Login

रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 2

श्रीमंतांच्या मुलांचे लग्न युती होण्यासाठीच असतात, एखाद्या श्रीमंत घराण्यात लग्न ठरलं म्हणजे बिझनेस मिळतो, सगळेच फायदे होतात,



रंग प्रितीचे... तुझे नी माझे... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
........

सचिन श्रेया दोघ रूम कडे निघाले.

"तू काय करतोस सचिन? , ऑफिसला जातोस ना ? ",.. श्रेया

"हो.. मी माझ्या वडिलांना बिजनेस मध्ये मदत करतो, मी इंजिनियर आहे, तू काय करतेस?, कॉलेजला आहेस ना ",.. सचिन

"हो, सेकंड इयर" ,.. श्रेया

" अरे बापरे अगदी वीस वर्षाची आहे ही, अल्लड",.. सचिन

लग्न ठरल्या नंतरही ते दोघं असे भेटलेच नव्हते, सचिन बिझनेस टूर मधे बिझी होता, एकदा दोनदाच त्यांनी लांबून बघितलं होतं एकमेकांना, आजूबाजूला इतका बायकांचा गोतावळा होता की त्यातून त्यांना बोलायला वेळच मिळाला नव्हता, दोन-तीनदा तिने तिच्या बाबांना विचारलं मुलगा काय करतो त्यांनी सांगितलं होत,

हॉटेलमध्ये एकच गडबड उडाली होती, श्रेया पळाली एवढच समजलं होतं, आई बाबा बाकीचे नातेवाईक सगळे श्रेयाला शोधत होते, तेवढ्यात श्रेया समोरून सचिन सोबत येतांना दिसली, सगळे शांत उभे होते. दोघेजण छान बोलत येत होते.

"काय झालं तुम्ही सगळे बाहेर का? ",.. सचिन

"कुठे गेली होती श्रेया? ",.. अभिजीत राव श्रेयाचे बाबा विचारात होते

"अंकल मि तिला भेटायला बोलवून घेतलं होतं, आम्ही लग्न ठरवल्यापासून असं भेटलोच नाही ना ",.. सचिन

"हो ना सचिन राव तुम्ही परवाच फॉरेन होऊन वापस आले ना, आत जा आराम कर श्रेया, उद्या लवकर प्रोग्राम सुरु होणार आहेत ",.. अभिजीत राव

"गुड नाइट",.. श्रेया सचिन कडे बघत होती

मीना ताई श्रेयाला घेऊन आत मध्ये चालल्या गेल्या ,

" जा तुम्ही पण जाऊन झोपा सचिन राव, सकाळी लवकर कार्यक्रम सुरू होणार आहे",.. अभिजीत राव

दोन करोडपती लोकांमधलं हे लग्न पेपरमध्येही चांगलंच गाजत होतं, लग्न ठरल्यापासून श्रेयाची माहिती सचिनची माहिती पेपर मध्ये येत होती, पण त्या दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळच नव्हता,

अगदी आठ दिवसात सगळं ठरलं होतं, त्यातले तीन चार दिवस तर श्रेया आई-वडिलांशीच भांडत होती की मला हे लग्न मान्य नाही, पण सचिन सारखा चांगला मुलगा हातचा जाऊ द्यायचं नव्हता त्यांना, आता जरी त्यांच्या प्रोजेक्ट मधे लॉस झाला असला तरी इतर काम नीट सुरु होते, शेअर मार्केटमध्ये त्यांची कंपनी नेहमी पुढेच असायची, आज लॉस झाला तर उद्या फायदा होईल आणि खानदानी श्रीमंत लोक आहेत ते, एक दोन लॉसने काही विशेष फरक पडत नाही, असा विचार श्रेयाच्या वडिलांनी अभिजीत माने यांनी केला होता

सचिनचे वडील केदार देशमुख मोठं नाव होतं मंत्र्या संत्र्यांची त्यांच्या घरी उठ बस होती तिकडे, अति श्रीमंत असे ते लोक पण एवढ्यात त्यांना बिजनेस मध्ये थोडा लॉस झाला होता, त्याच काळात त्यांची ओळख अभिजीत माने यांच्याशी झाली होती, त्यांनी त्यांना मदत करायचं इच्छा दाखवली, सचिनला त्यांनी बराच वेळा मीटिंगमध्ये बघितलं होतं, आपल्या श्रेयासाठी असा छान मुलगा हवा होता.

श्रेया कशी पण खूप हट्टी अजिबात ऐकत नाही ती, कोण मुलगा आहे कॉलेजचा जो तिला भावही देत नाही त्याच्यामागे मागे करते, चांगले स्थळ सोडून देते असं त्यांना वाटत होतं

मीना ताई श्रेयाला रूममध्ये घेऊन आल्या,.. "बाहेर कोणी कितीही सांगू दे मला माहिती होतं नक्की काय झालं ते, श्रेया तू इथून पळून जायचं प्रयत्न करत आहेस तुला तुझं चांगलं वाईट समजत नाही का?, मूर्ख मुलगी, काहीही डिसिजन नको घेत जावू, आता तुझ्या सासरच्या लोकांना जर हे समजलं तर काय होईल",.. आई खूप रागवत होती तिला

" होऊ दे काहीही, समजू दे, मी नाही घाबरत आई, त्यांना नसेल पटत तर त्यांनी नकार द्यावा लग्नाला तुला माहिती आहे ना आई मला हे लग्न करायचं नाही पप्पांसाठी मी एक बिझनेस डिल आहे, पप्पा त्या लोकांना मदत करता आहे त्या बदल्यात त्यांच्या मुलाशी माझं लग्न लावून द्यायचं हा विचार आहे त्यांचा, यात प्रेम माझी पसंती कुठे आहे",... श्रेया

" अगं पण तु त्या सौरभ साठी हे असं करते आहे त्या मुलाला तरी तुझ्यासोबत राहायचं आहे का? तू तर अशा मुलाला पसंत केलं ज्याला तू पसंत नाहीस, नाहीतर पप्पा तुला विचारत होते ना की तुझ्या पसंतीचा कोणी मुलगा असेल तर त्याच्याशी लग्न करून देऊ तुझ, तुमचं काही ठरलं नाही मग हा सचिन चांगला मुलगा आहे आता काय प्रॉब्लेम आहे",.. मीना ताई

" मग मी बोलते आहे ना सौरभशी मला थोडा वेळ नाही देता येणार का तुम्हाला? ",... श्रेया

" तुझ्या पप्पांनी चौकशी केली आहे, काही खास नाही तो मुलगा आणि त्याला तुझ्या सोबत राहायचं नाही, चुपचाप लग्न करून घे सचिन सोबत, तू खुश राहशील",.. मीना ताई

माझं चांगलं वाईट कशात आहे ते मला माहिती आहे श्रेया विचार करत होती थोड्या दिवसातच मी निघून जाईल

अभिजीत राव आत मध्ये आले श्रेया आणि मीनाताई गप्प बसल्या, ते येऊन श्रेया जवळ बसले,.." असं करतात का बेटा? कुठे गेली होतीस तू? ",

श्रेया काही म्हटली नाही.

" हे बघ श्रेया आता तुझं सचिन सोबत लग्न आहे, तू काही एकटी नाही, तुझ्यासोबत दोन घराण्याचे नाव जोडले जाणार आहेत, असा विचार करायचा नाही, काहीही करताना माझा विचार करत जा",.. अभिजीत राव

" बाबा प्लीज",.. श्रेया

"काहीही सांगू नको मला, आराम कर आता, उद्या लवकर कार्यक्रम सुरू होणार आहेत ",.. ते बाहेर निघून गेले

श्रेयाला झोपच येत नव्हती, परत एकदा तिने सौरभला फोन लागतो का ते बघितलं,

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या श्रेयाचा कॉलेजमध्ये मोठा ग्रुप होता, सदोदित मित्र-मैत्रिणींच्या रगड्यात असायची ती, श्रीमंत मुला मुलींचा ग्रुप होता तो, सगळेच एक से एक, त्यातले बरेच मुलं नेहमी श्रेयाशी मैत्री करायच्या मागे असायचे, कारण करोडपती वडिलांची एकुलती एक श्रेया म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती,

पण श्रेयाचे विचार नेहमी वेगळे होते तिने आधीपासून कोणाला भाव दिला नाही, श्रेयाला जो मुलगा आवडेल त्याच्याशी श्रेया लग्न करेल असा तिचे विचार होते,

एका वर्षाने मोठा असलेला सौरभ कॉलेजमध्ये लीडर होता, तो नेहमी मोटरसायकलवर सगळीकडे जायचा, खूप बिझी असायचा आणि तावातावाने सगळ्यांशी भांडायचं त्याची अशी डॅशिंग पर्सनॅलिटी श्रेयाला खूप आवडली होती श्रेयाला सारखं असं वाटायचं इतर मुलांप्रमाणे त्याने सुद्धा माझ्या मागे यावं, पण तो श्रेयाकडे लक्ष देत नव्हता,

स्वतःहून श्रेयाने दोन तीनदा त्याच्याशी बघून बोलून बघितलं पण तो नाही म्हणत होता, थोडेच दिवस तर कॉलेजला येणार होता तो एकदा ग्रॅज्युएट झाला की तो पुढची ऍडमिशन दुसरीकडे घेणार होता, त्यामुळे श्रेयाची धडपड चालली होती त्याच्याशी बोलण्याची आणि श्रेयाला असं वाटत होतं की तिला कोणी नकारच देऊ शकत नाही,

हा सचिन असं म्हणतो आहे तर खरं की आपण एकमेकाला मदत करू सोबत राहू पण नक्की असं वागेल ना तो? नाहीतर एकदा लग्न झालं की त्याचे रंग दाखवेल तो, त्याने मला काही केलं तर? असू दे पण मला कराटे येतात, चांगला एक हात दाखवेल ना त्या सचिनला परत माझ्याशी बोलणारच नाही,

केव्हातरी ती झोपली, सकाळी मीना ताई तिला उठवत होत्या... उठ लवकर श्रेया

"आई जरा पाच मिनिट झोपू दे",.. श्रेया

"समजत आहे का तुला तुझं लग्न आहे, उठ लवकर चल आवरायला घे, चहा नाश्ता आला आहे, आटोप लगेचच हळद आहे",.. मीना ताई

"काय यार ह्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजे का? मला नाही आवडत ती हळद वगैरे, मेहंदी साठी पण किती बारा तास मी हात धरून बसली होती तुम्ही लोक पण ना एकेक काढतात",.. श्रेया उठून चहा घेत होती

" नाही श्रेया आधी आंघोळीला जा ",.. मीना ताई

" काय यार आई मी आता चालली जाईल माझ्या घरी, तरीसुद्धा तू मला रागवते आहेस ",.. श्रेया नाराजीने आंघोळीला गेली, आंघोळ झाल्यावर तिने चहा नाश्ता करून घेतला, पार्लरवाल्या ताई आलेल्या होत्या त्यांनी श्रेयाला हळदीसाठी तयार केलं

खाली हॉलमध्ये खूप गर्दी होती एका बाजूला सचिनला हळद लागत होती, जरा वेळाने श्रेयाला हळद लागली, बऱ्याच मित्र-मैत्रिणी तिला येऊन भेटत होत्या,

राधिका.. माही आलेली होती,

"काही समजलं का सौरभ बाबतीत माहि?",.. श्रेया

"श्रेया आज तुझं लग्न आहे ना, तब्येत बरी आहे ना तुझी",..माही

"मी त्या सौरभला सोडणार नाही मला त्याच्यासोबत राहायचं आहे",.. श्रेया

"गप्प बस बावळट एवढा चांगला मुलगा मिळाला आहे सुखाने संसार कर",.. माही

"तू पण काय आईसारखी बोलते आहेस माही, तुझ्या फोनवरून फोन लाव ना त्याला",.. श्रेया

" मी असं काहीही करणार नाही श्रेया आणि तुलाही करू देणार नाही गुपचूप लग्नाला उभी रहा, एक मिनिट तू इथून पळून वगैरे तर नाही ना जाणार ",.. माही

श्रेया राधिका कडे बघत होती ,.." जाणार होती मी काल रात्रीच",

" कुठे आली तू गेट पर्यन्त पागल, मी वाट बघुन बघुन कंटाळली, शेवटी घरी गेली मी, कुठे होती तू, यायच नव्हत तर का बोलवलं मला रात्री ",.. राधिका

"मला त्या सचिनने अडवलं होतं येवु दिल नाही, त्याच्या रूम मध्ये कोंडल होत ",.. श्रेया

" ओ माय गॉड खरं की काय पुढे काय झालं, हाऊ रोमँटिक ",.. राधिका

" मग पुढे ? चांगल झाल श्रेया तू गेली नाही निघून अस चांगल नसत",.. माही

" नंतर सांगेल एक गंमत आहे",.. श्रेया

"म्हणजे तु सचिन सोबत काल ",.. राधिका

" चूप ग पागल ते नाही, सांगेन कॉलेजला आल्यावर नाहीतर मी सात आठ दिवसात कॉलेजला येणारच आहे ",.. श्रेया

"फिरायला नाही जाणार का तुम्ही",.. माही

"कोण मी आणि त्या सचिन सोबत फिरायला, शक्य नाही काहीही बोलू नको तू माही",.. श्रेया

घरातल्या बायकांची खूप गडबड उडाली होती, हळद लागल्यानंतर लग्नाच्या तयारीसाठी श्रेया रूममध्ये गेली, पुढचा मेकअप सुरू झाला, मोरपंखी निळ्या रंगाच्या शालूत खूप सुंदर दिसत होती, श्रेया कमालीची सुंदर तर ती होतीस हळदीने आपलं काम केलं होतं, एकदमच निखार आला होता तिच्या चेहऱ्यावर, भरपूर दागिने घातले होते तिने, सगळे चिडवत होते, काही खरं नाही सचिनच एवढी सुंदर बायको, काय करेल तो,

त्यांच्या चिडवा चिडवीचा श्रेयाला कंटाळा आला होता, ती तिच्या मोबाईल वर गेम खेळत होती, खाली बँडचा आवाज येत होता म्हणजे सचिन वरातीला गेला असेल,

सचिन फिरून मंडपात आला, श्रेया समोरून मैत्रिणीं सोबत आली, अतिशय सुंदर श्रेया कडे सचिन बघत बसला, त्याने पुढे होवुन तिला हात दिला,

मोठमोठे लोक आले होते लग्नासाठी, माईकवर त्यांचा अनाउन्समेंट वेलकम होत होतं, ते सगळे लग्नाच्या आधी स्टेजवर उभे होते, स्टेजवर खूपच गर्दी झाली होती, एका माणसाचा धक्का त्यात श्रेयाला लागला, ती बाजूला सचिन जवळ सरकली, सचिनने तिच्या खांद्यावरून त्या बाजूला हात ठेवला.

" सचिन जरा जपून उगाचच माझं खूप रक्षण बिक्षण करतो आहे असं दाखवू नकोस",.. श्रेया

"माहिती आहे मला श्रेया, पण इथे नको ना जरा शांत रहा मी काय सांगितलं होतं तुला की सगळ्यांसमोर काहीही होऊ शकतं",.. सचिन

"ठीक आहे ते पण डोन्ट टच मी",.. श्रेया

सचिन हसत होता,.. "ठीक आहे बाई",

लग्न लागलं, फॉर्मलिटी म्हणून दोघांनी विधी केले दोघीकडचे मंडळी पाहुण्यांचे ऊठबस मध्ये बिझी होते.

" मला खूप भूक लागली आहे सचिन, किती वेळ चालणार आहे हि पूजा? काही अर्थ आहे का या पूजेला? एक तर काहीच कळत नाही आणि नाकात तोंडात धूर जातो आहे",.. श्रेया

"जरा शांततेत घे श्रेया",.. सचिनने गुरुजींना विचारलं किती वेळ आहे पूजा?

बस दहा मिनिट.

"तोपर्यंत मला प्यायला काहीतरी दे सचिन",.. श्रेया

त्याने आजूबाजूला बघितलं, त्याच्या बहिणीला साक्षीला सांगितलं तिने पाण्याचा ग्लास आणून दिला, ते पाणी श्रेया पिली, पूजा झाली, नवरदेव नवरी जेवायला गेले, भरपूर प्रकार होते खायला, खूपच भूक लागलेली होती, श्रेयाने जेवायला सुरुवात केली,

" असं चालणार नाही वहिनी आधी नाव घे, सचिनला घास भरव आणि मगच तु जेवु शकते",.. साक्षी

"म्हणजे काय करायचं आहे? ... सिरियसली... मला जमणार नाही नाव घ्यायला, मला खूप भूक लागली आहे सचिन, तिने गुलाबजाम उचलून सचिनला खाऊ घातला, सचिननेही गुलाबजाम तिला खाऊ घातला, सगळेजण कौतुक करत होते, श्रेया आरामात जेवत होती,

सचिन तिच्याकडे बघत होता, काही खरं नाही या श्रेयाचं, जाऊ दे नाहीतर आपल्याला थोडे दिवसच राहायचं आहे हिच्या सोबत, माझी नेहा किती वेल बिहेव चांगली मुलगी आहे, शांत आणि सद्गुणी आहे नेहा.

नेहा सुद्धा सचिनला कॉलेजमध्ये भेटली होती, तो इंजीनियरिंग साठी होस्टेलला होता, तिथेच त्याची आणि नेहाची ओळख झाली, अतिशय हुशार नेहा मध्यमवर्गीय कुटुंबातली होती, त्यामुळे घरच्यांना हे नेहा सोबत लग्न मान्य नव्हतं

श्रीमंतांच्या मुलांचे लग्न युती होण्यासाठीच असतात, एखाद्या श्रीमंत घराण्यात लग्न ठरलं म्हणजे बिझनेस मिळतो, सगळेच फायदे होतात, घरच्यांचा खूप विरोध होता त्यात नेहा सुद्धा ऐकत नव्हती, ती एका कंपनीत जॉबला होती, तिथे तिचा परफॉर्मन्स खूप चांगला होता, पुढच्या शिक्षणासाठी कंपनीने तिला फॉरेनला पाठवलं, सचिनने तीला खूप मनवायचा प्रयत्न केला की आपण दोघं करू लग्न तरीसुद्धा नेहा न ऐकता फॉरेनला निघून गेली, आता ती काही वर्ष दोन वर्ष येणार नव्हती, त्या गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं होतं, या दरम्यान त्यांचे बर्‍या पैकी भांडण होत होते,

सचिनने वडिलांच्या बिजनेस मध्ये मदत करायचं ठरवलं आता त्याचा चांगला जम बसला होता, एक एक गोष्ट तो ऑफिसमध्ये नीट करत होता, पण मध्येच हे आता लॉस झाला, कशामुळे झाला हे सगळं तो बघतच होता, तोपर्यंत वडिलांनी त्याचं लग्न जमवलं श्रेया सोबत आणि लग्न नाही केलं तर कंपनीला तोटा होणार होता आणि वडीलही घराबाहेर काढतील म्हणून सचिन लग्नाला उभा राहिला होता.

🎭 Series Post

View all