पाऊस....

In The Rain

***पाऊस आठवणीतला ***

पाऊस.... 

पाऊस असतांना कंटाळा आल्यावर आई छोट्या मिताली मधे खेळायची.कधी छोट्या poem शिकवायची. कधी घरातले छोटे छोटे काम सांगायची.

मिताली कधी काम करायची तर कधी मी मी करून वाढवून ठेवायची.

तर हा पाऊस मितालीला घरात बसून ठेवत होता.

पाऊस बंद झाल्यावर शाळा , office ,इतर सुरळीतपणे होतांना दिसायच.

शाळेची साफसफाई होऊन परत सुरू होतांना दिसायची. पावसानंतर शाळा सुरु झाल्यावर शाळेतील मुलांची पावसावरची गाणी/ कविता ऐकू येत.

मग मिताली मैत्रीणी ते ऐकण्याचा /शब्द जोडण्याचा प्रयत्न करत.

नाही जमल तर आहेच ये रे पावसा , ये ग ये ग सरी 

आणि इतर सगळी गाणी ,पाऊस सुरु असतांना घरात केलेल्या गमती -जमती.

पावसानंतर निसर्गाने छान हिरवी गार पांघरलेली चादर बघायला मितालीला खूप आवडायचं.

बाहेर फिरायला निघाल्यावर रत्याच्या बाजूने पाणी वाहतांना दिसायच. पावसनंतर निघालेली छोटी छोटी रोप ,गवत ,त्यावर आलेली रंगबेरंगी फुलं , फुलपाखर दिसत.  मिताली फुलपाखरू पकडून बघायची.

शेतातली छोटी छोटी रोप हवेच्या तालावर नाचताना बघायला मितालीला खूप आवडे.तर कुठे कुठे पेरणी चालू दिसे.

कधी कधी ऊन पावसाच्या खेळामध्ये निघालेला इंदधनुष्य मितालीला आवडे.त्याच तिला फार नवल वाटायचं.

आई किती सुंदर रंग दिसत आहे. 

पण हे नेहमी का नाही दिसत ?

आता कसे आले ? 

कुठून आले ?

आई सागंते    ऊन आणि पाऊस एकाच वेळी असेल तेव्हा इंदधनुष्य दिसतो. सुर्य पूर्वेला असेल तर पश्चिमेला, सुर्य पश्चिमेला असेल तर पुर्वेला इंदधनुष्य दिसतो.

  उन पावसाचा खेळ चाले

           त्यातून इंदधनुष्य आले


                    निसर्गाचा सुंदर खेळ चाले

                                 त्यातून सुंदर सात रंग निघाले

*****


Like , comment करा.



























🎭 Series Post

View all