Jan 26, 2022
प्रेम

रंग प्रेमाचे भाग 2

Read Later
रंग प्रेमाचे भाग 2

आपण मागील भागात पाहिले की आदित्य मानसीच्या घरी राहायला आला होता. मानसी ऑफिसला जात असताना गडबडीत ऑफिसचे फाईल घरी विसरून जाते.

तिच्या सासूबाई आदित्यला बोलावून, "अरे आदित्य मानसी ही फाईल विसरून गेली आहे तिला जरा ऑफिसमध्ये देतोस का?" आदित्य, "हो मी तिकडेच चाललो आहे जाता जाता देईन." आदित्य जातो. ऑफिस मध्ये मानसी नसते तिची मैत्रीण तिथे भेटते.
आदित्य मैत्रिणीला विचारतो की, 'मानसी मॅडम कुठे आहेत?' मैत्रिणीने सांगितले कि 'ती एका ठिकाणी गेली आहे तिच महत्त्वाचं काम आहे. तुम्ही कोण आहात?'
"त्यांच्या घरी भाड्याने राहतो त्यांच्या घरातलाच एक आहे काकू मला मुलगाच मानतात." आदित्य.
मैत्रिण " मग तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. मानसीचे मिस्टर आणि त्यांचा एक मित्र पार्टनरशिपमध्ये एक बिजनेस करत होते. मानसीच्या मिस्टरांचे निधन झाल्यानंतर तो पार्टनर बिजनेस मधील प्रॉफिट झालेलं मानसीला काहीच देईना आणि वर तो बिझनेस फक्त माझाच आहे असे सांगून लागला. आता ती त्याच्याकडेच गेली आहे. तो मानसीला काहीही बोलतो. तो चांगला व्यक्ती नाही आणि ही त्याच्याशी भांडायला गेली आहे." आदित्यने तिला पत्ता विचारून घेतला आणि आदित्य त्याठिकाणी गेला. एक माणूस मानसी बरोबर वाद घालत होता. आदित्य मध्ये जाऊन बोलला "ओ मिस्टर बायकांशी कसं बोलावं तुम्हाला काही कळत नाही का?"
तो माणूस "तुम्ही कोण मध्ये मध्ये बोलायची तुम्हाला काही गरज नाही. ओह तुम्ही मॅडमच्या बाॅयफ्रेण्ड आहात काय?"
मानसी रागाने "काहीही बोलू नका."
तो माणूस म्हणतो "मग काय तर एक माणूस तुमच्या इथे आणि काही संबंध असल्याशिवाय येतो का कोणी?"
मानसी "आदित्य इथे का आला आहेस?"
आदित्य "हा माणूस तुम्हाला त्रास देत आहे आणि तुम्ही का सहन करत आहात. आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ चला."
तो माणूस "त्याचा काहीसुद्धा फायदा होणार नाही. हे सगळे माझ्या नावानेच आहेत."
मानसी "खोटं बोलून लुबाडून कागदपत्र स्वतःच्या नावाने केलेला आहे हा माणूस."
तो माणूस "खरच हे फक्त माझच आहे." असे म्हणून तो माणूस निघून जातो.
आदित्य मानसीला म्हणतो, "आपण याच्या वरती केस करूया माझ्या ओळखीचे वकील आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया." असे म्हणून दोघेजण वकीलाकडे जातात. वकिलाने संपूर्ण केस बघितल्यानंतर तो केस लढायला तयार होतो. त्याची पहिली नोटीस त्या पार्टनरला दिली जाते. नोटीस बघून त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. तो भयंकर चिडतो आणि रागाच्या भरात काही गुंडांना घेऊन तो आदित्यला मारायला जातो. त्याला खूप मारतात. आदित्य अगदी घायाळ होऊन पडतो. मानसीला कुणाचा तरी फोन येतो आणि तिला कळते की आदित्य जखमी होऊन पडलेला आहे. ती त्याला दवाखान्यात घेऊन जाते दवाखान्यातील उपचार झाल्यावर तो घरी येतो. घरी आल्यावर मानसीला त्याच्याबद्दल खुप वाईट वाटते. ती त्याच्या पासून लांब राहू लागते. उगाच आपल्यामुळे त्याला त्रास कशाला असे तिला वाटू लागते. पण आदित्य शांत बसणार यातला नव्हता. तो मानसीला न्याय मिळवून देणार होता. अखेर मानसीला न्याय मिळाला. न्यायालयाने पार्टनरला आतापर्यंतची नुकसानभरपाई मानसीला देण्यास सांगितले आणि यापुढील प्रत्येक महिन्याला झालेला नफा मानसीला दिला पाहिजे असे सांगितले.
रात्री अथर्व आदित्यकडे येतो आणि म्हणतो, "काका उद्या रंगपंचमी आहे आपण खेळायचं का?" रंगपंचमी आदित्यने "हो" असे म्हणाला. उद्या मला अजून एका व्यक्तीला रंग लावायचा आहे असे तो मनात म्हणाला.

आता यापुढील भाग पुढच्या लेखात पाहू.

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..