Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 5

थोड्या वेळापूर्वीच तू खूप चिडला होतास ना माझ्यावर की मी तुला बिना विचारता हात लावला, मग झोपेत जर मी तुझ्याजवळ आली तर,



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 5

©️®️शिल्पा सुतार
........

श्रेया आत कपडे बदलत होती, सचिन बाहेर बसून गप्पा मारत होता,.. "अंकल आम्हाला उशीर होत आहे" ,

त्यांनी श्रेयाला आवाज दिला, आटोप बेटा.

मीनाताईंनी अभिजीत रावांना आत मध्ये बोलवलं,.. "अहो ती नाही म्हणते आहे जायला",

"तिला आटपायला सांग",.. अभिजीत राव

सचिन त्यांच्याकडे बघत होता,.. काय झालं?

काही नाही सचिन राव ,... आतून श्रेयाचा आवाज येत होता,

"एक मिनिट अंकल तुम्ही म्हणत असाल तर मी आत जाऊन बघू का काय म्हणते आहे श्रेया ते",. सचिन

ठीक आहे.. दोघं काळजीत होते

सचिन आत मध्ये गेला, श्रेया सोफ्यावर बसलेली होती,

"काय प्रकार आहे हा श्रेया? गुपचूप बॅग भर आणि चल इथून, काय अस करतेस आपल्याला देवळात जायच आहे तिकडे वाट बघत असतिल सगळे",.. सचिन

"सचिन मी तुला सांगितल आधी मी नाही येणार",.. श्रेया

"मी तुला मदत करणार नाही अस केल तर, नाही तरी तुझ्या कडे आता काही ऑप्शन नाही, तुला याव लागेल माझ्या सोबत, तुझ्या घरचे तुला इथे राहू देणार नाही, हट्ट सोड ",.. सचिन

" मला नको तुझी मदत मी बघेन मला काय करायचं ते",.. श्रेया

"काही उपयोग नाही अस बोलून, लग्न झाल आपल, या घरातही आणि आमच्या घरातही सगळे माझंच ऐकतात, तुला डेमो बघायचा आहे का श्रेया, मी बाहेर जाऊन सांगतो की तुला यायचं नाही माझ्या सोबत, तुझे बाबा तुला बॅग घेऊन माझ्यासोबत पाठवून देतील, या पुढे तुला माझ्या सोबत रहायच आहे, जो पर्यंत मी स्वतः तुला डिव्होर्स देत नाही तो पर्यंत ",.. सचिन

श्रेयाला राग आला होता,.." सचिन प्लीज नको ना अस करु, माझ नाही मन तिकडे यायच",

" काही ऑप्शन नाही, मला अस करता येणार नाही थोडे दिवस रहाव लागेल तुला माझ्या सोबत, आमचा प्रोजेक्ट अजुन लॉस मधे आहे ",.. सचिन

" मी बिजनेस डील आहे का? मला काही मन नाही की नाही ",.. श्रेया

" तुझ्या बाबांनी आम्हाला मदत करण्याच्या बदल्यात तुझं लग्न माझ्याशी केले आहे, मी नाही ठरवलं होतं ते. आता ते प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाच आहे, तू इथे राहिली तरी मला प्रॉब्लेम नाही पण मग तुझे बाबा आम्हाला मदत करणार नाही, मी तुला असं सोडणार नाही गुपचूप चल थोडे दिवसाचा प्रश्न आहे श्रेया",.. सचिन

ती अजूनही सोफ्यावर बसलेली होती,

सचिन बाहेर गेला त्याने अभिजीत रावांना सांगितले,.. "श्रेया येत नाही आहे घरी, काय झालं आहे? काही चुकलं का माझ? , अस करुन कस चालेल, तुम्ही समजाव ना श्रेयाला, घरचे सगळे वाट बघत आहे आम्हाला देवळात जायचं आहे",.. सचिन

बाबा चिडले श्रेयावर,.. "श्रेया आधी बाहेर ये काय आहे हे वागण?",

श्रेया ड्रेसवर होती ती बाहेर आली, बाबा चिडले होते,.. "आवर लवकर तुझी बॅग घे आणि गुपचूप निघ, व्यवस्थित वागायचं तिकडे, मला अजिबात कंप्लेंट येता कामा नये",

बाबा प्लीज..

" मला काही ऐकायच नाही, सचिन राव म्हणतील तस करायच",.. अभिजीत राव

"जा बेटा श्रेया तयार हो, बाबा बरोबर सांगत आहेत, ड्रेस बदल साडी नेस" ,.. आई गेली मदतीला, श्रेया रडत होती

जावू दे थोडे दिवस राहू नीट तो पर्यंत सौरभ हो म्हटला तर ठीक नाहीतर याला त्याची नेहा मिळेल, मग काही काम नाही याच्याशी, मी घरी येईल,

साडी नेसून बॅग भरून श्रेया बाहेर आली, बाबांना भेटली, सचिन उठला दोघेजण निघाले

कार मध्ये श्रेया बॅग घेऊन मागे जाऊन बसली, सचिन तिच्या बाबांशी बोलत होता,.. "चला मी निघतो तुम्ही काळजी करू नका श्रेयाची",

"श्रेया पुढे येऊन बस मी काही तुझा ड्रायव्हर नाही",.. सचिन

बॅग तिथेच ठेवून श्रेया पुढे येऊन बसली, हिरव्या रंगाच्या साडीत छान दिसत होती, ती पण चेहरा फुगलेला होता, रडलेली दिसत होती ती, सचिन तिच्या कडे बघत होता, तो कार सुरूच करत नव्हता.

"काय झाल आता? काय बघतो आहेस इकडे, झालं ना तुझ्या मनासारखं, तुझ्या मुळे बाबा मला रागवले" ,.. श्रेया

" सीट बेल्ट लाव, का मी लावून देऊ",.. सचिन तिच्या जवळ आला, त्याचे केस श्रेयाच्या गालाला लागले, ती घाबरली

"नको तिकडे सरक सचिन, मी लावते माझा सीट बेल्ट",.. श्रेयाने स्वीट बेल्ट लावला, दोघ निघाले,

श्रेया अगदीच अल्लड आहे काय करू मी समजून तरी किती सांगू, तिकडे ती नेहा कोणा सोबत रहाते ते अजून समजल नाही, ती नेहा पण कधीची चीड चीड करते आहे

ते सगळे घरी आले घरचे पाहुणे गेलेले होते, श्रेया गेस्ट रूम मध्ये येऊन बसली,

साक्षी ताई तयार होती,.. "चल आपल्याला दहा मिनिटात निघायचं आहे देवळात जायला, श्रेया तुला फ्रेश व्हायचं असेल तर होऊन घे",..

साक्षी, विवेक, श्रेया आणि सचिन मंदिरात जायला निघाले, ओटीचे सामान सगळं घेतलेलं होतं, ड्रायव्हर गाडी चालवत होते, मागच्या सीटवर साक्षी मध्ये श्रेया आणि बाजूला सचिन होते आणि पुढे विवेक बसलेले होते, एक दीड तास लागला, मंदिरात पूजा झाली, प्रसन्न वाटत होतं, जरा वेळ बसून ते सगळे निघाले,

आता श्रेया बऱ्यापैकी साक्षी ताई सोबत बोलत होती, तिला खूपच दमायला झालं होतं, बरीच धावपळ सुरू होती सकाळपासूनही, गाडीत बसल्यानंतर तिला खूप झोप येत होती, तिने मागे डोकं टेकवून झोपून घेतलं, पण तरीसुद्धा तिची मान इकडे तिकडे जात होती,

"सचिन जरा बघ, श्रेया पडेल ",.. साक्षी ताई बोलली

सचिनने श्रेयाची मान त्याच्या खांद्यावर घेतली, आधार मिळाल्यामुळे सचिनच्या अंगावर लोळून श्रेया अगदी आरामात झोपली होती, ती जवळ आल्यामुळे सचिन गडबडला, साक्षी आणि विवेक दोघं हसत होते

श्रेया उठ.... सचिन हाक मारत होता

"अरे असू दे झोपू दे तिला लाजतो काय आहेस",.. साक्षी

"नाहीतरी थोड्यावेळाने हेच होणार आहे सो रिलॅक्स सचिन",.. विवेक चिडवत होते

श्रेया खरच गाठ झोपलेली होती, अगदीच लहान मुलीसारखी करते ही, हिला भूक कंट्रोल होत नाही, झोपही कंट्रोल होत नाही आणि सारखीच रुसलेली असते

तिच्या खांद्यांवरून हात टाकून तिच्या हाताला धरून सचिन बसलेला होता, सूर्यास्त झाल्याने बऱ्यापैकी अंधार झाला होता, साक्षी पण आता झोपली होती त्यामुळे सचिन बिंदास होता, एक दोन दा त्याने श्रेयाच्या कपाळावर किस केलं होतं, अतिशय छान वाटत होत तिच्या जवळ, दोन मिनीट तो विसरला की ही थोडे दिवस आहे आपल्या जवळ, गोड वाटत होत हिच्या जवळ, त्यात ही आपल्याजवळ बिंदास झोपली होती हे जास्त छान वाटत होतं, नको हिच्या एवढ्या आहारी जायला,

काय करार केला आहे हे लक्षात आहे ना, हिला नाही राहायचं माझ्यासोबत, आजही किती हो नाही बोलत होती ही, जबरदस्ती घेऊन आलो हिला घरी, बिझनेसचा प्रॉब्लेम लवकर नीट व्हायला हवा,

पण खूपच गोड आहे ही, एकदम इनोसंट तो परत एकदा श्रेयाकडे बघत होता, एवढ्यात घर आलं ही असं त्याला वाटत होतं, ही माझ्या बाहू पाशातून दूर जाईल, प्लीज थांब थोड्या वेळ,

साक्षी विवेक उतरले,.. "उठायचं की नाही सचिन श्रेया? की इथेच थांबताय?",

सचिनने श्रेयाला उठवलं, ती उठली, त्याला एवढ जवळ बघून एकदम बाजूला सरकली, सचिन उतरला, आत मध्ये निघून गेला, तिने तिचं सामान घेतलं, ती साक्षी ताई सोबत आत मध्ये आली, श्रेया सोफ्यावर बसली होती, आई आजी साक्षी बोलत होत्या, चांगले आहेत या तिघी, माझी काळजी घेतात जा

" श्रेया बेटा जा आराम कर, कपडे बदलून घे",.. सविता ताई

"श्रेया गेस्ट रूम मध्ये जात होती, तिकडे नाही आता सचिनच्या रूम मध्ये जा",.. साक्षी

श्रेयाला काही सुचत नव्हतं कुठे आहे सचिनची रूम.. साक्षीने रूम दाखवली

श्रेया रूम मध्ये आली, सचिन सोफ्यावर बसलेला होता, त्याने उठून दार लावून घेतलं , श्रेया बघत होती, सचिन चिडला आहे, काय झालं याला आता?

बघतो जरा हिच्या कडे, आता बरी आली माझ्या जवळ,
.. "छान झोप झालेली दिसते श्रेया",

काय?

"गाडीत छान झोपलीस तू माझ्या जवळ? काय प्रकार होता तो आधी सांग? ",.. सचिन

"म्हणजे? काय झालं",.. श्रेया

"जसं तुला काहीच माहिती नाही",.. सचिन

"खरंच नाही नीट सांग सचिन",.. श्रेया

"कार मध्ये तू माझ्या अंगावर का झोपलेली होती",.. सचिन

श्रेया आश्चर्याने बघत होती,.." नाही मी माझी माझी झोपली होती, तू का चिडतोय",..

" वेड्यासारखं बोलू नको पूर्ण रस्ता भर तू माझ्या अंगावर लोळत होती",.. सचिन

" सॉरी",.. श्रेया

" सॉरी नाही मला हे चालणार नाही, जसं तुला मी तुझ्याजवळ मी आलेलो चालणार नाही तसं मलाही तू माझ्याजवळ आलेली चालणार नाही, माझंही दुसऱ्यावर प्रेम आहे, मी तुला काही नाही केलं तरी तू मला बोलते की तुला कराटे येतात आणि आता तू माझा किती गैरफायदा घेतला",.. सचिन

" आय एम सॉरी सचिन मला खरंच माहिती नव्हतं",.. श्रेया

" एवढी झोप कशी लागते तुला सारखी? अगदी शुद्ध राहत नाही कुठे झोपली आहेस कुणासोबत आहेस, जरा अलर्ट नाही ",.. सचिन.... नशीब मी होतो अशी कुठेही ही झोपली तर काय होईल?

" मी काही केलं का तुला सचिन? ",.. श्रेया अगदीच क्लु लेस होती

" हो म्हणजे तू सोडत नव्हतीस मला, ताई जिजाजी हसत होते आपल्या दोघांना, जरा भान ठेवता येत नाही तुला, यापुढे मला विचारल्याशिवाय माझ्याजवळ यायचं नाही, मला हात लावायचा नाही",.. रागाने सचिन बाथरूम मध्ये चालला गेला,

ऍक्च्युली त्याला श्रेयाला ओरडायचं नव्हतं पण हिच्या सोबत असे गोड संबंध ठेवून उपयोग नाही, ती आज ना उद्या चालली जाईल म्हणून तिच्यापासून शक्य तितका लांब थांबलं पाहिजे, मधेच त्याला नेहाची आठवण येत होती, श्रेया बरोबर नीट राहिलं म्हणजे नेहाला धोका देतोय असं त्याला वाटलं होतं, म्हणून सचिनला राग येत होता

श्रेया काॅट वर बसलेली होती, मला खरंच आठवत नाही मी याला त्रास दिला ते, यापुढे मी अशी इतकी बिंदास झोपणार नाही, याला एवढा प्रॉब्लेम आहे तर सकाळी कशाला जबरदस्ती मला इकडे घेऊन आला हा , मी नाही म्हटली होती ना यायला,

त्याच्या बाबांना मदतीची गरज आहे त्यांच्या बिझनेस साठी म्हणून तो मला सोडत नाही, सगळे स्वार्थी आहे हे, तिच्या डोळ्यात पाणी होतं, किती बोलतो आहे हा मला, काय केलं मी काय माहिती, का झोपली मी कार मधे, चुकूनही आता याच्या जवळ मी जाणार नाही, तिने साडी बदलली ड्रेस घातला, ती आत चेंजिंग रूम मध्येच बसलेली होती, इकडे बाहेर आली नाही , सचिन टीव्ही बघत होता,

जरा वेळाने साक्षी जेवायला बोलवायला आली, सगळे डायनिंग टेबल जवळ गेले, सचिन समोर बसलेला होता त्याच्यापासून अगदीच लांब लावून श्रेया तिकडे आजी जवळ बसली याच्यापुढे याच्या कडे बघायलाही नको आणि त्याच्याजवळ बसायलाही नको सगळे येऊन बसले, श्रेया आरामातच बसलेली होती, आई वाढत होती, श्रेयाचा फोन वाजला सचिनचा मेसेज होता.. ताट कर श्रेया

श्रेयाला समजलं ती आरामात आहे अस, पण ताट मला करता येत नाही, काय करू? ती पटकन उठली.. "आई तुम्ही राहू द्या मी ताट करते",..

श्रेयाकडे असे ताट वगैरे करायची तिला कधी गरज नव्हती, एक तर तिला काही माहिती नव्हतं आणि गरम भांड्यांना आई हात लावू देत नव्हती आणि खूप मदतनीस होते घरी, तसे इथे ही होते मदतीला सगळे पण इकडे सचिन कडे त्याची आईच नेहमी सगळ्यांना जेवायला वाढत होती, घरच्यांना तेच आवडत होतं,

"तू बस श्रेया मी देते वाढून",. सविता ताई

" नाही आई तुम्ही बसा मी वाढते",.. श्रेया

सविता ताई तिला सांगत होत्या की एका डिशमध्ये असा बाऊल ठेवायचा त्यात भाजी टाकायची हात लावायचा नाही नाहीतर चटका बसेल ह्या चार-पाच बाऊलमध्ये तू भाजी वाढ

एक बाऊलमध्ये भाजी वाढून श्रेया सासूबाईंकडे बघत होती त्यांनी सांगितलं बरोबर आहे

केदार राव जेवायला येऊन बसले, श्रेया काहीतरी काम करत होती ते कौतुकाने तिच्याकडे बघत होते,.. "काय करते आहेस बेटा?",

"मी सगळ्यांना भाजी देते आहे बाबा",.. श्रेया

" हुशार आहेस तू ",.. केदार राव

आजी-आजोबा पण समोर बसलेले होते, आजीने सविता ताईंना जवळ बोलावलं,.. "श्रेया रडल्यासारखी वाटते आहे का? काय झालं? काही टेन्शन आहे का?",

आई श्रेया कडे बघत होती,.. "हो वाटतय तर खरं, जाऊ द्या पण नका विचारू, नवीन लग्न झालेलं आहे त्यांचं, संध्याकाळी सचिनच्या रूम मध्ये होती ती ",

"बरोबर आहे यानेच काहीतरी केलं असेल तिला, थोडे दिवस लक्ष नको द्यायला ",.. आजी

" येऊन बस श्रेया जेवून घे आता",.. सविता ताई

जेवण झालं सगळे सोफ्यावर बसले होते.. हे तुमच्यासाठी फिरायला जायच बुकिंग साक्षी सचिनला देत होती

" आम्हाला जमणार नाही खूप काम आहेत ",.. सचिन

" ऑफिसच्या कामांकडे मी बघीन सचिन जा जाऊन फिरून या तुम्ही ",.. श्रेया सचिन कडे बघत होती, तो काही म्हटलं नाही, तो त्याच्या बाबांशी ऑफिस बाबतीत बोलत होता,

श्रेया आत मध्ये निघून गेली मी मुळीच जाणार नाही याच्यासोबत फिरायला, उगीच परत इथे हात लागला तिथे हात लागला, मला हात का लावला असं होईल, आज मी झोपणार कुठे आहे खूप झोप येत आहे, तिने काॅटच्या एका साईडला झोपून घेतलं, बराच वेळ झाला होता तरी सचिन आला नव्हता, पण मी त्याची वाट का बघते आहे? सचिन आला

" कुठे होता तू? लगेच का नाही आलास रूम मध्ये? मला तुझ्या सोबत फिरायला येता येणार नाही",. श्रेया

"बाबांशी बोलत होतो जरा, माहिती आहे मला, मलाही नाही यायच पण काही करू शकत नाही आपण, आता जसे इथे राहतो आहोत तसंच तिकडेही राहू, बाबा स्वतः बोलले की जाऊन या मला ऐकावं लागेल",.. तो श्रेयाच्या बाजूला येऊन झोपला, श्रेया उठून बसली,

" तू इथे झोपणार आहे का?",.. श्रेया

" हो ही माझी जागा आहे माझा कॉट आहे",.. सचिन

" तू इथे झोपू शकत नाही",.. श्रेया

" मला दुसरीकडे झोप येत नाही आणि माझे पाय पुरत नाही मी इथे झोपणार",.. सचिन

" मी कुठे झोपू मग",.. श्रेया

" तू तुझं बघ, माझ्याजवळ झोप",.. सचिन

" थोड्या वेळापूर्वीच तू खूप चिडला होतास ना माझ्यावर की मी तुला बिना विचारता हात लावला, मग झोपेत जर मी तुझ्याजवळ आली तर, उद्या उगीच बोलशील तू मला",..श्रेया

"यायचं नाही तुझ्या तुझ्या साईडला झोपायचं",.. सचिन

" ते आता मला कसं समजणार झोपेत, तू दुसरीकडे झोप",.. श्रेया

"मी जाणार नाही तू जा ना मग दुसरीकडे",.. सचिन

श्रेया रागाने उठली ती चेंजिंग रूम मधल्या सोफ्यावर येऊन झोपली, पण तिला पांघरायला ब्लॅंकेट नव्हतं कारण तिकडे कॉटवर एकच मोठ ब्लँकेट होतं, ती उठली तिने कपाटातुन तिची ओढणी घेतली ती पांघरली आणि झोपली, दहा मिनिटांनी सचिन आत मध्ये आला तिला एक छोटं ब्लॅंकेट दिलं, श्रेयाने तोंड फिरवून झोपून घेतल, झोप येत नव्हती, रोज इथे नाही झोपता येणार मला, माझ्या घरी ठीक होती मी.

🎭 Series Post

View all