मीच माझा शिल्पकार-स्त्री

आव्हानात्मक कविता

ईरा "राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

                 कविता
   विषय-"मीच माझा शिल्पकार"
              शीर्षक-"स्त्री"

जरी नादान असशील तु काल
पंख फुटले आज तुजला,
आण तु पंखात बळ
आणि भिडुनी जा गगनाला....

पंख हीच तुझी ताकद
पंख हेच तुझे बळ,
पंखात भरुनी नवीन आशा
सोस त्यासाठी कुठलीही कळ....

छाटले जरी पंख तुझे
मनी ठाव ठेव उडण्याचा,
उड तु नव्या दिशेने
ध्यास नको मनी थांबण्याचा....

वाटेत येतील अडचणी जरी
तरी विश्वास ठेव जिंकण्याचा,
सोडूनी बंधने सारी
ध्यास ठेव कधी न संपण्याचा....

आव्हान पेलण्याची शपथ घे तू एकवार उड तु आकाशी स्वच्छंद,
कारण तुच आहेस
तुझ्या जीवनाची ग शिल्पकार...

सौ.सोनाली तिडके
जिल्हा-भंडारा...

🎭 Series Post

View all