया

" नाही ती दुसऱ्या देशात आहे" ,.. सचिन

" मग या देशातुन त्या देशात जाता येत नाही का",.. श्रेया

" नाही जाता येत आणि मला नव्हतं जायचं, मला घरी काम होतं पटकन याव लागल, आपलं लग्न होतं ",.. सचिन

" मला तुझ्या मैत्रिणीचा फोटो दाखव ना ",.. नेहा

सचिन हसत होता,

प्लीज सचिन दाखव ना

सचिन येऊन तिच्याजवळ बसला, त्याने मोबाईल मधून नेहाचा फोटो दाखवला, छान होती नेहा, कॉन्फिडेंट, ऑफिसमध्ये बसलेला फोटो होता,

" हुशार आहे का ही खूप ",.. श्रेया

"हो खूपच",.. सचिन

" तुझ्या घरचे नाही म्हटले का हिच्याशी लग्न करायला",.. श्रेया

हो

" मग तू का नाही गेला सगळं सोडून तिच्या सोबत? प्रेम असेल तर जायला हवं होतं",.. श्रेया

"तेव्हा मी पण शिकत होतो ",.. सचिन

" तुला जर सौरभ बोलला असता सगळं सोडून ये तर गेली असती का? ",.. सचिन

" हो गेली असती, मी पण सौरभ असं काही बोलला नाही, मुळात म्हणजे तो माझ्याशी बोलतच नाही",.. श्रेया

" एकदाही नाही का बोलला",.. सचिन

"एकदा बोलला होता, तो चिडला होता माझ्यावर, सांगितलं माझ्या मागे यायचं नाही ",.. श्रेया

आता सचिन खूप हसत होता.. खरं

" हो त्याने खूप रागवलं होतं मला, तू का हसतो आहेस ",.. श्रेया चिडली होती.

" तरी तू त्याच्यासाठी का बर लग्नातुन पळत होती",.. सचिन

आता श्रेया शांत होती, ती विचार करत होती खरच मी का पळत होती, हा छान आहे सचिन हिरो सारखा, जाऊ दे पण तो माझा नाही तो नेहाचा आहे, विचारून बघू एकदा सौरभला, तो नाही बोलला तर खोटं सांगू सचिनला की तो मी त्याच्यासोबत राहते आहे आणि निघून जाऊ या घरातुन, सचिन आणि नेहाच्या आयुष्यात मधे मधे करायचं नाही, छान आहे याची नेहा.

"काय विचार चालला आहे",.. सचिन

काही नाही..

बघू सौरभचा फोटो,.. श्रेया दाखवत होती, छान आहे सौरभ

" हो तो डॅशिंग आहे",.. श्रेया

" तुला डॅशिंग मुलं आवडतात का",.. सचिन

"नाही असं नाही पण सौरभ आवडतो",.. श्रेया

"चल झोप आता खूप वेळ झाली आहे",.. सचिन

"कसं झोपणार पण? ",. श्रेया

" आज तुला इथे झोपावे लागेल माझ्याजवळ",. सचिन

"पण मी जर झोपेत तुला हात लावला तर",.. श्रेया

" काही होत नाही, झोप आरामात",.. सचिन

" मग काल का चिडला होता तू इतका?" ,.. श्रेया

सचिन काही म्हटला नाही, खरंतर त्याला खरंच काल खूप छान वाटलं होतं श्रेयाजवळ आणि उगीच तिच्या जवळ गेलो ही आपली नाही या विचाराने तो चिडला होता,

सचिन त्या बाजूला झोपला या बाजूला श्रेया, तिने दोन उषा मधे ठेवल्या, जरा वेळ टीव्ही बघितला,

सचिन टीव्ही बंद करायला उठला, श्रेया झोपलेली होती.

🎭 Series Post

View all