रक्त रंजीत 365 रात्री ( भाग आठवा )

एक भयावह कथा मालिका
रक्तरंजीत 365 रात्री ( भाग आठवा )

सरू रडते आहे हे लक्षात आल्यावर तिला तिच्या दुःखाचा विसर पडला. तिने अलगद तिचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतले. सरू तिला एकदम बिलगलीच आणि म्हणाली,

" आई मला खूप भीती वाटते. मला लघवीच्या जागेतून सारखं रक्त येतं आहे." हे सांगताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहात होते. सरूचं बोलणं ऐकल्यावर तिला एकदम भरून आलं. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं.

बघता बघता आपलं हे बाळ किती मोठं झालं. दिवस कसे भरा भरा संपून गेले समजलच नाही. आता काही दिवसांतच तिचं लग्न होईल आणि ती पणं एकदिवस आपल्या सारखी आई होईल. या वर्षी सुरू मोठी झाली. पुढच्या वर्षी पुढची मुलगी तयार होईल. त्याच्या पुढच्या वर्षी अजून पुढची. आता हे निसर्गाचं चक्र सुरू झालंय.

मग तिने सरु ला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिचे डोळे पुसत ती तिला, जे तिला तिच्या आईने समजावून सांगीतलं होतं, तेचं तसचं समजावून सांगायला लागली. की बाई, बाईचा जन्म असाच असतो. आता तू खऱ्या अर्थानं स्त्री झालीस. आता जास्त जपून राहायचं. मुलांमधे जास्त मिसळायचं नाही. काळजी घ्यायची. तीन दिवस आराम करायचा. कशाला हात लावायचा नाही. विटाळ पाळायचा वगैरे वगैरे.

सरु तर घाबरून गेली होती. तिला तिने घड्या कशा घ्यायच्या वगैरे समजावुन सांगितलं आणि आराम करायला सांगितला. एक प्रकारे तिला आनंदही झाला होता. तिने राघवच्या बायकोला जेवणात काहीतरी गोड बनवायला सांगितलं.  या सगळया गोंधळात तिला तिच्या वेदनांचा विसर पडला. धनपालराज वरचा राग देखील ती विसरुन गेली.

सरूच्या पोटात खूप दुखत होते म्हणून ती शाळेत गेलीच नाही. तसही तिने आज तिला पाठवलच नसतं. सरूच्या तीन मैत्रिणी होत्या. साधना, शकिला आणि भूमिका. या चारही मैत्रिणी नेहमी सोबत असतं. सोबतच तालुक्याला शाळेत जातं.

साधना, रंगाने गोरी पान , नाकी डोळी रेखीव,केसांना थोडीशी सोनेरी झाक असणारी होती. तिला बोलायला खूप आवडत असे त्यामानाने शक्तीला आणि भूमिका या थोड्याशा अबोल भूमिका उंचीने कमी, आणि रंगाने सावळी होती. शकीला गोरी पान होती. परंतु ती बुरखा वापरत असे. सरू त्यामानाने त्या चौघींमधे अतिशय समजूतदार होती. वयाच्या मानाने तिला बऱ्याच गोष्टी लवकर समजत असत. तिच्या मधे निर्णय घेण्याची पण क्षमता होती.

आज बराच वेळ सरूची वाट बघून त्या एकट्याच शाळेत गेल्या. शाळेतून आल्या आल्या त्या सरुला भेटायला घरी आल्या. त्या वेळी सरू आतल्या खोलीत झोपलेली होती. त्यांच्या हातावर खाऊ देऊन ईश्वरीने त्या तिघींना त्यांच्या शिक्षकांना निरोप द्यायला सांगितला की ,

" सरूला बरं वाटतं नसल्याने ती अजून दोन चार दिवस सरू शाळेत येणारं नाही."

सरूच्या त्या तिघा मैत्रिणींनी तिच्या साठी चिंचा वगैरे आणल्या होत्या. तिच्या बरोबर थोडं बोलून त्या उड्या मारत घरी गेल्या.

" कसलं निरागस बालपण असतं ना. असं वाटतं की या मुली मोठया होवूच नये. पण निसर्गाला थोडच थांबवता येणार. बघता बघता या मोठया होवून संसार करायला निघून जातील देखील. लक्षातही येणारं नाही. " ती विचार करत बसली. "खरंच मुलगी निसर्गाचा केवढं मोठं वरदान आहे. मुलांपेक्षा तर त्या जास्त आई-वडिलांची काळजी करतात. जास्त प्रेम लावतात. त्यांच्यामुळे घराला घरपण येतं कशाला हवेत मुलं "

तिच्या मनातून धनपाल बद्दलचा राग केंव्हाच नाहीसा झाला होता. आज तो घरी आला की त्याला आपण, आपल्याच गावात शाळा उघडायला सांगू या. आता मुलगी मोठी झाली आहे. तिला एकटीला तालुक्याला पाठवायला खूप भीती वाटते. ती घरी येईपर्यंत जेव्हा जीव राहत नाही. तिच्यासाठीच नव्हे तर गावातल्या सगळ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी ही चांगलीचं गोष्ट होईल. शिवाय धनराज पाल चे नाव देखील या गोष्टीमुळे खूप आदराने घेतल जाईल. नक्कीच जर त्याने ही गोष्ट मनावर घेतली तर सहज होऊन जाईल. कारण त्याचे शब्दाला वजन आहे. फक्त त्याने ही गोष्ट मनावर घ्यायला हवी.

आज दिवस भर धनपालराजचा पत्ता नव्हता. कधी नव्हे ती धनराजपालची वाट बघत होती. संध्याकाळी धनपाल घरी आला. आला तोच मुळी दारू ढोसून. आज काल त्याचे पिणे खूप वाढलेले होते. दारू पिण्यासाठी त्याला काहीही कारण लागत असे कधी खूप आनंद असला तर आनंद व्यक्त करा साठी दारू पीत असे आणि जर कधी दुःखी असला तर दुःख विसरण्यासाठी दारू पीत असे.

आज तर ईश्वरीशी भांडण झाल्यामुळे तो पुरेसा बिथरला होता. त्यामुळे तो दारू पिऊन येणार याची अटकळ ईश्वरीला होती त्यामुळे तो दारू पिऊन आला, तेव्हा त्याचे तिला नवल वाटले नाही. तरी देखील तिने त्याच्याशी समजूतीने बोलण्याचं ठरवलं.

खरं म्हणजे धनपालराज आज मी बीथरला नव्हता तर उलट मनातून थोडासा धास्तावला होता. त्याला पूर्ण खात्री पटली होती की ईश्वरीला नक्की कळून चुकलं आहे की आपलं बाळ जिवंत जन्माला आलं होतं आणि त्याला आपण पूर्ण याची कबुली रागाच्या भरात देऊन टाकली. शिवाय तिला देखील ठार मारण्याची धमकी दिली होती हेही त्याला आठवलं. निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि त्याला त्या गोंधळात हा त्रास नको होता. विरोधी पक्षाचे लोक या गोष्टीचा फायदा घ्यायला मागेपुढे बघणार नाही याची त्याला खात्री होती. यासाठी ईश्वरीला विश्वासात घेऊन गोड बोलून समजावून सांगायची गरज होती.

त्या विचारात त्याने भरपूर दारू पिली होती.आणि झुलत घरी आला. ईश्वरी त्याची वाटच बघत होती तो आला आणि बंगईवर बसून झुलत राहिला.

ईश्वरी दारात येवून ऊभी राहीली. आणि म्हणाली,

" मी काय म्हणते ऐकलं का ? आपली सरू मोठी झाली आहे. तिला तिला एकटीला तालुक्याला शिकायला पाठवायसाठी मला खूप भीती वाटत असते. तुम्ही असं का करत नाही. आपल्याच गावात दहावीपर्यंत शाळा सुरू करा ना सगळ्याच लोकांची सोय होईल"

आज घरी आल्यावर ईश्वरी आपल्यावर भडकेल. शिव्यागाळ करेल. खूप मोठं भांडण होईल. गावाला तमाशा दिसेल. असं त्याला वाटत होतं . पण ती जे काही बोलत होती. त्यातून त्याला आपला उज्वल भविष्यकाळ दिसायला लागला. या येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी जणू काही तिने त्याला एक दिशाच दाखवून दिली होती. तो मनातून अतिशय खुश झाला आणि त्याने तिला आश्वासन दिल, की तो उद्याच गावातील प्रमुख लोकांची मीटिंग बोलवेल आणि याबाबतीत निर्णय घेईल.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all