Sep 28, 2020
सामाजिक

रक्षाबंधन- काळानुसार बदललेली व्याख्या

Read Later
रक्षाबंधन- काळानुसार बदललेली व्याख्या

रक्षाबंधन- काळानुसार बदललेली व्याख्या

 

रक्षाबंधनाचा सण आता जवळ आला आहे त्यानिमीत्ताने,

पूर्वीच्या काळी रक्षाबंधन म्हणजे,भावाने बहीणीची रक्षा करायची, कधी कधी तर दोन राज्यातील संबंध आबाधित राहावे म्हणून तिथल्या राण्या शेजारच्या राज्यातल्या राजाला राखी बांधत असत, श्रीकृष्णाने जसे द्रौपदीचे रक्षण केले ,हे तर पुराणातील उदाहरण सगळ्यांना ज्ञात आहे, पूर्वीच्या काळी स्त्रीया घराबाहेर पडत नसत ,त्यांना कुठेही जायचं म्हटलं तर बरोबर कुणाला तरी घेवून बाहेर जावे लागे, स्त्रीया आधी घराबाहेर पडत नव्हत्या,त्या सर्वस्वी नव-यावर अवलंबून असतं,त्यामुळे त्यांना नेहमीच नव-याच्या मर्जीप्रमाणे वागावे लागत असे,अशात जर भावाचा आधार असला की,नवरा त्यांच्याशी व्यवस्थित वागायचा ,त्यांच्या माहेराहून चांगले उपहार  आले की,बायकोला सन्मान मिळायचा. ज्या स्त्रीयांना माहेरचा आधार नसेल ,त्या स्त्रीयांना खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागायचे आणि पदोपदी माहेरच्या लोकांचा उद्धार ऐकायला मिळायचा ते वेगळच्ं , त्यावेळी प्रत्येक स्त्री सगळं सहन करायची कारण तिला वाटायचे की ,आपल्या मुळे माहेरच्या लोकांना त्रास नको ,कधी कधी तर जीव द्यावासा वाटायचा ,पण मुलांसाठी गप्प बसावे लागायचे. नव-याची प्रत्येक गोष्ट मन मारून करावी लागायची . आता तशी परिस्थिती राहिलेली नाही,आजची स्त्री शिकलेली आहे,ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते,तिला आता कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही,ती स्वसंरक्षणाचे  धडेही घेत आहे . स्त्रीयांना आता समान अधिकार देण्यात आले आहे. आधीच्या काळात भाऊ बहिणींना मदत करायचे ,आता बहिणही भावाला तितक्याच आपुलकीने मदत करते,लहान असेल तर मार्गदर्शन करते ,आजकालच्या बहीण भावांत मैत्रीचे नाते दिसते, ते एकमेकांशी सगळ्या गोष्टी बिनधास्त शेअर करतात,एकमेकांचे ओपिनीयन घेतात ,निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मात्र ज्याला निर्णय घ्यायचा त्यालाच असते. पूर्वीच्या काळी भाऊ बहिणीत असे नाते नव्हते,भाऊ जे सांगेल त्याप्रमाणं वागाव्ं लागायचंं,त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलताही नाही यायचं ,कारण आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृतीआहे ना.

आजकाल तर आईवडील मुलगा आणि मुलगी यांंना समान वागणूक देतात,मुलांएवढेच स्वातंत्र्य मुलींनाही आहे,प्रॉपर्टी मध्येही समान अधिकार आहे. पण बहीण भावाच्या नात्यात जी मजा असते ना ,ती काही औरच असते,एकमेकांना चिडवण्ं, सिक्रेट माहिती असल्याने ब्लाकमेल करणं ,एकमेकांना धमक्या देणे पण वेळ आल्यावर सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांची साथ देणं,एकमेकांवर विश्वास असणं आणि त्यातून एक सुरक्षितता आहे याची जाणीव असणं हे खूपच छान आणि सुंदर असतं,आपण कधीही एकटे नाही आहोत ,आपल्या बरोबर नेहमीच आपला भाऊ किंवा बहीण आहे याची जाणीव असल्याने जगाची विनाकारण फिकिर न करणं . भाऊ बहिणीच नातं रक्ताचच असतं असं काही नाही ,जोडलेली नाती कधी कधी त्यापेक्षा जास्त छान असतात ,कारण ती कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निर्माण झालेली असतात. बहीण भावाच्या नात्यात एकाला जर त्रास होत असेल तर तो दुस-याला न सांगता कळतो आणि तो त्याचे कारण शोधून, त्याचे नीराकारण करतो, न बोलताही अनुभवाने एकमेकांचा मूड कळतो ,तो ठिक कसा करायचा ,त्याची चावी पण एकमेकांकडे असते ,असं आहे भावाबहिणीच नातं. 

 

बंधन आहे हे रक्षाबंधनचं ,

एकमेकांना साथ देण्याचं,

फुलवू नात मैत्रीचं,

 

भरु रंग विश्वासाचा त्यात,

हरखून जातो भान या नात्यात,

साठवू त्याला आपल्या मनात,

 

या नात्याला आहे वेगळाच मान,

सा-या जगात आहे हे खुपच छान,

म्हणुनच आहे हे एक पवित्र बंधन,

असतं यात रुसणं,फुगणं,चिडवणं,

त्यानंतर असतं एकमेकांना मनवणं,

ह्यालाच तर म्हणतात नातं बहरणं ,

 

नसतो लवलेश मीपणाचा त्यात,

दोघांचही ध्येय एकच असतं,

देऊ एकमेकांना साथ आयुष्यात.

 

रुपाली थोरात 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat