राजार्जून भाग - १३

All are ready to fight a enemy..

       सगळे जण स्तब्ध होते. बॉम्ब त्यांच्या लोकेशनकडे जात होती. गुरुजी फरार झाला होता. पाटील विचार करत असाच बसलेला होता. संतोष खाली बेशुध्द पडला होता . त्याला उठवत जान्हवी खाली बसलेली होती. 

पोलीस हेड क्वाटर -

       कमिशनरच्या ऑफिसमध्ये पाटील, चव्हाण , संतोष आणि जान्हवी उपस्थित होते. कमिशनर फोनवर बोलणं संपवून फोन ठेवले. 

कमिशनर -" पाटील... काय करून ठेवलात हे? वरून आता फोन येऊ लागले आहेत. "

पाटील -" सर.. तिथली परिस्तिथीच तसली होती. आम्ही काही करूच शकत नव्हतो."

कमिशनर -" पाटील ... तुम्ही एक इन्स्पेक्टर आहात . असेल फालतू रीजन्स सांगू नका. "

पाटील -" पण सर... "

    पाटील वाक्य पूर्ण करणारच होता की कमिशनर त्याला थांबवले.

कमिशनर -" आता तो फरार झालाय. आता कुठे शोधायचं त्याला ?"

संतोष -" पण सर... बॉम्बची लोकेशन माहितीच आहे ना."

कमिशनर - " ती एकच तर आशा उरलाय ." 

जान्हवी -" सर.. तीन बॉम्ब आहेत. म्हणजे तीन टीम आपल्याकडे हवे. "

कमिशनर -" त्याची चिंता सोडा . ते अगोदरच करून ठेवली आहे. पण त्यांना बॉम्बची लोकेशन कसं सांगणार ?"

संतोष -" सर... इथून मी स्क्रीन शेअर करू शकतो. " 

कमिशनर -" हे चांगलं होईल. पाटील.."

पाटील -" येस सर .. "

कमिशनर -" तुम्हाला काय वाटतं तो गुरुजी कुठल्या बॉम्ब जवळ असेल ?"

पाटील -" सर... "

    पाटील विचार करतच होता की जान्हवी पुढे येऊन म्हणाली. 

जान्हवी -" प्रताप गड..."

संतोष -" तुला कसं माहिती ?"

जान्हवी -" तुला आठवत नाही . ऋचा मॅडम म्हणत होत्या की गुरुजी म्हणाला ' मुझे महाराष्ट्र को ही नहीं . महाराष्ट्र की शान को उडाना है. ' आणि महाराष्ट्राची शान म्हणजे.."

संतोष लगेच म्हणाला. 

संतोष -" छत्रपती शिवाजी महाराज... म्हणजे तो प्रताप गडावर असेल."

कमिशनर -" मग ठरलं... पाटील तू आणि तुझी टीम प्रतागडावर जायचं. "

पाटील -" येस सर..."

कमिशनर -" आणि हा... या वेळेस कुठलाही प्रोब्लेम मला नकोय.."

पाटील -" या वेळेस कोणतीही चुकी नाही होणार सर."

कमिशनर -" ठीक आहे.  तीन टीम बनलेली आहे. पाटील तुम्ही तुमची टीम प्लॅनिंग करून गडाकडे निघा . आणि हा तुम्ही तिन्ही टीम कॉन्टॅक्ट मध्ये रहा. मला प्रत्येक क्षणाची रिपोर्ट मिळायला हवं."

पाटील -" तुम्ही काळजी करू नका सर... सगळे रेडी करून पटकन आम्ही निघतो. "

कमिशनर -" ठीक आहे. "

पाटील -" जय हिंद सर."

सल्यूट करून तो जाण्याची परवानगी मागितला. 

कमिशनर -" जय हिंद."

     सगळे त्या ऑफिसमधून बाहेर आले. पाटील लगेच आपली टीमची यादी बनवण्यात बिझी झाला. संतोष आणि जान्हवी तिन्ही बॉम्बच्या लोकेशनची स्क्रीन शेअर करण्यात बिझी झाले. 

     काही तासानंतर तिन्ही टीम आणि संतोष , जान्हवी हेड क्वाटरला जमा झाले. सगळ्या टीमला आदेश देण्याकरता कमिशनर सगळ्यासमोर होते. 

कमिशनर - " ओल टीम्स रेडी?"

सगळे एका आवाजात म्हणाले ," येस सर."

सगळीकडे ती आवाज घुमत होता. त्या आवाजाने माहिती असल असतं की त्यांच्यात किती जोश होता?

कमिशनर -" आज आपली खरी परीक्षा आहे. खूप काही तुमच्यावर डीपेंड आहे. जर हे मिशन फेल झालं. तर पूर्ण महाराष्ट्राच नाही तर पूर्ण देशाला परिणाम भोगाव लागेल. तुम्ही हे होऊ देणार का?"

सगळे परत एका आवाजात म्हणाले , " नो सर..."

कमिशनर -" ओके... संतोष लॉकेशनची शेअरिंग झाली ?"

संतोष -" हो सर... तिन्ही टीमसाठी शेअरिंग झालीय. "

कमिशनर - " सगळे मिशन झाल्यावर भेटू. टीम लीडर तयार रहा."

सगळे मोठ्या आवाजात म्हणाले , " येस सर..."

कमिशनर - " चला... ऑल दि बेस्ट ."

   सगळे जाण्याची तयारी करू लागले. बंदूक , त्याला लागणारी गोळी आणि बाकीचे बुलेट प्रुफ जॅकेट घालून तयार होते. तिन्ही टीम जाण्यासाठी तयार होते. शेवटची तयारी बघून ते सगळे आपापल्या ठिकाणी निघाले. 

    जान्हवी , संतोष , चव्हाण आणि पाटील एका टीममध्ये होते. ते त्यांच्या टीमसोबत प्रतागडाकडे निघाले. बरीचशी रात्र झालेली होती . पण वेळ कमी होती. म्हणून ते लगबगीने रात्रीच निघाले. बाहेर थंडी वाढत होती. 

   संतोष आणि जान्हवी जवळच बसले होते. रात्र खूप झाली होती आणि थंडी मुळे जान्हवीला थंडी वाजू लागली होती आणि दिवसभर थकल्याने ती आखडून झोपली होती. ते बघताच संतोष त्याच्याजवळची जॅकेट तिला घातला. तिला थोडी ऊब मिळू लागली. झोपेत ती संतोषच्या खांद्यावर आली. तीच स्पर्श त्याच्या अंगात नवी स्पंदने निर्माण करत होती . तिच्या बॉब कट केलेली केस त्याच्या तोंडावर येत होती. ती झोपेत खूप क्यूट दिसत होती. तिच्या तोंडावरून त्याच लक्ष भरकटत नव्हती. त्याच्या मनात तिच्याविषयी वेगळीच भावना निर्माण झालेली होती. तिला बघून तो विचार करू लागला. ' ही एकटी राहते , पण किती धेर्याने काम करते. आज ती आमच्यासोबत काही विचार न करता आली. काय पण हो.. हिला मी वाचवणारच.. माझं जीव सुद्धा गेलं तरी चालेल.' तो तिच्या विचारात मग्न झालेला होता. विचार करताना त्याला सुद्धा झोप लागली. तिच्या डोक्यावर तो अलगद डोकं ठेवून झोपी गेला. 


     सकाळची कोवळी ऊन संतोषच्या तोंडावर पडत होती. तो लगेच जागा झाला. जागा होताच बघतो तर बाकीचे पोलिस नाश्ता करत होते. त्याला जरा वेगळच वाटलं. तो आजूबाजूला बघतच होता. इतक्यात जान्हवी म्हणाली. 

जान्हवी - " गूड मॉर्निंग."

तिच्या हातात एक चहाची कप घेऊन आलेली होती. ती त्याला देत म्हणत होती. 

संतोष ते बघून चिडत म्हणाला. 

संतोष -" तुला वाटतं का काही तरी ?.. इथे मिशनवर आलो आहोत. ट्रीप साठी नाही .. "

तो तसा बोलल्याने ती उदास पणे जीपच्या बाहेर आली. तो सुध्दा चिडत बाहेर आला आणि पाटील जवळ जाऊन म्हणाला.

संतोष -"सर... ही वेळ नाश्ता करायची नाहीये. तिथे बॉम्ब आहे आणि आपण इथे नाश्ता करत बसलोय."

पाटील शांतपणे म्हणाला.

पाटील -" संतोष.. शांत हो... काल सगळे काहीही खाले नव्हते आणि विना खाता कोणताही मिशन सक्सेस होत नाही."

हे त्यालाही पटलं. तो सुध्दा काहीतरी खाण्यासाठी घेऊन जान्हवी जवळ आला. जान्हवी उदास होऊन बसलेली होती. तो तिला बघून म्हणाला.

संतोष - " सॉरी... जरा जास्तच बोललो मी.."

जान्हवी - " इट्स ओके..."

अस म्हणत ती सुद्धा खाऊ लागली. 

जान्हवी -" थेंक्स.."

संतोष -" का?"

जान्हवी -" कालच्या जॅकेट मुळे ..."

तो लाजत म्हणाला.

संतोष -" इट्स ओके.."

मग दोघेही हसत नाश्ता करू लागले. 

     सगळं काही आटपून ते परत पुढचा रस्ता पकडले. इतकी मोठी प्रवास करून ते सगळे गडाच्या पायथ्याशी आले. सगळीकडे झाडे होते. आधीच अख्ख गड रिकाम केलेलं होत. सगळी तयारी करून पाटील आणि बाकीचे सगळे आत शिरले. 

पाटील -" अर्धे जण उत्तरेकडे जा आणि बाकी सगळे माझ्यासोबत चला आणि कॉन्टॅक्ट मध्ये रहा."

हे आदेश मिळताच सगळे वेगळे झाले. 

पाटील -" संतोष .. बॉम्ब ची लोकेशन कुठे आहे. "

संतोष - " सर... ५०० मीटरवर आहे."

पाटील -" ठीक आहे... सगळे पटकन चला "

पाटील गन काढून पुढे जाऊ लागला. त्याच्यासोबत सगळे गन काढून पुढे चालू लागले. जान्हवी आणि संतोष त्याच्या मागे जात होते. 

     पाटील उत्तरेकडे गेलेली टीमला कॉन्टॅक्ट करून विचारला. 

पाटील - " काही मिळालं का?"

तिथले हवालदार -" नाही सर.."

पाटील -" काही मिळालं तर ताबडतोब कळवा."

तो -" येस सर.."

पाटील -" काहीतरी गडबड वाटत आहे. "

संतोष -" म्हणजे ?"

पाटील -" इथे तर कोणीही दिसत नाहीये."

संतोष - " मग आता काय करायचं."

पाटील थोडा विचार करत म्हणाला. 

पाटील -" आपल्या टीम पैकी अर्धे इथेच थांबा आणि बाकी सगळे माझ्यासोबत या. संतोष आणि जान्हवी तुम्हीही सोबत या."

    पाटील , चव्हाण , संतोष ,  जान्हवी बाकी ८ हवालदार गडाच्या पायथ्याशी जाऊ लागले. 

   पायथ्याशी पोहचल्यावर ते शोधू लागले. 

संतोष -" सर... इथून ३०० मीटर सांगत आहे."

पाटील -" इथेच असेल."

सगळे शोधू लागले. पुढे जाताच त्यांना एक पडीक अस मोठ घर दिसल . ते बघून पाटील लगेच सावधान झाले. 

पाटील - " सगळे तयार रहा. तिथे खूप जण असू शकतात. तयार रहा. "

      सगळे तयार होऊन पुढे जाऊ लागले. तिथे खूप झाडे होते. सगळे सावधपणे आत शिरले. इतक्यात......

**********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच... आजचा भाग कसं वाटलं नक्की कळवा... पुढचा भाग शेवटचा असेल.. नक्की कळवा ... पुढे काय होईल हे सुध्दा कमेंट करून सांगा.. कमेंट खूप कमी येत आहेत... प्लीज नक्की कळवा कसं वाटलं... मी पहिल्यांदा थ्रिलर स्टोरी लिहीत आहे ... धन्यवाद ????????????????

🎭 Series Post

View all