Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग १० अंतिम

ती आल्यापासून...
भाग १० अंतिम

ती आल्यापासून त्याचं मन सैरभैर होत. तिच्याशी एकदातरी बोलायला तो तरसला होता. आज त्याने बरीच घेतली होती. माधवी आल्याचा आनंद आणि मनू कोणाची मुलगी आहे याचा राग मनात उफाळून आला होता अन् त्याचं रागाच्या भरात त्याने माधवी ला कॉल केला...

          "कोणाची मुलगी आहे ती? " त्याच्या आवाजाला धार आलेली.

      "हे बघा, तुम्ही कोण विचारणारे?  आपला काही संबंध आहे का? " माधवी पण तेवढ्याच आवाजात बोलली.

       "बायको आहेस तू माझी, प्रेम आहेस तू माझ... माझा हक्क आहे विचारण्याचा.." शंतनु चे डोळे आता थोडे पानावले होते. आवाज किंचित ओलसर झाला होता.

      "ओह.. रिअली.. आता मी कोण आहे ते कळलं? इतके वर्षे मी जिवंत आहे की मेली याच्याशी काही मतलब नव्हत तुम्हाला " माधवी उपहासाने म्हणाली.

      "पण मला वाटल की, ..." शंतनु

    "हो हो बस्... सफाई द्यायच कारण नाही. फोन ठेवा. कुठल्या परस्त्रीशी बोलत आहात याच भान असूद्या. तुम्हाला बायको आहे अन् मुलगा सुध्दा." असं म्हणून ती फोन कट करते.

       "कसं, सांगू तुला मधू... आय लव्ह ओन्ली यू " आय लव्ह यू इन्फीनायट...."
***


           "हे, हॅलो झाली का तयारी? मी येत आहे तुला न्यायला. सकाळी लवकर निघाव लागतं आहे, वेळेत पोहचायला हवं. आपणं लक्झरी बस मधुन जात आहोत. " वर्षा फोन वर सांगते.

       "थॅन्क गॉड ती देशमुख फॅमिली त्यांच्या गाडीतून येत आहे " माधवी बोलली खरी पण तिचं मन थोड खट्टू झालं. का ते तुम्हाला पण माहितच आहे.

       "मॅडम देशमुख फॅमिली देखील लक्झरी बस मधुन च येणार आहे तेही आपल्याच" वर्षा.

       आता मात्र माधवीला थोड नर्व्हस वाटू लागलं. आणि आनंदही.
***

           माधवी आणि मनू मावशीचा निरोप घेवून निघाल्या तोच शंतनु, किर्ती आणि विनू येताना दिसले तस ती पट्कन आत जाऊन बसली. पूर्ण प्रवासात मनू आणि विनू मस्ती करत होते पण माधवी खिडकीतून बाहेर बघत होती. समोरच्या बाजूला तिच्याकडेच तोंड करून शंतनु बसला होता. पण तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. पण त्याची नजर मात्र तिच्यावरून हटत नव्हती....

        गाडी नाश्त्याला थांबला तसे सगळेजण पटपट खाली उतरले. वर्षा मनूला घेवून गेली. अन् विनू देखील किर्ती ला जवळजवळ ओढतच घेवुन गेला.

             मधू खाली उतरणार तोच तिचा हात कुणीतरी पकडला. तिने वळुन पहिलं तर हो... तोच शंतनुच होता.

       "काय आहे? " तिने रागातच विचारलं?

     "मनू कोणाची मुलगी आहे?" तिच्यावर नजर रोखत त्याने विचारलं. तशी ती गडबडली.

      "लिस्टन मिस्टर शंतनु देशमुख.. माय लाईफ इज नॉट युअर प्रॉपर्टी... सो डोन्ट आस्क फुलिश केशन्स" तिने रागात बोलली अन् जायला वळली तोच त्याने पुन्हा तिला जवळ खेचलं. जवळजवळ ती त्याच्या छातीवर येवून आदळली. कितीतरी वर्षांनी ती त्याला इतक्या जवळून बघत होती. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले. त्याने तिचा हात हातात घेतला अन् स्वतःच्या डोक्यावर ठेवला.

         "आता सांग कोण आहे तिचा बाप?" त्याच्या अश्या वागण्याने ती पुरती गांगरली.

       "स्वतःच्या बायकोवर बोट उचलताना लाज नाही वाटत? स्वतःच्या मुलीला कुणाची मुलगी म्हणून विचारता? हो... तुमचीच आहे ती.. तुमचा खून आहे." तिच्या डोळ्यातुन आता अश्रूंची बरसात होऊ लागली. पट्कन तिने स्वतःचा हात सोडवून घेतला अन् तिथून निघून गेली.
***

           दुपार नंतर सगळे पुण्यात पोहचले. सगळे उतरले अन् त्याच वेळी शंतनुने मनू ला उचलून घेतलं अन् तिला घट्ट मिठीत कवटाळल...

        "एक अंडरकव्हर पोलीस आहेस. सगळया जगाची खबर असते पण स्वतःचा घरात काय घडल ते अजून नाही कळलं" वर्षा हळुच त्याच्या कानाजवळ येवून बोलते.

       "म्हणजे?" शंतनु.

     काय नाही चलं बोलू पुन्हा...

"हे हाय मधू दी कशी आहेस?" प्राची तिला पाहताच तिच्याकडे येते.

     "मी ठिक आहे, तू कशी आहेस? मस्त शोभते आहे आमची नवरी. आता काय नील ची विकेट हमखास पडणार" माधवी तिला चिडवते. तशी प्राची लाजते. तोवर नील देखील येतो.

       "वेलकम मिस्टर शंतनु देशमुख अँड मिसेस माधवी शंतनु देशमुख " नीलच्या वाक्यावर दोघेही एकमेकांकडे पाहतात. अन् किर्ती मात्र रागाने एक कटाक्ष दोघांवर टाकते.

      "नील चुकत आहेस.. मी माधवी चव्हाण." मधू सांगते अन् नील गोंधळून शंतनुला डोळ्यांनीच काय म्हणून विचारतो.

      "हॅलो.. मी मिसेस किर्ती शंतनु देशमुख. " किर्ती मुद्दामहून पुढे येवून सगळ्यांना ग्रीट करते. सगळे आत निघून जातात.

          "काय हे शंतनु? शेवटी त्या किर्तीशीच लग्न केलस? काय मॅटर आहे?" नील

       "आधी तुझ लग्न होऊदे मग सांगू निवांत अन् तुझही ऐकव " वर्षा मस्करीत म्हणाली अन् नीलच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले.

       "चील यार... चला आता मुहूर्त होत आहे " वर्षा म्हणाली तस तिघेही आत गेले.
***


           माधवी प्राचीला घेवुन बाहेर आली अन् शंतनु तिच्याकडे पहातच राहिला. लाल रंगाची जरीची अन् काठा पदराची साडी तिच्या गोऱ्या कांतीला खुलून दिसत होती. ओठांवर लाल रंगाची लिपस्टीक, किंचित घारे असणारे डोळे, त्यात काजळाची लकेर, तिच्या लांबसडक काळयाभोर केसांचा अंबाडा अन् त्यात मोगरा अन् गुलाबाच्या फुलांचा माळलेला गजरा. क्षणाक्षणाला उघडझाप होणाऱ्या तिच्या दाटसर बोलक्या पापण्या. तिने केलेला साज शृंगार अन् सगळ्यात आकर्षक तिच्या भांगात भरलेल लाल कुंकू तिला खूपच शोभून दिसत होत. कितीतरी वेळ तो तिलाच बघत होता. अन् त्याच वागणं पाहून किर्ती मनातच चरफडत होती.

        कधी नव्हे तो तिने इतका साज शृंगार केला होता, प्राची च्या आग्रहाखातिर. इतके दिवस लपवून भागांत कुंकू भरत होती पण आज उघड उघड भांगात कुंकू भरल होत. कुणासाठी... त्याच्यासाठी पण कळतच नव्हत ती का इतकी तयार झाली.

     लग्नविधी उरकला. सगळे जेवायला बसले.

      "वर्षू मी जरा वॉश रूम मध्ये जावून येते." माधवी

          "हो चालेल " वर्षा .
माधवी वॉश रूम कडे जाते तोच तिचा हात कुणीतरी पकडला. स्पर्श तिच्या नसानसांत भिनलेला. त्याचा सुगंध, त्याच्या येण्याचं अस्थित्व सगळ काही... तिच्या रोमारोमात भिनलेल. कसं विसरेल?...

        "प्लीज मला माफ कर मधू... प्लीज. आय लव्ह यू. मी तुला कधीच नाही विसरू शकत, कधीच दहा वर्षे झाली तू माझ्यापासून दूर आहेस, पण या प्रत्येक श्वासावर तुझच नाव आहे. माझा दिवस आणि रात्र देखील तुझ्याच आठवणीत असते. प्लीज मला माफ कर." शंतनु तिचा हात हातात घेवून बोलत होता. त्याच्या प्रत्येक शब्दात वेदना होती अन् ती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

       "केलं माफ. जाऊद्या मला." माधवी त्याच्यावरची नजर हटवून म्हणाली.

        "पुन्हा माझी होशील?" शंतनु ने तिच्या डोळ्यात बघत विचारलं.

      "काय बोलत आहात तुम्हीं शंतनु? आता हे शक्य आहे का? यामुळे किती आयुष्य उद्धवस्त होतील. इतकंच माझ्यावर प्रेम होत तर त्यावेळी का वागलात तसे. इतकंच प्रेम होत तर गेल्या दहा वर्षात एकदाही मला फोन केला नाहीत, ना ही मला शोधायचा प्रयत्न केला. कशी आहे, कूठे आहे, जिवंत आहे का? की मेली...." माधवी पुढे काही बोलणार तोच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. अन् ती त्याच्याकडे डोळे विस्फारून बघु लागली.

       "तुला काय वाटतं मी काहीचं प्रयत्न केला नसेल? खूप प्रयत्न केला मी तुला शोधायचा. तुझा फोन ही लागत नव्हता. जेव्हां तुझ्या ॲक्सीडेंट ची बातमी कानावर आली तेव्हा मी नुसता सैरभैर झालेलो. काय काय प्रयत्न नाही केला तुला शोधण्यासाठी. पण तू नाही भेटलीस. त्यावेळी मी किर्तीच स्टँड घेतलं नाही पण परिस्थितीच तशी होती की, जेव्हां किर्तीच मिसकरीज झालं तेव्हां ती पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही असं डॉक्टरनी सांगितल." अन् त्याच ऐकून माधवीला धक्काच  बसला.

       "काय बोलत आहात शंतनु तुम्ही?" माधवी.

   "हो, हे खरं आहे. म्हणूनच त्यावेळी मानसिक रित्या तिला आधाराची जास्त गरज होती. एक माणूस म्हणून तरी मी तिला आधार दिला. शेवटी तिने आपल्या बाळा मुळे तिचं गर्भाशय कायमचं गमावलं होत. तू मला सोडुन जात होतीस अन् त्याचं रागाच्या भरात मी तुला वाट्टेल ते बोलले. खरचं सॉरी ग त्यासाठी. पण मला माहित होत तू परत येशील, माझं प्रेम तुला परत आणेल. पण तुझ्या अक्सीडेंटची खबर ऐकून मी सैरभैर झालो... खरचं मी वेडा झालो होतो. तुला खूप शोधल पण तू नाही मिळाली. आणि या वेड्या मनाला भीती लागली की तुला काही झाली असेल तर... पण आज.. आज माझी मधू माझ्यासमोर उभी आहे. आणि आता मी तुला माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही." शंतनु अक्षरशः गुढग्यावर बसून रडत होता. माधवी ने त्याला गच्च मीठी मारली. अन् तिही आज मनसोक्त रडू लागली.

         "दहा वर्षे राहिली आहे तुझ्यापासून दूर... कोणासोबत राहिली ,ही मुलगी कोणाची? नको नको ते रंग उधळले असतील. आणि आता तू हिला स्वीकारणार? ही जर चारित्र्यहीन असेल तर?" किर्ती त्या दोंघांकडे रागाने बघत म्हणाली तोच सटाक एक चपराक तिच्या कानाखाली बसली.

        "तोंड सांभाळून बोल. बायको आहे ती माझी. माझा तिच्यावर विश्वास आहे. अन् काय ग हिचा अक्सीडेंट करून तुला काहीचं मिळालं नाही ना." शंतनु बोलला तस माधवी ने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.

        "शंतनु?" ... माधवी.

     "हो हिनेच केला होता तुझा अपघात मधू. काय वर्षा बरोबर ना?" शंतनु वर्षा कडे वळून म्हणाला.

       "फक्त अपघातच केला नाही तर तुम्हा दोघांना तोडण्यासाठी हिने माधवीच्या प्रेगनन्सी रिपोर्ट मधे अफरातफर केली होती. अँड नाऊ माझ्याकडे हिचं अरेस्ट वॉरंट आहे." वर्षा.

         माधवी तर सगळ सुन्न होउन बघत होती. तिला यातल काहीचं माहित नव्हतं पण तिच्याही नकळत वर्षाने या सगळ्याचा शोध घेतला होता.

           "माझ्या विनू ला सोडून मी कुठेच जाणार नाही. आणि माधवी तुझ्यावर पण मी केस करु शकते की माझ्या नवऱ्याला फूस लावून माझ्यापासून दूर केलं म्हणून. कितीही झालं तर मी त्याची बायको आहे." किर्ती रागाने म्हणाली.

       "केस तर मी तुझ्यावर करायचा हवी. काही वर्षांपूर्वी तूच हे माझ्यासोबत केलं होतस. पण जरी तू त्याची आता बायको असली तरी मीही त्याची बायकोचं आहे आणि आम्ही अजूनही डिवोर्स घेतला नाही हे विसरली वाटतं." माधवीच्या बोलण्यावर किर्ती चांगलीच चपापली.

         "आणि ज्याला तू माझा मुलगा म्हणत आहेस ना तो शंतनु आणि माधवी चा मुलगा आहे." वर्षा.

      "काय? अग पण त्याला अनाथ आश्रमातून घेतल आहे." शंतनु शॉक होऊन म्हणाला.

       "हो, माधवी ला एक मुलगा आणि मुलगी म्हणजे मनू आणि विनू जुळी झाली होती. ती इथून जाते वेळी प्रेग्नंट होती. तिने विनू ला आश्रमात दिलं आणि शंतनु देशमुख कोणाला ॲडॉप्ट करायला आले तरच याला द्या असं आश्रमाला सांगितलं.फक्त तुला... तुमच्या प्रेमाची निशाणी तुमच्या जवळ राहावी म्हणून." वर्षा.

        "तुला माहित होत मी ॲडॉप्ट बाळ घेणार आहे ते" शंतनु आता माधवी जवळ आला.

      "हो, कारण तुम्ही मला एकदा बोलला होता. आपल्या दोघांचं बाळ हवं नाहीतर मी एखाद्या बाळाला ॲडॉप्ट करेन." माधवी खाली मान घालून म्हणाली.

      शंतनु ने तिला मिठीत घेतलं. इतक्या वर्षातून त्याच्या मिठीत विसावून तिने समाधानाने डोळे मिटून घेतले.

       "आय एम रिअली सॉरी मधू. इतक्या वर्षे तू स्वतःच्या बाळा पासून दूर राहिलीस तेही माझ्यासाठी. खरचं मी तुझ्यापुढे काहीच नाही. तुझा त्याग अन् तुझं प्रेम याला मी खरचं लायकीचा नाही. आय लव्ह यू... आय लव्ह यू सो मच" शंतनु.

       "आय लव्ह यू टू शंतनु "... माधवी.

      बाजूला उभ्या असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत आणि दूर उभ्या असणाऱ्या त्या भावंडाना एव्हाना कळलं होत की तेच आपले आई बाबा आहेत.

        "मॅडम, जेल मधे जायची तयारी ठेवा. " वर्षा किर्तीला म्हणाली अन् किर्ती रागाने तिथून निघून गेली....

पल दो पल की ही क्यों हैं जिंदगी
इस प्यार को हैं, सदिया काफी नहीं
तो खुदा से मांग लू
मोहोलत मैं एक नयी
रेहना हैं बस यहा
अब दूर तुझे जाना नहीं
जो तू मेरा हमदर्द हैं
जो तू मेरा हमदर्द हैं
सुहाना हर दर्द हैं
जो तू मेरा हमदर्द हैं....

तेरी मुस्कुराहटे हैं ताकद मेरी
मुझको इन्ही से उमिद मिली
चाहे करे कोई सितम ये जहा
इनमे ही हैं सदा इफाजत मेरी
जिंदगानी बडी खुबसुरत हुई
जन्नत अब और क्या होगी कही
जो तू मेरा हमदर्द हैं
जो तू मेरा हमदर्द हैं
सुहाना हर दर्द हैं
जो तू मेरा हमदर्द हैं....
वू...........

(एक विलन)

समाप्त......