Mar 04, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

रक्षाबंधन आणि भद्रा...

Read Later
रक्षाबंधन आणि भद्रा...
रक्षाबंधन आणि भद्रा...


चकित झालात शीर्षक वाचून...

या रक्षाबंधनाला भद्रा हा शब्द सगळ्यांना माहिती झालाच असेल.

आता अर्थ समजो की न समजो सगळे राखी पौर्णिमेला भद्रा आहे म्हणून ओरडत सुटले. कित्येकांनी तर राखी शुक्रवारी बांधली गुरुवार सोडून.

आता यांना भद्रा हे किती कळलं कोण जाणे पण एक मात्र नक्की, आपल्याकडे अरिष्ट होणार म्हटलं कीं लोक काहीही मानतात.


जसं या भद्रासोबत उदाहरणं दिल्या गेली ती म्हणजे

रावणाला शुर्पनखेने या मुहूर्तावर राखी बांधली आणि मग म्हणे एक वर्षात रावण मेला. याचा एक अर्थ असा होतो का की शुभमुहूर्तावर राखी बांधली तर कितीही खराब कर्म केले तरी मरण येणार नाही.


दुसरं उदाहरणं देतात की होलिकेने याच मुहूर्तावर राखी बांधली म्हणून ती जळून मेली आणि तिचा भाऊ वाचवू शकला नाही.

म्हणजे शुभमुहूर्तावर वाईट कर्म क्रा असं म्हणायचंय का तुम्हाला?

अरे हुशार लोकांनो राखीची प्रथा आली कुठून, केव्हापासून, ती प्रथा त्या काळात होती हे कुठल्या ग्रंथात दिलाय का? याचा जरा विचार करा.


माझ्या माहितीप्रमाणे राखी प्रथा कधी सुरु झाली याचे निश्चित पुरावे नाहीत. लोक म्हणतात शिशुपालचा वध केला तेव्हा कृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्राने दुखापत झाली त्यावर द्रोपदीने आपलं रेशमी वस्त्र फाडून त्यावरून पट्टी बांधली.


आता यात बघा, पट्टी बांधली बोटावर आणि राखी बांधतात मनगटावर 

हे ओढूनताढून जोडलेलं लॉजिक वाटतं, नाही का?

असो, हा आपला मुद्दा नाही.


मुळात भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल. भद्राला कल्याणी पण म्हणतात हॊ.

 आता हा भद्राकाळ येतो कुठून तर पंचांगमधून.

पाच अंग मिळून बनतं ते पंचांग. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण...

यातल्या करणचे अकरा प्रकार असतात यात एक प्रकार असतो विष्टी करण. एका तिथीत दोन करण असतात.

ज्यावेळी हा विष्टी करण येतो त्यावेळी भद्रा असते. आता जसा राहुकाल, शनिची साडेसाती तसं हा भद्रकाल.


मग याचा बाऊ का? तर कुणीतरी हा शोध लावला आणि मेसेज टाईप केला मग फॉरवर्ड होत होत सगळे झाले ज्ञानी. भद्रा आहे राखी बांधता येत नाही.

पण हा योग तर याआधीही कितीतरी वेळा आलाय.


 मुहूर्त केव्हा बघतात तर लग्न, मुंज, बारसं यासारख्या मंगलप्रसंगी.

रक्षाबंधन तर बहीण-भावाचं नातं जपणारा, सामाजिक बांधिलकी जोपसणारा उत्सव आहे. उत्सवला मुहूर्त बघत नाहीत.


   आता ज्याला भद्राची जास्तच माहिती हवीय त्याने पियुषधारा ग्रंथ वाचा आणि ज्यांना मुहूर्ताची माहितीये हवी त्यांनी मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड हे ग्रंथ वाचा.


मी नाही वाचलेत बाबा, माझा छोटासा मेंदू आहे म्हणून... आणि हॊ मी भद्राची वेळ नाही पाळली कारण वर्षानुवर्षे असं काही नव्हतंच ना? मग हे आताच कुठून आलं. वर्षानुवर्षे आपण बिनधास्त राखी बांधायचो, आनंद मनवायचो पण हे सोशल मीडिया आलं आणि खोट्याचा जणू ऊत आलाय. कुणी त्रास घेत नाही खरं जाणून घेण्याचा.


       रक्षाबंधन नारळीपौर्णिमेला असतं आणि हॊ लोक तर राखी ते पोळा कधीही राखी बांधतात ना आपल्याला सोयीने मग यावर्षीच ही भद्रा कुठून आली?


अरे हॊ, अजून एक भद्रा ही शनिदेवाची बहीण होती. न्याय देणाऱ्याची, कर्माचे फळ देणाऱ्याची बहीण वाईट कशी असेल आणि ती वाईट असती तर तिला कालगणनेत स्थान कसं मिळालं असतं याचा विचार करा. जसं उन्हानंतर सावली तसं सुखानंतर दुःख आणि तसंच चांगल झाल्यावर वाईट असतं ना?


मन चंगा तो बगलमे गंगा...

कर्म चांगले करा सगळे मुहूर्त शुभ असतात.


  स्वर्गे भद्रा शुभं कुर्यात पाताले च धनागम।

मृत्युलोक स्थिता भद्रा सर्व कार्य विनाशनी।।


        असा एक श्लोक आहे. या श्लोकात म्हणतात की भद्रा स्वर्गात शुभ, पाताळात धन देणारी आणि मृत्यूलोकात विनाश करणारी असते. चंद्राच्या दशेवरून ते ठरवतात. त्यासाठी पंचांग, ज्योतिष्य सगळे शिकावं लागेल ते ही स्वतः अभ्यास करुन. करण हल्ली खऱ्यापेक्षा खोटं जास्त लवकर पसरतं नाही का?


भद्रासारखं...आजसाठी एवढंच... नाहीतर डोक्यावरून जायचं...समाप्त.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//