राहुलची बॉडी लटकत होती. त्या बॉडीवर कॅमेराचा प्रकाश पडत होता. कॅमेरामन वेगवेगळ्या अंगेल नी फोटो काढत होता.
पाटील -" चव्हाण ... खाली घ्या बॉडीला... खूप झाले मॉडेलिंग.."
चव्हाण -" हो ... साहेब ."
अर्जुन मात्र त्या भिंतीवर लिहिलेलं अक्षराला बघत होता. त्यावर लिहिलेलं वाक्य जणू काहीतरी त्याला सांगत होते . इन्स्पेक्टर पाटील त्याच्याजवळ आले.
पाटील -" अर्जुन .... काय झालं?"
अर्जुन -" काही नाही साहेब... हे जे काही लिहिलेलं आहे त्यावरून वाटत आहे की काहीतरी मोठ होणार आहे. "
चव्हाण बॉडीला अंबुलान्समधून हॉस्पिटलला पी. एम साठी पाठवून आला.
चव्हाण -" काय म्हणायचं आहे तुला?"
अर्जुन -" म्हणजे साहेब गुन्हेगार दोन प्रकारचे असतात. पहिले जे गुपचूप गुन्हा करतात आणि दुसरे म्हणजे गुन्हा करून तुम्हाला चॅलेंज देतात अशे काहीतरी एविडन्स सोडून जणूकाही ते तुम्हाला म्हणत असतो की ' या पकडून दाखवा मला '.. आणि हा दुसरा प्रकारचा गुन्हेगार आहे."
पाटील -" हमम... प्रलय आनेवाला है ... याचा अर्थ काय ?"
तेवढ्यात दुसरा एक कॉन्स्टेबल आला .
कॉन्स्टेबल -" साहेब ...हे मोबाईल आणि पाकीट सापडला आहे. "
पाटील -" हे तर राहुलचा वाटतोय..... चव्हाण हा मोबाईल घ्या .... यात काय सापडते का बघा ...आणि या नंबरचे आउटगोइंग आणि इन्कमिंग कॉलचे सगळे डिटेल्स मला पाहिजेत लवकरात लवकर.."
चव्हाण -" हो साहेब .."
चव्हाण तो मोबाईल घेऊन गेला . पाटील पाकीट उघडून बघू लागले . त्यात त्याचे लायसेन्स , एे टि एम आणि त्याच्या एक फॅमिली फोटो होता. अर्जुनसुद्धा त्या पकिटकडे बघत होता.
अर्जुन -" साहेब जायचं का?"
पाटील -" कुठ ?"
अर्जुन - " राहुलच्या घरी ..."
पाटील -" तुला पत्ता माहिती का?"
अर्जुन -" त्या लायसेन्स वर असेल ना ..."
पाटील -" हो ना... ????????.. चल.."
पाटील , अर्जुन आणि राजा ( ????????) तिघेही पोलिस गाडीमधून राहुलच्या घरी निघाले.
राहुल ' प्रकाश ' या अपार्टमेंट मध्ये राहत होता. पोलिस गाडी अपार्टमेंटच्या खाली येऊन थांबली. राहुल फ्लॅट नंबर १९ मध्ये राहत होता. पाटील अखेर बेल वाजवली. आतून एक ४५ वर्षाची बाई बाहेर आली.
प्रिया -" ओह... पोलिस... काय झालं?"
पाटील -" राहुल इथच राहतो का?"
प्रिया -" हो."
पाटील -" तुम्ही कोण?"
प्रिया - " मी प्रिया त्याची आई ... का साहेब काय झालय?"
पाटील -" आम्ही आत येऊ शकतो का?"
प्रिया -" हो या ना..."
घर खूप चांगला दिसत होता. अर्जुन त्या घराला नीट निरखून पाहत होता. राजा तर बाहेरच बसला होता.
पाटील -" मॅडम.... एक वाईट बातमी आहे."
प्रिया -" काय?"
पाटील -" राहुलचा मर्डर झाला आहे."
प्रिया -" काय ??..????????????????????????"
प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रिया रडत रडत खाली बसली. तिला एक क्षणासाठी ते खरच वाटल नाही .
पाटील -" मला माहिती आहे की खूप वाईट झाला आहे. पण आम्हाला चौकशी करायची आहे. प्लीज कोऑपरेट करा."
प्रिया तिचे डोळे पुसत म्हणाली.
प्रिया -" विचारा काय विचारायचं आहे ते.."
पाटील - " राहुल सोबत तुमचा लास्ट बोलणं कधी झाल होत ?"
प्रिया -" ३ दिवसा अगोदर .."
पाटील -" तो काय म्हणत होता का ... जस काही इंपॉर्टन्ट .."
प्रिया -" नाही ... तो तसा काही नाही बोलला."
अर्जुन -" तुम्हाला राधा माहिती का?"
प्रिया -" तू कोण ?"
अर्जुन -" मी अर्जुन ..."
पाटील -" तो माझ्यासोबत आहे... सांगा तुम्ही राधा अगरवालला ओळखता का?"
प्रिया -" हो... ती राहुलची मैत्रीण होती."
पाटील -" तिचा सुद्धा मर्डर झाला आहे."
प्रिया -" काय ??????????"
पाटील -" हो... तुम्हाला अजुन कोणावर संशय आहे का?"
प्रिया -" नाही साहेब... तो खूप चांगला होता... ????????"
पाटील -" ओके... तुम्हाला काही कळल तर सांगा.."
प्रिया -" हो..."
पाटील आणि अर्जुन तिथून निघाले. पोलिस स्टेशन पोहचताच चव्हाण त्यांची वाट बघत होता.
पाटील -" काय झालं चव्हाण ?"
चव्हाण -" साहेब राहुलचा कॉल डिटेल्स आल आहे ... हे बघा"
पाटील -" ओह.... म्हणजे राहुलच्या मोबाईल वर ५ दिवसात एक सुद्धा कॉल नाही आला."
अर्जुन -" अस कस शक्य आहे?"
चव्हाण -" म्हणजे ?"
अर्जुन -" म्हणजे साहेब त्याची आई तर म्हणाली की त्यांचा आणि राहुलचा बोलणं ३ दिवसापूर्वी झाला होता. "
पाटील - " म्हणजे काही तरी घोळ आहे?"
अर्जुन -" सर हे रिपोर्ट खोटं असेल तर?"
चव्हाण -" ती आई खोटं असेल तर ..."
पाटील -" नाही चव्हाण .... काहीतरी घोळ आहे. "
अर्जुन -" साहेब... कोणी कंपनीचा माणूस बाहेर इन्फॉर्मेशन देत असेल तर..."
पाटील -" शक्यता नाकारता येत नाही.... चव्हाण एक काम एका हॅकरला बोलावून सर्वर हॅक करून खर रिपोर्ट काढ.. आणि कंपनीमध्ये नेमक कोण आपल्याला रिपोर्ट देत, ह्याचा तपास कर... "
चव्हाण -" ओके सर..."
चव्हाण कडक सल्यूट मारून निघून गेला. तासाभरानंतर चव्हाण एका हॅकर सोबत आला.
चव्हाण -" साहेब .. हा संतोष ... हॅकर आहे."
संतोष -" हॅलो सर..."
पाटील -" बर... संतोष एका नंबर वरच इन्कमींग आणि आउटगोइंग बदलता येत का?... म्हणजे डिलिट करू शकतो का?"
संतोष -" हा सर... जर कंपनी साथ दिली नक्कीच होऊ शकतो."
पाटील - " मग आपण ते परत मिळवता येत का?"
संतोष -" हो सर.. पण कंपनीला कळू शकत... ट्राय करतो सर.."
पाटील -" ट्राय कर"
संतोष त्याच्या लॅपटॉप मध्ये हॅक करत होता. तेवढ्यात संतोष ओरडलाच .
संतोष -" येस ... आय डीड इट"
कित्येक प्रयत्नांनी त्या कंपनीचा सर्वर हॅक झाला होता.
संतोष -" सर त्या नंबर वर ३ दिवसापूर्वी आलेल्या कॉलची हे लिस्ट बघा."
अर्जुन आणि पाटील दोघंही त्या लॅपटॉप वर बघत होते.
अर्जुन -" साहेब हे बघा... त्याची आईचा कॉल नंतर मात्र एकच नंबर वर ४ वेळा कॉल आला होता. म्हणजे राहुल तिथे कुणाला तर भेटायला गेला होता. कोण असेल बरे??...एक काम करा त्या नंबरला आपण ट्रेस करू शकतो का?"
संतोष -" हो ..."
अर्जुन -" डू इट.."
संतोष अर्जुनसारख्या लहान पासून ऑर्डर मिळाल्याने एकदमच पाटील कडे बघत होता.
पाटील -" डू इट संतोष ...डू इट व्हॉट ही जस्ट सेड.."
संतोष मग त्या नंबरला ट्रेस करू लागला.
संतोष -" हे बघा साहेब ... तो आता शिवाजी चौकात आहे. "
अचानक अर्जुन म्हणाला.
अर्जुन -" साहेब आपल्याला जावं लागेल. "
पाटील -" येस... चव्हाण चला गाडी काढा."
पाटील , संतोष, अर्जुन ,चव्हाण आणि राजा गाडी मध्ये बसून शिवाजी चौका कडे निघाले. संतोष लॅपटॉपच्या स्क्रीनवरून ट्रेस करत होता.
पाटील -" संतोष तो कुठ आहे आता?"
संतोष -" सर १०० मीटर वर आहे."
संतोष अचानक एका कडे बोट करत म्हणाला.
संतोष -" सर तो बघा तोच असेल."
वडापावच्या गाडा वर एक दाढीवाला माणूस वडापाव खात होता.
पाटील -" चव्हाण आपल्याला शांतपणे त्याच्याजवळ जाऊन पकडाव लागेल ."
चव्हाण -" हो साहेब."
पाटील -" तू इथेच थांब अर्जुन ..."
अर्जुन - " नाही सर.. मी पण येणार आहे. "
पाटील -" नको ते खूप रिस्की आहे."
पाटील आणि चव्हाण त्याच्याजवळ जाऊ लागले. त्याला त्यांची चाहूल लागली. तो त्यांना बघून पळत सुटला . तो अर्जुन बसलेल्या गाडीच्या दिशेने पळत सुटला . ते बघताच पाटील आणि चव्हाण त्याच्या पाठीमागे पळत सुटले. हे बघून अर्जुन राजा म्हणाला.
अर्जुन -" राजा गो..."
राजा भुंकून त्याच्या पाठीमागे पळू लागला. अर्जुनसुद्धा त्याच्या मागे पळत गेला . तो एका बोगद्यात शिरला. बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला येताच. राजा अगदी वेगात त्याच्यावर उडी मारला . तो खाली कोसळला. अर्जुन लगेच त्याच्यावर उडी मारला.
अर्जुन -" सांग का मारलास राहुलला आणि राधाला ..."
अर्जुन त्याच्या छातीवर बसून त्याला विचारात होता. पाटील , चव्हाण आणि संतोष आता त्याच्या मागे आलेले होते. चव्हाण त्याला थांबवायला गेला पण पाटील त्याला इशारेने त्याला नकारार्थी दर्शवल. तो अर्जुनला ढकलून उभा राहिला आणि हसू लागला.
तो -" काही नाही करू शकत तुम्ही मला. प्रलय आणेवाला है..."
तेवढ्यात त्याच्या डोक्यात गोळी लागली.तो खाली कोसळला.????????????????????... पाटील आणि सगळे त्याच्याजवळ आले. पाटील त्यांच्या डोक्यावर असलेली कॅप काढली. तेवढ्यात त्या माणसाच्या खिशातून मोबाईल वाजू लागला. अर्जुन त्याच्या खिशातून मोबाईल काढला. तो कॉल रिसिव्ह केला . पलीकडून आवाज आला .
आवाज -" अर्जुन.... बहुत अच्छा नाम है... लेकीन तू है ना इस सब मे मत पढ... तू अभी बहुत छोटा है... मे नही चाहता की तेरा भी इसके जेसा हालत हो... मेरा पिछा छोड दे... वर ना सब मरेंगे... "
अर्जुन -" तू कोण है..."
तो हसू लागला .
आवाज -" तू जान के क्या करेगा.... "
अर्जुन -" तेरा प्लॅन क्या है?"
आवाज -" प्रलय आणेवाला है."
तो कॉल डिस्कनेक्ट झाला. अर्जुन शॉकमध्ये होता. कोण असेल हा?????....पाटील आणि सगळे त्या बॉडीकडे बघत होते.....
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच... आवडल्यास नक्की कमेंट करा... शेअर करा ... धन्यवाद...????????????