Oct 16, 2021
कविता

पाऊस...

Read Later
पाऊस...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पाऊस...

A Complete Guide To Stay Fit And Avoid Diseases During The ...

तसं आपलं नातं जुनंच आहे...

जेव्हा नुकतेच आईबाबांचा हात धरून चालू लागले

तसं तुझ्या पाण्यात मला मोठ्यांनी सोडलेल्या होड्या पकडायची ओढ लागायची...

जशी काही वर्ष गेली...

तशी आता होड्या सोडणाऱ्यांच्या यादींत मी सुद्धा समाविष्ट झाले...

तू कधी जोरात येत होतास तर कधी फक्त यायचा तसा जात होतास...

पण तू यावंसं बरसावं असं मला नेहमीच वाटायचं...

थोडी अजून काही वर्ष गेली आणि आता मी शाळेत जाताना मुद्दाम भिजू लागले...

तुझ्या असण्याचा आणि मका खाण्याचा काय संबंध होता हे तर माहीत  नाही

पण मी हमखास त्यावेळी गरमागरम मका खायचे..

भोलानाथ भोलानाथ हे गाणं मी पण गायचे...

पण शाळेत पाणी साठण्यासाठी नाही, तर तू येण्यासाठी....

पुढे अजून काही वर्ष गेली...

आता थोडी माझी घाईच असायची..

कारण कॉलेज माझं सकाळचं असायचं...

आणि आता मला तुझं येणं हवं असलं तरी ते कॉलेज मध्ये जाताना नको असायचं...

पण तू तर माझीच मज्जा घ्यायचं ठरवायचास...

आणि मुद्दाम नको त्यावेळी बरसायचास...

त्यावेळी तुझा खूप राग यायचा मला...

मग तुला नावं ठेवत मी कॉलेजला जायचे...

अशीच काही वर्ष गेली...

आणि आता मात्र माझी घाई ऑफिसमध्ये वेळेत जाण्याची असते...

आता मी भोलानाथ भोलानाथ गाणं म्हणत नसले तरी तू येण्याची वाट पाहत असते...

कारण तुझं असणं आमच्या सगळ्यांना किती महत्वाचं आहे

याची मला जाणीव आहे...

आता तू येतोस, तू बरसतोस...

कधी तू पूर घेऊन येतो तर कधी दुष्काळ घेऊन येतोस...

पण आता प्रत्येकजण तुझी आतुरतेने वाट पाहत असतो...

कारण तुझ्या येण्यामागचं कारण उशिरा का होईना

प्रत्येकाला कळू लागलं आहे..

वेड्या असलेल्या माणसाला तुझी खरी किंमत कळू लागली आहे...

उशिरा का होईना माणसाला शहाणपण येऊ लागलं आहे.

तू अशीच साथ आम्हाला देत जा.. 

आणि तुझ्या बरसण्याने ही पृथ्वी हिरवीगार करुन जा...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...