रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 3

खूपच छान चालला आहे दादा, आपण माघार घ्यायची नाही",.. बाकीच्या बहिणी हसत होत्या, श्रेया गप्प बसुन सगळ सहन करत होती.


रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
........

सगळ्या पूजा झाल्या होत्या, पाठवणीची वेळ झाली, श्रेया रूममध्ये बसलेली होती, मीना ताई तिची बॅग भरून देत होत्या.

" हे बघ श्रेया सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत, तुझ्या तुझ्या सामानाची काळजी घे, तिकडे कुठे इकडे तिकडे फेकू नको कपडे",.. मीना ताई

"हो ग आई किती वेळा तेच सांगते",.. श्रेया

"घरी गेला की सगळे दागिने काढून नीट कपाटात ठेव, किवा तुझ्या सासुबाईना विचारून ठेव , इकडे तिकडे ठेवू नको",.. मीना ताई

" ठीक आहे",.. श्रेया

" या दुसऱ्या बॅगेत तुझे रोजचे कपडे आहेत",.. मीना ताई

" ठीक आहे ",.. श्रेया

मीना ताई हळव्या झाल्या होत्या, त्या येऊन श्रेयाला भेटल्या,

" काय झालं आता आई? का रडतेस? ",.. श्रेया

" अग तू सासरी जाणार म्हणून तुझी आई रडते आहे",.. माही

श्रेयालाही कसंतरी वाटलं,.." आई मी काही दूर जात नाही, अगदीच अर्ध्या तासावर आमचं घर आहे आणि मी रोज कॉलेज झाल्यानंतर घरी येणार आहे मला तुझ्या हातचं जेवण आवडतं, रडू नको तू, हे बघ मग मला पण कसं तरी होतं",.. श्रेयाने त्यांना मिठी मारली,

आता श्रेयाला कसतरी होत होत खरच चाललो आपण इथून,.. "आई मला नाही जायचं ग सासरी, मी इथे नाही का राहू शकत, तू बोल ना बाबांशी ",

" हुशार आहेस तू बेटा, जा नीट रहा तिकडे ",.. मीना ताई

आई प्लीज,...

त्या दोघी आल्या खाली, सगळे पाहुणे वाट बघत होते, आता बरेच लोक कमी झाले होते, सचिन श्रेयाच्या हातून छोटी पूजा झाली,

"आम्ही निघतो आता" ,.. केदार देशमुख साहेब येवून भेटले,

"काळजी घ्या श्रेयाची",.. अभिजीत राव इमोशनल झाले होते, सगळे त्यांना समजावत होते,

अभिजीत राव येऊन भेटले श्रेयाला, श्रेया रडत होती ,.. "तुला वाटत असेल की मी तुझ्याशी खूप स्ट्रिक्ट वागलो आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव मी तुझं चांगलं करण्यासाठीच हे सगळं केलं आणि भविष्यात तू मला धन्यवादच देशील की बरं झालं पप्पा तुम्ही माझं चांगलं केलं",

"काही प्रॉब्लेम नाही पप्पा, माझा तुमच्यावर राग नाही",.. श्रेया अजून रडत होती, ते तिला घेवून बाहेर आले,

श्रेया सचिन सोबत सजवलेल्या गाडीत येऊन बसली, सचिन त्यांना येवून भेटला... " काळजी घ्या श्रेयाची खूप अल्लड आहे ती, चांगल्या वाईटची समज नाही तिला अजून, भांडते खूप पण मनात काही नसतं तिच्या, काही बोलली ती तर मला सांगा, समजून घ्या तिला ",..

" तुम्ही काळजी करू नका अंकल मी आहे",.. सचिन

ते दोघं बसले होते, बाकीचे येत होते, श्रेया रडत होती अजूनही , सचिनने तिला पाणी दिल टिश्यू पेपर दिला, आता बरीच सावरली होती श्रेया, तिला रडतांना बघून सचिनला कसतरी झाल होत, ती कार मधून तिच्या आई बाबां कडे बघत होती,

" डोन्ट वरी श्रेया रीलॅक्स काळजी करू नको मी आहे",.. सचिन तिला समजावत होता

श्रेयाला खूप राग आला होता त्याचा, उगीच याच ऐकल लग्नाला होकार दिला, आता कठिण जाताय आईला सोडून जायला, ती चिडली त्याच्यावर ... "मी आहे म्हणजे काय सचिन? तू अगदीच माझा सांभाळ करत असल्यासारखा करतो आहेस, तुझ्या मुळे झाल हे मी माझ्या घरी बरी होती ",..

"झाल वाटत रडून, लगेच भांडायला मोकळी तू, तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही श्रेया, जरा शांत राहणार का, असं बोलायची पद्धत असते ",.. सचिन

तेवढ्यात कारच्या दोघ्या बाजूने सचिनच्या चुलत बहिणी कारमध्ये घुसल्या, अजिबात जागा नव्हती मागच्या सीटवर सचिनच्या एकदम जवळ श्रेया ढकलली गेली होती, श्रेयाने सचिनकडे बघितलं, तोही तिच्याकडे बघत होता, दोघ अगदी जवळ होते, पहिल्यांदा श्रेया लाजली होती,

सचिन रिक्वेस्ट करत होतं त्याच्या बहिणींना की उतरा खाली, कोणीही उतरलं नाही, उलट त्यांनी कारचा दरवाजा लावून घेतला, एकमेकाजवळ बसण्या शिवाय काही गत्यंतर नव्हतं त्यांना,

किती वेळ आहे इथून यांच घरी यायला... श्रेया विचार करत होती, खूप थोड्या जागेत ती बसली होती, तिने थोडं जरी इकडे तिकडे बघितलं तरी तिचे केस सचिनच्या चेहऱ्यावर जात होते, त्यातून खूप छान सुगंध येत होता, सचिन मागे सरकून बसला, श्रेयालाही काही सुचत नव्हतं.

दोघी बहिणी खूप मजा करत होत्या, त्या श्रेयाला सारख वहिनी वहिनी करत होत्या, श्रेया चिडली होती, शेवटी घर आलं, दोघी बहिणी उतरल्या श्रेया पटकन बाजूला सरकली त्या दोघांना अजून आत येऊ दिलं नव्हतं, त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती, ड्रायव्हरही उतरून खाली गेला होता,

श्रेया बाजूला बसून साडी नीट करत होती, सचिन तिच्याकडेच बघत होता, छान वाटत हिच्या जवळ, काय लावते ही केसांना छान वास येतो, पण भांडकुदळ आहे ही, तिच्या बाबानी सांगितल तस थोड्या वेळा पूर्वी ,

" काय आहे सचिन? ",.. श्रेया

"तू काही म्हटलीस का?",.. सचिन

"हो... तू माझ्याकडे बघतो आहेस का सचिन? ",.. श्रेया

नाही..

"तसा विचारही मनात आणू नको, मला कराटे येतात",.. श्रेया

"वेडी आहेस का तू श्रेया जरा, मी बघत होतो तुझी साडी खराब झाली का ते ,.. सचिन

" मी माझं माझं बघून घेईन, माझ्या कुठल्याच गोष्टींत मध्ये मध्ये करायचं नाही",.. श्रेया

"एवढं टोकाच बोलायची गरज आहे का? आपण प्रेमानेही बोलून राहू शकतो ना एकमेकांसोबत आणि मला तुला त्रास देण्यात किंवा तुझ्यात अजिबातच इंटरेस्ट नाही, तुला कराटे येत असतील तर मला काय करायचं आहे",.. सचिनला राग आला होता

दोघांच्या भांडणाला तिथूनच सुरुवात झाली होती, सचिन अजून त्या बाजूला सरकून बसला, हिच्याशी बोलणच गुन्हा आहे

आत स्वागताची तयारी पूर्ण झाली होती, दोघांना आत बोलवलं, सचिन उतरला तिकडच्या बाजूने जाऊन त्याने श्रेयाचा दरवाजा उघडला, हात पुढे केला, श्रेया त्याच्याकडे बघत होती,

" मी सांगितलं होतं तुला की सगळ्यांसमोर नीट वागायचं",.. तो हळूच म्हटलं.. "हे माझ घर आहे आणि माझ्या घरचे आहेत आजूबाजूला, तू मला मदत केली नाही तर मी पण तुला मदत करणार नाही, तुला कायम माझ्या घरातच माझी बायको म्हणून राहावं लागेल, मी तुला जावू देणार नाही, तेव्हा जरा माझ्याशी प्रेमाने वाग, उलट उत्तर भांडण अजिबात चालणार नाही, समजल ना ",

हो... श्रेया आता हसून त्याच्याकडे बघत होती, तिने त्याच्या हातात हात दिला, ती खाली उतरली, सगळेजण बघत होते, बरेच फोटो निघत होते, दोघेजण आत आले, दाराजवळ दोघांना ओवाळ, कुमकुम मिश्रित पावलांनी माप ओलांडून श्रेया आत आली

" देवघरात जा आधी पूजा करून घ्या ",.. सविता ताई सचिनच्या आई बोलल्या

दोघ देवघरात आले, गुरुजी तिथे उपस्थित होते त्यांनी पूजा सांगितली, त्याप्रमाणे पूजा केली, दोघ बाहेर आले

सगळे सचिनला सांगत होते श्रेयाला उचलून घे आणि केक कापायला चल, सचिनला समजत नव्हतं काय करावं, तो तसाच उभा होता, श्रेयाचा भरोसा नाही उलटून वगैरे बोलायची उगीच हात लावला तर, एक तर तिला कराटे येतात, तो स्वतः हसत होता

कम ऑन सचिन बायको आहे आता श्रेया तुझी, चला लवकर केक कापायला, गार्डनमध्ये सोय केली होती, सगळे बरोबरीचे भाऊ बहीण तिथे हजर होते

सचिनने श्रेयाला उचललं, श्रेया खूप घाबरली होती, तिने एकदम त्याला पाठीमागून धरलं, हळूच काना जवळ येऊन तो बोलला आय एम सॉरी, दोघं गार्डन मध्ये आले, त्याने श्रेयाला खाली उतरवलं दोघं मिळून केक कापत होते

"हे काय असं सचिन श्रेयाच्या एवढ्या लांब उभ राहून केक कापतो आहे" ,..

सचिनने श्रेयाला जवळ ओढल, दोघांनी मिळून केक कापला, एकमेकाला खाऊ घातला, सगळे सांगत होते की नाउ यू कॅन किस युवर ब्राईड

श्रेयाचा आता पूर्णच घाबरली होती, काय करतो हा उगाच घरचे बोलले या नावाखाली मला हात लावतो की काय?

सचिन तिच्या कडे बघत होता, श्रेया घाबरली,... तो हसत होता, सचिनने सगळ्यांना शांत केलं.. घरातले मोठेपण आहे आजूबाजूला शांत रहा

सगळ्यांना ते मान्य झालं म्हणून तो प्रसंग टळला

श्रेयाच्या जीवात जीव आला, मंद म्युझिक लागलं होतं, सगळे छान डान्स करत होते, सचिन श्रेयाला सगळ्यांनी मधे घेतल ते दोघ सोबत डान्स करत होती, विशेष जागा नव्हती आत, श्रेया जवळ जवळ त्याच्या मिठीत होती, सचिन बघत होता श्रेया खूप सुंदर आहे एवढी थकली तरी मस्त दिसते, मी काय विचार करतोय हा नेहाची आठवण आली नाही आज विशेष, तिला फोन करावा लागेल

"किती वेळ चालणार आहे हा कार्यक्रम सचिन",.. श्रेया

काय माहिती?

"मला तर खूप दमलं सारखं झालं आहे, मला झोपायच आहे",.. श्रेया

"हो जावू या आत",.. सचिन

मी कुठे राहणार या सचिनच्या खोलीत का.. ओ माय गॉड

"काय बोलतात तुम्ही",.. सचिनची बहिण साक्षी चिडवत होती, साक्षीचे मागच्या वर्षी लग्न झालं होतं, तिला पण खूप श्रीमंत घराण्यात दिलं होतं, ती सकाळपासून कामात बिझी होती, सचिनला काय हवं नको ते ती बघत होती, सचिनचाही तिच्यावर खूप जीव होता

"ताई प्लीज श्रेया कडे लक्ष दे ना ती गडबडून गेली आहे या सगळ्या गोंधळात",.. सचिन

"हो श्रेया तुला काही हवं आहे का ये इकडे",.. साक्षी

"मला आराम करायचा आहे ताई",.. श्रेया

"हो आता हे एवढे एक दोनच गेम मग जेवण कर आणि मग रूम मध्ये जाऊन झोपून घे",.. साक्षी

अजून बरेच प्रोग्राम बाकी होते, दूध आणि पाण्याने भरलेल्या मोठ्या घंगाळात गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या, त्यात अंगठी शोधायचा खेळ होता,

" ओ गॉड नॉट अगेन सचिन मला जमणार नाही हे सगळं मला खूप थकायला झाला आहे मला रूम मध्ये जायचं आहे ",.. श्रेया

"असं चालणार नाही श्रेया प्लीज को ऑपरेट, एक-दोन दिवसच असतील हे कार्यक्रम नंतर एकदा आपले रुटीन सुरू झालं तर काही प्रॉब्लेम नाही",.. सचिन

सचिन आणि श्रेयाला समोरासमोर बसवलं, आत्याने अंगठी पाण्यात टाकली, शोधा अंगठी सचिन आणि श्रेयाने अंगठी शोधायला प्रयत्न केला, पहिल्या चान्स मध्ये सचिनला अंगठी सापडली, त्याने ती परत पाण्यात टाकली, श्रेयाला सापडली अंगठी, सगळे टाळ्या वाजवत होते , श्रेयाला समजलच नाही त्याने असं का केलं, सगळे खुश होते, दुसऱ्यांदा त्यांनी अंगठी आत मध्ये टाकली यावेळी श्रेयाला ती पहिल्यांदा सापडली तिने सगळ्यांना अंगठी दाखवली सगळे आता सचिनला बोलत होते काय सुरू आहे सचिन तुझ अंगठी सापडवली नाही तर तुमच्या संसारात श्रेया वरचढ राहील आटोप लवकर,

"काही हरकत नाही ही वरचढ तर मला चालेल" ,.. सचिन सगळ्यांसमोर बोलला, सगळे हसत होते,

सविता ताई सचिन गेला हातचा, त्या ही हसत होत्या,

सचिन तिच्या कडे बघत होता तो, असा त्रास देणार मी आता श्रेयाला, भांडायला आवडत ना हिला,

दोन चान्स तर गेले आहेत आपले आत्यांनी परत अंगठी पाण्यात टाकली यावेळी परत श्रेयाला अंगठी सापडली ती हात वर घेत होती तर आत पाण्यात सचिनने तिचा हात धरून ठेवला तिला हात बाहेरच घेता येत नव्हता

श्रेया सचिनकडे बघत होता, तिला राग आला

" अंगठी दे श्रेया",.. सचिन बोलला

श्रेया देत नव्हती, तो हात सोडत नव्हता, सगळ्यांना समजलं सचिनने श्रेयाचा हात धरला आहे, साक्षी हसत होती

"ताई सांगा ना",.. श्रेया

"सचिन सोड तिचा हात",.. साक्षी

सचिन हात सोडवतच नव्हता,.. "आधी अंगठी दे श्रेया तरच हात सोडेल",

" माझा हात दुखतोय",.. श्रेया

"मग दे अंगठी",.. सचिन

"नको देवू श्रेया अंगठी" ,.. आत्या सांगत होत्या

"मग मी हात सोडणार नाही, बसुन रहा अस माझ्या जवळ रात्र भर",.. सचिन

शेवटी श्रेयाने सचिनला अंगठी देऊन टाकली आणि मग त्याने हात सोडला

" खूपच छान चालला आहे दादा, आपण माघार घ्यायची नाही",.. बाकीच्या बहिणी हसत होत्या, श्रेया गप्प बसुन सगळ सहन करत होती.

पुरे झालं चला आता नंतर हळद उतरवायचा कार्यक्रम होता, त्यात श्रेयाला अजिबातच इंटरेस्ट नव्हता, सगळ्यांसमोर आंघोळीचा प्रकार,

सचिनला ही ते आवडलं नाही,.." मुळीच नाही आम्ही आमची उतरून घेऊ हळद",

"अरे असं चालणार नाही अजून पूजा झाली नाही तुम्हाला दोघांना एकत्र बाथरूम मध्ये जाता येणार नाही",.. आत्या

"आम्ही काही करत नाही आहोत" ,.. साक्षी त्या दोघांना गेस्ट रूमच्या बाथरुम मधे घेऊन आली, तिथे आज रात्री श्रेया राहणार होती, तीच सामान तिथे होत, श्रेयाला तर काही सुचत नव्हतं काय काय प्रकार चालले आहे, ती एका बाजूला उभी होती

" सचिन तू जा इथून",.. श्रेया

का?

" मला आवरायच आहे ",.. श्रेया

"आधी मी करणार इथे आंघोळ, तू बाहेर थांब",.. सचिन

"सचिन मुद्दाम करतोय तू मला माहिती आहे",.. श्रेया

साक्षी आत आली,.. "तुम्ही दोघ असे उभे का? " ,

"मग काय करायच आहे? " ,.. सचिन

साक्षी हसत होती,.. "काही नाही जा तू तुझ्या रूम मध्ये",

" हो मी जातो आहे",.. दोन मिनिटांनी सचिन त्याच्या रूममध्ये निघून गेला, श्रेया आंघोळ करून बाहेर आली, तिने छान ड्रेस घातला होता, खूप झोप येत होती तिला,

" श्रेया सचिन आला की बाहेर ये जेवून घे",.. साक्षी

ठीक आहे, ती आत बसली होती., हा सचिन मुद्दाम मला बोलतो आहे, मला नाही रहायच इथे. ती चिडली होती.

🎭 Series Post

View all