रक्त रंजीत रात्री ( भाग 25 )

एक भयावह मालिका


खरं वाटावं असं मुद्दाम घडवून आणलेलं नाटकं ईतकं कमालीचं यशस्वी होईल असं धनपालला अजीबात वाटलं नव्हतं. चोवीस तास चिंधी आपल्या आसपास राहू शकेल तेही ईतक्या राजरोस पणे , कोणालाही कसलीही शंका न येता. म्हणजे कमाल होती. अर्थात तिचा नवरा तिच्या सोबत होता म्हणा पण त्याची काही एव्हढी अडचण नव्हती. त्याला धनपाल हिशोबातच धरत नव्हता. मनसुखलालनेही छान नाटक केलं होतं. मनसुखलालला दिलेले पैसे अवघ्या काही तासात धनपालराजकडे परत आले होते. राघव तर घरचाच विश्वासू होता. अगदी मोफत चोवीस तास राबण्या साठी एक जोडपं धनपालला मिळालं होतं. त्याची त्याला गरज नव्हती. त्याला हवी असलेली चिंधी आता चोवीस तास त्याच्या आसपास असणार होती.

त्या दोघांना त्याने अशी खोली दिली होती की जेथून तो तिला कोणालाही संशय न येता केंव्हाही बिन दिक्कत न्याहाळू शकत होता आणि तिच्या ते लक्षात देखील आलं नसतं. त्यांचा म्होरक्या आपण सहज सुटलो याचं आनंदात होता. हळुहळू त्यांचा दिनक्रम सुरळीत सुरू झाला.

सकाळी न्याहरी सोबत घेवून दिवसभर परशा शेतात कामाला निघून जाई. तो बऱ्याच वेळा उशीरा घरी परत येत असे. किंवा कधीकधी तर रात्री शेतावर पहारा द्यायला थांबत असे. थोडक्यात काय तर तो असून नसून सारखाच होता.

या पेक्षा वेगळी गोष्ट चिंधिची होती. बघता बघता ती घरामधे रुळली. ज्या गोष्टी तिने आयुष्यात केलेल्या नव्हत्या त्या करण्यात ती तरबेज झाली. उदाहरणार्थ रोज दात घासून, तोंड धुवून स्वच्छ पाण्याने आंघोळ करणे. स्वच्छ धुतलेले कपडे वापरणे. त्या मुळे मुळात रेखीव असलेली ती अधिकच खुलून दिसायला लागली.  यात ईश्वरीचा खूप कोंडमारा होई. नवीन नवीन तिला चिंधीचे येणं आवडलंच नव्हतं.

पण जेंव्हा चिंधी घरातली साफसफाई, झाडलोट करण्या सारखी सगळी कामं सफाईने करायला लागली. त्या वेळी हळुहळू तिची नाराजी कमी होत गेली.

मुलींना देखील ती खूप जीव लावत असे. त्या मुळे  ईतर मुली देखील चिंधिच्या अंगावर होवून गेल्या. सगळ्यांना आंघोळी घालणं, वेण्या घालणं ,त्यांना नटवण, खाऊ पिऊ घालणं , त्यांच्या सोबत खेळण अशा अनेक गोष्टी ती सहज करत असे.

चांगलं राहायला लागल्या पासून चिंधिच सौंदर्य अधिकच झळाळून उठलं होतं. परशा मात्र शेतात राब राब राबत असे आणि घरी आल्यावर मेल्यासारखा झोपून जातं असे.

ईकडे धनपालला मात्र चिंधी आसपास वावरत असतांना किंवा पलीकडच्या खोलीत झोपलेली असतांना अजीबात झोप येत नसे. दिवसातून अनेक वेळा त्याला तिचं दर्शन होई आणि तो अधिकच खूळाऊन जाई. परंतू घरात अकरा मुली, बायको आणि ईतर गडी माणसं असतांना त्याला काहीचं करता येत नसे. तो जागच्या जागी तळमळत संधीची वाट बघत बसला होता.

धनपालच्या घरात अशी व्यवस्था होती की आपल्या सगळ्या मुलींच्या सोबत ईश्वरी झोपत असे. धनपाल त्याच्या वेगळ्या खोलीत एकटा झोपत असे. ज्या खोलीतून ईश्वरीच्या खोलीत जायला दरवाजा होता. जो आतून बंद असायचा. पण तो काही मजबूत दरवाजा नव्हता. सागवानी फळ्या फळ्या ठोकून अनेक फटी असलेला तो दरवाजा होता.

त्याच्या बरोबर समोरच्या खोलीत परशा आणि चिंधी राहायचे. वाड्याच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील खोल्या होत्या. ज्यात विक्रम आणि राघव राहायचे.

एक दिवस विक्रम, राघव, परशा आणि धनपाल असे चारही जणं पार्टी करत बसले होते. खरं म्हणजे धनपालच असं नोकर माणसांसोबत दारू पीत बसणं ईश्वरीला अजीबात आवडलं नव्हतं. त्या चौघांसाठी खास मांसाहार चिंधी बनवणार होती. खरं म्हणजे तिच्या हाताला एक वेगळीच चव होती. सगळ्या वाडाभर दारूचा आणि मांसाहाराच्या मसालेदार भाजीचा घमघमाट सुटला होता. ईकडे धनपाल नुसतं प्यायचं नाटक करतं होता. त्या तिघांना मात्र भर भरून पाजत होता.

सगळ्यांच्या जीभा दारू मुळे सैल सुटल्या होत्या. मुलांवर वाईट संस्कार होवू नये म्हणून ईश्वरी मुलींचा अभ्यास घेतं बसली होती.

परशा सांगत होता, " मालक माझा साळा व्हय चिंधिचा सख्खा भाऊ तुक्या लय डेंजर हाय बर का. माणसांना असा कोंबडी वानी मान पिरगळून मारून टाकतो. त्या पाईच जेल मधी हाय. आन तिची बहीण उंद्री ती पन तशीच खतरनाक. ती पन जेलमधीच हाय."

धनपाल विचार करत होता म्हणजे चिंधीच सगळं घराणंच गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे तर मग तिला देखील कसली आहे चारित्र्याची चाड. ती तर सहज वश होऊन जाईल आपल्याला.

अशाच दारु पित पित गप्पा सुरू होत्या. बरीच रात्र होत आली होती. धनपालने ईश्वरीला मुलींना जेवू घालायला सांगीतले. त्याने सांगितल्या प्रमाणे ईश्वरीने मुलींना जेवू लागले. जेवणं झाल्यावर त्यांना झोपवलं देखील.

आणि बराच वेळ झाला तरी हे सगळे जेवणार तरी कधी असा ती विचार करत होती. तेव्हढ्यात बाहेर काहीतरी पडल्याचा आणि फुटल्याचा जोरदार आवाज झाला. काय झालं हे पाहायला ती बाहेर आली आणि तिने जे पाहिलं त्या वर तिच्या डोळ्यांचाच विश्वास बसेना.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all