पावसाळा

Article About Rainy Season

पाऊस - डोक्यावर रणरणणारे ऊन,पायाखाली तव्यासारखी तापलेली जमीन आणि अंगावर च्या घामाच्या धारा यांनी  नकोस झालेल असत. उकाड्याने माणसे हैराण झालेली असतात.  आणि त्याच वेळी पाऊस येतो धो धो कोसळत. असा हा जीवघेण्या उकाड्यापासून सोडवणूक करणारा पावसाळा कोणाला आवडणार नाही?   हा पाऊस  रुक्ष, रखरखीत सृष्टी चे रूप पालटून टाकतो. पाऊस पडून गेला की सर्वत्र हिरवळ पसरते. वृक्षवेलीहिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटतात,

शेत हिरव्यागार रोपांनी डोलू लागतात. खळखळणारे ओढे-नाले सगळीकडून वाहतअसतात. 


या पावसाची रूपे तरी किती ? कधी रिमझिम येतो, कधी तो धो धो कोसळतो; तर कधी प्रचंड गडगडाट करत विजांचा चकचकाकाट करत धुवाधार बरसतो. एखाद्या दिवशी प्रचंड काळेभोर ढग आकाशात अवतरतात भरदिवसा जणू रात्रच सुरु होते. पावसाची सर थांबते. उघडीप येते तेव्हा सर्वत्र हिरवागार गालीचा पसरल्यासारखे वाटते.

असा हा पाऊस सुखदाता आहे .  धरती मातेला सुफला बनवतो. चार महिन्यांत हा पाऊस वर्षभराच्या पाण्याची

सोय करतो..
नमस्कार.. सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )