Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग ३

झाली ना सगळी पॅकिंग मावशी
भाग ३

"झाली ना सगळी पॅकिंग मावशी? सकाळी लवकर फ्लाईट आहे मुंबईसाठी." रात्री जेवण करून मावशी अन् माधवी दोघी निघायची तयारी करत होत्या.

      "हो सगळी तयारी झाली आहे पण नुसते कपडे घेवुन कसं चालेल ग आता कायमच तिकडे जायचं आहे ना? मग हे घरातील बाकी सामान नाही न्यायचे?" मावशी कपड्यांच्या घड्या घालत विचारते.

      "मावशी अहो तिकडे सगळी सोय होणार आहे आपली. आधीच त्यांनी सांगून ठेवलं आहे. तात्पुरते हे सामान राहुद्या इथेच. तसं ही याला काही होणार नाही आपल हक्काचं तर आहे. " माधवी.

    "पण मधू एक विचारू?" मावशी मधेच थांबत म्हणाली.

      "विचारताय काय मावशी, बोला ना. " माधवी.

     " मधू मी ऐकलं आहे की फ्लाईटला खूप पैसे लागतात म्हणे मग इतके पैसे आले तरी कुठून? म्हणजे ती तिकिटे.." मावशी.

     "मावशी, अहो ती तिकिटे पण त्यांच्याच खर्चातून आहेत."  आता माञ मावशी थोड समाधानाने हसली.
***

             

             पहिल्यांदा थोडीशी घाबरलेली मनू विमान थोड उंचावर गेल्यावर रिलॅक्स झाली होती. तिला फारच गंमत वाटत होती. ती पहिल्यांदाच विमानातून प्रवास करत होती. अर्ध्या तासातच विमान आता मुंबईच्या एअपोर्टवर होत.

           "वाऊ... फायनली आपणं मुंबईत आलो येह." मनू चक्क आनंदाने उड्याच मारू लागली. अन् तिच्याकडे बघून माधवी, मावशी दोघीही हसायला लागल्या. खरंतर माधवीला तिचं नवल वाटत होतं की, इतक्या सगळया सिटी मधून तिला मुंबईचंच आकर्षण होत. पण तिची नाळ जणू इथचं जोडली होती.

          "हॅलो.. डॉक्टर माधवी देशमुख तुम्हीच का?" एक ड्रायव्हरच्या पोशाखातील व्यक्ती तिच्याजवळ येत विचारते.

        "हो, हो मीच " माधवी हसून त्याला उत्तर देते.

     "साहेबांनी तुम्हाला पिकअप करायला पाठवले आहे, प्लीज या गाडीत जाऊन बसा." ड्रायव्हर अदबीने त्यांना बोलतो तस तिघीही गाडीत जाऊन बसतात.


          गाडी आत्ता मुंबईमध्ये प्रवेश करत होती. एक एक दृश्य पाठीमागे टाकत अन् माधवीची आठवणही. थोड्याच वेळात गाडी मुंबईच्या पोलिस हेड क्वार्टर समोर येवून थांबतो. कितीतरी दिवसातून न्हवे तर वर्षातून माधवी ते बघत होती. तिथले वर्दितले पोलिस बघून तिलाही तीच्या बाबांची आठवण आली अन् नकळत डोळे ओलावले.

            "वेलकम मॅम" एक गार्ड पुढे येवून गाडीचा दरवाजा उघडून ग्रिट करतो तस माधवी ही त्याला फक्तं हसून स्मायल देते. त्या गार्डच्या पाठोपाठ तिघीही एका प्रशस्त केबिन समोर येवून थांबतात. 'राघव अग्निहोत्री'
(डी. आय. जी.) अन् हे नाव वाचून तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटतं.

            डी. आय. जी. राघव अग्निहोत्री, जवळजवळ साठ च्या आसपास असणारे, माधवीच्या वडिलांचे जिवलग मित्र.  माधवीला नेहमीच आपल्या मुलीप्रमाणे मानायचे. माधवी त्यांना काकाच म्हणायची.

           " मे आय कम इन?" माधवी केबिन चा दरवजा पुढे करून विचारते.

          "येस, येस माय चाईल्ड... कम इन. तुझीच वाट बघत होतो." एक भारदस्त आवाज तिच्या कानावर पडतो.

          "कसे आहात काका?" माधवी भरल्या आवाजाने त्यांना विचारते. समोर खुर्चीत रेलून बसलेले, पांढरे झालेले केस, पांढरीशुभ्र झुबकेदर मिशी, आडदांड शरीर पण वयाच्या मानाने थोडंसं म्हातारपणात झुकणार शरीर, चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास, भेदक नजर पण हृदयात मात्र इतरांसाठी माया, ममता, प्रेम... आजही जसेच्या तसे आहेत. माधवी मनातच म्हणाली.

         " ये बैस.. मी ठीक आहे बेटा. तूझ सांग अन् अचानक काहीच कल्पना न देता मुंबई का सोडली? शिवाय तू मॅरीड आहे ना? आय मीन होतीस?" राघव काका काळजीने प्रश्नांवर प्रश्न विचारत होते.

        "हो.. हो काका सांगते. आधी मला बसू तर द्या. ही माझी मुलगी मनू आणि या गंगा मावशी." विषय बदलायचा म्हणून ती ओळख करून देते अन् राघव काका अविश्र्वासाने एकदा मनू कडे तर एकदा माधवी कडे बघत होते.

       "अग पण तुला तर..." राघव काका पुढे काही बोलणार तोच माधवी त्यांना मधेच अडवते.

       "काका प्लीज आता काहीच नको. हवं तर मी पुन्हा कधीतरी एकांतात भेटून सांगेन तुम्हाला. सध्या आमच्या राहण्याची सोय कुठे केली आहे?" उगाच मनू समोर काही विषय नको म्हणून ती मुद्दामहून टाळाटाळ करत होती.

      " ठीक आहे बेटा. जशी तुझी इच्छा. तुझ्या राहण्याची सोय व्यवस्थीत केली आहे अन् आता मनूच्या शिक्षणाची सोय देखील मीच करेन." राघव काका मनू कडे एक प्रेमळ कटाक्ष टाकून बोलतात.

      "अहो कशाला काका मी आहे ना, आधीच खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. प्लीज अजून काही नको." माधवी बारीक तोंड करून म्हणाली.

      "हे बघ मधू, तू जशी किरणची मुलगी आहेस तशीच माझी देखील त्यामुळे मनू माझ्या नाती सारखीच आहे. तू जसं म्हणतेस तस किरणनेही मला खूप आधार दिला अन् आता माझी वेळ आहे." राघव काका ओल्या डोळ्यांनी तिला आश्र्वासित करतात.

     "तुमचे खरच उपकार राहतील माझ्यावर अन् मी ते आयुष्यात नक्कीच कधीतरी फेडीन." माधवी.

         "माधवी, मला माहित आहे तू एक स्वावलंबी आणि कर्तृत्ववान मुलगी आहेस त्यामुळेच तुला डिपार्टमेंट मधे डॉक्टर म्हणून रूजू करत आहे. सध्या मी रिटायर आहे पण आजही इथे माझ्या मतांना किंमत दिली जाते. अन् राहिली गोष्ट उपकाराची तर आई वडील आपल्या मुलांवर कधीचं उपकार करत नसतात" त्यांच बोलणं ऐकून नकळतपणे माधवीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.

        त्यांचा निरोप घेवुन त्या तिघीही रूम वर आल्या. रूम कसला तो एक छोटासा टुमदार बंगलाच होता. का कुणास ठाऊक पण माधवीला तो ओळखीचा वाटला.

        "छान आहे ना घर मावशी." माधवीने त्यांच्याकडे पहात विचारलं तर त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वहात होत्या. कितीतरी वेळ त्या घराकडेच पहात तिथेच स्तब्ध उभ्या होत्या.

     "क.. काय झालं मावशी?" माधवीने गोंधळून अन् घाबरून विचारलं.

      "इथच तर जन्म झाला तुझा. खेळलीस, बागडलीस, लहानाची मोठी झालीस." मावशी बोलत होती अन् माधवी आश्चर्याने त्या घराकडे बघत होती. खरचं ते घर आज जसच्या तसं आहे? थोडीशी डागडुजी, रंगरंगोटी झालेली पण तिचं इमारत तिचं घराभोवती असणारी आमराई. ती त्या घराचं निरीक्षण करत होती अन् हळुहळू तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होत होत्या. बाबांशी केलेली मस्ती, मावशीला कस सतवल... पण तिला दोघेच आठवत होते. आई तर ती जन्मतःच देवाघरी गेली. पण मावशीने मात्र तिला कधीचं आईची कमी भासू दिली नाही. मुंबईत असूनही  एकांतात बांधलेलं ते तिचं घर होत. खास बाबांनी आई साठी बांधलेले कारण तिला एकांत खूप आवडायचा हे तिची भिरभिरती नजर वेलींनी झाकलेल्या नेमप्लेट वर गेली तिने हळुच वेली बाजूला सारल्या... ' चव्हाण निवास' त्या वरच नावं वाचून खरच आता तिला हुंदका आवरला नाही. तोच तिच्या फोनची रिंग वाजली...


           "कसं वाटलं सरप्राइज बेटा?" पलीकडून राघव काकांचा आवाज आला तशी ती आणखीच हुसमुसून रडायला लागली.

          "मधू अग ठीक आहेस ना? काही प्रोब्लेम झाला आहे का? का रडते आहेस? " काका काळजीने विचारतात.

      "अ.. हं.. काका काही नाही हा आनंद आहे जो तुम्ही मला मिळवून दिलात. थँक्यू थँक्यू सो काका." माधवी मनापासून त्यांचे आभार मानत होती.

       "थँक्यू नाही बेटा तो तुझा हक्क आहे, तुझ घर आहे ते. बस् आतापर्यंत ते दुसऱ्याच्या ताब्यात होत ते मी तुला मिळवून दिलं आहे आणि तसं वचनही मी किरणला, माझ्या मित्राला दिलं होतं. ते वचन मी आता पूर्ण केलं.


         दोनच दिवसात माधवी कामावर रुजू झाली. मनूच देखील मोठ्या स्कूल मद्ये ॲडमिशन घेतल अन् तेही राघव काकांनीच. मावशी आपल्या घरकाम करु लागल्या. सगळ पुन्हा व्यवस्थित चालू होत अन् अचानक एके दिवशी.....

क्रमशः...

( काय झालं असेल??? जाणून घेण्यासाठी वाचत रहा )