Dec 05, 2021
विनोदी

पाऊस आणि ते दोघे

Read Later
पाऊस आणि ते दोघे

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

"काय मस्त पाऊस पडतोय ना?टेरेसवर भेटूया दहा मिनिटात?" त्याचा तिला मेसेज..ती गालातल्या गालात हसत,काहीशी लाजतच,"नको कुणी बघितलं तर?" 
"कुणी नाही बघणार गं,ये लवकर..मी वाट बघतोय".. "ठिकये आलेच"..ती.दोघेही टेरेसवर आले,मनसोक्त पावसात भिजले..दोघे नजरेनेच एकमेकांशी बोलत होते,शब्दांची गरज उरली नव्हती.पावसाच्या सरी अंगावर बरसत होत्या आणि ते दोघे पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात बुडत होते. 
निशा आणि संकेत एकाच सोसायटीत राहत असताना दहा वर्षांपूर्वी असेच चोरून पावसात भिजायच्या बहाण्याने टेरेसवर येऊन एकमेकांना बघायचे,नजरेने बोलायचे...आज त्या आठवणी पुन्हा जगूया,पुन्हा चिंब भिजूया...म्हणून त्याने तिला गुपचूप टेरेसवर बोलवले होते तितक्यात मागून आवाज आला, "मम्मा पापा... तुम्ही इथे काय करताय? तुम्ही पण पावसात भिजताय वा.... मज्जाच मज्जा????"

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now