राजा-राणी भाग-३

राजा-राणी ही महेश आणि लक्ष्मीच्या प्रेमाची कथा आहे. प्रेम जेवढं माणसाला सुख, समाधान, आनंद देतं..... तेवढंच किंबहुना त्याहून जास्त दुःख, यातना, वेदना देतं...... असं म्हणतात "सुख किंवा दुःख हे व्यक्तीच्या मानण्यावर असतं."


क्रमशः.......
आपण मागील भागात पाहिले की महेश नोकरीसाठी शहरात आला. मित्राकडे राहू लागला. अगदी आठवड्याभरातच तो सगळ्यांचा आवडीचा झाला आणि एकदिवस त्याच्या ऑफिकमध्ये एक सुंदर मुलगी आली.

ती मुलगी मॅनेजरच्या केबिनमध्ये गेली होती. तोपर्यंत बाकीचे सर्व कर्मचारी आले होते. काही वेळाने मॅनेजर व ती मुलगी बाहेर आले. मॅनेजर सर्वांच्या मध्ये आले व म्हणाले, \"आजपासून आपल्या ब्रँच मध्ये एका नवीन सदस्याची भर पडत आहे. ती म्हणजे मिस लक्ष्मी यांची. आपण सर्वजण त्यांचं टाळया वाजून स्वागत करूया.\" लक्ष्मीने सर्वांना हात जोडून नमस्कार केला. \"मिस लक्ष्मी आजपासून लोन डिपार्टमेंट सांभाळतील.\" नंतर लक्ष्मीने तिचा परिचय करून दिला. आम्ही सर्वांनी एकएक करून आमचा परिचय करून दिला.

हळू हळू दिवस जात होते. लक्ष्मीची सर्वांशी मैत्री झाली तशी माझीही झाली. सुरुवातीला तिच्याशी बोलायला जरा कठीण गेलं कारण मी खेडेगावातील साधा मुलगा ती शहरात राहिलेली मॉडर्न मुलगी. तशी ती दिसायला साधीच पण तिचं बोलणं, कामाची पद्धत मॉडर्न. मी सुट्टीच्या दिवशी जेवढं बाहेर फिरता येईल तेवढं फिरायचो कारण मला शहरातल्या नव-नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. उंच उंच इमारती पहायच्या होत्या, मोठं मोठे बगीचे, हॉटेल्स सारं पाहायचं होतं. फिरताना राहुललाही सोबत घेऊन जायचो कारण त्याच्याकडून खूप माहिती मिळायची. त्याला या शहरात येऊन दोन वर्षे झाली होती.

मी ऑफिसमध्ये जास्त कोणाशी बोलत नसायचो आपलं काम भलं आणि आपण भलं तशीही फालतू गॉसिप्स मला अजिबात आवडत नाहीत. एकदिवस मी कामात व्यस्त असताना लक्ष्मी माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी सरप्राईज झालो आणि मी तिच्याकडे पाहताच राहिलो. ती लगेच बोलली, \"ही स्पेशल आद्रकची चहा आहे, कुलकर्णी मॅडमनी मागवली आहे.\" ती निघून गेली मी चहाचा कप घेऊन एक घोट घेतला तर खरचं स्पेशल चहा होती........ चहा पीत असताना माझ्या मनात अनेक प्रश्न घर करू लागले.......\"खरचं ही चहा आपल्यासाठी खूप स्पेशल आहे कारण लक्ष्मीने स्वतः आणून दिली आहे. ऑफिसमध्ये जाता-येता आमची एकमेकांची नजर व्हायची तेव्हा खूप वेगळं फील व्हायचं.... मला माझ्या इतर सहकाऱ्यांकडून समजलं होतं की तिला माझा इतरांना मदत करण्याचा स्वभाव खूप आवडतो.. माझं मनमोकळे पणाने बोलणे, सतत हसर राहणं.... तिला आवडतं म्हणे...... त्याचीच ही पावती नाही ना, या विचारात मी गुंग होऊन गेलो. नंतर मला काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला, दुपारची वेळ होती मी माझं काम करत होतो लक्ष्मी चिट्ठी घेऊन आली त्याच्यावर एक नंबर होता आणि मला म्हणाली, \"सर, जरा यांच्याशी बोलता का?\" मी लगेच बोलून गेलो, \"मी असिस्टंट मॅनेजर बरोबर खूप काही कामं करतो, आता फोनवर बोलायचं पण करू का?\" ती चिट्ठी टेबल टाकून ताडकन निघून गेली...... मी काय बोलून गेलो हे मलाच समजलं नाही बहुतेक दुसऱ्या कोणाचातरी राग तिच्यावर निघाला होता. मी तिचं म्हणणं ऐकून घेण्याअगोदर असं रिऍक्ट झालो. मला खूप वाईट वाटलं...... थोड्यावेळाने ती चिट्ठी घेऊन मी तिच्याकडे गेलो, प्रथमतः तिला सॉरी बोललो, मग सविस्तर विचारलं तर समजलं की, एक व्यक्ती त्याचं कर्ज मंजूर झालं तरी सारखं लक्ष्मीला कॉल करत होती.... लक्ष्मीला याचा खूप कंठाला आला आहे असं तिच्या बोलण्यावरून मला समजलं. मी तिला बोललो, \"नको टेन्शन घेऊ मी बघतो.\"
त्या नंबरचा मी तपास केला तर मला समजलं की ती व्यक्ती एक उद्योजक आहे. मी त्या व्यक्तीला कॉल केला आणि चांगलंच सुनावलं...... त्यांना त्यांची चूक समजावून सांगितली. नंतर लक्ष्मीला कॉल येणं बंद झालं...... दोन तीन दिवसाने मला तिने थँक्स देखील म्हटलं.....

टेबलवर किणीतरी टक-टक करत होत ......तसा मी भानावर आलो. माझ्या हातात चहाचा कप तसाच होता त्यातील चहा मात्र संपला होता....... मी मनातल्या मनात हलकं हसलो. कारण माझ्या मनात लक्ष्मीची एन्ट्री झाली होती........ तशी तिची एन्ट्री खूप दिवसापूर्वी झाली होती परंतु आज ऑफीसिएली...........तशी ती मला खूप आवडतं होती परंतु आपण गावाकडचे ती शहरातली म्हणून मी जास्त सिरियसली घेत नव्हतो........
अशाप्रकारचे माझी आणि लक्ष्मीची स्टोरी सुरू झाली.
मला समजलं की ती तिच्या मैत्रिणींसोबत गर्ल्स होस्टेलवर राहते...... तिचे वडील खूप मोठे वकील आहेत, तिला एक छोटी बहीण आहे. मीही माझी सर्व माहिती तिला सांगितली........ आमच्या ऑफिस नंतरच्या भेटी-गाठी सुरू झाल्या.

क्रमशः.....

लेखक- शाम मोहन भोसले

🎭 Series Post

View all