राजार्जून भाग -१

Arjun is a boy who is alone on street path with a dog named as Raja . One day Radha met him and take him to school . One day Radha get killed by murder ....

एक शहर, जिथे जीवन थांबत नाही. कित्येक लोक इथे येतात.  आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि इथलेच होऊन जातात . सकाळची वेळ निवांत जात होते . 
       
        त्याच शहरात एक १६ वर्षाचा मुलगा ' अर्जुन ' . त्याची आई त्याला जन्म देताच मरण पावली. बाप असून नसल्यासारखा सारखं, दारू आणि जुगार मध्ये पैसे उधळत होता. त्याच शिक्षण आठवी पर्यंतच झालं  होत. असच एका रात्री त्याचा बाप दारू पिऊन जात होता . त्याच रात्री त्याचा अपघातात मृत्यू झाला . आता या शहरात तो  एकटाच आयुष्य जगत होता .  

        " मे जिंदगी का साथ निभाता चला "
          एका टपरीवर रेडिओ वाजत होता. तिथे तो कामाला लागला. खूप कष्ट करत होता. असेच सकाळची वेळ होती . त्याला टपरी उघडत असताना रस्त्यावर एक कुत्री मेलेली दिसली .  एक लहानस पिल्लू तिच्या भोवती गिरक्या घालत होती. त्या पिलाला बघून त्याला स्वतःची परिस्थितीची जाणीव झाली . तो सुद्धा एकटाच होता. त्या  पिल्लुला तो पाळायचा विचार केला . त्यांनी त्याच नाव ' राजा ' ठेवला . कारण सुद्धा तसेच होत तो जेंव्हा रखवाल करायचा त्याच कान एकदम उभे राहायचे , जणू एक राजा आपल्या राज्याचं रक्षण करत असावं. 

         आता दररोजच त्यांचं दिनक्रम ठरलेलं होत. रोज सकाळी उठून ते दोघे टपरीवर जायचे . तिथे अर्जुन राजाला  दूध पिऊ घालायचा . दुपारी एक वडा पाव खायचा आणि संध्याकाळी तिथे ते दोघं समुद्राच्या किनारी कित्येक वेळ त्या लाटांना बघत बसायचे . तिथे येणारे खूप सारे लोकांना आनंदी बघून तो सुद्धा आनंदित व्हायचे . तिथे लहान मुलांना खेळताना बघून त्याला त्यांच्यासोबत खेळावस वाटत असे  पण ते लोक मला कसे वागवतील असा विचार करून तो कुणामध्ये मिसळत नव्हता. त्या लाटांना बघून त्याला खूप समाधान वाटायचं. कधी कधी तर ते दोघे तिथेच झोपी जायचे. आणि पुढच्या दिवशी परत पहिले पाढे पंचावन्न . 

      सूर्य मावळत होता. रोजच्या प्रमाणे  राजा आणि अर्जुन समुद्राच्या किनारी बसले होते . तेवढ्यात आवाज आला. एक मुलगी -" चोर चोर "
    अस ओरडत पळत होती. जीन्स पँट , एका साइडला साईड बॅग घालून , मोकळे केस , वय तसा २५ वाटत होता. चोर पर्स घेऊन पळत होता. त्या वाळूत तो चोर पुढे आणि ती मागे मागे पळत होती. अर्जुन राजा कडे बघून म्हणाला

अर्जुन -" राजा .... गो "

        अस म्हणताच राजा त्या चोराच्या मागे पळत सुटला. राजा अगदी वेगाने पळत होता. अर्जुन सुद्धा पळत सुटला. राजा इतका वेगात होता की काही सेकंदात तो चोराजवळ पोहचला  आणि त्या चोरावर झडप घातली. तो चोर भीतीनेच खाली पडला. राजा त्या पर्से ला दातात पकडला होता. ते दोघं त्याच्या जवळ येऊन त्याला मारू लागले. 

ती -" लाज नाही वाटत चोरी करायला ... देवांनी तुला चांगलं हातपाय दिले आहेत त्याचा उपयोग करून काम का नाही करत?"

चोर -" माफ करा मॅडम .. कोणी मला कामच देत नाही. आणि या पोटासाठी  मी चोरी केली मॅडम .... मला माफ करा.."

ती -" ठीक आहे .... आता पुढं कुठ दिसलास तर बघ... आणि हा माझा कार्ड, उद्या ये तुला काम मिळेल..."

चोर -" खूप उपकार झाले मॅडम..."

    अस म्हणत तो चोर निघून गेला. ती अर्जुन जवळ येत म्हणाली.

ती - " थंक यु..... तुझ नाव ?"

अर्जुन -" माझं नाव अर्जुन आणि हा राजा ..... आणि हो.... तुमचं नाव राधा अगरवाल... अगरवाल कंपनी च्या मालकाची एकलुती एक मुलगी.... तुम्ही त्या म्हाडा कॉलनी च्या समोरच्या बंगल्यामध्ये राहता... तुम्हाला तुमच्या ऐशोरामाची जिंदगी नको आहे..."

राधा -" ????????????.... माझ्या बद्दल एवढं कसं जाणतोस ??"

अर्जुन -" अगदी साधं लॉजिक आहे ते.... तुम्ही आता तुमचं कार्ड त्या चोराला दिलं. त्या कार्ड वर तुमचं नाव आणि कंपनी च नाव होत .. मग त्या वरून कळालं की तुम्ही अगरवालच आणि तुमचं काहीतरी संबंध आहे. तुम्ही त्या चोराला म्हणालात की त्याला काम देणार म्हणजे त्यांची मुलगीच असणार... तुमच्या जवळ खूप सारे गाडी असणार तरी तुम्ही चालत आलात , त्यावरून कळलं की तुम्हाला ऐशो अरामची जिंदगी तुम्हाला नको आहे.  तुम्हाला स्वतःच काहीतरी करायचं आहे... मला तुमचं घर माहिती नव्हतं... पण तुमच्या जीन्स वर चुना लागला आहे. इथ फक्त म्हाडा कॉलनी च्या समोरच चुना पडला आहे आणि त्याच्या समोरचा बंगल्यातच तुम्ही राहत असणार. "

राधा -" इंटरेस्टिंग .... यू आर वेरी  स्मार्ट... तू काय करतोस??? .."

अर्जुन -" मी इथ टपरी वर काम करतो... या टपरी वर मिळणारा मोबदल्यावर  राजा आणि माझं खर्च निघतो.. "

राधा -" शाळेला नाही जात का?"

अर्जुन -" कसं जाणार... कोणीच नाही आहे माझं या जगात ... तरी ८ वी पर्यंत झालाय माझं शिक्षण... आता हे टपरी आणि राजा हेच माझं जग..."

         राधाला त्याची खूप दया आली. असला स्मार्ट मुलगा शाळेत जात नसल्याचा तिला खूप वाईट वाटल.

राधा -" तू काही खालास?"

अर्जुन -" खालो ना... वडा पाव..."

राधा -" चल आपण जेऊ या.."

अर्जुन -" नको नको.... मला भूक नाहीये..."

राधा -" अरे पण मला लागली ना..."

अर्जुन -" हमम.... जायचं का राजा..."

राजा " बाऊ " म्हणत परमिशन दिलं...

तिघेही  हॉटेल मध्ये  गेले.  राधा जेवणाची ऑर्डर दिली. 

राधा -" तुला आता शाळेला जायचं झालं... तर जाशील का?"

अर्जुन -" जाईन की ... पण राजा आणि माझं खाण्याच कसं होणार?"

राधा -" ह्म्म... पण एक होऊ शकत  ना ... तू सकाळी आणि रात्री टपरीवर जाऊ शकतोस की..."

अर्जुन -" होऊ शकत... "

राधा -" तू फक्त शाळेत जा.... बाकीचं नंतर बघू...तुझ एडमिशन आता झालं म्हणून समझ..."

अर्जुन -" पण तुम्ही हे सगळं का करत आहात?"

राधा -" कारण कोणी फक्त पैसे नाही म्हणून शिक्षण सोडावं लागू नये म्हणून ..."

अर्जुन -" तुम्हाला एक सांगू ?"

राधा -" सांग की..."

अर्जुन -" तुम्हाला बघून मला अस वाटत की माझी मोठी बहीण असली असती तर तुमच्यासारखी असली असती."

राधा -" अरे मग मला मोठी बहिणच समझ की..."

अर्जुन -" हो.... धन्यवाद दीदी..."

राधा -" अरे .... दिदीला कोणी धन्यवाद म्हणत का?"

अर्जुन -" हो...????????"

     अर्जुन च चांगल्या शाळेत एडमिशन झालं. आता तो शाळेत जात होता. शाळेत जाताना तो टपरीवरचे सगळे काम आटपून जात होता. शाळेत गेल्यावर राजा मात्र शाळे बाहेर बसत असे. मधली सुट्टी मध्ये राजाला खायला देणं आणि स्वतः काहीतरी खाण आणि शाळा सुटल्यावर दोघे परत येत असत. टपरी चे मालक त्याला बघून खूप आनंदित होता. शाळेत त्याचे  नवीन मित्र मैत्रिणी झाले. त्यातली एक होती ' अंजली ' . हुशार आणि तेवढच मदत करणारी होती ती.
    
      दर रविवारी राधा आणि हे दोघं चौपाटीवर भेटत असे . आठवड्यात काय काय झालं हे एकमेकांना सांगत असत. 

    असच एका रविवारी राधा एका मुलाला घेऊन आली . 

राधा -" अर्जुन हा माझा फ्रेंड राहुल..."

अर्जुन -" फ्रेंड???... का बॉयफ्रेंड ??"

राधा लाजत म्हणाली.

राधा -" राहुल.. तुला म्हणले होते ना याच्या नजरेतून काहीही नाही चुकत ते... हाच तो अर्जुन..." 

राहुल -" बर ते जाऊ देत ... तुला कसं कळलं की मी हीचा बॉयफ्रेंड आहे ते?"

अर्जुन -" सिंपल... राधा जेंव्हा तुला फ्रेंड म्हणाली तेंव्हा ती पापणी बंद नाही केली . माणूस अस खोटं बोलताना करत असतो. दीदी ला हे पण माहिती नाही तिच्या हातांवर  दोन वेळा इंग्लिश मध्ये आर आर अस टॅटू काढली आहे . अजुन एक,  हिच्या मोबाईल मध्ये तुमचा दोघांचा  फोटो बघितला आहे ",

राहुल -" स्मार्ट... खरच राधा तू सांगितलं तसाच आहे हा..."

राधा -" मी म्हणाले होते ना... मग कसा चालय तुझं शाळा..."

अर्जुन -" मस्त... "

राहुल -" मग कोणी मैत्रीण झाली का?"

अर्जुन -" हो... अंजली म्हणून आहे ... खूप छान आहे ती... मला खूप काही मदत करती ती..."

राहुल -" मग गर्लफ्रेंड म्हण की ...."

राधा -" तू गप रे.... अर्जुन आज आपण बाहेरच जेऊ या... सगळे.."

अर्जुन -" ह्म... काय म्हणतो राजा जायचं का?"

परत राजा भुंकत परमिशन दिली. त्यारात्री खूप मजा झाली. परत पुढच्या दिवशीपासून सोमवार आला. परत तेच दिनक्रम चालू झालं . 

     रविवारचा दिवस होता. अर्जुन चौपाटीवर राधाची वाट पाहत  बसला होता . रात्र झाली तरी राधा आली नाही. अर्जुन ला वाटल बिझी असेल. परत तो सुद्धा शाळेत बिझी झाला.

     असाच तो शाळेतून परत येत होता. संध्याकाळ होत आली होती. रोड वर खूप गर्दी जमली होती . पोलिस सुद्धा आलेले होते. अर्जुनला नवल वाटलं. कारण त्या रस्त्यावर वर गर्दी नसायची . तो तिथे जाऊन बघतो तर काय.. राधा तिथं मृत पडली होती.... अर्जुनला खूप मोठा धक्का बसला... तो गर्दी तोडून आत जाईल तेवढ्यात त्याला पोलिस त्याला अडवल.... तो खूप विनवणी करत होता. ... राधाच्या डोक्याला खूप मार लागला होता . रस्त्यावर रक्तच रक्त पसरलेल होत. तिच्या बॅग मधले सामान पसरलेल होते. अर्जुन मात्र रडकुंडीला आला होता.... कोण तरी त्याच्या आयुष्यात आली होती.. झटक्यात गेली... मानलेली बहीण होती. तिला बघून अर्जुन रडत होता. राजा तिच्या बॉडीला बघून तिथेच बसला होता.यात काहीही शंका नाही की राधाचं खून झाला होत. राजा आणि अर्जुन परत एकदा अनाथ झाले. पोलिस तिथले रोड सील केले. अर्जुन मात्र तिच्या बॉडी कडे बघत होता....

          संध्याकाळ होत आली होती. सूर्य समुद्राच्या पोटात जाऊ पाहत होता . बीचवर सगळे खूप आनंदात होते.  अर्जुन आणि राजा मात्र अजुन दुःखात होते . ३ दिवस होऊन गेले होते त्या घटनेला , अजुन दोघे त्याच दुःखात होते . आपल आणि तिची काहीही संबंध नसताना ती खूप काही करत होती, मात्र अचानक तिचीच बॉडी आपल्या नजरेसमोर असेल अस अर्जुन स्वप्नातही विचार केला नव्हता . राजा तीन दिवस झाले काहीही खाल्ला नव्हता. खरच म्हणतात सगळे कोणीही मेल्यावर सगळ्यात जास्त दुःख , त्यांच्या खूपच जवळ असलेले लोकांना आणि कुत्र्याला होत असत. 

           अर्जुनला  भूक आणि तहान काहीच लागत नव्हती . आपल्याला जी नवी जीवन देऊन गेली ती आता या जगात नव्हती. अर्जुन शून्यात बघत विचार करू लागला.

           ' राधाचं सांगत होती की आपण शाळा शिकावी आणि मोठ व्हावं . नाही नाही .. ... शाळेला जायचं आणि मोठ होऊन दाखवायचं.' एवढं विचार करून तो उठला . राजाला कसं तर करून काहीतरी खाऊ घातला. पण  रात्री त्याला झोपच लागलं नाही.

          दुसऱ्या दिवशी तो शाळेला जाऊ लागला. तिथं सुद्धा त्याच मन लागत नव्हतं. अंजली हे ओळखून घेतली. मधल्या सुट्टीत त्याच कारण विचारली. तो सगळं काही सांगितला. 

अंजली -" जे झालं खूप वाईट झालं ... विसरून जा ... आणि पुढचं बघ....????????"

अर्जुन -" ह्म्म्...????"

         शाळा सुटल्यावर अंजली , अर्जुन आणि राजा चालत त्याच रस्त्यावर जात होते . अर्जुनला परत त्याच दिवसाचा आठवण येत होती . तो रस्ता अजुन सील होता. तिथं काही हवालदार होते . एकदम एक पोलिसाची गाडी आली आणि तिथं थांबली. त्यातून इन्स्पेक्टर पाटील बाहेर आले. 

पाटील -" काय रे चव्हाण काही कळाल का ?"

चव्हाण -" नाही साहेब.. बॉडी पी.म ला पाठवलं आहे ... रिपोर्ट आल्यावर कळेल. "

अर्जुन आणि अंजली त्यांचं बोलणं ऐकत होते. 

पाटील -" मला तर वाटतं की कोणीतरी बदला घेण्यासाठी खून केला आहे. "

चव्हाण -" शक्यता नाकारता येत नाही सर..."

पाटील -" चला आता रिपोर्ट आल्यावर कळेलच..."

चव्हाण -" सर आपण अगरवाल यांचं चौकशी करायची का?"

पाटील -" चव्हाण त्यांचं चौकशी करायला खूप मोठी एविडेन्स पाहिजेल."

चव्हाण -" पण सर कुठून तर स्टार्ट करावं लागणार ना ...."

तेवढ्यात अर्जुन पुढे होऊन म्हणाला 

अर्जुन -" सर तुम्ही राहुलचं चौकशी करा.."

पाटील त्याला बघून म्हणाले.

पाटील -" तू कोण ?"

अर्जुन -" राधा माझी बहीण होती...????????"

चव्हाण -" काहीही काय बोलतोस ?"

अर्जुन -" हो सर... ती मला भाऊ मानत होती. मी एक अनाथ आहे , तिने माझ्यासाठी खूप काही केलंय सर..."

चव्हाण -" एवढं मोठं बिझनेस मेन ची पोरगी तुला भाऊ मानते ??...????????"

   चव्हाणला विश्वास बसत नव्हता. त्याच्या मनात कसलीतरी शंका येत होती. अर्जुन त्यांना खूप समजावून सांगू लागला. 

अर्जुन -" सर प्लीज... विश्वास ठेवा माझ्यावर ... "

चव्हाण -"  एे.... गप जातो का मारू एक ...????????"

पाटील -" चव्हाण ... थंड घ्या जरा ...  काय बोलायचं आहे सांग ..."

अर्जुन -" सर ती माझ्यासाठी खूप काही केली. ती खूप चांगली होती. तिला प्रॉपर्टी च काहीही पडल नव्हतं. तिला काहीही गरज नव्हती याची , तिचा बॉयफ्रेंड राहुल मला एकदा भेटला होता ... "

पाटील -" म्हणजे तुला  राहुलवर शंका आहे."

अर्जुन -" नाही सर... पण मला म्हणायचं आहे की त्याला काहीतरी माहिती असेल "

पाटील -" मग तुला माहिती का तो कुठे राहतो ?"

अर्जुन -" नाही सर... पण जर राधा च्या कॉलेज मध्ये चौकशी केली तर कळेल..."

पाटील -" चव्हाण चला गाडी काढा .. आणि तू पण चल..."

अर्जुन -" ओके सर चला.... अंजली तू घरी जा मी यांच्या सोबत जातो.. बाय."

अंजली -" बाय... काळजी घे..."

अर्जुन -" तू पण ..????.. चल राजा ..."

राजा  "बाऊ " म्हणत होकार दिला ..

चव्हाण -" हे कुत्रा पण येईल ?"

अर्जुन -" हो सर ... हा माझा साथी आहे..."

पाटील -" ????????... चल घे त्याला पण ... चला चव्हाण ..."

      चव्हाण गाडी चालू केला. गाडी कॉलेज जवळ येऊन थांबली. कॉलेज खूप मोठं होत. अर्जुन तर कॉलेज चे बिल्डिंग बघण्यात हरवून गेला होता. सगळे मुले आणि मुली पोलिसांना बघत होते. 

पाटील -" चव्हाण चला प्रिन्सिपल कडे... "

चव्हाण एका शिपाई जवळ गेला. 

चव्हाण -" प्रिन्सिपलच केबिन कुठे आहे ?"

शिपाई -" तिथे आहे साहेब ... चला सोडतो ..."

पाटील आणि चव्हाण प्रिन्सिपल च्या केबिनमध्ये गेले. अर्जुन आणि राजा बाहेरच थांबले. पोलिसांना बघून प्रिन्सिपल उठून उभा राहिले.

प्रिन्सिपल -" नमस्कार साहेब ... बसा बसा... काय झालं?"

पाटील -" नमस्कार .. तुमच्या कॉलेज मध्ये राधा अगरवाल शिकत होती का?"

प्रिन्सिपल -" हो सर... अगरवाल यांची पोरगी ... ते आमच्या कॉलेजचे ट्रस्टी आहेत..."

पाटील -" बर बर... तिचं ३ दिवसापूर्वी खून झाला आहे..."

प्रिन्सिपल - " कळाल सर मला... खूप वाईट झाल तिच्यासोबत...सांगा तुमची काय मदत करू शकतो?"

पाटील -" सर... राधा कुठल्या क्लास मध्ये शिकत होती ?"

प्रिन्सिपल -" ती बी. ए थर्ड इअर ला होती. "

पाटील -" बर... तीच काही तक्रार वैगरे.."

प्रिन्सिपल -" नाही सर... ती खूप चांगली मुलगी होती. "

पाटील -" सर... मी तिच्या क्लास मध्ये चौकशी जाणार आहे . तुम्हाला अजुन काही कळाल तर सांगा..."

प्रिन्सिपल - " ओके सर... नक्की सांगतो."

पाटील आणि चव्हाण दोघंही बाहेर आले. अर्जुन आणि राजा त्यांचे वाट पाहत होते. 

अर्जुन -" सर अजुन काही कळाल का?"

चव्हाण -" तुला कशाला पाहिजे नसते चौकश्या.."

पाटील -" चव्हाण ... काही कळलं नाही ."

अर्जुन कॅन्टीन कडे बोट दाखवत म्हणाला.

अर्जुन -" सर ती बघा राधा ची मैत्रीण ..."

चव्हाण -" तुला कसं माहिती की तिचीच मैत्रीण आहे ते ?"

अर्जुन -" सर... राधा आणि तीच फोटो मी तिच्या मोबाईल मध्ये बघितलं होत."

पाटील -" चला  चव्हाण .... "

       सगळे कॅन्टीनमध्ये गेले. तिथे खूप सारे मुल आणि मुली होते. तिथे राधाची मैत्रीण आणि त्यांचं ग्रुप गप्पामस्ती करत होते . सगळे पोलिसांना बघून शांत बसले . पाटील त्यांच्या टेबलापुढे येऊन थांबले. ते थांबताच सगळे उठून उभा राहिले. 

पाटील -" अरे उठलात का?... बसा बसा..."

सगळे एकमेकांना बघत होते. नंतर सगळे बसले. 

पाटील -" तू राधा ची मैत्रीण ना ?"

स्नेहा -" हो सर .... माझं नाव स्नेहा पवार... "

पाटील -" तर स्नेहा ... मी ऐकलंय की राधाला एक बॉयफ्रेंड होता."

स्नेहा -" नाही सर..."

अर्जुन -" नाही सर .... ही खोटं बोलत आहे. हिला मी फोटोत पाहिलंय ते पण राहुल आणि राधासोबत ..... हिच्या तोंडावरून कळतंय की ही खोटं बोलत आहे ते."

पाटील -" स्नेहा खर खर सांग ..."

स्नेहा -" सॉरी सर... तिला एक बॉयफ्रेंड होता. राहुल त्याच नाव."

चव्हाण -" मग पहिला खोटं का बोललीस ?"

स्नेहा -" अस राहुलचं म्हणाला की कुणाला सांगू नको म्हणून "
पाटील -" बर त्याचा नंबर आहे का ?"

स्नेहा -" हो सर..."

पाटील -" चव्हाण हीच्याकडून नंबर घ्या आणि ट्रेस करा ."

चव्हाण -" हो सर..."

पाटील -" अर्जुन, राहुल  कसा होता ?"

अर्जुन -" म्हणजे सर तो चांगला होता. मग काय माहिती तो स्नेहाला अस का म्हणाला ते..."

पाटील -" त्याच राधा च्या खूनामध्ये हाथ असणार ."

अर्जुन -" नाही सर .... अस असल तर तो स्नेहाला कधीच भेटला नसता."

पाटील -" बरोबर म्हणालास."

मोबाईल मध्ये बोलून चव्हाण आला.

चव्हाण -" सर राहुलचं मोबाईल एक बंद पडलेल्या फॅक्टरी मधलं लोकेशन दाखवत आहे."

अर्जुन -" सर त्याला काहीतरी माहिती असणार त्याला जाऊन विचारायला हवं."

पाटील -" चला चव्हाण गाडी काढा."

     सगळे गाडीमध्ये बसले . एका तासात ते त्या फॅक्टरीच्या बाहेर पोहोचले . ती एक बंद पडलेली फॅक्टरी होती. सगळीकडे शांत होत . राजाला वेगळा गंध सापडला. तो भोकु लागला.

अर्जुन -" राजा गो..."

        राजा पळत त्या फॅक्टरीमध्ये गेला. बाकी सगळे त्याच्या मागे मागे गेले. जसे ते आत गेले . पुढील नजारा बघून सगळे थक्क झाले.???????? कोणीतरी राहुलला फाशीवर वर लटकवले होते. त्याच गळा सुद्धा चिरडला होता . त्याच्या गळ्यातून रक्त खाली पडत होता. पाटीलनी डोक्यावरचं कॅप काढली. त्या बॉडी मागच्या भिंतीवर लिहिलेलं होत. " प्रलय आणेवाला है " ..... सगळे त्या भिंतीवरच्या वाक्याकडे बघत होते.... आता ही केस डब्बल मर्डर चा झाला होता.
**********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढचा भाग लवकरच... आवडल्यास नक्की कमेंट करा... रेवियू द्या... धन्यवाद ????????