पाऊस आणि प्रेम

Cute love story of a married couple

आईवडिलांच्या इच्छेसाठी स्वतःच्या प्रेमाचा,समीरचा त्याग केला आणि अनिकेतची बायको होत बर्व्यांची सून म्हणून मुग्धा सासरी आली.अनिकेतला पहिल्याच रात्री भूतकाळ सांगून मोकळी झाली,त्यानेही समजून घेतले,तिला तिचा वेळ दिला.थोड्या दिवसात ती घरात रुळली पण अनिकेतसोबत तिचं नातं अजून बहरलं नव्हतं.एकदा दोघे कामानिमित्त बाहेर गेले होते,अचानक येताना रस्त्यात गाडी बिघडली.ढग दाटून आले होते,वीजा चमकत होत्या..अचानक धो धो पाऊस बरसू लागला..त्याला पाऊस खूप आवडायचा,तो मनसोक्त बागडत लहान मुलासारखा भिजत होता,तिची इकडे चिडचिड..ती गाडीतून बाहेर आली,वाऱ्याने तिची छत्री उडून गेली.अचानक तिचा पाय घसरून ती पडणार तितक्यात अनिकेतने तिला सावरले,आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत हरवून गेले. चिखलात पडताना वाचली पण त्या पावसामुळे अनिकेतच्या प्रेमात मात्र पडली.