राजसा भाग 4 (टीम प्रकाशवाटा)

Marathi love story


"काय?? राजवीर ईथे नाहिये?? जे व्हायचं नव्हतं तेच झालं.. अरे देवा.. " आजोबा छातीवर हात ठेवून मटकन खाली बसले.

मधूकररावांनी ते पाहिले आणि काकूळतीला येऊन त्यांची चौकशी केली.

"अरे मध्या राजवीर घरी नाहिये." राजवर्धन सर अपराधी भावनेने म्हणाले.

"अरे असेल इथेच कुठेतरी काव्यासुद्धा घरी नाहिये.. गेले असतील एकांतात." मधूकरराव राजवर्धन यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.

" अरे पण त्याचं सामान दिसत नाहिये इथे, म्हणून काळजी वाटतेय" राजवर्धन सर एका वेगळ्याच काळजीपोटी विव्हळत होते.

" ते होय... अरे आपल्या काव्याने राजवीरची खोली बदलवून घेतली, तिने त्याच्या आवडीनिवडी बघता त्याला कम्फरटेबल अशी रूम तयार केली आणि त्याचं सगळं सामान तिथे शिफ्ट केलं. काळजी करू नकोस. किती घाबरतोस?" मधूकरराव आपल्या लाडक्या मित्राची काळजी बघता त्यांना समजावत होते.

राजवीर गाडीत राहिलेला आपला लॅपटॉप घेण्यासाठी बाहेर आला होता. लॅपटॉप घेऊन परत जातच होता की कोणीतरी त्याच्यासमोर टक लावून उभं होतं.

इथे राजवीरच सगळ्यांबाबतीत दुर्लक्ष करणं काव्याने बरोबर हेरल. ती विचार करत गेट वर उभीच होती इतक्यात एक लांबलचक गाडी तिच्यासमोर येऊन थांबली. काव्याने त्या ड्रायवर कडून चावी घेतली आणि स्वतः गाडी सुसाट पळवत निघून गेली.

ड्रायवर सीटच्या बाजूला बसलेला राजवीर गुंगीतून नुकताच बाहेर पडत होता. डोक जड झाल होत. समोर धूसर दिसत होतं. त्याला शुद्धीत आलेलं पाहून काव्याने त्याच्यासमोर पाण्याची बाटली पुढे केली.

काव्या : congratulations. You are just been kidnapped. माझ्याच माणसाने तुला गुंगीचा स्प्रे मारला होता.

राजवीर : what?? Are you mad?? म्हणजे हे सगळं तू केलंस?? (आधी पाणी प्याव कि प्रतिक्रिया द्यावी हे राजवीरला कळतंच नव्हतं आणि तो तिला फक्त बघत होता)

इतक्यात काव्याने कचकन ब्रेक दाबला आणि जागीच गाडी थांबवली. नजरेनेच त्याला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले.

राजवीर थोडा रागातच बाहेर आला. ज्याठिकाणी कायाने गाडी थांबवली तीथे बाहेरचं दृश्य अगदीच नयनरम्य होतं. रात्रीच्या निळ्याशार आकाशात तारे टिमटिम चमकत होते. तलावाच्या काठावर सुटलेला गार वारा अंगाला वेगळाच अनुभव देत होता. तलावाच्या पाण्यात पडलेलं पौर्णिमेच्या चंद्राच प्रतिबिंब मनाला सुखावत होत आणि काठावर वसलेल्या झाडाभोवती चमचमणारे काजवे. वाहह अगदीच सुखावणारी वेळ होती ती.

राजवीर तर त्यातच हरवून गेला. काही वेळ असाच गेल्यानंतर काव्याने त्याला आपल्या सोबत तळ्याकाठी बसण्यास परत एकदा नजरेनेच खुणावले.

काव्या : काय मग?? आवडलं का?? कसं वाटतंय?

राजवीर : (थोडा नाटकी राग आणत) माझं kidnapping आवडलं का विचारतेस??

काव्या : (उगाच चिडवत ) तसं म्हण हवं तर. (आणि ती खळखळून हसली) बरं ते सगळं सोड. मी इथे तुला वेगळ्या कारणासाठी आणले आहे. (थोडी सिरीयस होत काव्या म्हणाली)

राजवीर : बोल??

काव्या : तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय ना?

राजवीर थोडा दचकलाच त्याला काय बोलावं कळतच नव्हत.

काव्या : मला कळतंय सगळं. But don't worry मी तुला जबरदस्तीने लग्न कर असं म्हणत नाहिये. पण आजोबांच्या खातर आणि त्यांच्या वयाचा विचार करता तरी तु त्यांना हे सुख द्यावस असं वाटतं.

राजवीर : पण???

त्याला शुsss म्हणून गप्प करत ती पुढे बोलू लागली. फक्त काही काळासाठी हे लग्न धरून ठेऊया योग्य वेळ बघून विभक्त होऊया. येवढा विश्वास ठेवू शकतोस तु माझ्यावर. आपण नवरा-बायको म्हणून नाही पण चांगले मित्र बनून नक्कीच राहू शकतो. so friends??

राजवीर तर आवासून बघतच बसला. त्याला काय बोलावं कळतच नव्हत.

काव्या : मैत्री करायला काही हरकत नाही. नको एवढा विचार करु. By the way ही ॲना ?? तिला तुझ्या लग्नाबद्दल माहीत आहे का??

राजवीर : अss ? तुला ॲना बद्दल कसं कळाल?

काव्या : ( मिश्किलपणे हसत) काव्यांजली सरंजामे म्हणतात मला. समोरच्याशी डील करण्याआधी त्याची इत्यंभूत माहिती करून घेते मी.

राजवीर : नाही तिला एवढ्यात नाही सांगता येणार. खूप हंगामा करेल ती.

काव्या : येस ofcourse, I can understand.

राजवीर : पण काय भारी आहेस ग तू. I just can't believe it. तु तर मला शॉकच केलंस. मला तर काही सुचतच नव्हतं. But Now I am feeling so much releif. (आणि त्याने पटकन काव्याला मिठी मारली) Thank you, thank you so much.

त्याच्या मिठीत थोडी हरवलीच काव्या पण लवकरच स्वतःला सावरत राजवीरला हि, जागा कशी वाटली हे विचारू लागली.

राजवीरच्याही मनात काव्याला मिठी मारताच अवघडल्यासारखे झाले. पण त्याला इथला नयनरम्य आणि मनाला शांती देणारा क्षण खूपच आवडला होता. तो तिला परत एकदा थॅंक्यू म्हणाला.

दोघेही मग घरी यायला निघाले. एकदाची गाडी दारावर येऊन थांबली आणि त्या दोघांना असे हसतखेळत घरी आलेल पाहुन राजवीरचे आजोबाही सुखावले. काव्या आणि आजोबांची नजरभेट झाली. तीच्या नजरेत त्यांना एक विश्वास जाणवला.

थोड्याच दिवसात राजवीर आणि काव्याची लग्न सराई अगदी जोमाने सुरू झाली. सरंजामेंच्या रूक्मिणी पॅलेस मध्ये लग्न अगदी थाटात करायचे ठरले.

बघता बघता साखरपुडा, हळद आणि मेहंदीचा कार्यक्रमही व्यवस्थित पार पडला. लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने करायचे ठरले. पण महाराष्ट्रीयन आणि राजस्थानी दोन पद्धती लक्षात घेता लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने व रिसेप्शन राजस्थानी पद्धतीने करायचे ठरले.

अखेर तो दिवस उजाडला. काव्या छान तयार होऊन बसली होती. राजवर्धन आजोबा काव्याला भेटण्यासाठी आले.

आजोबा : काव्या मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायच आहे. फार उशीर होण्याआधी मी आत्ताच सांगितलेलं बरं. काव्या राजवीरच्या आयुष्यात दुसरी एक मुलगी आहे.

काव्या : मला माहित आहे दद्दू. (अगदीच शांतपणे) पण माझ्यावर विश्वास ठेवा सगळं नीट होईल. मी घेईन सगळं सांभाळून.

आजोबा काव्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण ती त्यांना वचन देते की ती कधीही राजवीरची साथ सोडणार नाही. त्याला कधीही एकट पडून देणार नाही. तीच बोलन ऐकून आजोबांना खूप निश्चिंत वाटतं.

भटजींनी नवऱ्यामुलीला हाक मारताच काव्या समोर येते. गुलाबी काठपदराची पिवळी धमक नववारी साडी, त्यावर भरजरीने नटलेला मॅचिंग ब्लाउज, हातभर हिरव्यागार बांगड्या त्यासोबत सोन्याचे तोडे, हातभर रंगलेली मेहंदी त्याची शोभा अजूनच वाढवत होती. गळ्यात भरगच्च ठूशी जोडीला वर राणीहार, खांद्यावर रेशमी शाल, कानात डौलदार झुमके, केसांचा रंगीत फुलांनी बहरलेला अंबाडा, काळेभोर नक्षीदार डोळे, कपाळी चंद्रकोर आणि मोत्यांच्या मुंडावळ्या, हळदीने उजळून निघालेली तिची गोरी काया.. आ.. हा.. तिच्या सौंदर्यात भरच पडली होती. काव्या त्याक्षणी विलक्षण सुंदर दिसत होती.

तसं आमचा राजवीर पण काही कमी देखणा नव्हता. मोती रंगाचा कुर्ता, गुलाबी रंगाच सोवळ, खांद्यावर गुलाबी उपरण आणि डोक्यावर पेशवाई फेटा, कपाळावर मोत्यांच्या मुंडावळ्या, हळदीने चेहऱ्यावर आलेली तेजी त्याला आणखीनच रुबाबदार भासवत होती.

मंगलाष्टकाच्या गजरात लग्न सोहळा अगदी दिपून निघाला होता. अंतरपाट खाली उतरताच दोघांचीही नजर एकमेकांवर पडली आणि त्या रुपात दोघेही हरवून गेले. काहीवेळाने भानावर येताच काव्या पूर्ती लाजली. राजवीर ही थोडा दचकलाच तो काव्याला एकटक बघत जो होता.

सगळे समारंभ दणक्यात पार पडले. पाठवणी ही सुरेख पार पडली आणि काव्याला घेऊन संपूर्ण कुटुंब U.S ला पोहचले. काव्यासाठी हे घर काही नवीन नव्हते पण आज तिला हे घर नव्याने भेटत होते. दुसऱ्या दिवशी नववधूची ओळख रिसेप्शनच्या निमित्ताने इथल्या लोकांना होणार होती.

रिसेप्शन राजस्थानी पद्धतीने करायचे ठरले होते.
राजवर्धन सर यांमध्ये कोणतीही कसर राहू नये म्हणून जातीने लक्ष घालत होते. आपली भारतीय संस्कृती जगभरातल्या लोकांच्या मनामनात रुजावी आणि अभिमानाने आपला ऊर भरून यावा यापेक्षा वेगळं काय हवं असं नेहमी राजवर्धन सरांना वाटत असे. आज खास त्यांनी त्यासाठीच ड्रेस कोड ठेवला होता.

रिसेप्शनची रंगत वाढत चालली होती. सगळी पुरूष मंडळी भारतीय पेहरावात शिवाय डोक्यावर फेटा बांधून मिरवत होते आणि स्त्रियांनीही खास भारतीय पेहराव केला होता. असंही परदेशी नागरिकांना भारतीय संस्कृती आणि त्यांचा पेहराव नेहमीच आकर्षित करत आला आहे. राजेशाही थाटात संपूर्ण सोहळा संपन्न होत होता.

US मधला ग्रॅंड वेडिंग पॅलेस जो खूद्द राजवर्धन सरांच्या मालकिचा होता तिथे हा शाही सोहळा सुरू होता. ईथे फक्त रॉयल पाहुण्यांनाच आमंत्रित केले गेले होते. भारतीय पारंपरिक आणि फ्युजन पद्धतींचे विशेष पदार्थ बनवले गेले होते. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती.

राजवीरचे आजोबाही खूप खुश होते. US मधली सगळीच मोठमोठी हस्ती या सोहळ्याला उपस्थित होती. हा डोळे दिपवणारा सोहळा सगळे जवळून अनुभवत होते.

आपल्या उत्सवमूर्तींची तर खास तयारी करण्यात आली होती. सुंदर सोनेरी रंगात न्हाऊन निघालेला
शाही पेहराव, हातात रजवाडी कडे, गळ्यात भरगच्च चोकर आणि मोठा कुंदन व इतर रत्नजडित हार, डौलदार मांगटिका असे एक ना एक उंची दागिने अंगावर म्हडलेले, डोक्यावरून सोडलेली भरजरीची ओढणी अगदीच राजघराण्यातील कोणी राणीच अवतरली असावी. तिच्या तोडीसतोड आमचा राजवीर ही अगदी शाही पेहरावात दिमाखात उभा होता. सोनेरी शेरवानी, रत्नजडित पगडी, गळ्यात लेटेस्ट स्टाईलची मोती हार आणि पायांत मोजडी.

राजवाड्याप्रमाणे सजवलेल्या त्या पॅलेस मध्ये रोशनाई सुद्धा फारच आकर्षक केली होती. काव्या राजवीर ची जोडी अवतरताच फूलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. एखाद्या राजघराण्यातील राजा राणी च समोर उभे असल्याचा भास व्हावा इतके देखणे वाटत होते ते दोघेही एकत्र.

सगळं काही व्यवस्थित सुरुच होतं आणि इतक्यात बाहेर काहीतरी गोंधळ सुरू असल्याचे कळले. कोणीतरी हळूच राजवीरच्या कानात येऊन सांगितले आणि तो तडक हा सगळा सोहळा सोडून बाहेर निघून गेला. काव्या एकटीच तिथे उभी होती. आलेले पाहुणे या सगळ्या प्रकाराने आपापसात चर्चा करु लागले.

राजवीर बाहेर पोहचला तर राजवर्धन आजोबा आपल्या सिक्योरीटीला कोणालातरी बाहेर काढण्यासाठी सांगत होते आणि समोरची व्यक्ती त्यांच्याशी वाद घालत होती, आत येण्यासाठी धडपडत होती. राजवीर आणि त्या व्यक्तिची नजरभेट झाली. ती व्यक्ती डोळ्यातून आग ओकत होती.


क्रमशः


लग्न तर पार पडलं पण आता पुढे काय? काव्याने आजोबांच्या भावनेचा त्यांच्या शब्दाचा मान तर राखला पण राजवीरवर असलेलं प्रेम ती त्याच्यापर्यंत कस पोहचवणार? एवढ्या मोठ्या सोहळ्यात गालबोट कोणामुळे लागलं? कोण होती ती व्यक्ती? या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढचा भाग नक्की वाचा.

©® शुभांगी शिंदे

🎭 Series Post

View all