परवा अमरावतीत पावसानं दमदार हजेरी लावली त्यामुळे कालच्या हरतालिकेच्या उपवासासाठी आणलेले राजगिऱ्याचे लाडू अगदी नरम झाले...खाववल्या जाईनात.
मग एक आयडिया केली... राजगिऱ्याच्या नरम लाडूचा चुरा करुन घेतला एक वाटी साखरेत अर्धी वाटी पाणी घालून कढईत उकळायला ठेवलं.
एकतारी पाक झाल्यावर त्यात तीन वाट्या राजगिऱ्याचा चुरा घालून गोळा होईपर्यंत परतून घेतलं आणि एका थाळीत तूप लावून तो गोळा थापला. वरून ड्रायफ्रुट्स टाकू शकता... माझे राहिले टाकायचे.
कोमट झाल्यावर वड्या कापल्या...चवीला छान झाल्यात.
गुळाच्या पाकातही करता आल्या असत्या... आमच्याकडे गोड जरा जास्त खातात त्यामुळे जरा गट्ट गोड झालं तरी चाललंय...
पदार्थ वाया गेला नाही ह्याचं समाधान !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा