Feb 25, 2024
पुरुषवादी

राहू - केतू भाग 3

Read Later
राहू - केतू भाग 3गणिताचे पाढे तर राऊत सरांनी गाणी बोलून पाठांतर करायला शिकवले होते. कधी गणपतीच्या गाण्यांवर पाढे पाठ करायला शिकवले तर कधी दगड काठ्या मोजून. हे दोनच शिक्षक असे होते जे मधल्या सुट्टीत डब्बा खायला आणि आम्ही डब्ब्यात काय आणलेल आहे हे बघण्यास उत्सुक असायचे.

आमच्या वर्गात सुप्रिया म्हणून एक मुलगी होती. आई एकटीच कमवायची आणि बाप दारूवर पैसा उडवायचा. बिचारी रोज डब्यात शिळा भात आणायची कच्च मीठ मसाला टाकून. एकदिवस ही गोष्ट खिडकीतून राऊत सरांनी पाहिली आणि दुसऱ्या दिवशी पासून तिला आमच्या सोबत जेवायला घेऊ लागले. आमच्या सगळ्यांच्या पुढ्यातले घास घास देऊन तिचं जेवण संपूर्ण केलं आम्ही. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी अस काही नसायचं दोन तासांपूर्वी खाल्लेला मार लक्षातही राहत नव्हता एवढं मोकळेपणाने वावरायचो आम्ही.

सहामाही परीक्षेच्या नंतर राऊत सरांची बदली होणार होती पण आम्ही अभ्यास करणार नाही म्हणून आम्हाला त्यांनी सांगितल नव्हत कारण ते आमच्यासाठी किती प्रिय आहेत हे त्यांना चांगलच ठाऊक होत. आमची आठवड्याची एक परीक्षा व्हायची जी शाळेतर्फे असायची. ज्याची प्रश्नपत्रिका आमची शाळा काढायची. सरांनी आमच्याकडुन गणिताचा खूप अभ्यास करून घेतला आणि त्या वीस मार्काच्या परीक्षेत सगळ्यांनी पांढरा पेक्षा जास्त गुण आणले पाहिजेत अस सांगितलं होत. आम्ही पण खूप अभ्यास केला आणि चांगला पेपर लिहिला.
निकालाचा दिवस उजाडला. सगळ्या शिक्षकांनी आम्हाला आमचे पेपर दाखवले. आम्ही आमचे सगळे गुण लिहून घेतले होते पण भीती होती गणिताची. काय दिवे लागताहेत देव जाणे अशी अवस्था होती. मधल्या सुट्टीच्या आधीचा तास राऊत सरांनी घेतला. आम्हाला सगळ्यांना आमचे पेपर देण्यात आले पण पेपर जो पर्यंत देऊन होत नाही तोपर्यंत कोणीच आपले गुण बघायचे नाहीत अशी अट त्यांनी घातली. आम्ही वर्गात बासष्ट मुलं. दहा मिनिटातच पेपर देऊन झाले कारण सगळेच हजेरी क्रमांकाने उभे होते.

चला आता सगळ्यांनी आपापले गुण बघा आणि काही अडचण असेल तर विचारा!

आम्ही पेपर सरळ केले आणि....मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला गणितात वीस पैकी एकोणीस गुण मिळाले होते. मला तर अस झालं होत किती नाचू आणि उड्या मारू. सगळीच मुलं फार खुश होती कारण सगळेच जण पंधराच्या पुढे होते. आम्ही तर उड्या मारून सरांच्या गळ्यातच पडलो होतो.

तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास केला त्याचंच हे फळं आहे. असाच अभ्यास करत रहा पुढे..खूप शिका..खूप खूप मोठे व्हा. सरांचं बोलण फक्त आमच्या कानावर पडत होत पण आम्ही ऐकत नव्हतो आणि अचानक असे शब्द कानावर पडले की आम्ही एकमेकांचे पेपर बघत बडबड करत होतो आणि एकदम शांतच झालो.
क्रमशः
@ श्रावणी लोखंडे.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading

//