राघव त्याच्या घरी गेल्यानंतर विक्रमने अगोदरच खंडून ठेवलेला खड्डा धनपालने एका नोकराला सांगून व्यवस्थित साफ करून घेतला. खड्ड्यातली माती एका बाजूला व्यवस्थित रचून घेतली. खड्डा का खंडला आहे, हे विचारायचं धाडस हे काही माणसांमध्ये नव्हतं.
तिकडे सुंदरी खूप धावपळीत होती. हे काम तिने हातात घेतले असल्यामुळे तिची धावपळ सुरू होती. बरेच दिवस झाले तिने वाघ नखांचा वापर केलेला नव्हता. एकदाच एका हरणाला तिने निव्वळ वाघ नखांच्या साह्याने पूर्ण फाडून काढले होते. त्यानंतर त्यांचा कधी उपयोग झाला नव्हता. आज त्याला मुहूर्त लागणार होता त्यासाठी पॉलिश पेपरने घासून त्याने वाघ नख स्वच्छ आणि टोकदार करून घेतली. आणि सहज दोन बोटात वाघ नखं धरून एका भोपळ्यावर रेष ओढून बघितली. अगदी अलगद तो भोपळा चिरला गेला. आपलं काम सहज पार पडेल, याबद्दल तिला चिंता राहिली नाही. दुपारी तिने मन लावून जेवण केलं. छान पैकी झोप काढून, आराम केला. संध्याकाळ झाली. तसेच सर्वजण राघवची आणि विमलची वाट बघत बसले.
इकडे दरवाजा वाजताच विमल दरवाजा उघडून बाहेर आली. राघव आणि आपण चहा करून. मग आपण सोबत जाऊया असा तिने विचार केला. पण तिने दरवाजा उघडेपर्यंत राघव वाड्याच्या बाहेर देखील गेला होता. त्याला कदाचित आपण एकट्या होत याचा संकोच वाटत असेल. असा तिने विचार केला. तिला राघवच्या लाजाळू स्वभावा वर हसू आले. एकाच वाड्यात राहून कमीत कमी बोलणारा आणि इतका लाजाळू असणारा राघव हा तिला फारच बालिश स्वभावाचा माणूस वाटला. तो विक्रम आणि तो दोघेही धनपालकडेच नोकरीला होते. पण दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. विक्रम लहान मुलांमध्ये देखील रमत असे. तर राघव कधीच कोणाशी जास्त बोलत नसे. विक्रम देखील राघव बद्दल जास्त कधी बोलल्याचं तिला आठवलं नव्हतं. चांगलेही नाही आणि वाईटही नाही. त्यामुळे राघव बद्दल तिचं ठाम असं मत काहीचं नव्हतं. परंतु त्यावर त्याच्यावर अविश्वास दाखवावा असेही अजून काही घडलं नव्हतं. म्हणून ती थोड्याच वेळात दरवाजाला कुलूप लावून जायला निघाली. जाण्यापूर्वी ईश्वरीचा निरोप घ्यावा असं तिला वाटलं. परंतु ईश्वरीच्या घरातून घंटीचा आवाज येत होता. कदाचित ती आता देवपूजा करत असावी. उगाच तिला नुसतं सांगण्यासाठी त्रास द्यावा असं विमलला वाटलं नाही. कोणाला काही सांगून जावं तर वाड्यात कोणीच नव्हत.
शेवटी ती वाड्या बाहेर आली. तिच्या अंदाजानुसार राघव बाहेरच उभा होता. ती त्याच्याकडे बघून मंद हसली. राघव पुढे आणि ती मागे, असे दोघेजण चालायला लागले. चालता चालता तिच्या लक्षात आलं की आपण बाजारात जाण्याच्या ऐवजी तिसऱ्या गल्लीत चाललो आहोत. तिने राघवला आवाज देऊन विचारलं,
" भाऊजी, आपण बाजारात जाणार आहोत ना ?" त्यावर तो म्हणाला,
" हो वहिनी बाजारात चं जाणार आहोत. परंतु विक्रमने धनपाल राजकडून त्याचे पैसे घेऊन येण्यास सांगितले आहेत. म्हणून आपण वाड्यावरून पैसे घेऊ आणि लगेच बाजारात जाऊ."
तिला ते पटले. वाडा काही फार लांब नव्हता. दोनच मिनिटात ते वाड्याजवळ आले." वहिनी तुम्ही इथे थांबता का ? मी लगेच आत जाऊन पैसे घेऊन येतो."
वाड्याच्या दुसऱ्या बाजूला दारू पिणाऱ्या लोकांची ये जा चालली होती. पण तिच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सगळेजण आपल्याच धुंदीत होते. ती ज्या पायऱ्यांवर उभी होती. त्या पायऱ्या भोवती रांगोळी काढलेली होती. तुळशी वृंदावना जवळ दिवा लावलेला होता. दारू आणि अगरबत्ती यांचा एक वेगळाच विचित्र वास तिथे पसरलेला होता. तिने याआधी हा वाडा कधी पाहिलेला नव्हता. पण तो वाडा तिला खूप विचित्र वाटला. येथून जितक्या लवकर निघून जाता येईल तितके चांगले, असे तिला वाटले. ती अस्वस्थपणे उभी असलेली असतानाच, आत मधून चिंधी आणि धनपाल दोघेही बाहेर आले आणि म्हणाले,
"अरे वहिनी, आत या ना."धनपाल आग्रह करतं म्हणाला.
"विमल ,अगं तू पहिल्यांदाच येते आहेस आमच्या घरी मी तुला अशी चहा पाणी घेतल्या शिवाय कशी बरं जाऊ देईल. अग येना आत." चिंधीने तर तिला हात धरूनच आत घेतले.
"नको मालक, हे बाजारात वाट बघत असतील.". ती अजिजीने म्हणाली.
" अगं तू त्यासाठी तू कशाला बाजारात जायला हवस. या विक्रमला खरचं काही समजत नाही. तू इथेच बस. मी विक्रमला आणि त्या सोनाराला स्वतःच दागिने वाड्यावर घेऊन यायला सांगतो. त्यातून तुला हवं ते पसंत कर. हो ग ,अशा अवस्थेत कशाला तू बाजारात जातेस विक्रमला काही कळत नाही. तू पहीलट करीण आहेस. काळजी घ्यायला हवी. ये आत. मी आत्ता राघवला विक्रम भाऊजीला घेऊन यायला सांगते. निवांत बस आणि तुला काय खावस वाटते ते मला सांग " चिंधी मानभावीपणे म्हणाली.
चिंधीच्या गोड बोलण्याला विमल एकदम भाळली. सगळे लोक म्हणतात तितकी चिंधी वाईट नाही. क्षणार्धात तिचं मत चिंधी बद्दल चांगलं झालं. निश्चिंत होऊन ती आत आली. वाड्याच्या ओसरीत काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्यावर ती आदबीने जाऊन बसली. चिंधीने दिला प्यायला पाणी दिले.
" थोड्यावेळ थांब. विक्रम येईपर्यंत तुझ्यासाठी नाश्ता बनवते." असं म्हटलं आणि चिंधी आत निघून गेली. जाताना विमलकडे तिने एक तिरपा कटाक्ष टाकला. विमलच्या अंगावर बाळंतिणीचे तेज तळपत होते. क्षणभर तिला विमलचा हेवा वाटला. नंतर तिने स्वतःला सावरलं आणि विचार केला की थोड्याच दिवसात हीच अवस्था माझी होणार आहे.
विमल खुर्चीवर बसलेली होती, तेव्हा तिला अनेक नजरा निरखत होत्या. कशा प्रकारे तिला मारता येईल याचा विचार त्यांच्या मनात सुरू होता. असाच बराच वेळ गेला.
" तुला बाथरूमला जायचे असेल तर जाऊन ये ,"असं चिंदी तिला म्हणाली. पाणी पिल्यामुळे खरोखरच तिला लघवीची भावना झाली होती. बाथरूम कुठे आहे ,असं तिने विचारलं तेव्हा चिंधी तिला घेऊन आत गेली. आत मध्ये सुंदरी अगोदर पासून वाघ नखं पाजळत बसलेली होती. त्यावेळी विमलला कल्पना नव्हती की आपण बाथरूम मध्ये नाही तर आपल्या मृत्यूकडे पाऊल टाकत आहोत.
थोड्याच वेळात, बाथरूम मधून एक जीवघेणी किंकाळी बाहेर ऐकू आली आणि रक्ताचा एक मोठा ओहळ नाली मधून वाहायला लागला.
( क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा