रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 26 )

एक भयावह मालिका

बाहेर ओसरीवर ते चारही जणं मस्त पैकी दारू पीत बसलेले होते. त्या दारूचा आंबूस वास चिंधीच्या अगदी आरपार जावून तिला जणू आवाज देतं होता. आज दोन तीन महिने झाले रोज दारू शिवाय न झोपणारी ती त्या चिर परिचित वासाने बेभान होऊन गेली. तिच्यातली ती आदीम ऊर्मी वेगाने उफाळून आली. तिला कसलंच भान उरल नाही. धनपाल सोडून बाकी सगळे दारू पिऊन तर्र झालेले होते. रात्रीच्या चंद्राचा प्रकाश ओसरीवर पडलेला होता. ते धुंद वातावरण पाहून ईतके दिवस तिने धारण केलेली सभ्यतेची अवरण गळून पडली. अगदी नेहमीची गोष्ट असल्या सारखं तिने धनपालला विचारलं,

" मालक मी पण एक घोट घेऊ का ?"

क्षणभर धनपालचा स्वतःच्या कानावरच विश्वास बसेना. त्याला काय उत्तर द्यावे हेचं क्षणभर सुचलं नाही. तो नुसताच हसला. ईतके दिवस जिचा विचार करत होतो ती संधी इतक्या सहजतेने प्राप्त होईल असं त्याला वाटलंच नव्हत. त्याने काहीच न बोलता एक ग्लास पूर्ण भरला आणि तिच्या समोर धरला. तिने तो अगदी पाणी प्यावे अशा रितीने एका घोटात रिकामा केला. आणि मग काय, तिची इतक्या दिवसांची तहान उफाळून आली. ती ग्लासा वर ग्लास रीते करू लागली. त्यांच्यात  हळूहळु पिणं अशी प्रथाच नव्हती. एकदा दारू प्यायला लागल्या नंतर पूर्ण धुंद होऊन पडे पर्यंत पित राहायचं ही खरी दारू पिण्याची पद्धत. नुसता पिण्याचा आव आणण म्हणजे काय ?

हळूहळु तिच्यावर दारूचा अंमल चढू लागला. विक्रम, राघव आणि परशा यांना तर कसलीच शुध्द नव्हती. ते तर काहीच्या काही बरळत होते. सगळ्यांच्या दाबून ठेवलेल्या भावना अनावर होऊन बाहेर येतं होत्या आणि जीभा पण सैल सुटल्या होत्या. नाही नाही म्हणता धनपाल देखील चिंधी प्यायला आली म्हटल्या वर पूढे सरसावला. दोघेही एकमेकांना आग्रह करून करून पाजू लागले.

" चिंधी, एक गोष्ट सांगू का तूला ?" धनपालराजने लाडात येवून विचारले. त्याची जीभ खूप जड होत चालली होती.

" बोला ना मालक. मी तर तुमची दासी आहे. तूम्ही काही पणं बोलू शकता." ती धुंदावलेल्या नजरेने म्हटली आणि बोलता बोलता तिने पुन्हा एक ग्लास भरून पटकन गिळून टाकला. तिच्या पिण्याच्या त्या प्रकाराकडे धनपाल थक्क होऊन बघतच राहीला. तो नशेत असतांना देखील त्याला धक्का बसला. माणूस असून देखील तो स्वतः असं पिऊ शकला नसता. आता तिचा तिच्यावरचा ताबा सुटतं चालला होता. नजर खूप अस्थीर झालेली होती. सगळं जग हलक हलक होवून तिच्या भोवती गोल गोल फिरत आहे असं तिला वाटायंला लागलं. तिने अजून एक घोट घेतला. आता तर तिला स्वतःलाच पंख फुटले आहेत आणि ती आकाशात उंच उंच उडते आहे असं तिला वाटायला लागलं.

" ओ मालक तूम्ही काहीतरी सांगणारं होता ना. बोला ना. आज चिंधी बहोत खूष है " ती त्याच्याकडे मधाळ नजरेने बघत म्हणाली.

किती दिवस झाले ही संधी आपण शोधतो आहोत. सगळे स्वतःशीच बडबड करत निपचीप पडलेले आहेत. कदाचीत वाड्यातले ईश्वरी आणि मुलींसकट  बहुतेक सगळेच झोपून गेले असतील. जगात फक्त चिंधी आणि आपण असे दोघेच अस्तित्वात आहोत. आता कोणाला घाबरायची भीती नाही. तशाही अवस्थेत त्याने थोडं सावध होवून, कोणी जागी आहे का याचा कानोसा घेतला आणि चिंधीच्या जवळ जरा झुकून म्हणाला,

" चिंधी तू खूप सुंदर आहेस"

यावर चिंधी खदा खदां हसत म्हणाली.

" यात काय नवीन सांगितलं मालक तूम्ही. ही गोष्ट तर मला फार लहानपापासूनच माहिती आहे. त्या मुळेच तर सख्या काकांनी माझ्यावर लहानपणीच बलात्कार केला होता. "

ती गोष्ट ऐकल्यावर धनपाल राजला धक्का बसला. खोटी सहानुभूती दाखवत तो उद्गारला, " अरेरे" 

" खोटी सहानुभूती दाखवू नका मालक. मला माणसं चांगली ओळखता येतात. अशीच सहानुभूती दाखवून अनेक लोकांनी माझा गैरफायदा घेतला आहे. " तिचं बोलणं ऐकून धनपालची तर वाचाच गेल्यासारखी झाली. चिंधी मात्र पूर्ण बेभान झालेली होती.

" तूम्ही मला ईथ का आणलं आहे हे ही मला माहीत आहे. " चिंधी त्याच्याकडे मधाळ नजरेने बघत म्हणाली. धनपाल तर स्तब्ध होऊन गेला. " मालक, खूप दिवसाची मी तहानलेली आहे. माझी तहान भागवा ना. "

ती अडखळत बोलली. धनपाल कडे यायला लागली. तसा तिचा तोल गेला आणि ती धाडकन खाली पडली. तिच्या हातातला ग्लास खाली पडला. ती खाली पडल्याने अनेक गोष्टी खाली कोसळून जोरदार आवाज झाला. रात्रीच्या शांत वेळेत तो आवाज खूप मोठा वाटला. विक्रम, राघव आणि परशा यांना कसलीच शुध्द नव्हती.ते असेच अस्ताव्यस्त पडलेले होते. धनपालने चिंधीला कमरेत हात घालून आधार दिला आणि तो तिला घेऊन त्याच्या खोली कडे जायला निघाला.

त्याचं वेळी ईश्वरी बाहेर आली आणि तिने त्या दोघांना बघितलं.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all