रंग अहिंसेचा भाग १
"हॅलो अजय कुठे आहेस? अरे तुझ्या चुलत्याने घरात घुसून तुझ्या आई वडिलांना बेदम मारहाण केली आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. तू त्वरित गावाला निघून ये." प्रसादने पटकन बोलून फोन कट केला.
अजय बॉसला सांगून घरी जाणाऱ्या पहिल्याच बसमध्ये बसला. पाच ते सहा तासांच्या त्या प्रवासात अजयच्या मनात असंख्य चांगले अधिक वाईट विचार येऊन गेले होते. 'मन चिंती ते वैरी न चिंती' गावी गेल्यावर आपल्यासमोर अजून काय वाढून ठेवले असेल? हा विचार करतच अजय गावी पोहोचला. प्रसाद अजयला बस स्टँडवर घ्यायला आला होता. अजय थेट हॉस्पिटलमध्ये गेला. एका बेडवर वडील व दुसऱ्या बेडवर आईला बघून त्याला प्रचंड यातना झाल्या.
अजयने डॉक्टरकडे जाऊन आई वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली. प्रसाद व त्याचे दोन तीन मित्र वेटींग एरियात बसलेले होते. अजय त्यांच्यापुढे हात जोडून म्हणाला,
"मित्रांनो मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी गावात नसताना तुम्ही वेळेत माझ्या आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, म्हणून त्यांचे प्राण वाचले आहेत."
"अरे मित्र म्हणतोस आणि कसले आभार मानतोस. बरं मला एक सांग, आता पुढे काय करणार आहेस? तुझ्या चुलत्याला जास्त माज चढला आहे, त्याचा मोठा मुलगा पोलिसात असल्याने इथले पोलिस सुद्धा त्यांच्याच बाजूने आहेत. आम्ही तक्रार करायला गेलो होतो, पण त्यांनी तक्रार नोंदवून सुद्धा घेतली नाही. तुमची शेती हडपण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तू एक आवाज दे, लगेच गावातील मुलं आपल्या सोबत येतील. हवंतर आपण आमदार साहेबांना भेटायला जाऊ. माझी त्यांच्याशी ओळख आहे. आपण त्यांचा माज मोडायला पाहिजे." प्रसादने सांगितले.
अजय काय निर्णय घेईल? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा