राजा-राणी भाग-१

राजा-राणी ही महेश आणि लक्ष्मीच्या प्रेमाची कथा आहे. प्रेम जेवढं माणसाला सुख, समाधान, आनंद देतं..... तेवढंच किंबहुना त्याहून जास्त दुःख, यातना, वेदना देतं...... असं म्हणतात "सुख किंवा दुःख हे व्यक्तीच्या मानण्यावर असतं."
उच्चशिक्षित, प्रतिष्ठित बँकेत, उच्च पदावर काम करणारी लक्ष्मी आपल्या राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न करते. तिची पिंकी(छोटी बहीण) अचानक घरी आल्यामुळे ती वाचते, पिंकी आरडा-ओरडा करते. शेजारी-पाजारी गोळा होतात. थोड्या वेळाने तिचे सर्व नातेवाईक तिथे येतात. ती बेशुद्ध अवस्थेत आहे. मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. काहीवेळात हॉस्पिटलमध्ये पोलीस येतात चौकशी करू लागतात. तर त्यांना समजतं की, लक्ष्मीची आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. आई एका कोपऱ्यात बसून रडत आहे. पिंकी पोलिसांना मोबाईलमधील फोटो दाखवत रडत बोलत आहे की, या मुलामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.. हाच जबाबदार आहे.

पोलिसांना माहिती सांगत असतानाच पिंकीची नजर समोरून येणाऱ्या मुलाकडे जाते. हा तोच आहे त्याचा फोटो तिने पोलिसांना दाखवला, त्याचं नाव महेश..महेश पिंकीच्या दिशेने चालत येत आहे. पिंकी जोरात ओरडते, \"पकडा याला हाच आहे तो\". महेश त्यांच्या जवळ येतो पोलीस त्याला पकडतात. ICU मध्ये असणाऱ्या लक्ष्मीला शुद्ध येते तिची आई लगेच आतमध्ये जाते. महेश पोलिसांना विनंती करत आहे, हात जोडून बोलत आहे की, \"मला फक्त एकदा तिला भेटुद्या. मी तिची माफी मागण्यासाठी आलो आहे......\" पोलीस त्याच ऐकत नाहीत \"प्लिज.....साहेब प्लिज एकदा भेटुद्या..... मग तुम्ही म्हणाल तिकडे यायला तयार आहे मी.\" पोलीस त्याच्यावर ओरडतात, \" गप्प बस तुझ्यामुळे तिने हे सर्व केलंय, जर तिला तू दिसलास आणि तिने जीव बिव सोडला तर. गपगुमान आमच्यासोबत यायचं.....ये टाका रे याला गाडीत.\" पोलीस त्याला घेऊन जातात.

लक्ष्मी इकडे-तिकडे पाहू लागते, ती महेश, महेश असा आवाज देऊ लागते. पिंकी तिच्या जवळ येते व तिला रागात बोलू लागते, \"त्याच्यामुळं तुला एवढं दुःख भोगाव लागलं......तुला एवढा त्रास झालाय.. तरीही तू त्याचंच नाव घेतेस. ताई तुला अक्कल आहे का? त्याच्यामुळे तू आत्महत्येचा प्रयत्न केलास...... मरता-मरता वाचलीस तू .....तुझं नशीब म्हणावं लागेल. शांत राहा जरा.\" लक्ष्मी रडू लागते...... पिंकिला विनंती करू लागते, \" मला एकदा त्याला पहायचंय..... प्लिज मला फक्त एकदा त्याला भेटू दे.\" पिंकी बोलते, \" अगं तुला माहीत आहे ना तो तुला सोडून गेलाय, तो नाही भेटणार तुला.\" .....नाही... तो मला सोडून कुठेही जाऊ शकत नाही तो इथेच आहे.....प्लिज मला एकदा भेटायचंय.\" पिंकी मनात विचार करू लागते की हिला कशी चाहूल लागली तो इथं आल्याची......
लक्ष्मी बेडवरून उठण्याचा प्रयत्न करते, \" त्याचा आवाज ऐकलाय मी, तो इथेच आहे.\" असं बोलून सलाईनचा पाईप काडून टाकते. आरडा-ओरडा करू लागते. तिथे नर्स येते, तिला शांत करते व पिंकीला बोलते, \"यांना आरामाची गरज आहे, प्लिज त्यांना त्रास देऊ नका.\" नर्स गेल्यावर लक्ष्मी परत चिडचिड करायला लागते, पिंकी तिला समजावते, \"ओके, ओके तो आहे इथेच....आपण भेटू त्याला नंतर.\"
\"नाही मला आत्ताच भेटायचंय त्याला.\"
\"आपण त्याला आता नाही भेटू शकत\"
\"का?\"
\"त्याला चौकशीसाठी पोलिसांनी पकडून नेलंय.\" पिंकी बोलते.
\"का?\" परत लक्ष्मी विचारते.
\"का म्हणजे, त्याच्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे\".\"
लक्ष्मी ओरडते...\"मला अत्ताच भेटायचंय त्याला.... मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय.\"
लक्ष्मी उठण्याचा प्रयत्न करते..... तिला भुरळ येते......\"चल मला भेटायचंय..... तू मला घेऊन चल.\" अस बोलत ती बेडवर पडते.
पिंकी बोलते, \"ओके ओके आपण जाऊ भेटायला......तू जरा शांत हो....थोडा आराम कर.\"

इकडे पोलिसांची गाडी रस्त्याने चालली आहे, महेश अगदी रिलॅक्स मध्ये बसला आहे. तो काचेतून बाहेर पाहत आहे. हवालदार त्याच्याकडे रागाने आरोपी असल्यासारखं बघतोय...... महेश एक दोन वेळा त्याच्याकडं पाहून न पहिल्यासारख करतो..... एकदा हवालदाराकडे पाहून हसतो...... हवालदार अधिकच चिडतो..... रागाने महेशकडे पाहू लागतो......
महेशच्या घरी त्याची आई फोनवर बोलत आहे की, \"काही पत्ता लागला का त्याचा?\" समोरील व्यक्ती बोलते, \"सारं शहर पालथं घातलं... पण त्याचा काही तपास नाही लागला.\"
क्रमशः.......

लेखक- शाम भोसले



🎭 Series Post

View all