राजार्जून भाग - ३

One more sad part of the story created by Ramesh agarwal.

        संध्याकाळची वेळ होती. रस्त्यावर वर्दळ सुद्धा कमी होत होती. अर्जुन ,  संतोष  ,पाटील आणि चव्हाण मात्र अगदी शांत होते . एक मात्र एविडेन्स मिळालं होत, त्याला पण ते गमावून बसले होते. त्याची बॉडी पी म ल पाठून सगळे पोलिस स्टेशनला आले आणि विचार करू लागले की  नक्की प्रलय म्हणजे काय?

चव्हाण -" साहेब जितकं आपण खोलीत चालो , तितकेच ही केस फसत  आहे."

पाटील मात्र शांत होते.

अर्जुन -" साहेब ... आपण काहीतरी मिस करतोय ."

पाटील -" तुला अस का वाटत?"

अर्जुन -" साहेब ... समजा प्रलय म्हणजे काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. मग राधाला कोण आणि का मारेल?"

पाटील -" राधा आणि प्रलय यात काहीतरी संबंध नक्की आहे."

चव्हाण -" मग राहुलला का मारल असेल?"

अर्जुन -" तेच तर मला समजत नाहीय ."

पाटील -" अर्जुन ... मला वाटत आता अगरवाल यांना भेटायची वेळ आली आहे."

अर्जुन - " हो साहेब ."

चव्हाण -" साहेब आता गाडी काढतो."   

     पोलिस गाडीमध्ये सगळे बसले . काही मिनिटात "अगरवाल" बंगलाच्या बाहेर गाडी थांबली.  बंगलाच्या समोर खूप सारे गाडी उभे होते. पाटील आणि चव्हाण आत गेले. राजा , संतोष आणि अर्जुन गाडीतच बसले होते . बंगला खूप आलिशान आणि सुंदर दिसत होता . अनेक नोकर काम करत होते. त्यातला एकजण पाटीलला बघून त्यांच्याजवळ येऊन विचारला.

तो -" नमस्कार साहेब .... कुणाला भेटायचं होत ?"

पाटील -" नमस्कार ... अगरवाल आहेत काय?"

तो -" आहेत की .... तुम्ही बसा मी लवकरच त्यांना बोलवून घेतो."   

     पाटील आणि चव्हाण बसून घेतले. चव्हाण त्यांच्या बंगला निरखून पाहत होता. त्याला नवल वाटत होत की इतकं मोठ घर सुद्धा असू शकत. तेवढ्यात राधाचे वडील येताना दिसले.

पाटील -" नमस्कार ..."

रमेश -" नमस्कार साहेब .... मी रमेश अगरवाल ... राधा माझीच मुलगी होती ."

  त्यांचा आवाज रडण्यासारखं वाटत होता.

पाटील -" मला माहिती आहे की तुम्ही अजून दुःखात आहात. पण काय करणार साहेब आम्हाला ड्यूटी करावीच लागते."

रमेश -" ह्ममम.... मी समझु शकतो. बोला साहेब काय विचारायचं आहे तुम्हाला?"

पाटील -" जेंव्हा राधाच मर्डर झालं होत तेंव्हा तुम्ही कुठ होता ?"

रमेश -" मी तेंव्हा मीटिंग मध्ये होता."

पाटील -" म्हणजे रात्री तुमची मीटिंग होती तर?"

रमेश -" तुम्हाला काय म्हणायचं आहे ?... "

पाटील - " मला म्हणायचं आहे की रात्री मीटिंग असतो हे तर मला पटत नाही "

रमेश -" म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की मी राधाच मर्डर केलाय. साहेब मी तिचा बाप आहे . का मारीन मी तिला?"

पाटील -" मला चुकीच समजू नका. जो पर्यंत राधाच गुन्हेगार मिळत नाही . तो पर्यंत माझी सुई सगळीकडे जाईल ."

तिकडे बाहेर अर्जुन अजुन गाडीतच होता.

संतोष -" काय बंगला आहे यार..काय गाड्या आहेत. "

         त्याचा बोलण्याचा अर्जुन वर काहीच परिणाम होत नव्हता. तो मात्र विचार करत होता . त्याला अचानक काहीतरी सुचल आणि न राहून तो बंगलाच्या आत जाऊ लागला. त्याच्या मागे संतोषसुद्धा त्याला हाक मारत जाऊ लागला. तो आत जाताच रमेशच्या समोर बसला.

अर्जुन -" नमस्कार साहेब .... मी अर्जुन "

   सगळे चकित होऊन त्याच्याकडे बघत होते.

रमेश -" हा कोण ?"

पाटील -" हा अर्जुन ..."

अर्जुन -" मला फक्त एकच विचारायचं आहे "

रमेश -" काय?"

अर्जुन -" राधा कोणत्या रूममध्ये राहत होती ?"

रमेश -" का?"

पाटील - " साहेब ... फक्त सांगा कुठला रूम आहे ?"

रमेश -" वरून डावीकडचा रूम "

अर्जुन -" धन्यवाद..."

        एवढेच बोलून तोवर जाऊ लागला . त्याच्या मागोमाग सगळेवर जाऊ लागले. रूम उघडून सगळे आत गेले.

अर्जुन -" साहेब ... जर राधाला अगोदरपासून काहीतरी त्रास असेल तर नक्की इथे काहीतरी सापडेल. आपल्याला सगळीकडे चेक करावं लागेल. "

पाटील -" करेक्ट..."

       चव्हाण , संतोष , पाटील आणि अर्जुन रूम चेक करू लागले.

संतोष -" सर ... कॅन वी चेक द कॉम्प्युटर..."

पाटील -" येस .... "

   संतोष कॉम्प्युटर चेक करू लागला. पीसी ऑन करताच त्याला पासवर्ड मागू लागला.

पाटील -" याला तर पासवर्ड लागेल. "

संतोष -" सर हॅक करू ?"

पाटील -" ओके कर..."

संतोष हॅक करू लागला .

संतोष -" सर .... इट्स रेडी..."

पाटील -" चेक कर.... काहीतरी वेगळ वाटल तर मला पटकन सांग..."

संतोष -" ओके सर..."

      संतोष एक न एक फोल्डर चेक करू लागला. अर्जुन रूम मध्ये आणखीन काहीतरी सापडेल या आशेने रूम चेक करत होता. तेवढ्यात त्याला कॅमेरा आणि डायरी सापडली .

अर्जुन -" साहेब हे सुध्दा चेक करावं लागेल. "

पाटील -" येस... संतोष हे पीसीला कनेक्ट कर... "

        संतोष कॅमेरा कनेक्ट करून चेक करू लागतो. त्यात राधाचे खूप सारे फोटोज् होते. ती जेंव्हा युरोप टूरला गेली होती त्याची आठवण त्या कॅमेरामध्ये कैद होती. त्या टूरचे प्रत्येक क्षण ती त्या कॅमेरा मध्ये कैद केली होती. तेवढ्यात अर्जुनला काहीतरी दिसल.

अर्जुन -" दादा... मागचा फोटो दाखव .."

संतोष मागचा फोटो स्क्रीन वर आणला.

अर्जुन -" साहेब ते बघा ... "

      त्या फोटोमध्ये राधा नी समुद्राच्या समोर काढली होती. त्या फोटोमध्ये राधाच्या मागे एक माणूस तिला बघत होता. पण तो माणूस थोडा दूर होता.

पाटील -" संतोष झूम कर ...."

संतोष फोटोला झूम करू लागला.

संतोष -" सर .... हा तर तो माणूस आहे , ज्याला आपण पाठलाग करत होतो  आणि त्याला कोणीतरी मारल. "

अर्जुन -" साहेब ... काहीतरी लिंक आहे ."

रमेश अगरवाल राधाच्या रूममध्ये आले , तेंव्हा हे तिघे खूप गडबडीत रूम चेक करत होते. रूम अस्ताव्यस्त बघून त्यांचा पारा चढला.

रमेश -" साहेब ... हे काय चालय ?. तुम्ही चौकशी अस करत असता का?... थांबा मी कमिशनरलाच  फोन लावतो.????????"

पाटील -" साहेब ..."

पाटील काहीतरी म्हणण्याच्या अगोदरच तोपर्यंत रमेश कॉल लावला होता.

रमेश -" हॅलो... कमिशनर साहेब ... तुमचे पाटील साहेब विनाकारण आमच्या घरी चौकशी करायला आले आहेत.."

कमिशनर -" त्यांना फोन द्या."

एवढे बोलून रमेश मोबाईल पाटील यांना दिलं.

पाटील -" जय हिंद सर.... "

कमिशनर -" काय चाललंय पाटील..."

पाटील -" सर... राधाच्या मर्डरबद्दल चौकशी करायला आलो होतो."

कमिशनर -"  परवानगी आहे तशी..."

पाटील -" नाही साहेब..."

कमिशनर -" मग लवकरात लवकर निघा .... आणि तुम्ही हे केस सोडा . दुसरे कोणीतरी बघेल."

पाटील -" येस सर... जय हिंद सर.."

पाटील परत फोन रमेश यांना दिलं.

पाटील -" सॉरी सर... चला रे..."

अर्जुन -" काय झालं साहेब .."

पाटील -" तुम्ही पहिला येथून चला..."

         अर्जुन सगळ्यांच्या नजरा चुकवून कॅमेराची मेमरी कार्ड आणि डायरी घेतला. सगळे आता बाहेर आले.

अर्जुन -" काय झालं साहेब ?"

पाटील -" आता मी हे केस नाही घेऊ शकत..."

संतोष -" का ?"

पाटील -" वरून ऑर्डर आलंय..."

अर्जुन -" साहेब अस कस होईल ?"

चव्हाण -" असच असत पोलिस डिपार्टमेंटमध्ये..."

पाटील - " सॉरी अर्जुन...."

      अर्जुन आता खूप उदास झाला होता. सगळे गाडीत बसले. अर्जुनला  आणि संतोषला परत त्यांच्या जागेवर सोडले.

पाटील -" सॉरी अर्जुन..."

    एवढे बोलून ते गाडीत बसून गेले. संतोष , राजा आणि अर्जुन मात्र तिथेच उभे होते.

संतोष -" चला आता मी पण जातो. अर्जुन लगा झालं ते विसर."  

     अर्जुन अजुन गप्पच होता. संतोष निघून गेला. अर्जुनला आता कुणाकडून अपेक्षा उरली नव्हती. तो आणि राजा आता पुन्हाएकदा समुद्राच्या किनारी बसले होते . अर्जुन आता विचार करू लागला.

अर्जुन - ' का ?... का मी काहीही करू शकत नाही... म्हणजे राधाला न्याय नाही मिळणार... नाही अर्जुन तू हार मानून कसं चालेल.... तू महाभारतातल्या त्या अर्जुना सारखा आहेस.... हार न मानणारा... '      तेवढ्यात त्याला डायरीची आठवण आली... तो डायरी काढून वाचू लागला.......

********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

🎭 Series Post

View all