रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 4
©️®️शिल्पा सुतार
........
........
सचिन जेवायला आला, श्रेया दिसत नव्हती,.." साक्षी ताई श्रेया कुठे आहे?" ,
ती आत बसली होती,
सचिन आत आला, श्रेया फोन वर मेसेज बघत होती, ती नीट उठून बसली,.. चल जेवायला,
"बाहेर जाव लागेल का?, मी इथे जेवू का थकली आहे मी खूप",.. श्रेया
"नाही बाहेर चल, काही काम असेल तर मदत कर तिथे" ,.. सचिन
"सचिन प्लीज, उद्या पासून करेन ना मी काम, माझे खरच खूप पाय दुखताय",..श्रेया
तो बघत होता खुप थकली आहे ही.. "चल जेवून घे आणि झोप आता, काही नाही प्रोग्राम असले तरी मी नाही सांगेन",.
ठीक आहे ..
श्रेया बरीच शांत झाली होती, सचिन बोलेल ते ती ऐकत होती, दोघ बाहेर आले
" काय झालं श्रेया? ",.. साक्षी
"मला खूप थकल्या सारख होत आहे ताई",.. श्रेया
"आई हिची नजर काढ" ,.. साक्षी सविता ताईंना हाक मारत होती, त्या सचिन श्रेयाला घेवून आतल्या खोलीत गेल्या, दोघांची नजर काढली, सचिन हसत होता.. गप्प बस सचिन
काहीही काय? कोणाची होणार नजर या भांडकुदळ श्रेयाला, नुसती गोड दिसते तोंड उघडल की डेंजर आहे ही,
ती बाहेर आली, टेबल वर सगळे पाहुणे बसले होते, बापरे आता यांच जेवण झाल्यावर आम्हाला मिळेल का? , पण त्या बाजूला एक टेबल होता, साक्षीने श्रेया सचिनला तिथे बसवल, ह्यांना जेवायला द्या आधी, श्रेया जेवत होती, आत्या बघत होत्या,
"लहान आहे ती खाऊ द्या दमली आहे" ,.. साक्षी
"आम्ही कुठे काय म्हणतोय" ,.. आत्या
जेवण झालं.
"मी झोपू का ताई" ,.. श्रेया
हो, श्रेया रूम मध्ये गेली, कधी जातील हे पाहुणे काय माहिती, बोर झाल इथे, तिने झोपून घेतल,
सचिन बाकीच्यांशी बोलत बसला,
सचिन उठ आराम कर सकाळी पूजा आहे परत धावपळ होईल, साक्षी श्रेयाच्या रूम मध्ये आली, तिने झोपून घेतल, सचिन रूम मध्ये गेला.
सकाळी साक्षी लवकर उठली, श्रेया अजुन झोपली होती,.. श्रेया उठ
ती उठत नव्हती, काय कराव? , थोड्या वेळाने साक्षीने परत हाक मारली, श्रेया उठली,.. "जा आवरून घे, आज पूजा आहे बरेच पाहुणे येतील" ,
श्रेया रेडी होती, हिरवी लाल साडी ती नेसली होती, दागिने घालून खूप छान दिसत होती ती, खूप भूक लागली आहे, इकडे चहा पाणी काही आहे की नाही? ,
"पूजा होई पर्यंत तुझा आणि सचिनचा उपास आहे",.. साक्षी
श्रेया हॉल मध्ये आली, बरेच लोक होते, कोण कोण आहे यांच्या कडे काय माहिती? ती बाजूला उभी होती,
श्रेयाचे आई बाबा आले पूजेसाठी, नंतर श्रेया आई कडे जाणार होती, श्रेया खुश होती आता, सचिन आला तो भेटला सगळ्यांना ,
सविता ताई आल्या,.." चला सचिन श्रेया पूजेला बसा",.. दोघ त्यांच्या सोबत देव घरात गेले, पूजेची पूर्ण तयारी झाली होती, श्रेया सचिन जवळ बसली, तो तिच्या कडे बघत होता, खूप सुंदर दिसते ही आज ही या साडीत, कुठलाही रंग छान दिसतो हिला, चिडलेली दिसते ही, भूक लागली असेल, उपास आहे ना, थोड चिडवायला हव हिला,..." तुला समजल ना श्रेय आज काही खायच नाही दिवस भर आपल्याला" ,
"दिवसभर म्हणजे? पूजा होई पर्यंत आहे ना उपास?",.. श्रेया
"नाही कोणी सांगितल? दिवस भर आहे उपास, काही खावू नकोस, मला चालणार नाही ",.. सचिन
श्रेया टेंशन मधे होती,.. "मला शक्य नाही हे सचिन, भूक लागली आहे, प्लीज मदत कर, काही खायला आहे का?
" देता येणार नाही" ,... सचिन
मी पूजा झाली की आईकडे जाईल, तिकडे जेवण करेल, कोणाला समजणार नाही, श्रेया खुश होती,
"सचिन आज आई कडे जाते मी" ,... श्रेया
"ते जमणार नाही, तुला जाता येणार नाही, माझ्या घरचे म्हणतील तेच करायच श्रेया ,इकडे काही कार्यक्रम असतिल तर",.. सचिन
श्रेया रागात होती,.. "तू माझ्याशी अस का वागतो आहेस सचिन?, मला नाही सुचत तुमच्या कडे, मला माझ्या घरी जायच आहे, आई बाबा आले आहेत, मी जाणार ",
बापरे चिडली ही जावू दे रडेल उगीच मी गप्प बसतो
" सगळ हा म्हणेल तस करा पूर्ण फसली मी ",.. श्रेया रागात होती, मी चिडते भांडते म्हणून हा जास्त करतो का? , नीट बोलू का थोड्या वेळ याच्याशी , म्हणजे हा मला घरी जावू देईल,
" ठीक आहे सचिन, तू म्हणशील तस" ,.. श्रेया छान हसली त्याच्याशी.
सचिन एकदम शांत झाला. तिच्या सुंदर चेहर्याकडे बघत बसला.
" बर ठीक आहे जा तू तुझ्या आई बाबां कडे , चिडू नकोस, नाश्ताच मी बोलून बघतो आईशी, देईल ती नाश्ता , आईला विचारून जायच घरी",.. सचिन
" ठीक आहे" ,.. श्रेया खुश होती
गुरूजींनी पूजा सुरू केली, पूजा झाली घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, सचिन श्रेया सगळ्यांच्या पाया पडत होते, खूप गिफ्ट मिळत होते दोघांना, ही जोडी खूप आवडली सगळ्यांना,
जरा वेळाने श्रेया सचिनला नाश्ता दिला, श्रेया येवून बसली, श्रेया पाणी आण सचिन बोलला, साक्षी ही नाश्ता करत होती, ती उठत होती,
"ताई तू बस" ,.. सचिन
"अरे मी मावशींनी सांगते",.. साक्षी
"नको श्रेया पाणी आण आणि चहा ठेव" ,.. सचिन
तिला काही बोलता येत नव्हत सगळ्यांसमोर, ती किचन मध्ये गेली, तिने पाणी घेऊन आली, चहा ठेवायचा बाकी होता, जरा वेळाने चहा ठेवते असं सांगून तिने नाश्ता करून घेतला,
नाश्ता करून झाल्यानंतर सचिन तिच्याकडे बघत होता, ती किचनमध्ये गेली, काम करणाऱ्या मावशी तिथे उभ्या होत्या चहा कसा करायचा तिने विचारलं, त्यांच्या मदतीने तिने एक कप चहा करून आणला आणि तो सचिनला दिला, छान झाला होता चहा, सचिनने चहा घेतला
" चला आता आम्हाला निघावं लागेल, आम्ही श्रेयाला घेऊन जातो सोबत",.. अभिजीत राव
श्रेया खुश होती मी जाईन माझ्या घरी, सचिनने सांगितल्याप्रमाणे तिने सविता ताईंना विचारलं.. "आई मी जाऊ का घरी?",
त्या हो बोलल्या, श्रेया आत बॅग घ्यायला गेली, साक्षी तिच्या सोबत होती
"काय काय घेऊन जाऊ ताई? ",.. श्रेया
" जास्त काही घेऊ नको उद्या लगेच परत यायचं आहे तुला",.. साक्षी
"मला आईकडे थांबता येणार नाही का? ",.. श्रेया
"नाही तुला थांबायचं आहे का तिकडे?",.. साक्षी
श्रेया काही म्हटली नाही, ती आई बाबांसोबत घरी आली, रस्ता भर ती सचिनचा विचार करत होती, सचिनचा वागणं एकदमच बदलला आहे, लग्नानंतर तो माझ्यावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो, मला काम सांगतो, का करतो आहे तो असं? मुद्दाम करतो आहे का? की पती-पत्नी वाटावे म्हणून असं करतो आहे, काही समजायला मार्ग नाही, पण मी त्याला बोलणारच आहे,
ते घरी आले श्रेया तिच्या रूममध्ये निघून गेली, आरामशीर वाटत होतं तिला तिच्या रूममध्ये, मला अजिबात आवडलं नाही सचिनच्या घरी, मी तिकडे जाणार नाही, ती विचार करत होती जरा वेळ झोपली ती
....
....
सचिनने नेहाला फोन लावला, तिने समोरून फोन कट केला, सचिनने परत फोन लावला
" सचिन का करतो आहेस तू मला फोन?",.. नेहा
"मी दोन दिवसापासून तुला फोन करतो आहे नेहा, तू का फोन कट करते आहे",.. सचिन
"मग आता काय बोलणार मी तुझ्याशी? तुझ अभिनंदन करू का लग्न झाल्याबद्दल",.. नेहा
"मी तुला खरं कारण सांगितलं होतं ना लग्नाचं नेहा, हे फक्त एक डिल आहे थोडा वेळ दे मला ",.. सचिन
" मला काहीही सांगू नको सचिन",.. ते दोघे बोलत असताना मागच्या बाजूने एक मुलगा बोलण्याचा आवाज आला, नेहाने पटकन फोन म्युट वर टाकला
" कोण आहे नेहा तिकडे? ",.. सचिन
" कोणी नाही ऑफिसचं काम सुरू आहे",.. नेहा
" ठीक आहे ठेवतो मी फोन ",.. किती खोटं बोलते आहे ही नेहा, इकडे दिवस म्हणजे तिकडे रात्र असेल, सचिनने त्याच्या पर्सनल असिस्टंटला फोन लावला, नेहाचा नंबर दिला, पत्ता दिला, चौकशी करा कोणाबरोबर राहते आहे ही?
ठीक आहे सर..
......
......
मीनाताई दुपारी श्रेयाच्या रूम मध्ये आल्या होती, श्रेया टीव्ही बघत होती, थकली का श्रेया ?
"हो आई खूपच प्रोग्राम होते त्यांच्या घरी, खूप गर्दी पण झाली आहे तिकडे, मला कंटाळा येतो एवढ्या गर्दीत",. श्रेया
"एक-दोन दिवस थांबतील ग पाहुणे ",.. मीना ताई
"कोण कोण आहे त्यांच्याकडे आई ",.. श्रेया
"तुझे सासू-सासरे, सचिन राव त्यांची बहीण साक्षी तिचे मिस्टर विवेक आजी आजोबा आहेत, साक्षी विवेक नाही रहात इथे ते दुसर्या गावाला रहातात ",.. मीना ताई
" आई तुला अस झाल होत का सुरूवातीला, आवडल नव्हत का पप्पांच्या घरी? ",.. श्रेया
" हो बेटा अस होत, नंतर तुला तिकडे आवडेल इकडे नाही ",.. मीना ताई
" अस होणार नाही आई, मला आवडत तुझ्या जवळ, मी इथे नाही राहू शकत का ",.. श्रेया
" नाही बेटा ते घर तुझ आहे",... मीना ताई
श्रेया रडवेली झाली होती, उगीच ऐकल त्या सचिनच,.. " आई मी बाहेर जाते फ्रेंड्स सोबत ",
ठीक आहे
मीना ताई अभिजित राव चहा घेत होते,.." काय करते श्रेया? ",
" आराम करते आहे, फिरायला जाणार आहे थोड्या वेळाने, अहो ती तिकडे सासरी जायला नाही म्हणते आहे, मला काळजी वाटते",.. मीना ताई
" काही काळजी करू नकोस जाईल ती, अल्लड आहे ती ",.. अभिजीत राव
" कोणी काही बोलली तर नसेल ना तिला तिकडे ",.. मीना ताई
"माझी मुलगी आहे ती, कोणाची काय हिम्मत तिला बोलायची, काही झाल नसेल अस ",.. अभिजीत राव
संध्याकाळ पासूनचा वेळ तर श्रेयाचा मजेत गेला, मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्यासोबत ती बाहेर फिरायला गेली ,
"सौरभला फोन लाव माही",.. माहिने फोन लावला, सौरभने फोन उचलला नाही,
प्रत्यक्षातच भेटावं लागेल या सौरभला असं वाटतं आहे श्रेया विचार करत होती
श्रेया तिकडनं जेवण करून आली घरी आली, खूपच गडबड सुरू होती, सामान सगळं पडलं होतं, आई बघत होती सगळं ठीक आहे ना, काय काय हव ते ती सांगत होती ,
" काय सुरू आहे आई? ",.. श्रेया
" उद्या घरी पूजा आहे ना तुझ्या आणि जावई बापूंच्या हातून",.. मीना ताई
"नॉट अगेन काय गरज आहे एवढ्या पूजेची? ",.. श्रेया
"चांगल्या कार्यात असं बोलू नये मध्ये श्रेया, त्यांच्या घरी पूजा झाली तुझ्या पप्पांची इच्छा आहे आपल्या घरी ही तुमच्या हातून पूजा व्हावी",..मीना ताई
" मला तिकडे जायचं नाही, आई मी तुला दुपारी सांगितलेल आहे, पूजा ठेवू नकोस ",..श्रेया
"असं चालणार नाही, तुझे बाबा ऐकणार नाही तुला माहिती आहे ,लग्न झाल तुझ आता, एवढा चांगला मुलगा आहे, हट्ट सोड जरा, उद्यासाठी ही बघ तुझ्यासाठी छान सुंदर अशी जांभळी साडी काढून ठेवली आहे, लवकर उठ ते लोक लवकर येतील",.. मीना ताई
रागात श्रेया रूममध्ये गेली, तिने दार लावून घेतलं, परत एकदा सौरभला फोन लावला, त्याने नेहमीप्रमाणे तिचा फोन कट केला,...
जरा वेळाने श्रेयाचा फोन वाजत होता, तिला वाटत होत सौरभचाच फोन असेल, तिने पटकन फोन उचलला,..
हॅलो श्रेया
हॅलो कोण बोलत आहे?
" एवढ्यात आवाज विसरली का माझा आवाज मी तुझा नवरा सचिन बोलतो आहे",.
" कशाला फोन केला आहे? ",.. श्रेया
" माझी बायको माहेरी गेली तर बघत होतो तिला करमत आहे की नाही",.. सचिन
" हे बघ सचिन हे अस माझ्याशी बोलायचं नाही ",.. श्रेया
" मग काय करायचं?, येवू का तिकडे तुला भेटायला आता ",.. सचिन उगीच तिला चिडवत होता
" मला तिकडे यायचं नाही तुझ्या घरी, मी येणार नाही उद्या, माझे बाबा म्हटले श्रेयाला घेऊन जा, तर तू नाही सांगून दे सचिन, सांग त्यांना श्रेया मला पसंत नाही",.. श्रेया
" आणि मी का करेन असं? ",.. सचिन
"कारण माझं मन नाही आहे तिकडे यायचं",.. श्रेया
"काही प्रॉब्लेम आहे का तुला? कोणी काही म्हटलं का?",.. सचिन
"तुमच्याकडे खूप गर्दी असते आणि खूप नियम आहेत तू पण तिकडे माझ्याशी वेगळा वागतो, मला बोलतोस, काम सांगतोस, सगळ्यां समोर मला बोलतो , मी तुझी बायको नाही लक्ष्यात ठेव ",.. श्रेया
" बापरे खूप राग आलेला दिसतोय, वेगळ म्हणजे काय केलं मी तुला? पाणी द्यायला सांगितलं आणि चहा ठेवायला सांगितला, अरे मी ते मुद्दामून सगळ्यांसमोर असं करत होतो",.. सचिन
" काही गरज नाहीये या पुढे असं करायची",.. श्रेया
" श्रेया शांततेने घे थोड आपल्या दोघांसाठी तेच बर आहे" ,... सचिन
श्रेया काही म्हटली नाही, तिने फोन ठेवला आणि झोपून घेतलं
सकाळी लवकर पूजेची सगळी तयारी झाली होती, पार्लर वाल्या ताईंनी श्रेयाला तयार केलं, जांभळी नऊवार साडी, कपाळावर चंद्रकोर, पारंपारिक दागिने अशी तिची तयारी झालेली होती, खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होती, ती तोंड उतरवून ती पलंगावर बसलेली होती,
आई आली,.. "जरा हसून इकडे तिकडे बघितले तर अजून चांगलं वाटेल श्रेया",..
"का हसू आई मी, माझ्या मनासारखं काही होत आहे का इकडे",.. श्रेया
"काय झालं आता? ",.. मीना ताई
"काही नाही, तो सचिन माझ ऐकत नाही",.. श्रेया
"अस सचिन सचिन बोलू नये, अहो म्हणत जा सगळ्यां समोर त्यांना",.. मीना ताई
आई तू ही.. कोणी बोलू नका माझ्याशी
जरा वेळाने सचिनचे आई-बाबा, साक्षी तिचे मिस्टर विवेकराव, सचिन सगळे आले, ते सोफ्यावर बसले होते, श्रेयाला बाहेर बोलवलं, चहा आण ग, श्रेया बाहेर आली एखाद्या पिक्चरच्या हिरोईन सारखी ती खूपच सुंदर दिसत होती, सगळे तिच्याकडे बघत होते, तिने येऊन सगळ्यांच्या पाया पडल्या,
"आजी-आजोबा नाही आले का? ",.. आपोआपच तिने विचारलं
नाही आले ते , तिने चहा दिला सगळ्यांना,
सचिन बघत होता तिच्या कडे, तिने दुर्लक्ष केल, जावू दे चीड चीड नको करायला,
फोटोग्राफर आलेले होते, सगळ्या फॅमिली बरोबर फोटो काढले, नंतर सचिन श्रेयाचे फोटो काढायला त्या दोघांना बोलवलं
" बोलायचं नाही वाटतं आज माझ्याशी",.. सचिन
"असं काही नाही सचिन",.. श्रेया
"एक सांगू का तू अशी शांत छान वाटते ",.. सचिन
श्रेया त्याच्याकडे बघत होती,
" बराच फरक पडला तुझ्यात, कसं काय?",.. सचिन
" सचिन तुला वाटत आहे का मी तुझ्याशी आता भांडाव",.. श्रेया
नाही
"मग गप्प बस",.. खूप सुंदर फोटो काढले त्यांचे, दोघं आत येऊन बसले
गुरुजी आलेले होते, चला पूजेला बसा, समोर पूजा मांडली होती,
" मला हातवाय धुवायचे आहेत ",.. सचिन
" श्रेया सचिन रावांना आत मध्ये ने",.. मीना ताई
श्रेया सचिनला घेऊन आत मध्ये आली, तिने बाथरूम दाखवलं, तो हात पाय धुऊन आला, श्रेयाने टॉवेल दिला, सचिन तिच्या कडे बघत होता, श्रेयाने त्याच्या कडे रागाने बघितल, हा का बघतो केव्हाचा माझ्या कडे
"खूपच सुंदर दिसते आहेस तू आज श्रेया, पण नाकाला काय झालं? ",.. सचिन
श्रेया आरशात बघत होती ठीकच होतं की नाक
" केवढा राग आहे त्या नाकावर",.. सचिन
श्रेया त्याच्याकडे बघत होती, तिने त्याला मारल,.. "बापरे सांगू का तुझ्या घरच्यांना नवर्याला मारते ही",
तिला आता हसू आलं
" पण काहीही म्हणा तू खूपच सुंदर दिसते आहे आज",..सचिन
श्रेया लाजली..
" काय झालं? छान दिसते ही आपण कॉम्प्लिमेंट कोणालाही देऊ शकतो ना, मैत्रिणींना घरच्यांनाही म्हणतो की छान दिसते आहे अस ",.. सचिन
ठीक आहे
"एका दिवसानंतर नवरा भेटला आहे जरा हसून बोल",.. सचिन
"सगळे काय मला सकाळपासून हसायला सांगता आहेत मला नाही हसायचं",.. श्रेया बाहेर आली, सचिन तिच्या मागे आला दोघ पूजेला बसले, पूजा छान झाली
" आता काय आहे पुढचे प्रोग्राम? ",.. अभिजीत राव मीना ताईंना विचारात होते
" स्वयंपाक तयार आहे, जेवण करून घ्या आता",.. मीना ताई
" आम्ही दुपारनंतर देवाला जाणार आहोत, निघतो जरा वेळाने",.. सविता ताई
चालेल..
जेवण झालं पंचपकवांनाचा स्वयंपाक होता सचिनचं खूपच कौतुक करत होते सगळे, आई बाबा साक्षी विवेक घरी गेले
" सचिन तू श्रेयाला घेऊन ये मग आपण तिथून देवळात जाऊ, नाही तरी घरूनच निघावं लागणार आहे तर आम्ही पुढे जातो",.. साक्षी
चालेल..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा