Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग २

अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी
भाग २


अखेर तो दिवस उजाडला होता ज्या दिवशी माधवीच्या गोडूलीने म्हणजेच मनूने जन्म घेतला होता. हाल अपेष्टा सहन करत तिने तिला लहानाची मोठी केली. जेंव्हा तिला खरचं आधाराची गरज होती तेव्हा ती एकटी पडली होती पण मनाने नाही... तिच्या सगळया इच्छा ती होईल त्या परिने पुर्ण करत होती. परिस्थीती तशी बेताचीच त्यामुळे मनूला देखिल जान होती. पण तिची एक इच्छा जी तिच्या आईने आजवर पुर्ण केली न्हवती. नेहमीच ती टाळाटाळ करायची अन् ती म्हणजे तिचे बाबा... खरचं कोण आहेत आपले बाबा? हा प्रश्न मनूच्या इवल्याश्या जीवाला पडायचा... पण कदाचित याच उत्तर माहित असूनही आई सांगत नाही त्यामुळे ती नेहमी रागवायची. पण आता तिलाही कळत होत की खरच आपली आई या विषयामुळे हर्ट होतेय, मग तिने पुन्हा कधी सहसा विचारलंच नाही.

          


            "हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. अशीच नेहमी आनंदी रहा, मम्मा अल्वेज विथ यू बाळा." माधवी भरल्या डोळ्यांनी मनूला शुभेच्छा देत होती. आज तिच्या लाडक्या लेकीचा बर्थ डे जो होता.

       " थँक्यू आई, लव्ह यू.. आधी मला माझं गिफ्ट काय ते दाखव." मनू तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवत बोलते.

      " अहह न... ते एक सरप्राइज आहे. ते मी तुला आताच नाही देणार. ते तर रात्री मिळेल केक कटिंग झाल्यावर. बी रेडी फॉर युवर स्पेशल सरप्राइज माय प्रिन्सेस" माधवीने तिच्या कपाळाच चुंबन घेतलं.

          " ओहो, आई. किती तो सस्पेन्स. ठीक आहे, मी रात्री पर्यंत वेट करेन ओके." मनू थोडंसं गाल फुगवून बोलते.
***


            "मावशी झाली ना तयारी सगळी. आणि माहित आहे ना की हा इथला लास्ट बर्थ डे आहे मनूचा? आणि हेच सरप्राइज द्यायचं आहे तिला. पण..." माधवीच्या हृदयाची धडधड वाढली होती. जणू भुतकाळ तिला खुणावत आहे, अन् ती अनावधपने त्याकडे ओढली जात आहे. पण मनूच भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी तिला हे पाऊल उचलाव लागणार होत.

          " पोरी... झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा. आता पुन्हा त्याचा विचार करुन काय फायदा? ही एक चांगली संधी दिली आहे नशिबाने तुला तर त्याचा उपयोग करून घे." मावशी तिच्या खांद्यावर थोपटून आतमध्ये निघून जातात.
***


           "हॅपी बर्थडे टू यू... हॅपी बर्थडे टू यू..." सगळेजण एका सुरात म्हणत होते. सगळे म्हणजे मनूचे मित्र मैत्रिणी. अगदी साधंच सेलिब्रेशन पण त्यात मायेचा, प्रेमाचा ओलावा. मनूने केक कट केला अन् दोन बोटांच्या चिमटीत पकडून मधूला भरवला अन् नंतर गंगा मावशीला.

      " व्हेअर इज माय सरप्राइज आई?" मनू एक हात पुढे करून विचारते.

        "ह्मम... आधी डोळे बंद कर बघू. " माधवी बोलते अन् मनू हळूच डोळे मिटते. माधवी तिच्या हातावर काहीतरी टेकवते.

           "डोळे उघड मनू" माधवीच्या आवाजाने मनू पापण्या किलकिल्या करुन डोळे उघडते अन् हातातल्या वस्तूकडे बघून ती टुणकन उडी मारून माधवीला गच्च मिठी मारते.

         "थँक्यू आई... थँक्यू मम्मा. फायनली तू माझं स्वप्न पुर्ण केलंस. लव्ह यू " तिच्याभोवती असणारी मिठी आणखी घट्ट करत मनू बोलते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. किती दिवसांपासून ती ज्या हट्टासाठी पेटली होती अखेर तो हट्ट माधवी ने पुरवला होता. पण त्यात तिचीही गरज होती. ज्या गरजेसाठी ती हे जड मनाने स्वीकारत होती.

            "मग, आवडलं ना सरप्राइज? " मावशी मनूचा गाल खेचत विचारतात.

        " खूप म्हणजे खूप." हातात पडलेल्या त्या मुंबई फ्लाईटच्या तिकिटाकडे बघून मनू भलतीच खुश झाली होती. अखेर तिचं मुंबईला जाण्याच स्वप्न पुर्ण होणार होत. लहानपापासून त्याच हट्टाला ती पेटली होती पण माधवी काहीनकाही कारण सांगून तिला टाळत आली होती. कारणही तसंच होतं. दहा वर्षापूर्वी तिने मुंबई सोडली होती पण तिच्या आठवणी मात्र तिथेच घुटमळत होत्या. आजही तिला एक प्रकारची ओढ होती अन् तितकीच भीतीही. कारण पुन्हा एकदा भूतकाळाच्या साखळंडांनी बांधलो गेलो तर? पुन्हा त्यांची नि माझी भेट झाली तर? अश्या बऱ्याच प्रश्नांचं काहूर मनात उठायचं पण दुसर मन सांगायचं, एवढी चांगली ऑफर आली आहे तर का नाकारत आहेस? केवळ तुझा भुतकाळ आडवा येतो म्हणून? राहिली गोष्ट त्याची तर तो कधीचं त्याच्या लाईफ मद्ये मुव्हअप झाला असेल मग तूच का विचार करतेय?

               अन् बाजी मारली होती दुसऱ्या मनाने. अखेर तिने ती ऑफर स्वीकारली होती. आय. पी. एस. किरण चव्हाण म्हणजे माधवीचे वडील पंधरा वर्षापूर्वी मुंबईत पोलीस खात्यात कार्यरत होते. अन् आज त्याच ओळखीने तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला 'डॉक्टर ऑफ पोलिस डिपार्टमेंट'मधे काम करण्याची ऑफर दिली होती. आणि हीच ऑफर माधवीच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार होती.

               जिथं तिचा जन्म झाला, जिथं ती लहानाची मोठी झाली, शिक्षण घेतलं एवढंच नाही तर फक्त तिच्या बाबांसाठी तिने नाईलाजास्तव लग्न केलं त्या मुंबईत आज ती तब्बल दहा वर्षांनी जाणार होती. हळुहळू तिच्या मनात आठवणींच वलय तयार होत होत... ती आज धावपळ करुन थकली होती तरीही आठवांची गात्र तरतरीत होती....

फ्लॅशबॅक......


         " शंतनु.. तूम्ही का असा अबोला धरून आहात माझ्याशी? आपणं यावर काहीतर चर्चा केली तरच मार्ग निघेल ना. अशी आयुष्यात कितीतरी वादळ येतील मग असं खचून चालेल का?" माधवी टेरेस वर एकटाच उभा असणाऱ्या शंतनुला बोलत होती पण तो तिला काहीच प्रतिसाद देत न्हवता. तिने त्याच्या दोन्ही खांद्याला पकडुन त्याचं पाठमोर तोंड तिच्याकडे वळवल.

       "काय झालंय तुम्हाला? गेली चार दिवस झाले धड बोलत नाही, जेवण करत नाही, सगळ आयुष्य संपल्यासारखे का वागताय?" माधवीचा आवाज आता ओलसर झाला होता. कधी हुंदका फुटेल सांगता येत न्हवत. अन् तिची ती ती अवस्था बघून त्याची थोडी चलबिचल झाली.

       " हे बघ मधू, मी आता खरच बोलण्याच्या मनस्थितीत नाही. प्लीज मला थोडा वेळ दे, प्लीज" शंतनु अगदी खालच्या आवाजात तिला बोलला.

      " ठीक आहे. मग मी असा विचार केला आहे की तुम्हाला स्वतःचच बाळ हवं आहे तर तूम्ही एक पर्याय निवडू शकता. त... तूम्ही दुसरं लग्न करा " ती अडखळत बोलली अन् तीचे हे शब्द जणू उकळते तेल कानात ओतल्या प्रमाणे थेट शंतनुच्या हृदयाला जाऊन भिडले. अन् एक सपकन आवाज तिच्या कानाखाली झाला तसा आतापर्यंत दाबून ठेवलेला तीचा हुंदका बाहेर पडला. ती तशीच त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली. शंतनुने तिला गच्च मिठीत कवटाळली. त्याचेही डोळे तुडुंब भरले होते.

     " मधू... भलेही आपल लग्न एक डील होती पण आता तू फक्त माझी बायको नाहीस तर तू माझा श्वास आहेस. तू माझं पहिलं प्रेम नसल तरी तू माझं शेवटचं प्रेम आहेस. आता तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचा विचार करूच शकत नाही. स्वप्नात सुद्धा नाही. अन् राहिली गोष्ट आपल्या बाळाची तर आपण काहीतर मार्ग काढू पण प्लीज तू अशा गोष्टी नको करु... आय लव्ह यू सो मच्" तो तिच्या डोक्यावर हळुवार हात फिरवून तिला धीर देत होता. आता कुठे तिच्याही जीवात जीव आलेला.....
***


             आश्र्वासित करणारे त्याचे शब्द आताही तिच्या कानात जसेच्या तसे घुमत होते. डोळे काठोकाठ भरले होते पण त्यांना अजुन सांडण्याची मुभा मिळाली न्हवती. एक दीर्घ श्वास घेवुन ती हलकेच डोके सोफ्यावर टेकवत डोळे मिटून घेते...

             शब्द तुझे ते
       का निःशब्द झाले
       का मनावर माझ्या
       दुःखाचे सावट आले
कधी कळणार हे डाव आयुष्याचे
    रंग बदलत्या नात्यांचे...
         रंग बदलत्या नात्यांचे....

क्रमशः.....

( भवितव्य घडविण्यासाठी मुंबईला निघालेल्या माधवीचा होईल का भूतकाळाशी सामना??? जाणून घेण्यासाठी वाचत रहा )