अलक खास रामनवमी चे औचित्य साधून

Small stories


अलक/ छोटेखानी लघुकथा खास रामनवमीचे औचित्य साधून

१.शबरी
आज माननीय मुख्यमंत्री दौलत देशमाने यांनी प्रसिध्द राम मंदिर मध्ये पूजा आणि अभिषेक केला ,भटजींनी त्यांना प्रसाद दिला तर लगेच त्यांच्या सेक्रेटरी रमा ने तो प्रसाद आधी खाऊन पाहिला.. दौलत ने तिच्याकडे रागात पाहिले
रमा : शबरी ने सुद्धा आधी बोरं टेस्ट केली होती साहेब,तुम्ही सुरक्षित तर जनता देखील सुरक्षित


२ पवनपुत्र

आज पवन ने राघवच्या नकळत त्याची महत्वाची कागदपत्रे चोरूली, वैदेही ने ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघितलं.. सर्व घरच्यांना बोलावून तिने पवन चा खूप अपमान केला आणि त्याच्यावर पोलीस केस करणार ..तोच
राघव : बास झालं वैदेही ,अगं पवन खूप विश्वासु आहे ,लहानपणापासून त्याने माझी काळजी घेतलीय ,तुला आणि मला देवा प्रमाणे पूजतो तो .जणू आपण रामसीता आणि तो पवनपुत्र हनुमान..आज ऑफिसमध्ये रेड पडली होती बरं झालं पवन ने सकाळीच ती कागदपत्रे लपवून ठेवली ..

३ कौसल्येचा राम बाई
आज भरल्या घरात वाटणी होणार होती चार भावंडं आणि एक बहीण असे पाच हिस्से झालेले प्रॉपर्टी चे . ,रात्री त्यांची आई सह्या करणार होती कागदपत्रांवर ,पण ती आज रामयण नाटक पहायला आझाद मैदानात गेली होती, मुलं देखील तिथे गेली.. नाटकाच्या शेवटी एक वाक्य होतं
"सतत का ऐकावे पांडव कौरवांचे महाभारत
अरे कोणी तरी राम व्हा ,कोणी भरत व्हा, तर कोणी लक्ष्मण व्हा..एकमेकांना जपतात भावंडं रामायणात ".
आणि बघता बघता मोठया भावाने कागदपत्रे फाडली ..


४.शूर्पणखा
रमेश आणि किरण या दोन मित्रांमधे आज खूप भांडण झाले, रमेश ने किरणच्या बहिणीला छेडलं होतं.. पण मग किरण ने दुसऱ्यादिवशी रमेश च्या बहिणीचे अपहरण करून पुन्हा काहिदिवसानी घरी आणुन सोडली.. किरणच्या बहिणी ने भावाच्या विरोधात तक्रार केली
"अरे प्रत्येक बहीण ही शूर्पणखा नसते ,आंधळ प्रेम किती करावं भावा वर यालाही मर्यादा असतेच "


-मित्र रिषभ