रायगड एक वेड

Historical

रायगड एक वेड 


लहानपणापासून मनात एक ईच्छा होती 
की एकदातरी रायगड या  डोळ्यानी बघायचा च ......

जीवात जीव असेपर्यंत एकदा तरी माझ्या राजा ची समाधी बघून डोळ्यांचे पारणे फेडायचे च....... 

पण रायगडी जाणे एकटीला तरी शक्य नव्हते व वेळेअभावी कुणी सोबत देखील येत नव्हते. 

मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही ईच्छा अशीच पडली होती खितपत, 
जेव्हा जेव्हा मी समाधिस्थळाचा फोटो बघायचे ...
आपोआप डोळ्यात पाणी यायचे 

"राज कधी होईल हो तुमच्या भेटीची ओढ पूर्ण 
निदान या जन्मात तरी योग येऊ द्या" 
मी पाणावलेल्या डोळ्यानी राजांना विनवणी करायचे, 

असेच दिवसामागून दिवस जात होते, 
माझ्या मनात, हृदयात, लेखनात राजे रेखाटले जात होते पण वास्तवाचे काय ???
त्यात तर अजूनही ओढ होती भेटीची 
ती कधी होईल पूर्ण ??

अशातच शाळेने सहल रायगड ला नेण्याचे ठरवले, 
ज्या दिवसापासून सहलीचे ठिकाण ठरले होते
 त्या क्षणापासून मनाला फक्त राजे च दिसत होते, 

सगळी तयारी झाली व सहल निघाली, एक एक ठिकाणघेत आम्ही रायगड ला पोहोचलो 

शेवटी आलेच होते मी माझ्या राजाच्या रायगडी .............

पहाटेची वेळ 
सर्वत्र पसरलेले धुके 
व पायथ्याशी आम्ही 

भेटीलागी जीवा या ओढीने तहान भूक विसरून मी तो पायथा डोळ्यात साठवत होते, 

रायगड चढणे 
कुणा ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही 

हे फक्त मी ऐकले होते 
पण आज ते अनुभवायचे होते 
तेवढ्यात सरांचे शब्द आठवले 

गड चढायला खुप अवघड आहे 
त्यामुळे जाताना रोप वे ने व येताना पायी यायचे आहे 

 थोडी निराश झाले मी 
"काय हे....
 राजे मला फक्त बघायचे नाहीत तर अनुभवायचे आहे" 

पण ते सांगताय म्हणजे काहितरी तथ्य असेल असे समजून मी चालू लागले 

एक शिक्षक व काही विद्यार्थी असे एक एक करून सगळे रोप वे कडे सरकत होते, 

मी ही माझा ग्रुप घेऊन समोर गेले, 

"बाप रे इतके उंच जायचे आहे 
तेही यात बसून 
नको रे बाबा 
त्यापेक्षा मी खाली च बसते 
आयुष्यात पहिल्यांदाच रोप वे बघून मनात आले" 

पण आता पर्याय नव्हता च 

मी देवाचे नाव घेत त्यात बसले 
बसताना च डोळे बंद केले 
मनात हजार शंका 
मधेच तुटला तर??
बंद पडला तर ??
चक्कर आली तर 
हाड देखील सापडणार नाही पुढील विधी साठी 
घे खुप हाऊस होती ना रायगड बघायची आता भोगा कर्माची फळ " 
मनात हे द्वंद्व चालू होते 

तेवढ्या एक मुलगी ओरडली 
"Miss look down, how beautiful

माझे डोळे अजूनही बंद होते 
"कशाचं सुंदर गप बस की मला चक्कर आली मग कळेल " 
असे मनात बोलून 

"Really " 
असे फक्त तोंडावर म्हणाले 


"Miss please  open your eye's " 
ती देखील हट्टाला पेटली 

नाईलाजाने मी डोळे उघडले 

बघते तर काय ......
जणू   सृष्टी चा तो एक विलक्षण आविष्कार होता, 
खाली ती हिरवी गर्द झाडी 
वरती निळेभोर आकाश 
व मध्ये आम्ही 
आसुसलेलो भेटीसाठी 
एकदा डोळे उघडले व उघडे च राहिले इतकी जादू होती त्या सौंदर्यात 
जिवाला वेड लावणार ते निसर्ग सौंदर्य मी  हृदयात साठवत होते 
भान हरवून मी माझ्या राजा चा रायगड अनुभवत होते .....

शेवटी  आम्ही रोप वे ने सुखरूप पोहोचलो होतो 
पहिले पाऊल खाली टाकले 

.......... आपोआप हात जमिनीला टेकून कपाळी लागला नकळतपणे 

हो .....हीच ती माती आहे जिच्यावर माझ्या राजा ची पाऊले पडली असतील. 

हीच ती माती आहे जिने माझ्या राजाला राज्यकाभार शिकवला असेल.

हीच ती माती आहे जिने माझ्या राजाला 
आलिंगन दिले असेल. 

आज मी त्याच मातीवर उभा होते 
आज त्याच मातीच्या स्पर्शाने मी देखील पावन झाले होते, 
स्वप्नात पाहिलेला रायगड आज मी अनुभवत होते 
याहून मोठं सुख कोणतं असेल हो ...... .......

गाईड पुढे चालत होता व माघे आम्ही 
सगळे तो काय सांगतोय हे ऐकत होते व मी अनुभवत होते फक्त माझ्या राजा चा रायगड 

कारण आहेच माझ्या राजाचा रायगड वेड लावणारा 

त्या प्रत्येक दगडात राजांचा सहवास जाणवत होता. 
येणारी वाऱ्याची झुळूक देखील आता परिचयाची भासत होती 
एक एक पायरी ओलांडत 
त्या विस्तृत कमानीतून जेव्हा आत प्रवेश केला 

तेव्हा राज 
खरच तुमच्या राज्यात आल्याचा भास झाला ....


गाईड ने सुरुवात राण्याच्या महाला पासून केली 
त्या महालाची विस्तीर्णता बघून 
आमचीच दमछाक झाली 

अरेच्चा आपल्याला बघायला दमछाक झाली त्यांची फक्त एक राणी इथे राहात होती, 
असे एकामाघून एक सगळे राणीवसा चे महाल व त्या समोरील दासीची मकान बघून झाली

खरच काय वैभव होतं माझ्या राजाच..

नंतर तळे दाखवून त्यांनी शेवटी त्या ठिकाणी आणले च 

जिथे माझ्या राजांनी शेवटचा स्वास घेतला.... 

डोळे पाणावले ...
हृदय सोलून निघाले .....
हातपाय थरथरू लागले .....
शब्द न फुटताच ....
मनात मी बोलू लागले ...

"राजे आज हवे होता तुम्ही ....
राजे पुन्हा जन्माला या ना ....
गरज आहे ओ तुमची आम्हा सर्वाना "

डोळ्यातील पाण्याला वाट मोकळी करून देत ......

सर्वजण पुढे गेले होते 
मी मात्र अजूनही त्याच ठिकाणी होते ...

थोड्या वेळाने 

लांबपर्यंत पसरलेल्या भिंती ला बघून मी सभेत पोहोचले 


हो तिथेच पोहोचले 
जिथे माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला होता 
असा सोहळा जो बघून जगाचे डोळे दिपले होते 
डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सोहळ्याची साक्षीदार असलेल्या त्या जागेभोवती चेतने च एक वलय निर्माण झाले होते 
जे प्रेरणा देत होत बघणाऱ्या प्रत्येकाला 
हीच होती माझ्या राजाची राजसभा 
जिथे  बसून राजे 
राज्यकारभार बघायचे 
त्या ठिकाणचा बारीक आवाज 
दूरच्या कोपऱ्यापर्यंत जातो च कसा हे न उलगडलेलं कोडं आज  पुन्हा पडलं होतं 

मग बाजारपेठ त्यातील दुकाने 
एका एका ओळीत असलेली बावीस बावीस दुकाने आजही खुणा दर्शवतात 
समोर गेल्यावर 
 तो निसर्गरम्य परिसर अनुभवत अनुभवत मी 
कधी जगदीश्वराच्या गाभाऱ्यात आले 
माझे मलाच कळले नाही.

"जगदीश्वरा आले रे तुझ्या भेटीला 
एकदाची " 
असे मनात पुटपुटत घंटा वाजवली 

"त्या पायथ्याच्या दगडापासून 
महादेवाची घंटा हलवली " 

या ओळी मनात घर करत होत्या 
लगेच घेतला कागद व उतरवलं त्यांना शब्दात 


तेवढ्यात गाईड चे शब्द कानावर पडले 

"हे समाधीस्थळ" 

हा शब्द ऐकताच पाऊलांनी वेग घेतला पण त्यापूर्वी च मन तिथे जाऊन थांबले होते 
आता तो काय सांगत होता याचे काहीच भान उरले नव्हते 

फक्त हे आठवले .....

यासाठी च केला होता अट्टाहास ( उजवा हात वरती आला कोपऱ्यात त्याने वाक घेतला 
मान झुकली शरीरासाहित 
व राजांना मानाचा मुजरा केला ) 


जे स्वप्नांत पाहिले मी 
ते सत्यात व्यक्त व्हावे 
असे म्हणणारी मी 
आज उघड्या डोळ्यांनी माझ्या राजा ची समाधी बघत होते, 

आज डोळ्याचे पारणे फिटले होते 
आज जन्माला आल्याचे सार्थक झाले होते 
आज माझ्या राजाला 
मी खऱ्या अर्थाने भेटले होते 
आज या भेटीने मन तृप्त झाले होते,

का प्रत्येकाला राजाचे इतके वेड आहे हे मी आज स्वतः अनुभवले होते, 

ती श्वान समाधी धण्याशी प्रामाणिक तेची कबुली देत होती.


इथून आज मी खुप काही घेऊन वापस जाणार होते पण मानवी स्वभाव शेवटी कुठेतरी नडणारच 
ना ...
म्हणून त्या ठिकाणी पडलेला एक बारीक खडा उचलला व आजही तो जीवापाड जपला माझ्या राजा ची पाऊल खूण म्हणून.

शेवटी चालू झाला परतीचा प्रवास 
जाताना डोळयांना विलक्षण वाटणार सौंदर्य आता घामाच्या रूपाने पाझरत होतं 
हातापायानी तर कधीच रामराम ठोकला होता,
दगड ,माती ,खाच, खड्डे 
ओलांडत ओलांडत 
रडत, पडत 
आम्ही पायथ्याचा वेध घेत होतो.

"राज खरच तुमचा रायगड फक्त पुस्तकात वाचण्यात मजा नाही खरी मजा तर  अनुभवण्यात आहे " 


खाली पोहोचेपर्यत शरीराचा असा एकही अवयव नव्हता ज्यात चेतना उरली होती 
फक्त मन सोडले तर 
कारण आज ते भरून पावले होते 
माझ्या राजा ला स्वतः च्या डोळ्यानी बघून 

आम्ही रायगडावरून पायउतार झालो 
आता डांबरी रस्ता लागला होता 
पण त्या गुळगुळीत रस्त्यावर देखील ठोकरा बसत होत्या 
कारण शरीर तर खाली आले होते पण मन अजूनही वरती च होतं


शेवटी पुन्हा एकदा नजर टाकली त्या विशाल साम्राज्यावर 
व मनाशी च म्हणाले 

" बा रायगडा
पुन्हा असाच योग येऊ दे तुझ्या भेटीचा 
व एकदा नको अनेकदा येऊ दे 

जीवात जीव असे पर्यंत " 


@ खरच प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात रायगड बघावाच 
त्या मातीत जाऊन माझ्या राजा चा स्पर्श अनुभवावाच 
तरच जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटेल ....

आत मोर्चा शिवनेरी कडे 

बघू कधी योग येतो .......


मी याच रायगडी केलेली ही रचना       

राजे

युगानुयुगे बदलली,
पिढ्यान पिढ्या घडल्या,
 भवानी माते च्या या पुत्रा पुढे,
 मोठमोठ्या आसाम्याही  रडल्या..

हाती भवानी मातेची तलवार, 
मस्तकी भगवा टिळा, 
जिजाऊंच्या या वाघाने लावला ,
सर्वधर्मसमभावाचा लळा.

 वेगात वाहणारा वारा,
 जणू संकटांची चाहूल देत होता,
सुकली होती पाने-फुले,
जेव्हा माझा राजा शेवटचा श्वास घेत होता.

वैऱ्याची ती रात्र रायगडाने 
देखील अनुभवली,
पायथ्याच्या  दगडापासून 
महादेवाची घंटा हलवली. 

उन्हाळ्यात सूर्याने 
किरणे विरळ केली,
धगधगत्या ज्वालां ना
 आसरा म्हणून 
ढगांनी सावली दिली.

गर्जना झाली, 
अश्रूंचे बांध फुटले,
त्या रायगडाला साक्षी ठेवून, 
माझ्या राजाने  डोळे मिटले
माझ्या राजाने डोळे मिटले
????????????????????????????????????????????????

नमस्कार मी लेखिका गीता सूर्यभान उघडे, 

खुप वेळा ठरवले मनातील राजे प्रति असलेली भक्ती शब्दात उतरवावी पण काही चुकेल या भीतीने हिंमत च झाली नाही 
पण शेवटी आज हिंमत केलीच 
जे चुकले असेल तो माझा दोष समजून मला माफ करावे ही नम्र विनंती 
कथा आवडल्यास नावसाहित शेअर जरूर करावी 
पण साहित्य चोरी नको 
कारण लेखन हा लेखकाचा आत्मा असते.

टीप : मी काही खुप मोठी लेखिका नाही व राजे बद्दल काही लिहावं इतकी मोठी तर मुळीच नाही त्यामुळे जे चुकलं असेल ते माझा दोष समजून माफ करा व जे चांगलं वाटेल ते आई तुळजाभवानी चरणी अर्पण 

जय जिजाऊ 
जय शिवराय 
जय शंभूराजे