Jan 23, 2022
प्रेम

रंग प्रेमाचे भाग 3

Read Later
रंग प्रेमाचे भाग 3

अथर्व सकाळी लवकर उठला आज रंगपंचमी म्हणून नाचू लागला. आदित्य कडे जाऊन

"आदित्य काका आज रंगपंचमी आहे. आपण रंगपंचमी खेळणार आहोत ना?"
आदित्य 'हो चला खेळूया' म्हणून बाहेर आला आदित्य आणि अथर्व रंगपंचमी खेळू लागले.
थोड्यावेळाने आदित्यने अथर्वला आईला बोलव असे म्हणाला. नंतर आदित्यने मानसीला रंग लावला. मानसी चिडून त्याला काही वाटल ते बोलली आणि रागाने आत गेली कारण तिला त्याच्या डोळ्यात तिच्या बद्दलचे प्रेम दिसत होते.
मानसीचे सासुसासरे मानसीला समजाऊ लागली "अगं मानसी तो तुझ्यावर प्रेम करतो. तू असं का करतेस लग्न कर आणि संसार थाट नव्याने. अथर्वला ही बावा मिळेल."
मानसी म्हणते, "मी नाही करणार लग्न. तुम्हा दोघांसाठी कोण आहे? मीच तुमचा आधार बनून राहीन.
तिची सासू "आमच्या नंतर तुला कुणाचा आधार आहे. तूझे आयुष्य भरपूर शिल्लक आहे आम्ही काय आता म्हातारे झालो आहोत. आमचे आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही."
मानसी म्हणते, "मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि माझे माझ्या नवऱ्या वरील प्रेम कमी होणार नाही.
मी काही लग्न करणार नाही." असे म्हणून मानसी स्वतःच्या मतावर ठाम असते. संध्याकाळी अथर्व आणि मानसी बसले असता अथर्व मानसीला म्हणतो की 'उद्या माझ्या शाळेत सगळ्यांचे बाबा येणार आहेत. मी पण आदित्य काकाला नेऊ का माझ्याबरोबर.'
मानसी 'का' असे म्हणाली.
अथर्व म्हणतो "माझे बाबा म्हणून मी आदित्य काकाला नेतो. माझे बाबा पण आदित्य काका सारखेच दिसत होते ना."
मानसी चिडते आणि म्हणते, "अजिबात नाही. काही गरज नाही." अथर्व रागाने बोलतो "का नाही तो तर खूप चांगला आहे. माझ्याशी मैत्री पण केली आहे आणि त्याला नेले तर काय बिघडलं."
मानसी म्हणते "अजिबात नाही. नाही म्हणून सांगितला आहे ना तुला." असे म्हणून त्याला रागाने मारते. अथर्व रडू लागतो आणि रागाने खोलीत जातो. थोड्यावेळाने मानसीला खूप वाईट वाटू लागते. मग ती अथर्व च्या खोलीत जाते आणि प्रेमाने अथर्वला कुरवाळू लागते. अथर्व रागाने दुसरीकडे जाऊन बसतो. मानसी परत त्याला समजावून सांगू लागते,
"अरे आदित्य काका आहे तो तुझा बाबा नाही. बाबा देवाकडे गेला आहे ना. पण मीच बाबा आणि आई पण मीच. उद्या शाळेत मी येईन बर."
अथर्व "सगळ्यांचे बाबा येणार आहेत. मग तू येऊन काय करणार?"
"मग आजोबा येउ दे?"
"आदित्य काका आला तर चालणार नाही का?"
"बघूया" असे म्हणून त्याला समजावू लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेला जाताना अथर्व गुपचुप आदित्यला जाऊन भेटला आणि
"आदित्य काका माझ्याबरोबर शाळेत येणार का रे?"
आदित्य "का बरे?"
अथर्व "अरे ते माझ्या शाळेत आज सगळ्यांचे बाबा येणार आहेत. तु पण माझा बाबा म्हणून येशील का?"
आदित्य "हो नक्कीच. मला आवडेल. तुला आवडेल का?"
"हो. म्हणून तर तुला विचारायला आलो आहे."
"ठीक आहे चल मग आज मी तुला सोडायला येतो." असे म्हणून अथर्व आदित्य बरोबर शाळेत जातो आणि सगळ्या मुलांना हे माझे बाबा आहेत असे म्हणून ओळख करून देतो. आदित्यला पण खूप समाधान वाटते.
इकडे मानसीला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा ती खुप चिडते आणि अथर्वला खूप मारते.
"तुला सांगितलं होतं त्याला घेऊन जाऊ नकोस म्हणून आणि तू काय ऐकलं नाहीस माझं. मी येते म्हणाले होते ना तुला." "सगळ्यांचे बाबा येणार म्हणूनच आदित्य काका पाहिजे होता. तू येऊन काय करणार होतीस?"
मानसी मनात म्हणते "अथर्वलाही बाबाची गरज लागणारच. तो अजून खूप लहान आहे. त्याला यातील काहीही माहीत नाही. तो तर त्याच्या बाबाचं तोंड सुद्धा बघितला नाही. त्याला वाटणारच मलाही बाबा हवेत म्हणून." असे म्हणून ती विचारत असते. तेवढ्यात तिच्या सासूबाई येतात आणि म्हणतात "बघ अथर्वलाही बाबाची गरज आहे. त्यामुळे तू एकदा विचार करून बघ. आदित्य खूप चांगला मुलगा आहे. तुला सुखात ठेवेल.
मनसी आता 'हो' म्हणणार असते. तिने सासूला सांगितलेलं असतं की मी आदित्य लग्न करायला तयार आहे. पण त्यांना माहीत नसतं की हा आदित्य कोण? कुठला? इथे कसा काय आला? त्याचे आई बाबा कुठे असतात? तो कुठे राहतो? काय करतो? याबद्दल कुणालाही काहीच कल्पना नसते. तो कोण आहे? हे आपण पुढील भागात पाहू

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..