राजसा भाग 5 (टीम प्रकाशवाटा)

Marathi love story

राजवीर : ॲना!! ॲना.. calm down.

ॲना : राजवीर?? How could you do this? You cheater.. you lier...

राजवीर : shut up ॲना.. just calm down.

ॲना राजवीरच काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. वाढलेला गोंधळ पहाता राजवीर तिचा हात धरून एका बाजूला घेऊन जातो. ॲनाच्या डोळ्यांत राग स्पष्ट दिसत होता.

ॲना : leave me राजवीर. ( राजवीरच्या हातातून स्वतःचा हात सोडवत) don't be too smart ok!! I will surely see you mister. You hurt my feelings राजवीर.

राजवीर : calm down ॲना. I am still love you. Please listen to me dear. Please try to understand.

राजवीर कशीतरी एकदाची ॲनाची समजूत काढतो आणि तिला घरी पाठवतो. ॲना जायला‌ तयार नसतेच. पण राजवीर तिला प्रेमाने समजावून बाहेरच्या बाहेर जायला सांगतो.

एवढा आनंदाचा सोहळा आणि त्यात ॲनाचा हा गोंधळ. राजवीरला खूप अपमानास्पद जाणीव झाली होती.

रिसेप्शन झाल्यानंतर सगळे घरी पोहोचतात. रिसेप्शनला कोण कोण येऊन गेले? कोण नाही? याची चर्चा झाली.

आजोबा : तरीही ॲनामुळे छान कार्यक्रमाचा बेरंग झालाच. असो ठीक आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलच बरं.

सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात.

या सगळ्यात एकीकडे आजोबांनी त्यांना हनिमूनला पाठविण्यासाठी तिकीट बुक केले होते. पण, राजवीर आणि काव्याने ठरल्याप्रमाणे आजोबांची समजूत काढत वेळ मारून नेली.

काव्या :- दद्दू आम्ही आता नाही जाऊ शकत. कारण माझे आधीचे प्रोजेक्टचे काम अपुर्ण राहिले आहे. त्याचे सबमिशन जवळ आले आहे. त्यामुळे सध्या जायचा विचार नाही करू शकत.

राजवीरही मध्येच बोलतो. हो दादासा ‌. सध्या माझे सुध्दा ऑफीसमध्ये खूप काम पेंडिग आहेत. आधीचे पंधरा दिवस काम झाले नाही. त्यामुळे आम्ही सध्या नाही जाऊ शकत. शिवाय तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे.

राजवीर आणि काव्याने हनीमूनची गोष्ट मोठ्या सफाईने टाळल्याचे आजोबांच्या लक्षात आले. आजोबांना राजवीरच्या प्रेमप्रकरणाची माहिती होतीच. त्यामुळे त्यांना हे अपेक्षित होतेच. पण, तरीही नाराज न होता त्यांनी या गोष्टीला फारसे मनावर नाही घेतले.

राजवीर नेहमीसारखा ऑफीसमध्ये जाऊ लागला. काव्या तिच्या नवीन संसारात रममाण व्हायचा प्रयत्न करीत होतीच शिवाय आपल्या बिझनेसच्या जबाबदाऱ्या सांभाळून, आजोबांकडेही स्वतः लक्ष देत होती. खऱ्या अर्थाने ती या घरची सून झाली होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, काम स्वतः करण्यात तिला आनंद वाटत होता.

दहा पंधरा दिवसांनी राजवीरच्या काही खास मित्रांनी राजवीरसाठी एका पार्टीचे आयोजन केले आणि राजवीर, काव्याला आग्रहाने पार्टीला बोलावले.

‌ त्या दिवशी राजवीर ऑफीसमधून लवकर घरी आला. काव्या सुंदर हलकासा मेकअप करून तयार झाली होती. पिंक कलरचा ऑफ शोल्डर बाॅडीकाॅन ड्रेस, एका बाजूला पिन अप करत रोल करून मोकळे सोडलेले केस, कानात खड्याचे स्टडस आणि पायात हाय हिल्स घातल्यामुळे काव्या आणखीनच सुंदर दिसत होती.

राजवीरने काव्याला आवाज दिला तशी काव्या बाहेर आली. दोघेही अतिशय सुंदर आणि सुरेख दिसत होते. दोघेही एकमेकांना दोन क्षण बघतच राहिले.

राजवीर आधीच हॅन्डसम होताच. त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट , ट्राऊझर आणि त्यावर लेदरचे जॅकेट घातले होते. त्याची बाॅडी आणि त्याचे भुरभुरणारे केस मोहून टाकणारे होते.

राजवीरने काव्याला बघितले. तर मनातून तो घायाळ झाला होता. तिचे लालचुटुक ओठ , लांब सडक मोकळे केस , तिने घातलेला ड्रेस बघून तो हरवून गेला. तिचे हे रुप बघून राजवीर थबकला. तिचे हे सौंदर्य बघून त्याची नजर हलत नव्हती.
तेवढ्यात काव्याने आवाज दिला...

काव्या :- राजवीर.. निघायचे होते ना आपल्याला!

राजवीर :- हो चल निघुया ...तू खूप सुंदर दिसत आहेस काव्या....

Thank you...तू देखील राजवीर... (काव्यानेही हसत त्याला कॉम्प्लीमेंट दिली)

त्याच्या एका स्माईलने काव्याला देखील मनातून खूश झाली आणि दोघेही पार्टीसाठी रवाना झाले. काव्यासाठी अशा पार्टीला जाणे नवीन नव्हतेच पण तरीही तिला अवघडल्यासारखे होत होते. तिथे सगळे जण अगदी मनमोकळेपणाने वागत होते. पार्टी म्हटले कि रम, डान्स योगायोगाने आलेच. तिथे ॲना ही उपस्थित होती.

तिथले वातावरण पाश्चात्य संस्कृतीचे असल्यामूळे सर्व मित्र मैत्रिणी एकत्र डान्स करत होते. राजवीरसाठीही हे नवीन नव्हते.

सगळे एकत्र आल्यावर राजवीरच्या मित्रांनी एकच जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले. शॅंपेनची बॉटल राजवीरच्या पुढे सरकवत गेस्ट ऑफ ऑनरचा मान देत मित्रांनी परत जल्लोष केला. राजवीरने स्टाइलने त्या बॉटलची कॅप ओपन करत दोन ग्लास एक सीप या प्रमाणात भरले. एक ग्लास त्याने काव्याला ऑफर केला पण तिने नकार दिला. ॲनाने लगेच दुसरा ग्लास उचलून राजवीरला चिअर्स करत त्याच्या हाताला क्रॉस करत घोट संपवला. राजवीर काव्याकडे बघून थोडासा शरमला पण तिने नजरेनेच इट्स ओके म्हणत दिलासा दिला. ॲनाही तिथे आली होती.

मित्रांनी राजवीर आणि काव्याला डान्ससाठी आग्रह केला अर्थातच पार्टीचे खास पाहुणे होते ते. राजवीरने हात पुढे करत काव्याचा हात हातात घेतला. शांत रोमॅंटिक संगीताच्या तालावर कपल डान्स करु लागले. मग हळूहळू इतर लोकही त्यांना शामिल झाले. त्यांना अस एकत्र बघून ॲनाला राग आला होता. ती तडक राजवीर आणि काव्याकडे गेली.

ॲनाने राजवीरला डान्स करण्यासाठी विचारले. काव्या क्षणभर थांबली आणि हलकेच स्माइल देत बाजूला जाऊन बसली. it's ok. go-ahead म्हणत तिने सहज माघार घेतली. तिला त्या दोघांच्या मैत्री बद्दल कल्पना असल्यामुळे तिने नजरेने राजवीरला होकार दिला.

राजवीर आणि ॲना यांनी डान्स करायला सुरुवात केली. एकमेकांच्या बाहुपाशात एक होऊन जणु ते प्रेमाच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघाले होते.

प्रेमात बुडालेले ते दोन जीव आनंदात होते. तो क्षण , तो स्पर्श , ॲनाला सुखावत होता. ती खूप आनंदात होती. किती तरी वेळ ते एकत्र होते. गप्पा, डान्स... सगळी धमाल चालली होती.

काव्या हे सगळं दुरून बघत होती. मनात थोडाशी गुंतागुंत वाढत होती. नकळत मन भरकटू लागले होते. आपल्या डोळ्यासमोर आपला नवरा एका दुसऱ्या स्त्रीच्या बाहुपाशात आहे. हे सहन होत नव्हते.

आपण हा विचार का करतोय ? आपलं आणि राजवीरचं नातं फक्त एक मैत्री आहे. तेही काही दिवसांसाठीच. आपण त्याच्यात गुंतत का चाललोय ? आपल्या मनात जळफळाट का होतोय ? काय होतंय आपल्याला ? असा विचार करतच होती कि, राजवीरचे पाच सहा मित्र तिच्या जवळ आले.

हाय, हॅलो झाले. थोडीशी ओळख झाली. आपले मित्र काव्याच्या जवळ गेले होते. याकडे राजवीरचे पुर्ण लक्ष होते. अधून मधून तो काव्याकडे लक्ष ठेवून होता.

त्याचे मित्र तिला डान्ससाठी फोर्स करत होते. पण ती स्पष्टपणे नकार देत होती. राजवीर जर ॲनासोबत डान्स करू शकतो तर तु का नाही ?
ते तिला खूपच भरीस पाडत होते.

त्यांचा Hangover झाल्यामुळे त्यातील एक जण तिच्याशी डान्स करण्यासाठी तिच्या कमरेत हात घालण्याचा प्रयत्न करतच होता कि, तेवढ्यात राजवीर लगेच जवळ येतो. त्यामुळे सगळे दूर होतात. काव्या ठिक असल्याची खात्री करत त्यांना तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तणूकीसाठी त्यांना काव्याची माफी मागायला लावतो.

तिला फार आनंद होतो. राजवीर आपला नवरा आहे. पण, त्यापेक्षाही एक माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याच्या मनात आपल्या विषयी चांगली भावना आहे.

घडलेल्या प्रकरणामुळे काव्याचा मुड थोडा खराब झाला होता. त्यामुळे राजवीर काव्याला घेऊन तेथून बाहेर निघून जातो. तो तिला लाॅंग ड्राईव्हला घेऊन जातो. तो तिला एका सुंदर ठिकाणी घेऊन येतो. जिथे फक्त हिरव्या झाडांची गर्द झाडी. सोबत चांदण्याचा शीतल प्रकाश, झुळझुळणारा गार वारा, आणि ते दोघे. जणुकाही प्रणयात धुंद होऊन एकमेकांना समजून घेण्यासाठी हा एक क्षण पुरेसा होता....

राजवीर काव्यासोबत ती थोडी नॉर्मल होईपर्यंत वेळ घालवतो. जवळपास अर्ध्या तासाने तो काव्याला विचारतो.

राजवीर:- तुला परत पार्टी जाॅईन करायला आवडेल? कि आपण घरी जाऊयात??

काव्या:- नको राजवीर मी आता घरीच जाते खूप थकलेय. ड्रायव्हरला मला घरी सोडायला सांग आणि तु प्लीज ॲनाला घरी सोडून ये. ती आधीच खूप रागवली आहे. अजून नको चिडायला.

राजवीरलाही काव्याचे म्हणनं पटतं तो स्वतः काव्याला आधी घरी सोडतो, मग परत पार्टी जाॅईन करतो. आतातर पार्टीही रंगात आली होती. ॲना मात्र रागाने लालबुंद झाली होती. आधीच तिला काव्याचा राग आला होता. त्यात राजवीर तिला सोडून काव्याला सोडायला घरी गेला. त्यामुळे मनात आग धुमसत होती. त्यामुळे रमचे अनेक ग्लास तिने रिचवले होते. बेधुंद झाली होती.

राजवीरला परत आलेले बघताच तिला खूप आनंद झाला. परंतु रागाच्या भरात केलेल्या नशेने तिचे भान हरपून गेले होते. पार्टीत बराच उशीर झाला होता. त्यात ॲनाची तर जवळ जवळ शुध्दच हरपली होती. त्यामुळे राजवीर तिला उचलून घेतो आणि गाडीत झोपवतो आणि तिला तिच्या घरी सोडायला जातो.

पुर्णपणे भान हरपल्याने ती गुंगीत असते. शिवाय रात्र बरीच झाल्यामुळे राजवीर तिच्या घरीच ती रात्र घालवतो. पहाटे पहाटे राजवीरला जाग येते. त्याला घरी जाणे आवश्यक असते. परंतु, ॲना त्याच्या कुशीत पहुडलेली होती. तिला तो बाजूला सारतो घरी निघतो इतक्यात ॲनाही उठते. ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण, आता मला घरी जाऊ दे. आपण परत भेटूच. असे म्हणून तो निघून जातो.


घरी पोहोचतो तो पर्यंत सकाळचे सात वाजलेले असतात. काव्या आणि दादासा त्याची वाट बघतच असतात. तो येताच प्रश्नांची सरबत्ती सुरू होते.

आजोबा :- कुठे होतास रात्रभर?

राजवीर :- मी... ते... ॲनाला सोडायला घरी गेलो होतो.

आजोबा :- का? कशासाठी ?

काव्या : दद्दू, प्लिज... आपण नंतर बोलू ना. आता काही विषय नको.

आजोबा :- अरे, पण ...आता तुझे लग्न झाले आहे. घरी कोणीतरी आपली वाट बघत असेल. काही जाणीव आहे कि नाही?

काव्या : दद्दू!! तुम्ही शांत व्हा.. येवढं काही नाही झालंय..

राजवीर : - दादासा तुम्हांला चांगले माहित आहे कि माझे ॲनावर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय राहूच शकत नाही.

आजोबा : तुझ्या वडीलांनी जे केलं, तू सुद्धा तेच करणार आहेस का?? जे माझ्या सुनेने भोगले, जे सहन केलं , ते मी काव्याच्या बाबतीत होऊ देणार नाही.

काव्या , राजवीरला गप्प बसण्याची विनंती करते. पण कोणीच कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं.

दादासा :- राजवीर .... काय बोलता तुम्ही?
काही कळतं कि नाही.....

आजोबांचा आवाज आता चढला होता. राजवीर आणि आजोबांचा वाद वाढतच होता. शेवटी राजवीर काहीही न बोलता डोक्यात राग घालून घराच्या बाहेर पडतो.

काव्या त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न करते. पण , वाऱ्याच्या वेगाने तो गाडीत बसून निघून जातो. इकडे आजोबा हतबल होऊन गेले होते. काव्याला काहीच सुचेनासे झाले होते.

अवघ्या काही मिनिटांतच काव्याचा फोन वाजला. अनोळखी नंबरवरून आलेला कॉल तिने रिसिव्ह केला खरा पण समोरच्याच बोलन ऐकून घेताच तिच्या हातांचा त्राणच गेला. हातातील मोबाईल सटकन खाली पडला. समोर पाहिलं तर आजोबा कोसळून खाली पडले होते.


क्रमशः

(टीप: ॲना ही फाॅरेनची असल्यामुळे कथेत इंग्रजी शब्द वापरणे गरचेचे होते. त्यामुळे या भागात इंग्रजी शब्द वापरले आहेत ????????)

राजवीर रागाच्या भरात कुठे गेला? काव्याला कोणाचा फोन आला होता? आजोबांना नेमकं काय झालं? काव्या हे सगळं कसं निभावणार? यासाठी "राजसा" चा पुढचा म्हणजेच शेवटचा भाग नक्की वाचा. शेवटचा भाग परवा पेजवर येईल.

©® आश्विनी सुहास मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all