रक्त रंजीत 365 रात्री ( भाग सोळावा )

एक भयावह मालिका


रक्तरंजीत 365 रात्री ( भाग सोळावा )

नागनाथच्या घरून निघतांना विक्रम खूप आनंदी होता. त्याचं लग्न होवून दोन वर्ष होत आली होती. जर नागनाथने सांगितलं तसं झालं असतं तर त्याच्या सारखा नशीबवान तोच असता. तस दोन वर्ष म्हणजे फार दिवस नव्हते झाले लग्नाला. तरी त्याच्या डोळ्यासमोर मालकाचा आदर्श होता की. मग तो किंचित नाराज व्हायचा.

त्याच्या बायकोचं नाव विमल. विमल दिसायला जरी साधारण होती तरी तिच्यावर विक्रमच अतोनात प्रेम होतं. तिचा रंग गव्हाळी सावळा होता. तिच्या हनुवटीवर आणि कपाळावर हिरव्या रंगाचा ठीपका  गोंदलेला होता. ती नेहमी भल्या मोठया आकाराचा कुंकवाचा टिळा लावत असे. खाली न चुकता हळद. सगळया गावात एव्हढ मोठं कुंकू लावणारी ती एकमेव स्त्री होती.

नऊवारी हिरवे पातळ, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या, कपाळावर चंद्रकोरीच कुंकू, गळ्यामध्ये काळ्या मण्यांमधे ओवलेलं छातीवर रुळणार लफ्फेदार मंगळसूत्र, पायात घुंगराच्या तोरड्या, जोडवे अशा मराठमोळ्या वेषात तिचं राहणं खुलून दिसत असे. तिच्या हाताची बोटं निमुळती होती. नाक किंचित बसके होते. पण तिला नीटनेटक राहायला आवडत असे. नऊवारी साडी नेसावी तर विमलनेच असं जून्या जाणकार बायका म्हणत. कुठे इकडची सुरकुती तिकडं होईल तर शपथ. तिला नऊवारी साडी खूप शोभून दिसायची.

बोलायला आणि स्वभावाला ती खूप गोड होती. तिच्या कामाचा झपाटा देखील खूप होता. आठ दहा जणांचा स्वयंपाक ती बघता बघता करून टाकत असे. संध्याकाळी चुलीसमोर बसून चुलीतल्या जळत्या लाकडांच्या प्रकाशात तिचं भाकऱ्या थापण ईतक छान वाटे की तिच्या लयदार हालचाली विक्रम न कळतं निरखत राही. आणि भाकऱ्या तरी कसल्या गोलाकार करायची आणि तेही छान नाजुकसा पोपडा आलेल्या. विक्रमला तिचं भाकरी बनवणं एव्हढ आवडत असे की तो मुद्दामून एक दोन भाकरी जास्त खाई. तिलाही तो जास्त जेवला की आनंद होई. तिच्या जेवणालाही चव होती. कितीतरी वेळा धनपालराज देखील तिच्या हातचा भाकरी आणि ठेचा मागत असे.

तिला लहान मुलांची देखील खूप आवड होती. त्यातल्या त्यात तिची आणि सरुची चांगली गट्टी जमत असे. ती सातव्या इयत्ते पर्यंत शिकलेली असल्या मुळे बऱ्याच वेळा सरुचा अभ्यास घेतं असे. सरू अतिशय हुशार होती. ती बऱ्याच वेळा अनेक गोष्टी विमल जवळ शेअर करत असे. सरूचे लांबसडक केस विंचरून त्यांची छान वेणी तयार करून त्यांच्या शेपटाला रिबिनी बांधून फुलं तयार करुन बांधून देऊन तिला शाळेत जायसाठी तयारी करून देणं हा तिचा आवडता छंद. काम नसेल तेंव्हा विमल झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून झोके घेत बसे.

ईश्वरीच्या बहुतेक सगळ्या मुलींची ती लाडकी काकू होती. सगळ्या मुलींना आंघोळी घालणं, कपडे घालणं, केसं विंचरण, वेण्या घालणं, त्यांना गंध पावडर करणं, त्यांचा नाश्ता पाणी करणं, ही सगळी काम ती आवडीने करायची. नंतर ही कामं आटोपल्या वर ती सगळ्यां मुलींना घेऊन बसत असे आणि त्यांना गोष्टी सांगत असे. त्यांचा अभ्यास घेतं असे. वाड्यावर खूप गर्दी आणि मुलांची वर्दळ असल्यानं तिला तिथं सहज करमत असे. तिचा दिवस सहज निघून जाई.

या व्यतिरिक्त विक्रामचा शूर आणि धाडशी स्वभाव तिला खूप आवडत असे. एकदा विक्रम आणि ती तालुक्याच्या गावाला गेले होते तेंव्हा तिने हौशीने हातावर विक्रमच नावं आणि विक्रमने तिचं नाव गोंदून घेतलं होतं. विक्रमला तिचं असं जवळ जवळ करत आसपास घोटाळत राहणं खूप आवडत असे.

नेहमी धनपालराज सोबत राहावं लागत असल्या मुळे विक्रमला ईच्छा असूनही विमल सोबत वेळ घालवायला मिळतं नसे. तरी तो त्यातल्या त्यात प्रयत्न करत असे. त्या छोट्याशा गावात फिरायला जाणे ही गोष्टचं नव्हती तिथं सिनेमा, बाग वगैरे गोष्टीचं अस्तित्वात नव्हत्या. मुळात नवरा बायको फिरायला जाणंच मुळी कोणाला मान्य नव्हतं. शिवाय दिवसा कामामुळे आणि आजुबाजुला मुलं असल्यामुळं काहीचं बोलणं होतं नसे. जे काही बोलायचं ते रात्री सगळे झोपल्यावर आणि सगळी कडे सामसूम झाल्यावर.

त्या मुळे नागनाथ पतंजली कडून आल्यानंतर त्याला महत्वाची गोष्ट विमल जवळ बोलायची होती. सरूचा अभ्यास झाल्यावर तो एकांत त्याला मिळाला.

" विमल, ऐक ना. एक गोष्ट विचारतो. नाराज नाही व्हायचं" त्यानं लाडात येऊन विचारलं.

" नाराज कशापाई होणारं. विचारा की " तिनही खट्याळ पणं उत्तर दिलं.

" अग, खरं सांगू का. आजकाल घरात एखाद बाळ हवं असं वाटतं. " 

" ते काय आपल्या हातात असतं होय. अहो, जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी देवानं त्याच्या हातात ठेवल्या आहे म्हणून बरं " ती एकदमच तत्वज्ञानी माणसा सारखं बोलू लागली.

" ते काहीही असो. पणं मला बाळ हवं आहे. तेही माझ्या सारखा पहिलवान गडी." विक्रम लाडात म्हणाला. " आणि मी सांगतो तसं वागली तर लवकरच आपल्या घरात देखील बाळ येईल बघ. "

" मग वागेन ना " असं म्हणत ती विक्रमच्या कुशीत शिरली.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all