राजार्जून भाग - ७

The mistry of Pralay is still confused for Arjun.

        खाली पडलेला व्यक्तीच्या डोक्यावर तो गन धरतो... आणि म्हणतो... ," प्रलय आनेवाला है...." एवढं म्हणून तो ट्रिगर दाबतो आणि अख्खी इमारत जी मोकळी होती तिथे गोळीचा आवाज घुमु लागली.
+++++++++++++++++++++++

       स्नेहा पवारच्या घरांमध्ये गर्दी जमू लागली होती. इन्स्पेक्टर पाटील गौरीला ( स्नेहा पवारची आई ) घेऊन घरात गेलेले होते. बेशुद्ध होऊन तिला आता १५ मिनिटे झाले होते. पाटील डॉक्टरांना फोन करणारच होते , पण चव्हाण गौरीच्या तोंडावर पाणीचे काही थेंब शिंपडला . तेंव्हा ती शुध्दीवर आली. ती आजूबाजूला बघत होती , तर तिथे पाटील आणि चव्हाण व्यतिरिक्त आजबाजुचे सुद्धा तिच्या घरी आलेले होते. गौरी त्या सगळ्यांना बघताच रडु लागली. 

गौरी -" स्नेहा... स्नेहा कुठ आहे ???... स्नेहाला काय झालं???"

     जेंव्हा तिला परत पाटील स्नेहा बाबतीत कळवल तेंव्हा ती मोठ्यांनी रडु लागली.... 

पाटील -" मॅडम.... आम्हाला माहिती आहे की तुम्हाला खूप दुःख झालेला आहे पण माझी ड्यूटी आहे . त्यामुळे प्लीज मला को - ऑपरेट करा..."

      थोड्यावेळाने गौरी शांत झाली. तिला शांत पाहून पाटील तिला प्रश्न विचारू लागले.

पाटील -" मला सांगा की स्नेहा तुम्हाला जाताना काही सांगितली का???"

गौरी शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती. 

गौरी -" ती म्हणाली होती की एक महत्वाचं काम आहे . २ तासांनी येईन..."

पाटील -" जाताना काही घेऊन गेली होती का??.."

गौरी -" काही फाईल्स आणि  पर्स घेऊन गेलेली होती.."

पाटीलला थोडा अजीब वाटलं . कारण स्नेहाच्या बॉडी जवळ कोणतेही बॅग सापडली नव्हती. 

पाटील -" ती कॉलेजला जात असताना ती अजुन कुठ काम करत होती का??"

गौरी -" होय... ती अगरवाल रिसर्च लॅबमध्ये इंटरशिप करत होती..."

पाटील -" किती दिवसापासून इंटरशिप करत होती??"

गौरी -" जवळजवळ ६ महिन्यापासून करत होती...,????????"

पाटील -" तीच वागणूकमध्ये काही फरक वाटत होत का??"

गौरी -" म्हणजे???"

पाटील -" म्हणजे तुम्हाला वेळ न देणे , तुमच्याशी चांगलं न वागणे वैगरे??"

गौरी -" नाही... उलट आम्ही आजकाल खूप खुशीत राहत होतो... ती लॅबमध्ये रिसर्च करत होती आणि तिला पगार सुद्धा मिळत होता.... तिचे बाबा तर कधीच आम्हाला सोडून गेले होते. फक्त आम्ही दोघेच होतो... "

पाटील -" ह्ममम... तुम्हाला हरकत नसेल तर स्नेहाच रूम आम्ही चेक करू शकतो??"

गौरी -" हो .. ती रूम तिची आहे... "

    गौरी स्नेहाच्या रूमची दिशा दाखवली. चव्हाणला इशारा देत उठला. इशारा समजताच चव्हाण पाटीलसोबत रूममध्ये जाऊ लागला. 

    रूम तशीच होती जशी एक मुलीची असावी. पिंक कलर वॉल , वॉलवर पोस्टर लावलेले होते. रूम अजुन अस्ताव्यास्त पसरलेला होता , जस का स्नेहा काही तासांपूर्वीच इथून गेली असावी. बेडवर लॅपटॉप उघडाच होता. जाताना ती नक्कीच लॅपटॉपवर काम करत असावी. पाटील एकही क्षण वेस्ट घालवता रूम चेक करू लागला . पण चेक करताना तो हातमोजे घालायला विसरला नाही . त्यांना बघून चव्हाणसुद्धा त्याच्या कामाला लागला. पाटील सगळ्यात आधी लॅपटॉप चेक करू लागला. लॅपटॉप ओपनच होता तर त्याची दाट शक्यता होती की तिच्या बाबतीत महत्वाचं एविडेन्स त्यात सापडेल.
      
        पाटील लॅपटॉप ऑन करण्याचा प्रयत्न करू लागताच त्याला कळाल की लॅपटॉपला पासवर्ड आहे. लॅपटॉप आता एकच जण ओपन करू शकत होता , तो म्हणजे संतोष . त्यामुळे तो लॅपटॉप सोबत घेऊन जाण्याचा विचार करू लागला. चव्हाण बाकीच्या ठिकाणी तपास करू लागला होता. जसे टेबलावरचे काही पुस्तक , त्याच टेबलच्या खाली असलेली ड्रॉवर इत्यादी तो चेक करू लागला. पाटील लॅपटॉप सील करून ठेवली , जेणेकरून तो जाताना घेऊन जावा. त्यानंतर तो रूममधील बाकीच्या ठिकाणी शोध सुरू केला. 

पाटील -" काही सापडल का , चव्हाण ??"

चव्हाण -" नाही साहेब... अजुन तरी नाही सापडली. " 

पाटील -" चव्हाण ... मला सांगा समजा तुम्ही ईलिगल काम केलास आणि तुला एविडन्स मिठवायचा असेल , तर तू काय करणार??"

   पाटील विचारपूर्वक हा प्रश्न केला होता. 

चव्हाण -" मी ते फेकलो असतो... "

     चव्हाणच्या तोंडातून हा उत्तर ऐकल्यावर पाटीलची ट्यूब पेटली. तो लगेचच टेबलाजवळ असलेला कचऱ्याच्या डब्यात शोध घेऊ लागला. त्या कचऱ्यात तो एक अश्या काही एविडेन्स शोधत ज्यांनी स्नेहाच्या मरणाचं कारण समजेल. खूप सारे फाटलेले कागद त्या कचऱ्यात होते. शोध घेत असताना त्याचा लक्ष एक चुरघळलेल्या कागदावर गेला. तो कागद नीट करून बघू लागला. 

पाटील -". हे तर डेबिट कार्डच्या बिल आहेत.." 

चव्हाण पाटील बोलल्यामुळे त्या कागदाकडे बघू लागला.

चव्हाण -" अरे तिच्या...... १,००,००० चा बिल...????????????????"

पाटील -" एवढं जर ती पैसे खर्च करत होती , तर तिच्याकडे अजुन किती पैसे असेल ??? ..."

पाटील थोडा विचार करू लागला. 

चव्हाण -" साहेब... हिचा अकाउंट डिटेल्स काढावं लागेल.."

पाटील -" हा बिल वर डेबिट कार्डचा नंबर आहे... पहिला हे काम करा... डेबिट कार्डचा डिटेल्स काढा.."

पाटील ऑर्डर सोडला तसा चव्हाण ते बिल घेतला. 

चव्हाण - " हो साहेब..."

पाटील लॅपटॉप आपल्या ताब्यात घेऊन परत खाली येऊ लागला. खाली येताच तो गौरीला प्रश्न करू लागला. 

पाटील - " मला सांगा... आजकाल स्नेहा खुशीत होती असे तुम्ही म्हणत होतात... तर कशाप्रकारे खुशीत होती ती??"

गौरी -" म्हणजे ???"

चव्हाण -" म्हणजे की ती खुशीत होती ते तुम्हाला कसं कळाल?"

गौरी -" मी काही वर्षांपूर्वी लोन घेतली होते. स्नेहाच्या शिक्षणासाठी म्हणून....  काही दिवसापूर्वी ती ते लोन क्लिअर करून टाकली. "

पाटील -" तुम्ही तिला विचारल नाही का ? की कुठून आले एवढे पैसे??"

गौरी -" विचारले... ती म्हणाली की  स्कॉलरशिप मधून आणि पगारातून सेव्ह केलेले पैसेतून ती लोन फेडली.."

पाटील -" किती लोन काढला होता तुम्ही?"

गौरी -" २,००,००० रुपये .."

चव्हाण -" एवढे पैसे ती फेडली??..???????????? "

गौरी -" हो..."

पाटील - " बर... आम्ही जे लॅपटॉप घेऊन जात आहे... एविडेन्स म्हणून .. तुम्हाला काही प्रॉब्लेम ??"

गौरी  मान हलवत इशारा दिला. 

पाटील - " ओके... आम्ही तपासणी करणार आहोत... तुमची गरज पडली तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ. तो पर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाता कामा नये."

गौरी -" होय सर.."

एवढं बोलून चव्हाण आणि पाटील बाहेर पडले. चव्हाण गाडीमध्ये बसत असताना काही प्रश्न करू लागला. 

चव्हाण -" साहेब ... स्नेहा एवढं लोन कसा काय फेडल असेल??... म्हणजे बघा ना... माझी ही नोकरी आहे . तरी सुद्धा मी एकत्र एवढे पैसे फेडल नसत.."

पाटील -" तेच तर खटकताय मला चव्हाण... तुम्ही त्या डेबिट कार्डच्या डिटेल्स मागवून घ्या. त्यावरूनच काहीतरी कळेल आपल्याला... "

चव्हाण -" होय साहेब... पण मला वाटतं ती वेगळच काम करत असावी म्हणून एवढे पैसे तिच्याकडे आलेले होते." 

पाटील - " ते तपासणी केल्यावरच कळणार ना.."

चव्हाण -" हो साहेब..."

    दोघेही पोलिस स्टेशनला गाडी घेऊन जात होते. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली होती. 

पाटील - " चव्हाण .... पी. म चा रिपोर्ट कधी येणार आहे??"

चव्हाण - " साहेब .... उद्या ते रिपोर्ट्स तुमच्या हातात असतील..."

पाटील - " बर... "

     पाटील आपल्या टेबलावर जाऊन बसत असताना मोबाईल काढून कुणाला तरी कॉल लावत होते. कॉल पिक अप झाल्यावर पाटील विचारपूस करू लागले.

पाटील -" हॅलो.... संतोष .."

संतोष -" हा... बोला सर..."

पाटील -" त्या फाइलव्दारा काही कळाल का??"

संतोष -" हा सर.... खूप मोठा लोचा आहे सर..."

पाटील -" म्हणजे ???"

संतोष -" म्हणजे सर.... त्या साठी इतिहासात जावं लागेल.."

पाटील -" डिटेलमध्ये सांग..."

संतोष -" अस सांगता येत नाही सर.... भेटल्यावर सांगतो.."

पाटील -" ओके... बर स्नेहाच्या घरातून मी लॅपटॉप एविडेन्स म्हणून जप्त केलेला आहे . पण त्याला पासवर्ड आहे . तू क्रॅक करू शकतो ना??"

संतोष -" हो सर.... ये तो मेरे बाये हाथ का खेल है..????"

पाटील -" बर... मी घेऊन येतोय... "

संतोष -" ओके सर..."

कॉल कट करून पाटील टेबलावरील फाईल घेऊन स्टडी करू लागतो. 

      रात्रीचे आठ वाजत आलेले होते. पाटील अजुन स्टेशनमध्ये चव्हाण यायची वाट बघत होते. कंटाळून ते संतोषकडे जाण्यासाठी बाहेर आले , तर वाटेत चव्हाण येताना दिसला. 

पाटील -" चव्हाण... एवढे का उशीर झाला?"

चव्हाण -" साहेब... तो रिपोर्ट तयार करून देताना उशीर  झाला.... हा घ्या..."

एवढं बोलून चव्हाण हतातली फाईल पाटीलला दिला. 

पाटील -" बर चल... संतोषकडे जायचं आहे ??"

   पाटील आणि चव्हाण दोघेही अवघे दहा मिनिटात संतोष च्या घरी पोहचले. 

संतोष - " या सर..."

पाटील -" चल संतोष ... हे घे लॅपटॉप आणि कामाला लाग..."

  अर्जुन , चव्हाण आणि पाटील फाईल वाचण्यात बिझी झाले. 

पाटील -" चव्हाण .... स्नेहाच्या बँकमध्ये खूप ट्रांझेशन झाले आहेत... ते पण लाखोंचे ट्रांझेशन झाले आहेत... "

चव्हाण -" हो साहेब... आणि हे बघ अकाउंट नंबर ज्यातून स्नेहाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाले आहेत."

पाटील -" कुणाच्या नावावरून हा अकाउंट आहे??"

चव्हाण -" साहेब... हा तर इंटरनॅशनल अकाउंट आहे.." 

पाटील -" कुठल्या देशातून ??"

चव्हाण -" चीनमधून..."

पाटील -" चीनमधून एवढे पैसे स्नेहाच्या अकाऊंटमध्ये कशाला ट्रान्स्फर केला असावा ??"

तेवढ्यात संतोष चा आवाज आला.

संतोष -" सर.... लॅपटॉप इस रेडी टू युज.."

    त्याच हे बोलणं ऐकून पाटील ,चव्हाण आणि अर्जुन तिघेही लॅपटॉप जवळ आले. संतोष लॅपटॉपच्या फाईल्स चेक करू लागला होता. त्या फाईल्स मध्ये स्नेहाच्या पर्सनल फोटोज् होते. संतोष प्रेकॉस्शन म्हणून एक पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लागला. जस जस तो फाईल्स ओपन करत होता तसे तसे तो पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी करून घेत होता. लॅपटॉपला नेट कनेक्ट करून तो स्नेहाच्या सगळे सोशल मीडिया अकाउंट चेक केला तर तिथे सुद्धा काहीच क्लू सापडला नाही.

पाटील -"  संतोष... तिचा इमेल्स चेक कर..." 

संतोष -" हो सर..."

    मेल्स चेक करत असताना खूप इमेल्स चीनच्या अकाउंटवरून आलेले होते. संतोष लगेचच कॉपी करू पाहत होता. पण ते इमेल्स फक्त अकाउंट ट्रान्स्फर चे होते. सर्वात अगोदरचे इमेल्स तो चेक करू लागला. एका ईमेल मध्ये वॉर्निंग असं नाव लिहिलेला होता. 

   संतोष तो ईमेल ओपन करू लागतो . तर तिथे एक डॉक्युमेंट जोडलेले होते. तो डॉक्युमेंट ओपन करतो , तर अचानक लॅपटॉप हँग पडू लागतो. लॅपटॉपच्या स्क्रीनवर फक्त महाराष्ट्राचा नकाशा येतो आणि त्याच्यावर , ' Pr LaY '
असे लिहिलेला होता. सगळे त्याकडेच बघू लागतात . ती स्क्रीन बंद चालू होत होती. सगळे निरखून त्याला बघत होते. अचानक एक स्पार्क झाला आणि ते लॅपटॉप बंद पडला.

संतोष - " शिट... शीट... "

संतोष लगबगीने लॅपटॉपला कनेक्ट केलेला पेन ड्राईव्ह काढू लागतो.

पाटील -" काय झालं... काय झालं संतोष ..."

संतोष -" सर... लॅपटॉप त्या डॉक्युमेंट मुळे हॅक झाला आणि सगळे फाईल्स डिलीट झाले... शीट..."

अर्जुन मधेच बोलू लागतो.

अर्जुन - " साहेब ... मग आता ??"

पाटील फक्त ऐकत त्या लॅपटॉपला बघू लागले होते...

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

🎭 Series Post

View all