Login

राजार्जुन भाग - ६

One twist comes in the story

पाटील -" एक बॉडी सापडली आहे... "

अर्जुन -" कुणाच ??"

पाटील -" राधा आणि राहुलची फ्रेंड स्नेहा पवार हीच... "

अर्जुन -" काय???"

पाटील -" हो.. आणि तिचा खून पण राहुल सारखाच झाला आहे... एक मेसेज सुद्धा लिहिलेला सापडला आहे... "

संतोष -" काय??"

तेवढ्यात अर्जुन म्हणाला.

अर्जुन -" प्रलय आनेवाला है .."

पाटील -" चव्हाण..."

चव्हाण -" हो साहेब ... "

    चव्हाणला इशारा कळाला. वाट न पाहता तो बाहेर जाऊन गाडी काढला.

पाटील -" अर्जुन ... आपल्याला बॉडीची तपासणी करावी लागेल..."

अर्जुन -" हो साहेब.."

          इन्स्पेक्टर , चव्हाण , अर्जुन आणि संतोष सगळे त्या मर्डर स्पॉटवर पोहचले. एका मोठ्याशा गोडाऊनमध्ये , राहुलचा बॉडी ज्या अवस्थेत सापडली होती त्याच अवस्थेत स्नेहाची बॉडीसुद्धा सापडली होती. तीच गळासुद्धा कापलेला होता आणि बॉडी मात्र फासी लावल्यासारखी एका दोरीनी लटकवली होती . बॉडीच्या मागच्या भिंतीवर रक्ताने मोठ्या अक्षराने मेसेज लिहिलेलं होत ,"  प्रलय आनेवाला है .." त्या बॉडीला बघताच राजा भुंकू लागला. त्याच्या भुंकण्याच्या आवाज पूर्ण गोडाऊनमध्ये घुमत होता. 

पाटील -" अर्जुन... आता मला ऑफिसियली काही करता येईल. ही एक दुसरी केस आहे..."

संतोष -" पण ही केस पहिल्यासारखेच आहे ना?? "

पाटील -" हो ... पण तपासणी आपल्यालाच करावी लागेल ना.."

अर्जुन -" मग आपल्याला तपासणी चालू करावे लागेल साहेब..."

पाटील - " ह्मम... चव्हाण बघा काही सापडत का??"

चव्हाण -" होय साहेब..."

अर्जुन -" राजा ... "

      राजा शेपूट हलवत अर्जुनकडे आला. अर्जुन त्याला डेड बॉडीची वास सुंगावला आणि म्हणाला.

अर्जुन -" राजा गो...."

      राजा एकदा भुकून वास सुंघत फिरू लागला. तो जसा बाहेर सुंघत गेला , तसे त्याच्या मागे अर्जुन सुद्धा जाऊ लागला. बाकीचे मात्र त्या बॉडीच्या आजूबाजूचे वस्तू तपासात होते. राजा एकदमच बाहेर असलेल्या झुडूपात गेला. झाड्यांमध्ये काहीवेळ राजा गायब झालेला होता. अर्जुन राजाला अजुन निरखून बघू लागला. तेवढ्यात राजा अर्जुनला बघून भुंकला. अर्जुन त्याला बघताच पळत त्याच्याकडे गेला . तिथे बघतो तर एक रक्ताने माखलेली चाकू पडलेली होती. अर्जुन चव्हाणला हाक मारून बोलावला. चव्हाण रुमालनी ती चाकू घेऊन इन्स्पेक्टर पाटीलकडे आला. 

अर्जुन -" साहेब ... याच चाकुनी स्नेहाचा गळा कापला असावा. "

पाटील -" ह्मम.... चव्हाण याला लॅबमध्ये पाठवा आणि सांगा अर्जंट आहे लवकरात लवकर यावरच्या ब्लडचा रिपोर्ट हवी आहे.."

चव्हाण -" हो साहेब..."

     तेवढ्यात अजुन एकदा राजा भुंकण्याचा आवाज आला. सगळे त्या आवाजाच्या मागे जाऊ लागले. बाहेर जाताच राजा झुडपाच्या मागे असलेल्या झाडाखाली उभा होता आणि भुंकत होता. बाकीचे झुडपाच्या मागे उभे होते आणि अर्जुन राजाकडे झुडपातून मार्ग काढत जाऊ लागला. अर्जुन पाहतो तर इथे काही फाईल्स पडलेले होते.  अर्जुन त्या फाईल्स चेक करू लागला. त्याला काही कळत नव्हता तर तो पाटीलला बोलावू लागला.

अर्जुन -" साहेब ... इथे या..."

पाटील राजाकडे जात म्हणाला.

पाटील -" काय आहे ???"

अर्जुन -" साहेब काही फाइली आहेत..."

     पाटील त्या फाईल्सना चेक करू लागला. त्या फाइल्सवर काही नाव होते जसे ,' अगरवाल केमिस्ट रिसर्च लॅब ' आणि ' जेनेटिक्स रिसर्च लॅब ऑफ जर्मनी ' ....

संतोष -" हे दोन फाईल्समध्ये तर काही डाटा आहेत. कसले आहेत हे??"

पाटील -" अस वाटत आहे की काही रिसर्चचे डाटा आहेत....
"

संतोष -" पण ही फाईल इथे कशी काय???"

अर्जुन -" स्नेहाच बॅकग्राऊंड काय आहे ??"

चव्हाण - " चेक करावं लागेल..."

पाटील - " मग करा चव्हाण..."

चव्हाण -" हो साहेब..."

चव्हाण मोबाईल काढला आणि कॉल लावला.

संतोष -" अगरवाल रिसर्च लॅब ... हे कुठं तर ऐकलय .."

     संतोष आठवण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात अर्जुन म्हणाला 

अर्जुन -" ही तीच लॅब आहे , ज्यात राधाची आई म्हणजे ऋचा काम करत होती..."

पाटील -" ती जेनेटिक्स स्पेशालिस्ट होती ना?? "

तेवढ्यात चव्हाण कॉल कट करत आला आणि म्हणाला .

चव्हाण -" साहेब .. कळाल.. ही स्नेहा  जेनेटिक्समध्ये डिग्री घेत होती आणि इंटरशिप रिसर्च लॅबमध्ये करत होती..." 

अर्जुन -" कुठल्या ??"

चव्हाण -" अगरवाल रिसर्च लॅब ...."

ते ऐकताच सगळे चव्हाणकडे बघू लागले.

अर्जुन -" साहेब .. काहीतरी लिंक आहे या फाईल्स आणि ऋचाच कीडनेप मध्ये... ते शोधायला हवं.."

संतोष -" ते फक्त या फाईल्समधले डाटामुळेच कळणार .."

अर्जुन -" साहेब कोणी ओळखीचं जेनेटिक्समधला व्यक्ती आहे ??"

पाटील - " माहिती करून घेतो??... तोपर्यंत आपण या स्नेहाची माहिती काढून घेऊ..." 

चव्हाण -" साहेब... तिचा घरचा पत्ता घावला..."

पाटील -" चला चव्हाण जाऊयात... गाडी काढा .."

चव्हाण -" होय सर..."

अर्जुन - " साहेब ... मी आणि संतोषदा दोघे जेनेटिक्स रिसर्च लॅब ऑफ जर्मनी  याबद्दल माहिती काढून घेतो..."

पाटील -" हो.. चला चव्हाण..."

  पाटील आणि चव्हाण दोघेही जीपमध्ये बसून स्नेहाच्या घरी निघाले. इकडे अर्जुन , राजा आणि संतोष सगळे घरी जाण्यासाठी निघाले. 

       संतोषच्या घरी पोहचताच संतोष पीसी ऑन केला. गूगल वर सर्च करू लागला. जस तो नाव घातला ,' जेनेटिक्स लॅब ऑफ जर्मनी ..' खूप सारे फोटोज् आले. संतोष खूप काही वेबसाइट्स सर्च करू लागला. अर्जुन खुर्ची वर बसून संतोषला सर्च करताना बघू लागला होता. काही आर्टिकल वाचू लागला . त्या आर्टिकलमध्ये एका न्यूजपेपरचे कटिंग्ज लावलेले होते . असेच काही कटिंग बघताना अचानक संतोषला काहीतरी दिसलं. 

संतोष -" अर्जुन... लवकर इकडे ये.."

     अर्जुन संतोषजवळ जाऊन पीसीच्या मॉनिटरकडे बघू लागला , तर तिथे न्यूजपेपर पेपरच्या कटिंगमध्ये ऋचाचे (म्हणजे राधाची आई) काही फोटो छापलेले होते आणि खूप काही डॉक्युमेंट्ससुद्धा होते. जे फोटो राधाच्या बेडरूममध्ये मिळालेले मेमरीकार्डमध्ये होते ते सुद्धा तिथे होते. 

अर्जुन -" हे फोटो इथे कस ??"

संतोष आर्टिकल वाचू लागला. 

    दुसरीकडे इन्स्पेक्टर पाटील आणि चव्हाण स्नेहाच्या घरी पोचले. चव्हाण दरवाजाच्या बाजूला असलेली बेल वाजवू लागला . थोड्यावेळाने एक जवळ जवळ ५० वर्षाची एक महिला दरवाजा उघडली . 

ती -" पोलिस... काय झालं सर??"

चव्हाण -" स्नेहा पवार हीच घर आहे ना??"

ती -" होय..."

पाटील -" आपण कोण??"

ती - " मी तिची आई ' गौरी पवार ' .... काय झालं सर. सगळं ठीक आहे ना??"

पाटील - " एक वाईट बातमी आहे??"

गौरी - " काय सर??...????????"

पाटील -" स्नेहा पवार हीच काल हत्या झाली आहे..."

गौरी - " काय???.... ????????????"

ती बातमी ऐकताच खाली कोसळली.

पाटील - " मॅडम.... "

पाटील आणि चव्हाण दोघेही तिला उचलण्यासाठी पुढे आले.

++++

   दुसरीकडे संतोष अजुन पीसीवरच रिसर्च करत होते. 

अर्जुन -" संतोषदा   .... काही कळाल का??"

संतोष -" यातले काही तर असे कॉन्सेप्ट आहेत जे मला पण कळत नाही..."

अर्जुन -" मग तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहील...????????????.."

संतोष - " जरा वेळ दे..."

अर्जुन -" काही तर कळाल असेल ना?"

संतोष -" हे वाचून एवढच कळाल की १९४४ जर्मनीमध्ये  हिटलर नी एक न्युक्लिअर बॉम्बस्फोट घडवला. पण एक चूक त्यात घडली की रेडिएशन लीक झाली. झालेल्या लिकमुळे तिथले कित्येक नागरिक मारले गेले. पण स्फोट असल्या शहरात घडवला होता जिथे कमी लोक असतील. "

अर्जुन -" त्याचा आणि ऋचाचा काय संबंध ???"

संतोष -" सांगतो... जेंव्हा रेडिएशन लीक झाली तर तिथल्या नागरिकांसोबत तिथले कित्येक प्राण्यांना रेडिएशनचा इफेक्ट झाला. कित्येक पिढ्या अपंग जन्माला झाले. ऋचा जेनेटिक्समध्ये रिसर्च करत होती, तर ती प्राण्यांवर सुद्धा रिसर्च करू लागली होती आणि ती सक्सेस पण होत होती. जर्मनीमध्ये तिला बोलावण्यात आले. तिथल्या जेनेटिक्स एक्सपर्टससोबत ती तिथे काम केली आणि ती सक्सेसफुल झाली. तिथल्या प्राण्यांना ती जेनेटिक्समुळे बर केली. त्यानंतर ती नागरिकांना सुद्धा बर करू लागली. पण बर होण्याच्या वेळ खूप होत होती. "

अर्जुन -" ओहह..."

संतोष -" काय ओहह??... एवढं सोपं नव्हत ते न्युक्लिअर रेडिएशन म्हणजे खूप हानिकारक असत. ती कसं काय यांना बर केली असेल??"

अर्जुन -" ते महत्वाचं नाही आहे???... महत्वाचं प्रश्न हे आहे की ती त्या रिसर्चवरून जर रेडिएशन वर उपाय शोधला असेल तर तिचा किडणाप्पिंग का झाला असेल??"

++++++++

     एक अनोळखी व्यक्ती फोनवर बोलत होता.

तो -" येस बॉस..... पण बॉस तो आमच्या गँग मधला आहे.... ओके बॉस...."

कॉल कट करत तो व्यक्ती खुर्चीवरून उठतो. आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमधून एक गन घेतो. तो व्यक्ती आपल्या केबिनमधून बाहेर आला. तर त्या केबिनच्या बाहेर काही लोक एका व्यक्तीला मारत होते. तो व्यक्ती अगदी रक्तबंबाळ झालेला होता. गन घेतलेला व्यक्ती त्याच्यासमोर आला. 

तो - " तुझी काय चुकी झाली माहिती आहे???"

खाली पडलेला व्यक्ती गन घेतलेला व्यक्तीकडे बघितला.

तो - " तू ते फाईल्स तिथे सोडायला नको होते...."

   खाली पडलेला व्यक्ती एकच वाक्य म्हणतो , " गुरुजी ... तुम्ही मला मारणाराच आहात. पण एक सांगतो तुम्ही चुकीचं करत आहात.... प्रलय येणार नाही ...." 

    खाली पडलेला व्यक्तीच्या डोक्यावर तो गन धरतो... आणि म्हणतो... ," प्रलय आनेवाला है...." एवढं म्हणून तो ट्रिगर दाबतो आणि अख्खी इमारत जी मोकळी होती तिथे गोळीचा आवाज घुमतो..

********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती
 

🎭 Series Post

View all