क्रमशः.......
महेशच्या मामासोबत महेशचा चुलता देखील आहे. ते दोघं एक महिना झालं महेशला शोधत आहेत. शहरामध्ये फिरता-फिरता एका ठिकाणी बसतात. चुलते सहज बोलतात, \"एकदा त्याला फोन लावून बघ लागला तर लागला.\" मामा फोन लावतो. रिंग वाजते गेल्या महिन्याभरापासून मोबाईल बंद होता आता रिंग तरी वाजतेय म्हणून त्यांना थोडासा आनंद होतो. .......इकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस महेशची चौकशी करत आहेत. त्याच्या खिशात असणारा फोन वाजतो..... पोलीस त्याला फोन मागतात...... तो फोन बाहेर काढतो बघतो तर मामा कॉलिंग असं दिसतं.... तो पोलिसांना दाखवतो आणि फोन कट करतो आणि मोबाईल खिशात ठेवतो...... हवालदार त्याच्याकडे रागाने बघू लागतो..... तो काही बोलणार तेवढ्यात महेश बोलू लागतो........
\"सर, एवढं सारं प्रकरण झाल्यावर तुम्हाला उत्तर देण्याइतपत कॉन्फिडन्स आलाय माझ्यात.\"
पोलीस, \"मग कर सुरुवात..... सांग नेमकं काय झालं ते?\"
\"सर मी खरं सांगतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.\" महेश बोलतो.
हवालदार बोलतात, \"ये प्रेमवीर, पहिल्यापासून..... अगदी पहिल्यापासून सांगायचं......\"
महेश त्यांच्याकडे पाहू लागतो.
हवालदार, \"हं..... स्टार्ट.\"
महेश एकदा सगळ्यांकडे पाहतो तर सगळेच त्याच्याकडे पाहत असतात......
महेश घाबरत बोलतो, \"ओके ओके..... ठिकय.\"
आणि सांगायला सुरुवात करतो.
नोकरी लागली म्हणून गावाकडील एका ढाब्यावर मित्रांना पार्टी दिली होती. त्या पार्टीत चर्चेदरम्यान एका मित्राचा मित्र शहरात राहत आहे असं कळलं. मग मी जरा निवांत झालो...... कारण कधीही अशा शहरात राहिलो नाही..... आणि शहरात आपले कुणी नातेवाईकही कोणी नाही. त्या मित्राच्या मदतीने राहण्याचा प्रश्न मिटला होता.......राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी लागल्यामुळे पहिली पोस्टिंग या शहरात झाली.....
दुसऱ्या दिवशी आई-वडिलांचे आशिर्वाद घेऊन मी बस, ट्रेन, रिक्षा असा प्रवास करत या शहरात आलो. हे शहर माझ्यासाठी नवीन होतं. मला स्वप्नातल्या गावी आल्यासारखं वाटतं होत...... इथले रस्ते, बाग-बगीचे, उंच उंच इमारती, गर्दी आणि वेगवेगळ्या कार बघून मी आनंदलो होतो.......त्याचबरोबर आई वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं याचा मला अभिमान वाटत होता.....मी रिक्षात असतानाच मित्राच्या मित्राला कॉल केला....तो मला घेण्यासाठी स्टॉप वर येऊन थांबला.......... त्याचं नाव राहुल.... रूमकडे जाता जाता राहुलने एका चहावाल्याला दोन चहा रूमवर पाठवायला सांगितलं...... मी त्याच्याबरोबर रूमवर गेलो......रूममध्ये सामान ठेवलं......थोडा निवांत होणार तेवढ्यात माझी नजर भिंतीकडे गेली .....वेगवेगळ्या पोजमध्ये..... वेगवेगळ्या होरॉइन्सचे फोटोज..... वेगवेगळ्या फिल्म्सची पोस्टर्स .....हे सर्व बघून मी थक्क झालो कारण माझ्यासाठी हे नवीन होतं.......त्यावेळी मी खूप साधा मुलगा होतो अगदी खेडवळ...... अंगात साधा ढगळा शर्ट, साधी पॅन्ट......शहरात येण्याअगोदर मी फक्त स्पर्धा परीक्षा, अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच केला होता.......मी खिडकीजवळ गेलो .....तिथून उंच उंच इमारती दिसत होत्या.......मनाला अगदी प्रसन्न वाटलं......
मी फ्रेश होण्यासाठी जाणार तेवढ्यात दारात चहावाला शंकर आला..... त्याने दारावर टक टक असं वाजवलं व बोलला,\" आय कमइन\". मी त्याच्याकडे पाहत राहिलो. लगेच तो म्हणाला, \"मी आता येऊ.\" राहुल ने ये ये म्हणून आवाज दिला....त्याने माझ्याकडे पाहुन स्माईल केलं व बोलला, \"नमस्कार अंकल.\" मी मानेनेच त्याला उत्तर दिलं. .....त्याने मला व राहुलला चहा दिला आणि बोलला,\" आय मे गो नाऊ.\" .......थोडं थांबून....\"मी जाऊ शकतो.\"....राहुल त्याला बोलला, \"मग काय मुक्काम करायचाय.\" तो लगेच घाईघाईने निघून गेला.....मला थोडं हसू आलं..... राहुल मला बोलला,\"अरे त्याला इंग्रजी बोलायला शिकायचंय.... जेव्हा जेव्हा येतो तेव्हा इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असतो.....
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी माझे देव-देवता यांची पूजा करत होतो...... राहुल मात्र लवकर आवरून बिल्डींगखाली माझी वाट पाहत उभा होता. थोड्यावेळाने राहुलच्या बाईकवरून बँकेत आलो....... माझा पहिला दिवस.... गाडीवरून उतरल्याबरोबर मी आरशात पाहून माझे केस सेट करू लागलो........ राहुल बोलला,\" फर्स्ट डे.\" आतमध्ये गेलो तर वरिष्ठ कोणीही आलं नव्हतं..... फक्त शिपाई होता त्याने नमस्कार केला....राहुल मला बोलला, \"तुला लोन डिपार्टमेंट देतील वाटतं.\".......नंतर हळूहळू सर्व कर्मचारी आले...... मग बँक मॅनेजरने सर्वांना माझी ओळख करून दिली.
आता मी शहरात आणि माझ्या कामाच्या ठिकाणी चांगलाच रुळलो होतो......... एकदिवस मी ऑफिसमध्ये सकाळी सकाळी पेपर वाचत असताना मला आवाज आला..... Excuse Me......मी वर पाहिलं तर एक मुलगी
मला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होती..... मला वाटलं कस्टमर असेल म्हणून मी म्हणालो, \"Yes, Mam How can I help you?\".
\"Where is Managers Cabin\"?\"
मी बोटाने तिला केबिन दाखवलं....... सुंदर, सावळी, स्वज्वल, प्रसन्न चेहरा, लांब केस पाहताक्षणी मला ती भावली......... ती केबिनकडे निघून गेल्यावर मी माझं काम करू लागलो......... ऑफिस मधले कर्मचारी येऊ लागले.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा