प्रेमाने सर्व साध्य होत ( राज - श्रद्धा - प्रेमकथा )

Raj Shradha

राज - हॊ बोलनां आता अजून किती वेळ घेणार आहेस विचार करायला..

श्रद्धा - फक्त एका अटीवर हो बोलेन. 

राज - अट सांगून तर बघ.

श्रद्धा - जर आयुष्यभर साथ देणार असशील तरच हॊ बोलेन.

राज - कसली अट ठेवतेस , मला आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सोबतचं काढायचय.

( श्रद्धा निर्भान होऊन त्याचा शब्द न् शब्द ऐकत होती, तिला विश्वास बसत नव्हता की कुणी तिच्यावर सुद्धा इतकं प्रेम करणार आहे, तिने एक ही क्षण न घालवता राज ला हॊ बोलून टाकलं, दोघे एकमेकांसोबत खुप खुश होते वेळ पण छान जात होता, गप्पा टप्पा, भेटी- गाठी, रूसवा-फुगवा, जे प्रेमात असतं ते सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक श्रद्धा ला एक प्रश्न सारखा सतावू लागला, राज ने ही तिच्या मनातली अस्वस्थता बरोबर हेरली ) 

राज -  इतका विचार कसला करत आहेस, दोन दिवस झाले पाहत आहे मी तू खुप टेंशनमध्ये आहेस.

( राज चे हे शब्द ऐकून श्रद्धा च्या डोळयातून चटकन पाणी आले व ती बोलू लागली) 

श्रद्धा - तुझ्या घरचे मला Accept करतील ना रे...

राज - अगं बस एवढचं कारण आणि तू एवढं टेंशन घेतलं आहेस मी आजच बोलेन घरच्यांशी. 

(एवढं बोलून राज निघून गेला, श्रद्धा त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच राहीली )

राज - आई बाबा मला तुमच्याशी खुप महत्वाचं बोलायचंय. 

वडील- काय बोलायचंय.

आई - अरे बोल ना बाळा काय झालं.

 -राज -  माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय.... 

(हे ऐकताच राज च्या वडिलांना त्याचा खुप राग आला, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या आवेशातच त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली, त्याची आई मध्ये आली व बोलू लागली) 

आई - अरे तुला कळतंय का तू हे काय बोलतो आहेस, तुझी हिंमत झालीच कशी आमच्याशी असं स्वत:च्या लग्नाबद्दल बोलायची, हेच संस्कार दिलेत का आम्ही तुला, कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक.... 

("कोण कुठली मुलगी पसंत ......केली आहेस कुणास ठाऊक" हे त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानावर पडताच राज चा राग अनावर झाला)  राज - आईईईईई.....! मला हवं तेवढं बोला पण प्लीज श्रद्धा ला नका काही बोलू, खुप चांगली आहे गं ती खुप प्रेम करते ती माझ्यावर.... 

(हे ऐकताच त्याची आई स्तब्ध झाली, तिला कळून चुकलेलं की त्याची काहीच चुक नव्हती तरीही आपण त्याला बोलत आहोत, पण त्याचे वडील काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते) 

वडील- तू काहीहि बोललास तरी आम्हाला हे पटलेलं नाही, आता तू हा विषय काढून टाक डोक्यातून. 

राज - बाबा जर मला बहीण असती आणि तिला जर या परिस्थिती ला सामोरं जावं लागलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं... 

(हे ऐकून त्याचे वडील त्याच्याकडे पाहतच राहिले, राज ने ही लढाई जिंकली होती, त्याने होकार मिळवला होता, त्याच्या आई वडिलांनी मुलीला न पाहता लग्नासाठी परवानगी दिली होती. आता श्रद्धा ची वेळ  होती घरी सांगायची, त्याआधी दोघांनी भेटायचं ठरवलं.) -

श्रद्धा - मला खुप भीती वाटत आहे रे, खुप कडक आहेत माझे बाबा, मला मारतील ते मी जर हा विषय काढला तर... 

राज - मग काय करायचं ठरवलं आहेस.

श्रद्धा - राज तू ये ना प्लीज माझ्या घरी, तू सुरूवात कर मग मी सांभाळून घेईन सगळ.

राज - ठीक आहे मी येतोय उद्या तुझ्या घरी, तू फक्त तयार रहा.

श्रद्धा - ठिक आहे.

(ठरल्याप्रमाणे राज श्रद्धा च्या घरी गेला, त्याने सगळी परिस्थिती तिच्या वडिलांना सांगितली श्रद्धा च्या वडिलांचा रागाचा पारा चढला, तळपायाची आग मस्तकात, श्रद्धा ला जोरात हाक मारून बाहेर सगळ्यांसमोर बोलवण्यात आलं, श्रद्धा घाबरतच  बाहेर आली सर्वांसमोर, श्रद्धा ला विचारण्यात आलं की हा मुलगा जे बोलतो आहे ते खरे आहे काय, तिला फक्त हो किंवा नाही हे उत्तर द्यायचं होतं, राज ने त्याची कामगिरी एकदम चोख बजावली होती आता श्रद्धा ची बारी होती, श्रद्धा ने राज कडे  पाहिले राज आशेने तिच्याकडे पाहत होता बहुतेक त्याला कळून चुकलेलं की श्रद्धा भितीपोटी माघार घेईल, वातावरण खुप तापलेलं होतं, सगळे श्रद्धाच्या उत्तराची वाट पाहत होते,  श्रद्धा बोलू लागली) …

बाबा खुप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या लेकिवर, तर मग माझं पण हे कर्तव्य बनतं की माझ्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगावी जर मी तुम्हाला हे नाही सांगितलं तर मी तुमचा विश्वासघात केल्यासारखं होईल. बाबा राज जे बोलत आहे ती एक न् एक गोष्ट खरी आहे, हो प्रेम करते मी राजवर आणि तुमच्या परवानगीने मला लग्न करायचंय त्याच्याशी, प्लीज बाबा एकदा सकारात्मक पणे विचार करा आमच्या नात्याबद्दल आणि हो तुमच्या पद्धतीने त्याची कसोटी घ्या पण प्लीज एकदा त्याचा विचार करा..... 

(श्रद्धा च्या घरचे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते अन् ती बेभान होऊन आपल्या प्रेमाची बाजू मांडत होती, आणि राज आनंदाश्रू ढाळत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता, त्याला गर्व वाटत होता की एका खुपच जबाबदार व समजुतदार मुलीशी तो प्रेम करत होता) यानंतर काय.... अहो काय होणार श्रद्धाच्या वडिलांनी काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले व काही वेळांनी ते परत आले व तिच्याकडे पाहून एक मस्त स्माईल दिली, श्रद्धा ने ही जराही विलंब न करता बाबा अशी मोठी किंकाळी मारून बाबांना जोरात मिठी मारली.... आणि राज आणि श्रद्धा च  लग्न झाल.

कधी कधी प्रेमाने समजावून किंवा आपली बाजू मांडून पण आई - वडील ऐकतात. दरवेळीच टोकाची भूमिका घेणे गरजेचे नसते.

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )