राजसा भाग अंतिम (टीम प्रकाशवाटा)

Marathi lave story

राजवीरचा अॅक्सिडेंन्ट झाला होता हे फोनवर ऐकून काव्याच्या हातातून फोन खाली पडला आणि तिने समोर पाहिले तर दद्दू पण पडले होते. ती लगेच त्यांच्या जवळ गेली. लो बीपीमुळे त्यांना चक्कर आली होती. काव्या लगेच राजवर्धन यांना घेऊन हाॅस्पिटलमध्ये गेली. तेथे गेल्यावर ती त्यांना डाॅक्टरांकडे दाखवून राजवीरकडे आली. राजवीर त्याच हाॅस्पिटलमध्ये होता. ती तिथे आली आणि पाहिले तर राजवीर बेशुद्ध अवस्थेत होता. तिने कसंबसं स्वतःला सावरलं. त्याला फार मार लागला होता. डॉक्टरनी लगेच OT मध्ये घेतलं व काव्याला कनसेंट फॉर्मवर सही द्यायला सांगितलं. तसं तिच्या डोळ्यासमोरून सगळ्या गोष्टी झर्रकन येऊन गेल्या आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. आठवणींचा ठेवा खूप गोंधळ घालून गेला.

डॉक्टर त्याला अंडर observation ठेवतात व काव्याला केबिनमध्ये बोलावून घेतात. काव्या डॉक्टरना भेटते. इतक्यात तिचे दद्दू पण येतात. डॉक्टर त्यांना त्याचा पाय निकामी झालेले सांगतात. दद्दू खूपच टेन्स होतात पण काव्या विचारते यावर उपाय?
डॉक्टर सांगतात physiotherpy ने आपण त्यांना पूर्णपणे बरं करू शकतो पण वेळ जाईल.
हे ऐकून दोघेही जरा हताश होतात.

काव्या- कधीपासून करू शकतो हे सुरू आपण?

डॉक्टर- राजवीर जसे मेडिसिनला प्रतिसाद देतील तसे आपण लगेच चालू करू.

दद्दूना ती घरी पाठवते ते ऐकत नाहीत तरी कसंबसं समजावून आराम करायला सांगते.
सगळे फारच काळजीत असतात. काव्या जरी धीर देत असली तरी तिला खूप काळजी वाटत होती. थोड्यावेळात राजवीर हालचाल करतो आणि डॉक्टर त्याला चेक करतात. शुद्धीत येताना सगळे त्याच्या भोवती असतात. राजवीर पटकन उठायचा प्रयत्न करत असतो तोच काव्या त्याला उठू नको असं डोळ्यांनीच सांगते तसा तो गुंगीत असल्यामुळे पुन्हा झोपून जातो.

काव्याचा आतापर्यंतचा अडवून ठेवलेला डोळ्यातला पूर आपसूकच बाहेर येतो. आता तिच्या पुढे राजवीरचे पाय निकामी झालेले असतात हा मोठा प्रश्न असतो, फार कठीण काम असतं. ती मनात काहीतरी ठरवून डोळ्यातल्या पाण्याला बांध घालते व निश्चय करून बाहेर येते.
तोच तिला राजवीरच्या रूम मधून काहीतरी गोंधळ ऐकू येतो. ती धावतच तिकडे जाते तर राजवीर फार राग राग करून घेत असतो. तो झोपेत असताना तिथे डॉक्टर आणि सिस्टरच बोलणं त्याच्या कानावर पडलेलं असत. काव्या जशी त्याच्या जवळ जाते तरीही त्याचे डोळे चिंता वजा भीती व्यक्त करत असतात. काव्या समजून जाते व राजवीरला लहान मुलासारखं जवळ घेते व त्याला सांभाळून घेते. इकडे डॉक्टर इंजेक्शन देतात तो झोपून जातो.

काव्याला त्याच्या डोळ्यात विलक्षण बदल दिसून येतो. तो घरातून चिडून बाहेर पडलेला असतो त्यामुळे सगळ्यासाठी काव्याला जबाबदार धरत असतो.

काव्या ठरवते राजवीर समोर सगळं पाॅसिटीव्ह वातावरण नेहमी ठेवायचं. त्याप्रमाणे ती डॉक्टरांशी बोलते जेव्हा राजवीर जागा होतो तेव्हा ती राजवीरला बोलण्यात मग्न ठेवते. जसे डॉक्टर येतात तसं राजवीरना ग्रीट करून ते सांगतात की उद्या पासून आपण एक वेगळी ट्रीटमेंट सुरू करू त्याने फरक पडेल व तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.

डॉक्टर असताना अॅना तिथे येते व तिला राजवीरच्या अवस्थेची कल्पना येते. ती राजवीरला पाहून अगदी एखाद्या मोडलेल्या काचेच्या वस्तूप्रमाणे त्याला हिनवते व त्याला म्हणते की we are no longer together राजवीर I am breaking up with u!

राजवीर- listen to me ana, I can't live without you!

अॅना- No its Over...

तिच्या या वाक्याने राजवीर पुरता मोडतो तो पुन्हा राग राग करतो. यावेळी काव्यावर पण तो चिडतो ती काहीच बोलत नाही त्याचा राग शांत होण्याची ती वाट पाहते.

राजवीरला न राहवून अॅनाची आठवण येत राहते तो फारच डिस्टर्ब राहतो. काव्या त्याची सगळी काळजी घेत असते. पण त्याला तिच्याकडून काहीच करून घ्यायची इच्छा नसते. तो तिचा राग करतो. त्याला फक्त अॅना हवी असते बाकी कुणीच नाही त्याला स्वतःवर पण राग येत असतो.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करतात. काव्या ते सर्व राजवीरला करवून घेते. सगळं काही राजवीरच फार जवळून करते. तो काहीही बोलत नसतो पण तरी काव्या नेहमी चेहरा हसरा ठेऊन त्याच्या सोबत बोलत सगळं करत असते.

दिवस जातात तसं राजवीरला काव्याच वागणं अंगवळणी पडत जात. त्याच्या मधला चांगला माणूस तिच्या केलेल्या सेवेबद्दल किती दिवस राग राग करेल?

अनाहूतपणे राजवीरला ते आवडत असतं. त्याच्या डोक्यात फक्त रागाने घर केलेलं असतं. पण काव्या समोर आली की तो तिच्यात हरवून जातो हे पण तेवढच खरं.

राजवीरला physiotherpy ने बराच फरक पडलेला असतो. डॉक्टर चेक करून त्यांना सांगतात.

डॉक्टर- राजवीर उद्या तुम्ही घरी जाऊ शकता. u have fast recovery, i must appreciate काव्या मॅम, फारच छान सेवा केलीये काव्या मॅमनी तुमची. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर यातून बाहेर येत आहात. कारण आमच्यापेक्षा मॅमना याची खात्री जास्त होती and she has done it.


राजवीर हे ऐकून फार surprise होतो आणि मनात आनंद ही होतो पण दाखवत नाही. राजवीरला मनात खूप वाईट पण वाटत. आपण किती चुकीचं वागलो याची जाणीव होऊन जाते.

काव्या- डॉक्टरांचे धन्यवाद मानते.

आज राजवीर फायनली आपल्या घरी डिसचार्ज होऊन जातो. काव्या तो येणार म्हणून घरात सगळं त्याच्या आवडीचं करून ठेवते तशी तयारी असते. दद्दू पण खूप खुश असतात. सगळे त्याच्या welcome साठी सज्ज असतात.

राजवीर घरात प्रवेश करताच त्याला एक वेगळी पाॅझिटिव्ह लहर जाणवते. प्रसन्न वाटत त्याला. काव्याचा आधार घेत राजवीर आपल्या रूममध्ये जातो. त्याला त्याचा आवडता फ्रेग्रन्स रूममध्ये जाणवतो त्याच्या चेहऱ्यावर आपसूक एक हलकीशी खुशीची लहर उमटते.

तेवढ्यात आजोबा येऊन त्याची विचारपूस करतात व मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्यांच्या चेहऱ्यावर राजवीरला परत मिळवण्याचं समाधान दिसून येत.

मधेच वाक्य तोडत काव्या येते. दोघांसाठी जेवण आज इकडेच करू. आजोबांना जेवण देऊन राजवीरला जेवण भरवण्याची तयारी करते. राजवीर आज मनापासून खूप खुश असतो. राजवीरला सूप भरवून ती उठते तोच राजवीर तिला तू पण घे जेवायला अस म्हणतो, आजोबा ही त्याला दुजोरा देतात. तिघेही गप्पा गोष्टी करत जेवण करून घेतात. ही खुशी बघून आजोबा खूप समाधानी होतात व ते दोघांना सांगून आपल्या खोलीमध्ये जातात.

जेवण संपवून काव्या उठते.

राजवीर : thank you काव्या.

काव्या एक गोड स्माईल देते व त्याला गोळ्या देऊन जाते.

काव्या बाहेर गेल्यावर राजवीर स्वतःच्याच विचारांत गुंग होऊन जातो. काव्या सोबतची पहिली भेट ते आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून गेला. किती फरक आहे ॲना आणि काव्यामध्ये, माझे पाय निकामी झाले तसे ॲनाने साथ सोडली, आपण आपल्या या परिस्थितीला काव्याला जबाबदार धरले, तिला नको नको ते बोललो तरीही कसलीच अपेक्षा न करता काव्याने फक्त आणि फक्त माझी काळजी घेतली. मला माझ्या पायावर उभे राहण्यास मदत केली. खरंच मैत्रीचं नातं सांभाळलं. पण फक्त मैत्रीत कोणी एवढं करतं का? पण मी एवढा विचार का करतोय? मी प्रेमात तर नाही ना काव्याच्या? काय करू आपलं प्रेम व्यक्त करू का तिच्या पुढे? ती हो म्हणेल?

अशा सगळ्या विचारातच राजवीर झोपी गेला. इतक्यात काव्या तिथे आली. राजवीरला झोपलेलं पाहून त्याच्या जवळ गेली. त्याच्या अंगावर चादर ओढून मायेने डोक्यावर हात फिरवत हळूच Love you राज म्हणत बाहेर जातच होती की राजवीरने तिचा हात धरला, काव्या गोंधळून मागे वळली.

काव्या : राजवीर ?? मी तर फक्त चादर नीट करत होते.

राजवीर : हो?? (आणि त्याने तिला जवळ ओढली)

काव्या राजवीरकडे ओढली गेली तशी ती अजूनच बावरली. राजवीरने तिच्या मनातली घालमेल ओळखली आणि तिचा हात सोडला. काव्या पळतच बाहेर गेली.

राजवीरच्या ठिक होण्याच्या आनंदात काव्याने आजोबांना विचारून घरी पुजा ठेवली. राजवीरलाही पुजेची कल्पना दिली. राजवीरने तर आदल्या रात्री काव्याच्या मनातलं ओळखलं आता वेळ होती स्वतःच प्रेम व्यक्त करण्याची. पण सांगायचं कसं...?यातच त्याला कल्पना सुचली.

पुजेचा दिवस उजाडला. राजवीर आणि काव्या दोघेही तयार होऊ लागले. काव्या राजवीरला आधार देत बाहेर आणतच होती. इतक्यात राजवीरने तिला दूर सारले आणि एकट्याने पुढे चालू लागला. काव्याला खूप वाईट वाटले. ती शांतपणे त्याच्या मागोमाग चालू लागली.

अचानक काव्या जागीच थांबली. डोक्यावर पडणाऱ्या गुलाबांच्या पाकळ्या पाहून थोडी हरवलीच. दोन्ही हातांनी त्यांना आपल्या ओंजळीत समावून घेत होती. तेवढ्यात तिची नजर समोर उभ्या असलेल्या राजवीरकडे गेली. तो तिला लांबूनच एकटक न्याहाळत होता. आज या क्षणाला काव्याला त्याच्या नजरेत एक वेगळीच ओढ जाणवली.

राजवीर : माझी मैत्रीण होण्याचं तू ठरवलस. आता माझ्या आयुष्यभराची सोबतीन होशील? मला स्वतःच्या प्रेमात पाडून तू मला कायमच आपलसं केलंस. I LOVE YOU काव्या... सौ. काव्यांजली राजवीर राजपूत.

राजवीरचे हे शब्द ऐकताच काव्या मोहरली. पळत जाऊन राजवीरला बिलगली. राजवीरनेही तिला आपल्या मिठीत सामावून घेतले. मनातल्या भावना अश्रुंवाटे मोकळ्या झाल्या. राजवीरने अलगद तिची हनुवटी दोन बोटांनी वर केली. तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग डोळ्यांचे चुंबन घेतले. आता काव्याच्या मनात फुलपाखरे उडायला लागली. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता की आजोबांनी हाक मारली. काव्याने अजाणतेपणे राजवीरला दूर ढकलले, अजूनही एकदम नीट उभ न राहू शकणाऱ्या राजवीरचा तोल जातोय हे लक्षात येताच तिने त्याला सावरले. त्याचा स्पर्श तिला परत शहारुन गेला.

आजोबा आत आले तो पर्यंत राजवीर काव्या बाहेर येतच होते. काव्याला आज पहिल्यांदाच आजोबांनी लाजताना पाहिले होते. त्यांना तिथल्या वातावरणाचा पुर्ता अंदाज आला. त्यानी हसून त्या दोघांना पुजेसाठी पुढे होण्यास सांगितले.

आज खऱ्याअर्थाने राजवीर आणि काव्या नवरा बायको म्हणून ती पुजा सार्थकी करत होते. दोघांनीही पुजा झाल्यावर आपल्या नवीन आयुष्यासाठी देवाचे आशिर्वाद घेतले. सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन, आजोबांचेही आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकले. तस राजवीर काव्याच्या कानात हळूच पुटपुटला.. मगाजच काम थोड अर्धवट राहिले आहे. काव्याने काय म्हणून विचारताच, राजवीरने बोटाने आपल्या ओठांच्या चुंबनाचा इशारा केला. काव्या पूर्ती लाजली. आजोबांनी तो गोंधळ बरोबर ओळखला आणि राजवीरचा कान धरत त्याला उठवले.

काव्या राजवीरला बघून लाजत होती आणि राजवीर आपला कान चोळत होता. आजोबांनी सहज विचारले मग कधी जाताय दोघे हनीमूनला? राजवीर अती उत्साहात उद्याच निघू असं म्हणाला आणि तिथे एकच हशा पिकला. राजवीरने स्वतःची चीभ चावली आणि लाजू लागला. काव्या आणि राजवीरने आजोबांना मिठी मारली.

समाप्त.

©® पल्लवी पाटील.

राजसा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा..

🎭 Series Post

View all