रक्षाबंधन एक अतूट नाते भाऊ बहिणीचे

Brother sister love..

विषय:- रक्षाबंधन अतूट नात भाऊ बहिणीचे....                                                सर्व नाती काही रक्ताची नसतात....काही नाती मनाने जुळलेली असतात यात बहीण भाऊ हया अनमोल रत्नाचा ही समावेश असतो ..... भावाच निरागस प्रेम अन बहिणीची अफाट माया हे सर्वाच्या भाग्यात नसते ....मग अशातच कुणाला बहिणीच प्रेम मिळालेलं नसेल ,कुणाला बहीण नसेल तर त्याला एखाद्या वळणावर तिची भेट घडवून येते..भले ते नाते रक्ताचे असो वा नसो....पण त्या व्यक्तीत ते नात अन त्या नात्यात ल ते निरागस प्रेम ....आपल्या नजरेच्या कक्षेत बागडू लागत....बहिणीची किंमत अन तिचं प्रेम तिची माया काय असते....ह्याची जाण असते आपल्याला बहिणीच ते कृपाळू प्रेम,तोच हट्टीपणा...बहीण भावातला खेळकरपणा ,तिची लाडी गोडी .....तेच गोंडस प्रेम.... क्षण अगदी फुलून जातात....हे नात रक्ताच असेल किंवा नसेल पण.....प्रेमाचं विश्र्वासच अन मना मनाच असत....आणि ते कायम तसेच राहावं हीच आपली प्रामाणिक इच्छा असते ... कोणत्याही भावासाठी बहीण ही important असते...किती साधं सरळ असते बहीण भावाचे नाते जिथे मी काही न बोलता तुला सर्व समजलं जात .... दादा बघ आज अस झालाय म्हणताच काळजी नको करू सर्व ठीक होईल असे तू म्हणतो....तुझे हे शब्द ऐकताच माझे अर्धे टेन्शन कमी होते.... बहुतेक ह्यालाच बहीण भाऊ चे नाते म्हणातात.... प्रत्येक बहीण भावाला हेच सांगते तू नेहमी जिकावेस तू नेहमी आलेल्या संकटाशी लढावे.... कारणे कुठली न देता... प्रयत्न करत राहावे...कारण तुझी ही बहीण नेहमी तुझ्या सोबत असेल ... अश्या ह्या भाऊ बहिणीसाठी हे चार शब्द........                   बहीण भावाचं नातं खूप खास असत. दूर असो व जवळ नेहमी मनाच्या जवळ असत. . मुक्ताई ज्ञानेश्वर सारखं प्रत्येक बहीण भावाचं नातं असत. . जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडण करतो .. त्यात हे त्यांचं प्रेम दडलेलं असत . भाऊ आपल्या बहिणी ला तुझं रक्षण करेन हा वचन देतो तो पाळतो. . बहीण लहान असो किव्हा मोठी प्रत्येक भावाची लाडकी असते. . छोट्या छोट्या गोष्टीवर चिडवण्यात रडवण्यातच त्याची प्रीती असते. . जेव्हा ती रुसून बसते तेव्हा तिला मनवण्याची पण tirck भावा कडे असते. . ती जेव्हा हा ड्रेस कसा दिसतो विचारल्यावर . तुला कोणताही ड्रेस छान दिसतो म्हणून वाह वाह केल्यावर . तिच्या face वर आलेली smile पाहून जे त्याला खुशी मिळते ती कशातच नसते. . रात्री उनाडक्या करून घरी येताना ना चुकता एक chocolate मात्र आणायला तो कधी विसरत नसतो. . बहीण कधी हट्ट केला तर ते पूर्ण करणे हा भाऊ आपली duty समजतो. . खरं तर बहीण किती हे सुंदर असो अथवा नसो तिला चिडवलं असं एक नाव भाऊ बहिणीला देतो. . आणि बहिणीला राग येतो पण भाऊ कोणत्याही नावाने हाक मारली तरी तिला तो आवडतो. . कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, . म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… असच असत प्रत्येक भाऊ बहिणीचं अनमोल नातं..