रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 21 )

एक भयावह मालिका



  त्या दिवशी धनपालराज घरी आला पण त्याचं कोणत्याच गोष्टीत मन लागत नव्हतं. डोळ्यासमोर सारखी चिंधी दिसत होती. काही केल्या तिचे विचार डोक्यातून जात नव्हते. गावं कुसा बाहेर राहणाऱ्या वस्तीत तिच्या सारखं रत्न आलं कसं आणि कुठून ? अशा गलिच्छ वस्तीत देखील तिचं सौंदर्य लपून राहात नाहीये. जर तिला चांगले कपडे आणि दागदागिने वापरायला मिळाले तर ती कसली सुंदर दिसेल, जणू अप्सराच. आणि तिचा नवरा , काय नावं होतं बरं त्याचं ? हा आठवलं परशा. काय ते नावं आणि काय पण ते ध्यान. कसा सांभाळत असेल तो. का नुसता नावालाच नवरा होता आणि चिंधी जातं असेल रात्री टोळीच्या मूखिया कडे. हा बुळा बसत असेल नुसता हातावर हात धरुन. आणि धनपालच्या डोक्यात एक भयंकर कल्पना आली ती ही की आपल्याला कसंही करून चिंधी मिळालीच पाहिजे. भले त्या साठी कीतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. पणं चिंधीने आपली शेज सजवायला हवी. तेही कायमची. त्या साठी काय करावं लागेल याचे तो वेगवेगळे प्लॅन करायला लागला.

खरं म्हणजे ज्या वेळी त्याच्या डोक्यात चिंधीची अभिलाषा निर्माण झाली होती ती वेळ सगळ्यां निमझरी साठी अशुभ ठरणारं होती हे त्या वेळी ना त्याला माहीत होतं ना कोणाला. आणि जरी माहीत असतं तरी पूढे होणाऱ्या घटना कोणी टाळुही शकणार नव्हत. कारणं हे नियतीचच प्रयोजन होतं. ज्यात नुसतीच निमझरी नाही तर सगळा आसपासचा परिसर होरपळून निघणार होता. मृत्यूच एक असं महाभयानक तांडव थोडे थोडके नाही तर वर्षभर सुरु राहणार होतं की सगळेच जण त्यात होरपळून निघणार होते.

धनपालला बघितल्या नंतर तिकडे चिंधीची अवस्था देखील अशीच बेभान झालेली होती. तसाही परशा तिच्या बरोबरीचा नव्हताच. तिची शारीरिक असो वा आर्थिक, कोणतीच गरज तो भागवू शकत नसे. तो सगळ्याच बाबतीत मुखिया वर अवलंबून राही. मूखीयाच्या शब्दा बाहेर जाण्याची त्याची हिंमत होत नसे. टोळी प्रमुखाचे बोलावणे आल्यावर चिंधी तर राजरोस त्याच्या समोर निघून जात असे. तसही नीतिमत्तेच्या आणि चारित्र्याच्या संकलप्नना त्यांच्यात एव्हढ्या ठाम नव्हत्या. ज्याच्या कडे पैसा असे तो टोळीतली स्त्री सहज विकत घेऊ शकत असे. पणं हे सगळे नियम टोळी पुरती मर्यादीत होते. टोळी बाहेरच्या माणसाला त्यांच्या जगात स्थान नव्हते आणि बाहेरच्या जगात त्यांना स्थान नव्हते. टोळी बाहेरच्या माणसाचा स्पर्श देखील त्यांच्या स्त्रीला झालेला चालतं नसे. मग संबंध तर दूरच राहिले. जर त्याच्या टोळीतल्या स्त्री ला असा स्पर्श झालेला त्यांच्या लक्षात आला तर त्या स्त्रीला वाळीत टाकण्या पासून अगदी जीव घेण्या पर्यन्तच्या शिक्षा त्यांच्यात होत्या. तिथं क्षमा नव्हती. भले ते आपसात कसेही वागोत. त्यांचे नियम त्यांनी बनवलेले होते.

आज धनपाल घरी आला. सरुने त्याला पाणी दिलं. ईश्वरीने मोठया मनाने त्याला माफ करून तो रात्रभर कोठे होता ते विचारलं. वरतून त्याला काय लागलं याचीही विचारपूस केली. पणं डोक्यात चिंधी भरलेल्या धनपालला तिच्या बद्दल सहानुभूती वाटण्या ऐवजी तिरस्कारच दाटून आला. त्याच्या न कळत तो ईश्वरीची आणि चिंधीची तुलना करु लागला. जी कधीचं होवू शकली नसती. पणं आज त्याच्या दृष्टीने चिंधी समोरं त्याला ईश्वरी डावी वाटतं होती. ईश्वरीच काय सगळ्या जगातल्या स्त्रिया आणि चिंधी या मधे त्यानें चिंधीचीच निवड केली असती. ईतका तो चिंधीच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता. आता प्रश्न होता फक्त तिच्या प्राप्तीचा.
त्या साठी त्यांच्या सगळ्या वस्तीवर उपकार करणे गरजेचे होते आणि दुसरं म्हणजे तिचा नवरा परशा याला कोणत्या तरी गुन्ह्यात अडकवण गरजेचं होतं. म्हणून त्याने राघवला हाक मारून महत्वाची गोष्ट सांगीतली. राघव त्याच्या समोर हात जोडून उभा राहिला.

" हे बघ राघव, उद्या पासून काही दिवस तुला आपल्या गावातल्या विहिरीवर पहारा द्यायचा आहे. ओढ्याच्या पलीकडे काही लोकं तात्पुरते राहायला आलेले आहेत. त्यांची पाण्याची गरज भागवण आपलं कर्तव्य आहे. गावातले काही लोकं विरोध करतील. त्यांना सांभाळणं आणि गावात शांतता ठेवणं तुझं काम राहिलं. प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. समजलं ना. "

राघवला उलटं मालकाचा हा विचार खूप आवडला.

" आणि अजून एक महत्वाची गोष्ट. जर त्यांच्या पैकी कोणी आपल्या वाड्यावर पैसे घेऊन पाणी भरायला तयार असेल तर तसही बघं. बिचारी गरीब माणसं आहेत. त्यांनाही मदत होईल. " असं बोलतांना धनपालच्या डोळ्यासमोर पाण्याच्या कळशा डोक्यावर घेऊन कंबर हलवित वाडयात पाणी भरणारी चिंधी येतं होती.

असं त्यांचं बोलणं सुरु असतानाच विक्रम नमस्कार करून ओसरीवर आला आणि नागनाथने धनपाल बद्दल जी भविष्यवाणी त्याने केली होती ती सांगायला त्याने सुरूवात केली. राघवला समजणार नाही अशा हळू आवाजात तो म्हणाला,

" मालक, नागनाथ म्हणतो की मालकाला पुत्र संतती होणार पणं वहिनी साहेबांपासून नाही. त्यांच्या नशिबात कोणीतरी एक स्त्री येणार आहे."

हे ऐकल्यावर तर धनपालला कोणीतरी आपल्या नशिबाचे दरवाजे उघडत आहे असा भास झाला. विक्रमला त्याने अत्यानंदाने मिठी मारली. दोघं बराच वेळ बोलत राहीले.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all