रंग प्रेमाचे भाग 4

Marathi love story

मानसीची सासू बाहेर बसली असता तेथे तिच्याच वयाची एक जोडपे आले आणि ते आदित्य बद्दल विचारू लागली. तेव्हा त्या म्हणाल्या “तो आमच्या इथेच भाड्याने राहतो.”

मग आदित्यची आई म्हणाली, “आम्हाला त्याची रूम दाखवता का?” मानसीच्या सासूने आदित्य ची रूम दाखवली. परंतु आदित्य रूममध्ये नव्हता. कोणत्यातरी कामासाठी बाहेर गेला होता.
मग मानसीच्या सासूने “तुम्ही कोण आहात? आणि आदित्य कडे काय काम आहे तुमचे?” असे विचारले.
तेव्हा आदित्यची आई म्हणाली, “मी आदित्यची आई आहे आणि हे आदित्यचे बाबा आहेत.”
मग मानसीच्या सासूने त्या दोघांना आपल्या घरी आणले आणि त्यांना पाणी आणि चहा करून दिले. इतक्यात तेथे आदित्य आणि मानसी दोघेजण आले.
त्यांना बघताच आदित्यची आई म्हणाली, “अरे आदित्य इतके दिवस तू कोठे होतास? घर सोडताना काहीच सांगितले नाहीस? स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे इतकेच बोलला. असं कुठे जातो? काय करतो? काहीही सांगितले नाहीस? आम्ही किती काळजी करत होतो? तुझी शोधाशोध करून इथपर्यंत पोहोचलो आहे.”
तेव्हा आदित्य “अगं आई थोड शांत हो की किती काळजी करशील? मी तुम्हाला म्हणालो होतो ना मी काहीतरी बनून घरी येईन म्हणून. तुम्ही का शोधाशोध करत होतात?”
आदित्याची आई “ते काही नाही तू आधी आपल्या घरी चल.” “नाही आई मला जे काही करायचं आहे ते पहिला करणार मगच घरी येणार असं सांगितलं होतं ना.”
आदित्यचे बाबा, “अरे आदित्य आपला बिजनेस आहे. आपली सगळी प्रॉपर्टी आहे. सगळ तुझच आहे ना. मग कशाला आटापिटा करत आहेस. शेवटी सगळा कारभार तुलाच सांभाळायचा आहे.” आदित्य “पण मला काहीतरी बनायचे होते.” आदित्यची आई “पुरे झाले आता वर्ष झालं तू घराबाहेर आला आहेस. आम्ही वर्ष कसं काढले आमच आम्हालाच माहित. आता आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे बर.” असे आदित्य म्हणतो. मग आदित्य मानसीची आणि मानसीच्या सासू-सासर्‍यांची ओळख करून देतो. आदित्य त्याच्या आईला मानसी बद्दल आणि त्याच्याबद्दल सगळे काही सांगतो.
आदित्यची आई आदित्यला ओरडते “अरे आदित्य एका विधवेशी तू लग्न करणार आहेस काय? आपले स्टेटस व आपले राहणीमान बघ. काहीही तुला विचार सुचले आहेत आणि ही बाई पण नवरा मेल्यानंतर तुझ्या मागे लागली आहे होय. तुला वेड लावली आहे ही.”
मानसीची सासू “अहो काही वाटते काय? काय वाट्टेल ते बोलताय तुम्ही. ही आमची सून आहे. आम्हीच हिच्यावर कधी संशय घेतला नाही आणि तुम्ही काय वाटते काय बोलता?”
“अहो ही बाई माझ्या मुलाला नादी लावली आहे आणि एका विधवेशी लग्न करणार का माझा मुलगा? आमचं काहीतरी स्टेटस आहे की.”
आदित्य हा एकदम गडगंज श्रीमंत बापाचा मुलगा असतो. त्यांची भरपूर श्रीमंती असते आणि तो एकुलता एक असतो. त्याच्या आईबाबांनी त्याच्यासाठी खूप सारी स्वप्न पाहिलेली असतात आणि त्यांनी त्याच्यासाठी एक मुलगी ही बघून ठेवलेली असते. परंतु आदित्य हा मानसीवरच प्रेम करत असतो आणि त्याला मानसीशीच लग्न करायचे असते.
त्याची आई म्हणते “तुला या मुलीशी लग्न करायचे असेल तर तुला आपल्या संपत्तीत हिस्सा सोडून द्यावा लागेल. अरे तुझ्या श्रीमंती कडे बघून तुझ्यावर प्रेम करते.”
आदित्य “बास आई तसे काही नाही. हिला तर माहिती सुद्धा नव्हते की मी श्रीमंत आहे ते आणि ही तयार सुद्धा नव्हती. ही फक्त आणि फक्त अथर्वसाठी माझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि तू असा का विचार करत आहेस बर. ही जर तुम्हाला सून म्हणून पसंत नसेल तर मी त्या घरात यायला तयार नाही.” असे म्हणताच आदित्यचे आई-बाबा घरातून रागाने निघून जातात आणि आदित्य माणसी सोबत कायमचा त्यांच्या घरीच राहिला

आता यापुढील भाग पुढच्या लेखात पाहू.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.



*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

🎭 Series Post

View all