
रक्षाबंधन नाते बहीण भावाचे
बहीण भावाचे नाते हे जगावेगळे नाते असते,या नात्यात गोडवा,रुसवा,फुगवा...असे सगळेच प्रकार असतात..किती हे नाते हे पवित्र...या नात्याला दुसऱ्या कोणत्याच नात्याची तोड नाही,अशाच एका बहीण भावाची कहाणी मी आज सांगणार आहे...
साची अन् प्रणय दोघे सख्खे बहीण भाऊ जरी नसले तरी सख्या बहीण भावा पेक्षा त्यांचे प्रेम काही कमी नव्हते,साची ही प्रणय ची सावत्र बहीण म्हणजेच साची जन्म झाला अन् साची ची आई देवा घरी गेली,अगदी छोटीसी साची आई विना जगत होती.
साची चा सांभाळ करण्यासाठी तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले अन् नंतर साची ला गोड भाऊ मिळाला म्हणजेच प्रणय चा जन्म झाला...प्रणय हा साचीला खूप जीव लावायचा,पण प्रणय ची आई काही सचीला अजिबात जीव लावत नव्हती,मग तिला बिचारी ला घरकामाला लावत स्वतः नेहमी बसून राहायची,शेवटी सावत्र आई ती सावत्र च आई...
साची ला देखील तिच्या सावत्र आईचा खूप राग यायचा,पण करणार काय?नशिबाचा भोग म्हणत ती नेहमी गप्प राहायची,बिचारी साची सगळं निमूट पणे सहन करायची,फक्त तिच्या लाडक्या भावाचा विचार करत ती शांत राहत असे..
प्रणय साठी साची वाटेल ते करायला तयार होती,एके दिवशी साची कपडे धुवाला निघाली अन् तिच्या सोबत प्रणय देखील निघाला,आणि वाटेत च प्रणय नजरेआड झाला,म्हणजेच दिसत च नव्हता तिने भरपूर शोध घेतला पण त्याचा काही पत्ता लागला नाही....तिला तर घरी जाण्याची देखील खूप भीती वाटत होती,कारण नदी वर कपडे धुवायला नेण्याकरिता प्रणय ची आई नेहमी रागवत असे,,आता घरी जाऊन आईला कसे सांगायचे हा विचार तिच्या मनात येत होता,आणि प्रणय दिसेनासा झाला हे ऐकुन आई खूप रागावणार व घरातून हल्कुन लावणार हे तिला माहित होते...
म्हणून तिने स्वतःच प्रणय चा शोध घेण्याचे ठरविले,आणि प्रत्येक ठिकाणी ती प्रणय...प्रणय म्हणून ओरडू लागली,...पूर्ण दिवस ती फक्त तिच्या लाडक्या भावाचा शोध घेत भिरत होती,पण प्रणय काही केल्या सापडेना....आणि अशातच तिच्या घरी आई अन् बाबांना देखील कळले की प्रणय हरवला,,आता ते सुध्धा प्रणय चा शोध घेत होते,आणि त्या ब्रोबरोबर साची चा देखील...
एक दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रणय दुसऱ्या दिवशी तिथेच सापडला जिथून तो हरवला,साची तिचे आई वडील सर्व तिथे आले अन् त्यांनी प्रणय ल विचारणा केली की तू कुठे होतास,,प्रणय ने उत्तर दिले मी माझ्या एका मित्राच्या घरी होतो,तेव्हा त्याचे आई वडील त्याला रागावले व म्हणाले की सांगून जायचे ना....त्यावर त्याने उत्तर दिले ...अग आई बघ तू ताई चा किती राग करते पण ताई माझा अजिबात राग करत नाही,,सर्वात आधी तिने च माझा शोध घेतला,आणि माझी काळजी तिला तुमच्या पेक्षा जास्त आहे....
मला फक्त माझ्या ताईचा चांगुलपणा सिध्द करायचा होता म्हणून मी स्वतःच लपलो होतो...हे उत्तर ऐकताच त्याच्या आई च्या डोळ्यात पाणी आले व तिच्या लक्षात आले की सावत्र बहीण सुध्धा सावत्र भावाला सख्या भावा सारखा जीव लावते....
आई ने दोघांना जवळ घेतले,दोघांच्या पाप्या घेतल्या व माझी दोन्ही गुणाची लेकर म्हणत घरी नेले...व तसेच साची ची क्षमा मागितली...आणि आनंदाने सर्व राहू लागले....
Ashwini Galwe Pund....