राजार्जून भाग - ८

Now it's time for war between one unknown person and arjun.

संतोष लगबगीने लॅपटॉपला कनेक्ट केलेला पेन ड्राईव्ह काढला.

पाटील -" काय झालं... काय झालं संतोष ..."

संतोष -" सर... लॅपटॉप त्या डॉक्युमेंटमुळे हॅक झाला आणि सगळे फाईल्स डिलीट झाले... शीट..."

अर्जुन मध्येच म्हणाला .

अर्जुन - " साहेब ... मग आता ??"

    पाटील फक्त ऐकत त्या लॅपटॉपला बघू लागले होते. त्यांच्या हातून एक महत्त्वाचं एविडन्स गेलेलं होत. ते असेच विचार करत होते , तर पाटीलला शांत बघत चव्हाण म्हणाला .

चव्हाण -" साहेब ... आता ??"

पाटील -" माहिती नाही... पहिला आपण स्टेशनला जायला हवं. तिथे आपल्याला एका व्यक्तीला भेटायचं आहे ."

चव्हाण -" कोण सर ??"

पाटील -" तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल . अर्जुन आणि संतोष तुम्ही दोघंसुद्धा चला. "

संतोष - " ओके सर..."

संतोषच्या त्या वाक्याने अर्जुनसुध्दा मान हलवत होकार दर्शवला. 

अर्जुन - " राजा ... चल..."

एवढ म्हणताच निवांत बसलेला राजा उठून शेपूट हलवत भूंकला. शेवटी पाटील इन्स्पेक्टर कॅप घालत म्हणाले.

पाटील -" चव्हाण गाडी काढा." 

    ऑर्डर मिळताच चव्हाण गाडी काढण्यासाठी गेला. सगळे संतोषच्या घरातून बाहेर पडले . खाली येताच सगळे पोलिस स्टेशनला रवाना झाले. 

   काहीवेळाने गाडी स्टेशनसमोर उभी राहिली. क्रमाक्रमाने सगळे त्यातून बाहेर येऊन स्टेशनमध्ये जाऊ लागले . सर्वात आधी इन्स्पेक्टर पाटील आणि त्यानंतर बाकी सगळे केबिनमध्ये येऊ लागले. पाटील आपल्या सीटवर बसताच त्यांच्या टेबलावर असलेला फोन वाजू लागला. एक रिंग वाजताच पाटील ते फोन रिसिव्ह केले आणि बोलू लागले. 

पाटील -" हॅलो....... ते आले आहेत काय???"

पुढून काहीतरी उत्तर ऐकल्यावर , थोडा विचार करून पाटील म्हणाले.

पाटील -" बर... पाठवून द्या आत.."

    अस म्हणताच केबिनमध्ये असलेले सगळ्यांच्या तोंडावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं की कोण येणार आहे??... थोड्यावेळाने एक मधुरसा आवाज केबिनच्या दारापासून आला.

ती - " May I come in sir??"

      मुलीच आवाज ऐकताच संतोषच लक्ष तिच्याकडेच वळली.  तिथे एक मुलगी उभी होती. जिच्या हातात एक फाईल होती. तिच्या त्या शॉर्ट अँड सिल्की केसांना बघून संतोष फक्त आता बेशुध्द होणारच होता . तिचे त्या डोळ्या वरील स्पेक्ट्सला बघून कोणीसुद्धा तिला "क्युटी" अस नाव दिल असत. ती दिसतच होती इतकी "क्यूट"  तर संतोष काय इतर कोणताही मुलगा असता तर तेंव्हाच घायाळ झाला असता. तो सुंदर अश्या मुलीकडे बघत हरवलाच होता तेवढयात राजा भुंकुन त्याच स्वप्न भंग केला. 

         पहिल्यांदाच संतोषला राजाचा राग आला होता. 

पाटील -" Come in..."

ती घाबरतच पाटीलच्या टेबलाजवळ आली . 

पाटील -" चव्हाण ... ही जान्हवी आहे. नुक्लियर रिसर्च करणारी स्टूडेंट आहे. ही आपल्याला या केसमध्ये हेल्प करणार आहे."

संतोष उत्साहात मोठ्या आवाजाने म्हणाला .

संतोष -" होय का??...???????? "

  त्याच्या आवाजानेच जान्हवी घाबरली आणि स्वतःच स्पेक्ट आणि हातात असलेले फाईल्स सांभाळली आणि हळू आवाजात म्हणाली.

जान्हवी -" हो.."

पाटील -" जान्हवी .... तुला मी आम्हाला मिळालेल्या फाईल्स पाठवले होत्या... काही कळाल का? "

जान्हवी -" हो सर.... ऋचा अगरवाल ही एक जेनेटिक सायंटिस्ट होते. जेंव्हा जर्मनीमध्ये १९४४ मध्ये अणुबॉम्ब चाचणी केलं गेलं. तेंव्हा रेडिएशनमुळे तिथल्या लोकांवर परिणाम झाला. त्यांचे पुढील जनरेशनवर सुद्धा परिणाम दिसू लागले . पण ऋचा मॅडम जेंव्हा रिसर्च ( २००६) सुरू केले. तेंव्हा त्यांना कळाल की डी. एन. ए मध्ये जेनेटिक बदल घडवून लोकांना बर करू शकतो. त्यामुळे ते त्या कामात लागले." 

पाटील -" मग त्यांचं किडनेप का केलं असणार??"

संतोष -" माहिती नाही....????????????????????????????????"

संतोष अस म्हणताच सगळे संतोषकडे बघू लागले. संतोषची नजर मात्र जान्हवीच्या रूपाला निहारत होती . जेंव्हा त्याला कळाल की इन्स्पेक्टर पाटीलसुद्धा त्याला बघत आहेत. तेंव्हा तो शुध्दीवर वर आला .

अर्जुन -" साहेब.... कोणी कुणाला का कीडनेप करत असतात??"

पाटील -" पैसेसाठी??"

अर्जुन -" पण त्यांचं किडनेप झाल्यावर असा काही फोन नाही आला. "

अर्जुन काहीतरी तर्क लावत बोलत होता. 

चव्हाण -" मग किडनेप कशासाठी झालाय??."

अर्जुन -" त्यांना ऋचा मॅडमकडून काहीतरी हवी असेल ??"

संतोष -" हो.... पण त्यांना फायदा कस होऊ शकत?"

जान्हवी -" एका जेनेटिक सायंटिस्ट पासून काय फायदा असू शकतो...."

अर्जुन विचार करत इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात संतोष म्हणतो.

संतोष -" कदाचित.... त्यांच्यापासून त्यांना काही नुकसान होत असेल...." 

पाटील -" नाही संतोष .... जर नुकसान होत असल असत तर तिला जिवंत ठेवलं नसत..."

जान्हवीला काहीतर आठवल्या सारखं झालं आणि ती मधेच बोलू लागली. 

जान्हवी -" सर.... जर तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं."

पाटील -" काय??"

सगळ्यांचं लक्ष आता जान्हवी कडे लागून होती.

जान्हवी -" १९४४ मध्ये जेंव्हा हिटलर आत्महत्या केला होता . त्याच्या आधी त्याचा एक प्लॅन होता. तो एक न्यूक्लियर बॉम्ब बनवायचा प्रयत्न करत होता. "

संतोष - " हो ... ते तर माहितीच आहे ... त्यात काय विशेष ??"

जान्हवी -" विशेष आहे... कारण तो न्यूक्लियर बॉम्ब जेनेटिकली करणार होता.."

पाटील - " म्हणजे ? "

जान्हवी - " म्हणजे जेंव्हा १९४४ मध्ये अणुबॉम्ब ची चाचणी झाली , तेंव्हा ते तर फक्त  डेमो होती . खरतर तो जेनेटिक वापरून जेनेटिक न्यूक्लियर बॉम्ब तयार करणार होता. त्याचा ब्लूप्रिंट पण तयार होत .  पण , त्याच्या आत्महत्या नंतर ते कुठ गेलं ?? माहिती नाही..."

संतोष -" यातून काय सिद्ध होत??"

जान्हवी -" यातून हे सिद्ध होत की कदाचित ऋचा मॅडमला या बॉम्बच्या निर्माणसाठी किडनेप केला असेल तर..." 

पाटील -" असू शकतो... "

संतोष -" सर... पण ती तर मग आता बाहेरच्या देशात असेल ..."

अर्जुन -" नाही... खून इथे होत आहेत... म्हणजे जे कोणी असेल ते इथेच आले असतील..."

पाटील -" अर्जुन  बरोबर म्हणतोय..."

अर्जुन -" संतोष दा... पी. सी बंद होण्याच्या अगोदर काय दिसत होत..."

संतोष -" महाराष्ट्राचं नकाशा आणि PraLaY अस लिहिलेलं होत."

   अर्जुन पाटीलच्या टेबलावर असलेली डायरी घेतली आणि त्यावर तो प्रलय लिहिला. नंतर केबिनमधील भिंतीवर असलेल महाराष्ट्राचं नकाशा पाहू लागला . इतका वेळ गप्प बसलेला चव्हाण म्हणाला.

चव्हाण -" काय शोधू लागलास..."

अर्जुन -" लिंक..."

थोडा वेळ शोधल्यावर तो वळला आणि म्हणाला 

अर्जुन -" साहेब... PraLaY  या मधील La  म्हणजे लातूर आणि Y म्हणजे यवतमाळ आहे. या शहरात बॉम्बस्फोट होणार आहे..."

चव्हाण -" आणि Pra  म्हणजे?"

अर्जुन -" हेच तर कळत नाहीये..." 

पाटील -" पण... मुंबई , पुणे इतके मोठे शहर सोडून इथे का बॉम्बस्फोट होईल??"

अर्जुन -" साहजिकच साहेब... जर तुम्हाला कळाल की बॉम्बस्फोट होणार आहे , तर तुम्ही पहिला मुंबई , पुणे असल्या मोठ्या शहरात कडक बंदोबस्त करणार... आणि हे दोन शहराचा कोणी विचारसुद्धा नाही करणार..."

संतोष -" सर... वी हेव टू इन्फोरम .."

   तेवढ्यात पाटीलच्या टेबलावरील फोन खणखणला. पाटील वेळ न घालवता रिसिव्ह केला. 

पाटील -" हॅलो..."

पुढील व्यक्ती म्हणतो.

व्यक्ती - " फोन उस बच्चे को दो..."

पाटील -" कोन हो तुम?" 

व्यक्ती -" इन्स्पेक्टर सहाब... वक्त कम है मेरे पास ओर तेरे पास भी, तो चुपचाप उस बच्चे को दे..."

   परिस्तिथीच गांभीर्य लक्षात घेऊन पाटील फोन लाऊड स्पीकर वर ठेवला. 

व्यक्ती -" ओये इन्स्पेक्टर... मैने तुझे बच्चे को फोन देनेको कहा है लाऊड स्पीकर पे रखने को नही कहा ..."

सगळे चकित झाले. कुठूनतरी तो नजर ठेवत होता. पाटील नाईलाजाने फोन अर्जुनला दिला. 

व्यक्ती - " क्या रे बच्चे.... एक लडकी का तो खून हूआ है... क्यू इतना थक रहे हो??... तेरे हाथ से कुछ नही होगा... "

  तो व्यक्ती तसच बोलत होता. अर्जुन त्याचा ऐकत आजूबाजूला लक्ष देत होता. तेंव्हा त्याला कळाल की त्यांच्या केबिनमध्ये सी. सी. टी. वी कॅमेरा लावलेला होता. त्याला लक्षात आल. तो जो कोणी आहे तो इथूनच त्याच्यावर लक्ष ठेवत होता. अर्जुन त्याच बोलणं ऐकत होता. 

व्यक्ती -" अबे स्कूल जा... तेरा ये काम नही है.."

   अर्जुन इतकं वेळ ऐकुन बोलला. तो सुद्धा मुंबईच्या रस्त्यावर राहत होता. त्याला माहिती होत की असल्या माणसाला कसं बोलायचं.

अर्जुन -" क्यू बे फट रही है क्या?..."

   एवढ बोलून अर्जुन हसू लागला. त्याच्या एका वाक्यावर त्याचा तोंड काही सेकंदासाठी गप्प झाला. 

व्यक्ती -" अे बच्चे...  मेरे पास आणे की जरुरत तुझे नही पडेगी. क्यूकी तू नही बचनेवाला है... तू ही क्या  पुरा महाराष्ट्र जलेगा... "

अर्जुन गांभीर्य पने ऐकत होता... 

व्यक्ती -"  बचा सकते हो तो बचाव इस महाराष्ट्र को.. 2 दीन है तुम्हारे पास..."

एवढ बोलून अर्जून च्या उत्तराची वाट बघत बसला....

अर्जुन हसतच उत्तर दिला .

अर्जुन -"  चल झुटा.. ????????????.."

      एवढ बोलून पुढचा व्यक्ती रागातच फोन ठेवला.. आता एक युद्ध छेडून झालेली होती... १५ दिवस राहिलेले होते...

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

🎭 Series Post

View all