रम्य ते बालपण ....

ईरा : शब्दांचे वैभव


रम्य ते बालपण ..

अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता.झाडांची पाने दारासमोर विखुरली होती .छोटीशी ईरा हातात झाडू घेऊन अंगण झाडत होती .कचरा एका बाजूला लावून बाहेर टाकत होती.छोट्याशा बादलीतून पाणी आणून सा-या अंगणात शिंपडत होती.दारासमोर छोटीशी पण सुबक रांगोळी काढत होती.तिच्या हस-या स्वभावाने सकाळसुद्धा प्रसन्न झाली होती.

ईरा गरीब सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी...! तिचे आईवाडिल आपल्या वडलोपार्जीत शेतीवर गुजरान करत होते.पण आपली मुलगी ईरा हिला त्यांनी सुसंस्काराने घडवले होते.छोट्याशा ईराला लहाणपणीच योग्य सवयी लावल्या होत्या.लहाणपणी ती सगळ्यांकडे हसतमुखाने जात होती.घरात ती आनंदाने बागडत असे.मिळेल ते खाणे आणि खेळात रमणे इतकेच तिला माहित होते.आईने सांगीतलेली बारीकसारीक कामे ती पटपट करत असे.छोटी असूनसुद्धा ती घराची साफसफाई करत होती.स्रीया घरची लक्ष्मी असतात हे ईराच्या छोट्याशा कृतीतून दिसून येते.बालपणाचा आनंद त्याला संस्काराची जोड दिल्यास आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहत नाही हे ईराच्या वागण्यातून जणवत होते.

ईरा निरागस बालपणाचा मनसोक्त आनंद घेत होती.लता , मुग्धा , शर्वरी , वैशाली , प्रियांका , सायली , मुक्ता अशा मैत्रिणींच्यात ती रमूण जात.गल्लीत मातीत खेळणे , लंगडी घालणे , लपाछपी , आंधळी कोशिंबीर , चोर पोलिस , सापशिडी अशा सगळ्या खेळात ईरा आपले मनाला आनंद देत होती.सगळ्या मैत्रिणी ईराशिवाय खेळत नव्हत्या किंबहुना त्यांना ईराशिवाय करमत नव्हते.

शाळेतही ईरा हुशार होती.दिलेला अभ्यास ती वेळेत पूर्ण करत असत.सगळ्या मैत्रीणींचा घोळका ईराच्या घरात जमत असत.सुरवातीला गोंधळ घालून दमलेल्या मैत्रिणी नंतर मन लावून अभ्यास करत. मध्येच ईराची आई ईराकडे डोकावून पाही पण ईरा फार हुशार ती लगेच अभ्सासात गुंग होई, अभ्यासात रमलेला घोळका अचानक कुजबुजू चालू होई आणि केंव्हातरी गाणी म्हणत असत.ईराच्या आईची ओरड ऐकू आली की गाण्याचा आवाज लगेच थांबत असे.शाळेत ईरा खूप गमतीजमती करत असत.गुरुजींची आवडती असलेमुळे तिला प्रत्येक वेळी गुरुजी तिला प्रार्थनेच्च्यावेळी सुविचार , प्रेरणादायक गोष्ट सांगायला सांगत असत.सांगण्याची कला , गोड आवाज आणि धाडस यामुळे तीचे प्रभुत्व लहाणपणीच दिसत होते.

लहाणपण किती निरागस असते ..! ईराचे लाघवी हसणं , आदरार्थी वागणं , संस्कारक्षम बोलणं , मुलांच्यात रमणं , शाळेत बागडणं , विविध कलेत पारंगत असणे हे ईराचे बालपणाचे रुप फार मोहक वाटते.जीवनाचा आनंद व दूरदृष्टीकोन यांचा सुंदर मिलाफ ईराच्या बालपणात ठळकपणे निर्दशनास येतो.ईराने बालपणाचा खरा आनंद लुटला .आईवडिलांनी ईराला छान घडवले. चांगले संस्कार , चांगले विचार यामुळे ईरा लहान असूनही प्रगल्भ वाटली.
ईराचे हे बालपण निश्चितच प्रेरणादायक व हवेहवेसे वाटले .बालपणाचा काळ सुखाचा हे ईराच्या बालपणावरुन आठवले ...!!
जीवनात लहाणपणापासून आनंद घ्या आणि जीवन आणखी समृद्ध बनवा.

©नामदेवपाटील